New Maruti Suzuki Swift : मारुती च्या या कार ने पुन्हा केला धमाका, 4 थ्या जनरेशनची नवीन स्विफ्ट मार्केट मध्ये दाखल
New Maruti Suzuki Swift : 2024 मध्ये मारुतीच्या या कार ने पुन्हा एकदा भारतात दमदार एन्ट्री केली आहे, चला तर बघूया New Maruti Suzuki Swift या कार बद्दल
New Maruti Suzuki Swift : New Maruti Suzuki Swift : भारतामध्ये Maruti Suzuki कंपनीच्या Swift या कार ने पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केली आहे. Maruti Suzuki कंपनीची हि एकमेव कार आहे ज्या कार ने अखंड भारतामध्ये धुमाकूळ घातला असून या कारला लॉन्च होऊन कित्येक वर्ष होऊन गेले तरीही आज देखील या कारची प्रचंड अशी मागणी आहे. New Maruti Suzuki Swift च्या या कारला दुसऱ्या कंपनीची कोणतीही कार टक्कर देऊ शकलेली नाही. आज देखील या कारचे लाखो युनिट मार्केटमध्ये विकले जात आहे. हे लक्षात घेऊन कंपनीने परत या कारमध्ये नवीन फीचर्स ऍड करत नवी कोरी Swift मार्केटमध्ये उतरविली आहे. देशातील ही 1 नंबर हेच बॅक कार आहे.
Maruti कंपनीची लोकप्रिय ठरलेली हि देशातील एकमेव कार आहे. चौथ्या जनरेशन ची Maruti ची ही Swift कार आहे. या कारमध्ये नवीन फीचर्स अनेक ॲड केले गेले आहेत. त्याचबरोबर या नवी कोरी Swift कारचा खूप दिवसांपासून ग्राहक प्रतीक्षा करत होते. आता हि मार्केटमध्ये आली असून ग्राहकांची गर्दी होणार आहेत. कंपनीने डिझाईन, फीचर्स आणि इंजिन मध्ये बदल करत कार मध्ये अनेक बदल केले आहेत. आता ही कार अधिक स्टायलिश आणि लुक मध्ये रुबाबदार झालेली आहे. या कारमधील ZXI + हे टॉपचे मॉडेल असणार आहे. चला तर आज आपण जाणून घेऊया या कार बद्दल सविस्तर
New Maruti Suzuki Swift Variant किती व्हेरिएंट मध्ये ही कार उपलब्ध
नवीन Maruti कंपनीची Swift 2024 चे चौथ्या जनरेशनचे 5 व्हेरिएंट मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहे. यामध्ये LXI, VXI, VXI(O), ZXI,ZXI(O), ZXI+ अशा 5 प्रकार यात समावेश आहे. या 5 व्हेरिएंट पैकी LXI हे बेस वेरियंट आहे. आणि VXI, VXI(O) हे मधले व्हेरीएंट आहे. तर ZXI आणि ZXI + हे टॉपचे व्हेरियंट असणार आहे. सध्या कंपनीने या 5 व्हेरिएंट मध्ये कार लॉन्च केली आहे. यामध्ये नवीन व्हेरिएंट देखील नंतर समाविष्ट होऊ शकतात.
New Maruti Suzuki Swift Color कलर ऑप्शन किती असणार
चौथ्या जनरेशन ची Maruti कंपनीची Swift 5 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध झालेली असून या नवीन Swift मध्ये आपल्याला एकूण 9 कलर ऑप्शन मिळणार आहेत. ही नवीन कार 2 गियर प्रकार मध्ये उपलब्ध असणार आहे. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल अशा 2 प्रकारांमध्ये ही कार उपलब्ध असून त्यानुसार New Maruti Suzuki Swift कारचे अनेक व्हेरिएंट मार्केटमध्ये असणार आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मुळे ही कार अनेक मॉडेल मध्ये उपलब्ध असेल आणि त्यामुळे ही कार आपल्याला 9 कलर ऑप्शन मध्ये भेटू शकते.
New Maruti Suzuki Swift Price किंमत किती असणार
नवीन Swift 2024 च्या चौथ्या जनरेशनची कार बुकिंग सुरू झालेली असून ही कार बुक करण्यासाठी तुम्ही फक्त 11000 /- रुपये भरून सुद्धा बुक करू शकतात. यासाठी जवळील डीलरला भेट देऊ शकता या कारची डिलिव्हरीही 2024 च्या जून महिन्यापासून सुरू झालेली आहे. अगदी कमी रक्कम मध्ये देखील ही कार आता आपल्याला बुक करता येऊ शकते. फक्त 11 हजार रुपये भरून आपण नवीन कोरी Maruti ची Swift घरी घेऊन जाऊ शकता. या कारच्या किंमत बद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने या कारच्या बेस व्हेरिएंट ची किंमत ही 6.49 लाख रुपये एक्स शोरूम इतकी ठेवली आहे.
तर यामधील टॉप व्हेरिएंट ची एक्स शोरूम किंमत ही 9.64 लाख रुपये आहे. कंपनीने कमी किंमत मध्येच नवीन Marutiची Swift बनविली असून या कार मध्ये अनेक फीचर्स ॲड करण्यात आलेले आहे. त्यामुळे ग्राहकांना अगदी कमी किमतीत त्यांच्या आवडीचे Swift कार खरेदी करता येणार आहे. या नवीन Swift कारची स्पर्धा मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या टाटा च्या Tiago या कार सोबत होणार आहेत.
New Maruti Suzuki Swift Engine इंजिन
New Maruti Suzuki Swift च्या मॉडेलमध्ये अनेक बदल करण्यात आलेले असून त्यामधील मुख्य बदल हा इंजिन मध्ये करण्यात आलेला आहे. यामध्ये आपल्याला 1.2 लिटरचे Z सिरीज चे पेट्रोल इंजिन देण्यात आलेले असून या इंजिन मध्ये 3 सिलेंडर आहेत. तसेच हे इंजिन 82 PS पावर आणि 112nm चा टॉर्क जनरेट करून शकते. तसेच हे इंजिन हायब्रीड टेक्नॉलॉजीच्या पद्धतीवर कार्य करते त्यामुळे हे इंजिन जास्त पावर जनरेट करू शकते.
यामुळे कारचे मायलेज देखील वाढते. हे नवीन इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक अशा 2 प्रकारच्या गिअरबॉक्स मध्ये उपलब्ध असणार आहेत. जुन्या Swift च्या तुलनेत या नवीन Swift च्या इंजिन मध्ये बदल करण्यात आल्यामुळे आता नवीन Swift मॅन्युअल मॉडेल हे 10% पर्यंत जास्त मायलेज देऊ शकते तर ऑटोमॅटिक मॉडेल हे 15% पर्यंत जास्त मायलेज देऊ शकते. असे Maruti Suzuki कंपनीचा दावा आहे.
New Maruti Suzuki Swift Mileage मायलेज
नवीन डिझाईन केले गेलेल्या Maruti Swift या कार मध्ये इंजिन मध्ये मोठा बदल केल्याने आता या कारच्या मायलेजमध्ये भर पडणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या कारचे मायलेज हे 25.75 kmpl पर्यंत असणार आहेत. जुन्या Swiftच्या तुलनेत या नवीन Swift चे मायलेज हे जास्त असणार आहेत. ही कार फक्त पेट्रोल व्हेरियंट मध्ये उपलब्ध असणार आहे. या कारच्या इंधन टाकीची स्टोरेज क्षमता ही 37 लिटरची आहे तसेच ही कार BS VI 2.0 या इमीशन नॉम्स वर आधारित आहे.
New Maruti Suzuki Swift Suspension, Brakes सस्पेन्शन आणि ब्रेक
या कार मध्ये आपल्याला पुढील चाकांसाठी मॅक फर्जंन तर मागील चाकांसाठी टोरशन बीम या प्रकारचे सस्पेन्शन देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या कारमधील स्टेरिंग हे इलेक्ट्रिकल प्रकाराचे दिलेले आहे. त्याचबरोबर हे स्टेरिंग ऍडजेस्ट देखील करता येऊ शकते. New Maruti Suzuki Swift कारची टर्निंग रेडीयस ही 4.8 मीटर इतकी आहे. तसेच या कारच्या पुढील चाकांसाठी व्हेंटिलेटेड डिस्क ब्रेक वापरण्यात आलेले आहे. तर मागील चाकांसाठी ड्रम ब्रेकचा वापर करण्यात आलेला आहे. या कारचे चारही व्हील हे अलॉय व्हील देण्यात आलेले आहेत. हे अलॉय व्हील 15 इंच चे देण्यात आलेले आहेत.
New Maruti Suzuki Swift Size साईज
Swift कार हॅशबॅक मध्ये असून ही एक कॉम्पॅक्ट कार आहे. या कारची लांबी 3860mm रुंदी 1735 mm हाईट 1520mm इतकी देण्यात आलेली आहे. तसेच या कारच्या मागील बाजूस बूट स्पेस देखील मोठा आहे या कारमध्ये बूट स्पेस आपल्याला 265 लिटरचा मिळतो. या कार ची सीटिंग कॅपॅसिटी ही 5 लोकांची आहेत. ज्यामध्ये पुढे 2 आणि मागे 3 जण बसू शकतात. या कारचा ग्राउंड क्लिअरन्स हा 163 mm एवढा आहे. तसेच या कारचा व्हील बेस हा 2450mm इतका आहे. या कार चे वजन हे 925kg इतके आहे. या कार मध्ये एकूण 5 दरवाजे देण्यात आलेले आहे. ज्यामध्ये उजव्या बाजूने 2 डाव्या बाजूने 2 आणि मागील बूट स्पेस साठी 1 देण्यात आलेला आहे.
New Maruti Suzuki Swift Features फीचर्स
या कार मध्ये फीचर ची कुठलीही कमतरता कंपनीने ठेवलेली नाही. कार मध्ये 9 इंच चा इन्फोटेनमेंट डिस्प्ले देण्यात आलेला असून हा डिस्प्ले स्मार्ट प्रो प्लस पद्धतीचा आहे. तसेच कार मध्ये अनेक फीचर्स दिलेले आहे. ज्यामध्ये वायरलेस चार्जिंग, वाईड अँगल रियर कॅमेरा, टाईप A आणि टाइप C चार्जिंग पोर्ट, एलईडी प्रोजेक्टर हेडलाईट, एलईडी टेल लॅम्प आणि एलईडी फॉग लॅम्प असे अनेक नवीन फीचर्स कंपनीने आता या कार मध्ये ऍड केले आहेत.
हे देखील वाचा : Wings EV Robin : हि कार एम जी कॉमेट ला धूळ चारणार, जाणून घ्या कींमत
New Maruti Suzuki Swift Safety सेफ्टी
सेफ्टी बद्दल बोलायचे झाल्यास या कार मध्ये ABS सिस्टीम ची ब्रेकिंग सिस्टीम दिलेली असून या कार मध्ये सेंट्रल लॉकिंग, अँटी थिफ्ट अलार्म, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन असे फीचर्स दिलेले आहेत. कंपनीने या कार मध्ये एकूण 6 एअरबॅग दिले आहे. ज्यामध्ये एअर बॅग या ड्रायव्हर आणि पॅसेंजर यासाठी सेपरेट दिलेल्या असून या एअरबॅग साईडने देखील उपलब्ध आहेत. या कारमध्ये कर्टन एअरबॅग देखील उपलब्ध आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल पद्धतीचा वापर देखील या कार मध्ये करण्यात आलेला आहे. सीट बेल्ट वार्निंग, डोअर अझर वार्निंग, इंजिन इमोबलाइजर, स्पीड अलर्ट स्पीड सेन्सिंग, हिल असिस्ट आणि स्पीड सेन्सिंग ऑटो डोर लॉक अशा अनेक सेफ्टी फीचर्स कंपनीने आता कार मध्ये दिलेल्या आहेत.
New Maruti Suzuki Swift आरामदायक सुविधा
New Maruti Suzuki Swift कारच्या मागील आणि पुढील काचा या पॉवर विंडोज देण्यात आलेल्या आहे. तसेच New Maruti Suzuki Swift कार मध्ये पावरफुल एसी दिलेला असून हीटर देखील उपलब्ध आहे. या कारमध्ये पॉवर स्टेरिंग दिलेले आहे आणि ते ऍडजेस्टेबल आहेत त्याचबरोबर ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट देखील या कार मध्ये उपलब्ध आहेत.
ऑटो क्लायमेट कंट्रोलचा देखील या कारमध्ये वापर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ॲक्सेसरी पावर आउटलेट, व्हॅनिटी मिरर, रियर सीट हेड रेस्ट, ऍडजेस्टेबल हेड रेस्ट, कप होल्डर, क्रूज कंट्रोल, पार्किंग सेन्सर, रियल टाईम विकल ट्रेकिंग, फोल्डेबल रियर सीट, किलेस एन्ट्री, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन, यु एस बी चार्जर, आयडियल स्टार्ट स्टॉप सिस्टीम, ऑटोमॅटिक हेडलाईट अश्या खूप सार्या आरामदायक सुविधा कंपनीने या कारमध्ये दिलेल्या आहेत.