Favarni Pump Yojana : फवारणी पंप वर मिळणार 100% अनुदान, असा करा अर्ज
नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती करण्यासाठी अनेक उपकरनांची गरज हि भासत असते. सध्याच्या काळामध्ये शेतीसाठी योग्य उपकरणाचा उपयोग केला तरच शेती ही फायद्याची ठरू शकते. प्रगतशील देशांमध्ये शेती ही पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा वापर करून केली जाते. त्याचप्रमाणे आता भारतामध्ये देखील अनेक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती हि करण्यात येत आहे. सरकार देखील आता शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन योजना राबवत असून शेतीसाठी लागणाऱ्या अनेक उपकरणांमध्ये देखील सरकार मदत करत आहे. सरकारकडून विविध कृषी यंत्र खरेदीवर अनुदान वितरित करण्यात येत आहे.
शेतीला आवश्यक असणारे उपकरणांमध्ये फवारणी पंप हे एक अति महत्त्वाचे यंत्र आहे. या फवारणी पंप मध्ये बॅटरी दिलेली असून हा स्वयंचलित आहे. इलेक्ट्रिकल फवारणी पंप चा वापर करून शेतकरी पिकाला फवारणी करू शकतो. या उपकरणामुळे शेतकऱ्याचा खूप सारा वेळ वाचतो आणि शारीरिक कष्ट देखील कमी लागतात. सरकारने 2024 – 25 मध्ये बॅटरी चलीत फवारणी पंप वाटप सुरू केली असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याकरिता आवश्यक असणारा अर्ज कसा भरायचा ते आपण आता बघूया.
Favarni Pump Yojana योजनेसाठी पात्रता
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
- यापूर्वी कृषी शेतकऱ्याने यांत्रिकीकरन योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- यापूर्वी बॅटरी चलित पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
Favarni Pump Yojana आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड असणे गरजेचे आहे
- 7/12 असणे गरजेचे आहे
- 8 अ दाखला आवश्यक आहे
- स्वयंघोषणापत्र
- मोबाईल नंबर
- बँक मध्ये खाते असणे गरजेचे आहे
- बँक पासबुक
- अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक हा मोबाईल क्रमांक सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा भरायचा
तुम्ही हा अर्ज मोबाईल किंवा कम्प्युटर वर देखील भरू शकता यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला शेतकरी योजना हा पर्याय दिसेल त्यामध्ये आपण जर यापूर्वी नोंदणी केली नसेल तर सर्वप्रथम आपणास नोंदणी करून घ्यावी लागेल. नोंदणी केल्यानंतर आपणास लॉग इन करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपणास आधार नंबर टाकावा लागेल त्यानंतर (OTP) ओटीपी मोबाईल क्रमांक (Mobile Number) वर आल्या नंतर ओटीपी टाकून लॉगिन पर्याय वर क्लिक करावे लागेल.आता लॉग इन केल्या नंतर खाली दिलेल्या माहितनुसार अर्ज करावा.
- सर्वप्रथम कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडा
- तपशील मध्ये मनुष्यचलित अवजार हा पर्याय निवडा
- यानंतर पीक संरक्षण अवजार पर्याय हा पर्याय निवडा
- मशीन प्रकार मध्ये बॅटरी स्वयंचलित फवारणी पंप या पर्यायावर क्लिक करा
- त्याखाली योजनेच्या अटी आणि शर्ती मान्य करा या समोर दिलेल्या चौकटीत क्लिक करा (Favarni Pump Yojana)
- जतन करा या पर्यायावर क्लिक करा
- यानंतर आपणास अजून अर्ज करायचा आहे का, करायचा असेल तर होय वर क्लिक करा, नसेल करायचा तर नाही पर्याय वर क्लिक करा
- यानंतर अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा
- देण्यात आलेल्या सर्व सूचना वाचून ओके पर्यायावर क्लिक करा
- आपण भरलेल्या अर्जाला प्राधान्य क्रमांक द्या
- यानंतर आपल्याला 23.60 रुपये एवढे शुल्क भरावे लागेल
- शुल्क भरल्यानंतर आपण भरलेल्या अर्जाची प्रत प्राप्त होईल (Favarni Pump Yojana)