IND Vs SL 3rd T20 Highlights : अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव, सुपर ओव्हर मध्ये भारताने सामना जिंकला
IND Vs SL 3rd T20 Highlights : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या तिसऱ्या अंतिम T20 सामन्यात भारताने श्रीलंकेला सुपर ओव्हर मध्ये पराभूत केले आहे. IND Vs SL 3rd T20 Highlights हा सामना श्रीलंकेच्या पालेकेले येथील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वर खेळविण्यात आला होता. या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने या अगोदर झालेल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवीत मालिका आपल्या नावावर केली आहे.
IND Vs SL 3rd T20 Highlights : तिसरा T20 सामना हा भारताने जिंकत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे. या तिसऱ्या t20 सामन्यात श्रीलंका संघाने चांगले प्रदर्शन केले होते हा सामना पूर्णपणे श्रीलंका संघाचा हातामध्ये होता. परंतु भारतीय गोलंदाजांनी कमबॅक करत श्रीलंके संघाला बॅट फूट वर आणले आणि हा सामना टाय झाला. IND Vs SL 3rd T20 Highlights त्यानंतर श्रीलंका संघाच्या फलंदाजानी सुपर ओव्हर मध्ये चांगले प्रदर्शन केले नाही. सुपर ओव्हर मध्ये वॉशिंग्टन सुंदर यानी गोलंदाजी घेतली होती श्रीलंके संघाकडून सुपर ओवर मध्ये फक्त दोनच धावा निघाल्या आणि 2 गडी बाद झाले. त्यानंतर भारतीय संघाला मिळालेले 3 धावांचे आव्हान हे भारतीय संघाने पहिल्या चेंडूमध्येच पूर्ण केले.
सूर्यकुमार यादव यानी सुपर ओवरच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारत हा सामना जिंकला. या सामन्यामध्ये श्रीलंका संघाची सुरुवातीपासून चांगली पकड होती सामना श्रीलंका संघ सहजपणे जिंकला असे वाटत होते. परंतु श्रीलंका संघाच्या 2 विकेट पडल्यानंतर त्या नंतर कोणताही फलंदाज मैदानात टिकला नाही. (IND Vs SL 3rd T20 Highlights) श्रीलंकाच्या एका पाठोपाठ 1 विकेट पडतच राहिल्या. या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर मध्ये 9 गडी गमावत 137 धावा केल्या होत्या.सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांकडून चांगली फलंदाजी झाली नाही.
भारतीय संघाची फलंदाजी (IND Vs SL 3rd T20 Highlights)
प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आल्यानंतर भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गील ही जोडी मैदानात उतरली होती (IND Vs SL 3rd T20 Highlights) या जोडीने देखील या सामन्यात चांगले प्रदर्शन केले नाही. संघाचे धावफलक 11 असताना भारतीय संघाची पहिली विकेट पडली. दुसऱ्या ओवरच्या शेवटच्या चेंडू यशस्वी जयस्वाल बाद झाला त्याला तीक्षना याने पायचीत बाद केले. यशस्वी जयस्वाल यानी 9 चेंडू मध्ये 10 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 2 चौकार लगावले होते यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी भारतीय संघाचा एसटी रक्षक संजू सॅमसन हा फलंदाजीसाठी आला मागील सामन्यात शून्य धावांवर बाद होणारा संजू सॅमसन या सामन्यात देखील शून्य धावांवरच बाद झाला.
संजू सॅमसन यानी 4 चेंडू मध्ये शून्य धावा करून बाद झाला त्याला चामेंडू याने हसरंगा च्या हाती झेल देत बाद केले. आता भारतीय संघाची स्थिती 12 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी भारतीय संघाचा युवा आक्रमक फलंदाज रिंकू सिंग हा मैदानात आला. परंतु रिंकू सिंग देखील जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाही. चौथ्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर रिंकू सिंग बाद झाला. संघाचे धावफलक 14 असताना भारतीय संघाची तिसरी विकेट पडली रिंकू सिंग याला तीक्षना याने पथीरानाच्या च्या हाती झेल देत बाद केले. रिंकू सिंग यानी 2 चेंडू मध्ये 1 धाव केली होती. आता भारतीय संघाची स्थिती नाजूक झाली होती. अवघ्या 14 धावांवर भारतीय संघाच्या 3 विकेट गेल्या होत्या.
रिंकू सिंग बाद झाल्यानंतर शुभमन च्या साथीला भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा मैदानात आला. या जोडीने सावकाशपणे खेळत भारतीय संघाचे धावफलक पुढे नेले. परंतु ही जोडी देखील जास्त मैदानात टिकू शकली नाही. संघाचे धावफलक 30 असताना भारतीय संघाची चौथी विकेट पडली. (IND Vs SL 3rd T20 Highlights) सूर्यकुमार यादव हा बाद झाला त्याला फर्नांडो यानी हसरंगा च्या हाती झेल देत बात केले. सूर्यकुमार यादव यानी 9 चेंडू मध्ये 8 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार लगावला होता 30 धावांवर भारतीय संघाच्या 4 विकेट पडल्या होत्या. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी शिवम दुबे हा मैदानात आला. या जोडीने संयमाने खेळण्याचा प्रयत्न केला धावफलकामध्ये 18 धावांची भर पडली आणि शिवम दुबे बाद झाला धावफलक 48 असताना भारतीय संघाची पाचवी विकेट पडली.
नवव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर शिवम दुबे याला मेंडीस याने कुशल च्या हाती झेल देत बाद केले. शिवम दुबे यानी 14 चेंडूंचा सामना करताना 13 धावा केल्या होत्या. शुभमन गील ला कोणताही फलंदाज चांगली साथ देत नव्हता. शिवम बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी रियान पराग हा मैदानात आला. रियान पराग आणि शुभमन गील या जोडीने सावकाशपणे खेळत भारतीय संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला. (IND Vs SL 3rd T20 Highlights) 15 ओवर मध्ये भारतीय संघाने 100 धावा पूर्ण केल्या. शुभमन गील 39 धावा करून बाद झाला त्याने 37 चेंडूंचा सामना करताना एकूण 40 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 3 चौकार लगावले होते. संघाचे 102 धाव फलक असताना भारतीय संघाची सहावी विकेट पडली.
आता रियान पराग च्या साथीला फलंदाजीसाठी वाशिंग्टन सुंदर हा मैदानात आला वाशिंग्टन सुंदर आणि रियान पराग या जोडीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु रियान पराग देखील बाद झाला. 16 व्या ओवरच्या पाचव्या चेंडूवर रियान पराग याला हसरांगा याने मेंडीस च्या हाती झेल देत बाद केले. भारतीय संघाची स्थिती 105 धावा 7 गडी बाद अशी झाली होती. रियान पराग यानी 18 चेंडू मध्ये 26 धावा केल्या होत्या त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार लगावला होता. रियान पराग बाद झाल्यानंतर वाशिंग्टन सुंदर च्या साथीला फलंदाजीसाठी रवी बिश्नोई हा मैदानात आला. रवी बिश्नोई याने वाशिंग्टन सुंदरला चांगली साथ देत संघाचे धावफलक पुढे नेले.
शेवटच्या ओव्हर पर्यंत ही जोडी टिकून खेळली संघाचे धावफलक 137 असताना वाशिंग्टन सुंदर याला तिक्षणा याने बोल्ड केले. वॉशिंग्टन ने 18 चेंडू मध्ये 25 धावा करत 1 षटकार आणि 2 चौकार लगावले होते. वॉशिंग्टन सुंदर हा महत्त्वाचे खेळी करून बाद झाला. शेवटच्या ओवरच्या पाचव्या चेंडूवर वाशिंग्टन बाद झाला. आता 1 चेंडू शिल्लक होता आणि रवी बिश्नोईच्या साथीला फलंदाजीसाठी सिराज हा मैदानात आला. अखेरच्या चेंडूवर 1 धाव काढण्याच्या प्रयत्नात सीराज हा बाद झाला.
त्याला कुशल मेंडीस याने धावबाद केले आणि भारतीय संघाने 20 ओवर मध्ये 9 गडी गमावत 137 धावा केल्या. भारतीय संघाकडून फलंदाजी मध्ये शुभमन गील यानी चांगली खेळी केली. (IND Vs SL 3rd T20 Highlights) त्याचबरोबर वाशिंग्टन सुंदर आणि रियान पराग यानी देखील मोठे योगदान दिले. श्रीलंका संघाकडून गोलंदाजी मध्ये तीक्षना यानी 3 गडी बाद केले, तर हसरांगा याला 2 विकेट मिळाल्या, चामेंडू, फर्नांडो, मेंडीस यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. भारतीय संघाने पावरप्लेमध्ये 30 धावा काढल्या होत्या.
श्रीलंका संघाची फलंदाजी (IND Vs SL 3rd T20 Highlights)
भारतीय संघाने श्रीलंका संघाला जिंकण्यासाठी 20 ओव्हर मध्ये 138 धावांचे आव्हान दिले होते हे आव्हान सोपे होते. या सामन्यामध्ये भारतीय संघाचे फलंदाज हे चांगली कामगिरी न करू शकल्याने भारतीय संघ हा मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. श्रीलंका संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी निसंका आणि कुशल ही जोडी मैदानात आली. या जोडीने सुरुवातीपासूनच संयमाने खेळी केली जिंकण्यासाठी छोटे आव्हान मिळाले असल्याने श्रीलंका संघाचे फलंदाज हे सावकाशपणे खेळत कुठलीही चूक न करता खेळत होते. सलामीच्या या जोडीने श्रीलंका संघाला चांगली सुरुवात करून दिली.
या जोडीने श्रीलंकेला 50 धावांचा पल्ला गाठून दिला आणि संघाचे धावफलक 58 असताना श्रीलंका संघाची पहिली विकेट पडली. नवव्या ओवरच्या पाचव्या चेंडूवर निसंका हा बाद झाला त्याला रवी बिश्नोई याने रियान पराग च्या हाती झेल देत बात केले. निसंका यानी 27 चेंडू मध्ये 26 धावा केल्या त्यामध्ये 5 चौकार लगावले होते. तो बाद झाल्यानंतर कुशल मेंडीस च्या साथीला कुशल परेरा हा मैदानात आला. या दोघांनी देखील कुठलीही घाई न करता सावकाशपणे खेळत संघाचे धावफलक पुढे नेले. भारतीय संघाच्या गोलंदाजांना विकेट घेण्यात यश येत नव्हते.
या जोडीने संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला. संघाचे धावफलक 110 असताना श्रीलंका संघाची दुसरी विकेट पडली. सोळाव्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर कुशल मेंडीस बाद झाला त्याला रवी बिश्नोई यानी पायचीत केले. कुशल मेडिस यानी 41 धावा केल्या त्यामध्ये 3 चौकार लगावले होते. आता श्रीलंका संघाला जिंकण्यासाठी 28 चेंडू मध्ये 28 धावांची गरज होती. हा सामना श्रीलंका संघाच्या पूर्ण हातात होता. (IND Vs SL 3rd T20 Highlights) कुशल मेंडीस बाद झाल्यानंतर कुशल परेरा च्या साथीला फलंदाजीसाठी हसरंगा हा मैदानात आला. परंतु तो जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाहीत. संघाचे धावफलक 117 असतानाच हसरंगा बाद झाला त्याला वाशिंग्टन सुंदर यानी रवी बिश्नोईच्या हाती झेल देत बाद केले.
हसरंगा याने 4 चेंडू मध्ये 3 धावा केल्या होत्या. सतराव्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. तो बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी असलंका हा मैदानात आला. परंतु तो आपले खाते न खोलता पहिल्या चेंडूवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर यानी सलग 2 विकेट घेतल्या असलंका हा शून्य धावा वर बाद झाला. त्याला वाशिंग्टन सुंदर यानी सॅमसन च्या हाती झेल देत बाद केले. आता श्रीलंका संघाची स्थिती 117 धावा 4 गडी बाद अशी झाली होती. एकापाठोपाठ एक विकेट पडल्या आणि श्रीलंका संघ आता दबावा मध्ये आला होता. असलंका बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी रमेश मेंडीस हा मैदानात आला. एका बाजूने कुशल परेरा हा चांगली फलंदाजी करत होता संघाला जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज होती.
परंतु संघाचे धावफलक 129 असताना कुशल परेरा बाद झाला. त्याला रिंकू सिंग याने झेल घेत बाद केले. कुशल परेरा यानी 34 चेंडूमध्ये 46 धावा केल्या होत्या त्यामध्ये 5 चौकार लगावले होते. आता श्रीलंका संघाची स्थिती 129 धावा 5 गाडी बाद अशी झाली होती. आता श्रीलंका संघाला जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 9 धावांची गरज होती. कुशल परेरा बाद झाल्यानंतर रमेश मेंडीस च्या साथीला कमेंडू मेंडीस हा मैदानात आला. आता भारतीय गोलंदाजांनी श्रीलंका संघाच्या फलंदाजावर दडपण आणले होते. 19 व्या ओवरच्या शेवटच्या चेंडूवर रमेश मेंडीस बाद झाला. संघाचे धावफलक 132 असताना श्रीलंका संघाची सहावी विकेट पडली.
(IND Vs SL 3rd T20 Highlights) रमेश मेंडीस याला रिंकू सिंग याने शुभमन गिल च्या हाती झेल देत बाद केले. रमेश मेंडीस ने 6 चेंडू मध्ये 3 धावा केल्या होत्या. आता श्रीलंका संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज होती. अखेरची ओवर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने घेतली.विसाव्या ओवरच्या दुसऱ्या चेंडू वर कमेंडू मेंडीस देखील बाद झाला. त्याला सूर्यकुमार यादव यानी रिंकू सिंग च्या हाती झेल देत बाद केले. आता फलंदाजीसाठी फेर्नार्डो मैदानात आला. परंतु पुढच्या चेंडूवर तीक्षना हा बाद झाला.
त्याला पहिल्या चेंडूवर सूर्यकुमार यादव यानी बाद केले. तीक्षणा यानी 1 चेंडूमध्ये शून्य धाव केली. आता श्रीलंका संघाची स्थिती 132 धावा 8 गाडी बाद अशी झाली होती. अजूनही श्रीलंका संघाला जिंकण्यासाठी 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज होती. चामिंदू याने 1 चौकार लगावला आणि अखेरच्या चेंडूवर 1 धाव काढून हा सामना बरोबरीत संपला. श्रीलंका संघाने 20 ओव्हर मध्ये 8 गडी गमावत 137 धावा केल्या. हा सामना बरोबरीत संपल्यानंतर ही मॅच सुपर ओव्हर मध्ये गेली.
सुपर ओवर श्रीलंका संघ (IND Vs SL 3rd T20 Highlights)
सुपर ओवर मध्ये श्रीलंका संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी कुशल मेंडीस आणि कुशल परेरा ही जोडी मैदानात आली आणि भारतीय संघाकडून गोलंदाजी मध्ये वॉशिंग्टन सुंदर यानी गोलंदाजी घेतली. पहिल्या चेंडूवर 1 धाव निघाली आणि 1 बॉल हा वाईड गेला. 1 चेंडू मध्ये श्रीलंका संघाने 2 धावा केल्या आणि दुसऱ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदर याने कुशल परेरा याला बाद केले. (IND Vs SL 3rd T20 Highlights) वॉशिंग्टन सुंदर यानी कुशल परेराला रवी बिश्नोई च्या हाती झेल देत बाद केले. कुशल परेरा 0 धावावर बाद झाला.
तो बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात निसंका आला आणि पुढच्याच चेंडूवर वाशिंग्टन सुंदर याने निसंका याला देखील बाद केले. जोऱ्याचा टोला लगावण्याच्या प्रयत्नात निसंका हा रिंकू सिंग च्या हाती झेल देत बाद झाला. अशा प्रकारे श्रीलंका संघाच्या 2 विकेट पडल्या आणि सुपर ओवर मध्ये श्रीलंका संघ हा फक्त 2 च धावा करू शकला. भारतीय संघाला जिंकण्यासाठी सुपर ओव्हर मध्ये 3 धावांचे लक्ष देण्यात आले.
सुपर ओवर भारतीय संघ (IND Vs SL 3rd T20 Highlights)
श्रीलंका संघाकडून 3 धावांचे आव्हान मिळाल्या नंतर भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी सूर्यकुमार यादव आणि शुभमन गील ही जोडी मैदानात आली. गोलंदाजीसाठी तीक्षना याने गोलंदाजी घेतली. भारतीय संघाला जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव याने चौकार लगावला आणि भारतीय संघ हा सामना जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने सुपर ओव्हर मध्ये सामना जिंकत 3 सामनांच्या मालिकेमध्ये 3 सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली आणि श्रीलंका संघाला क्लीन स्वीप दिला.
हे देखील वाचा : TATA Nexon CNG : आली आहे देशातील no 1 CNG कार, जाणून घ्या कींमत
सामन्याचा मानकरी (IND Vs SL 3rd T20 Highlights)
(IND Vs SL 3rd T20 Highlights) या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजी त्याच बरोबर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करणारा भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर हा या सामन्याचा मानकरी ठरला.
मालिकावीर (IND Vs SL 3rd T20 Highlights)
भारतीय संघाचा कप्तान सूर्यकुमार यादव हा या मालिकेचा मालिकावीर ठरला. सूर्यकुमार यादव याने तीनही सामन्यात उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आणि आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला 3 विजय मिळवून दिले आणि मालिकाहि जिंकली.
हे देखील वाचा : Hyundai Exter : हि आहे Hyundai ची जबरदस्त SUV कार, कींमत फक्त 6 लाख