तुमच्या बँक खात्यात 3000/- रु अजून आले नाही? आता काय कराव? या 3 गोष्टि घ्या समजून :Ladki Bahin Yojana Installment

तुमच्या बँक खात्यात 3000/- रु अजून आले नाही? आता काय कराव? या 3 गोष्टि घ्या समजून :Ladki Bahin Yojana Installment

Ladki Bahin Yojana Installment : लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत बहुतांश महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आले आहे. महिलांना 2 हप्त्याचे 3000/- एकाच वेळेस मिळत आहे. परंतु अजून देखील बहुतेक महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा झालेला नाही. यामागे कोणते कारणे आहे ते बघूया. 

Ladki Bahin Yojana Installment
Ladki Bahin Yojana Installment

Ladki Bahin Yojana Installment : आतापर्यंत शासनाकडून जवळपास 80 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. संबंधित योजनेसाठी सरकारने कोट्यावधी रुपये या योजनेवर खर्च केले आहे. आतापर्यंत या योजनेसाठी खूप सारे अर्ज आलेले आहेत. त्यातील बरेच अर्ज रद्द देखील झालेले आहे, त्यामुळे काही महिलांना अजून देखील हप्ता मिळालेला नाही. 

ज्या महिलांना अद्याप हप्ता मिळलेला नाही, त्यांना हप्ता हा मिळणारच आहे. यासाठी तुमचा अर्ज अपलोड झालेला आहे का? ऑनलाईन चेक केल्यानंतर अर्ज अपलोड दाखवत आहे का? अर्ज रिजेक्ट दाखवत आहे का? या सर्व बाबी ऑनलाईन चेक केल्या पाहिजे, तरच तुम्हाला अर्जा मधील कारण समजेल. 

पहिलं मुख्य कारण 

राज्य सरकारने महिलांच्या बँक खात्य मध्ये हप्ता जमा करणे सुरू केलेले असून, रक्षाबंधनच्या अगोदर पात्र महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा झाल्यानंतर, बाकीच्या पात्र महिलांच्या खात्यात 17 ऑगस्ट पर्यंत पैसे जमा करू असे आश्वासन राज्य सरकारने केले आहे. हप्ता जमा होण्याची प्रत्यक्षपणे सुरुवात 14 ऑगस्ट 2024 पासून चालू झालेली आहे. 15 ऑगस्ट रोजी 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर हप्ता जमा करण्यात आला होता. (Ladki Bahin Yojana Installment) 17 ऑगस्टपर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे अर्ज प्रक्रिया अजून चालूच आहे. 

दुसरे मुख्य कारण 

बँकेत हप्ता जमा न होण्याचे दुसरे कारण बँक सीडिंग स्टेटस आहे. बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. जर महिलांना त्यांच्या बँक खात्यात योजनेचा हप्ता हवा असेल तर त्या महिलांना आपले आधार कार्ड हे बँक खात्या सोबत लिंक करणे गरजेचे आहे. आधार नंबर जर बँक खात्यासोबत लिंक नाही तर त्यामुळे हप्ता जमा होऊ शकणार नाही. आपला आधार नंबर बँक खात्यासोबत लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी UIDAI या संकेतस्थळावर जाऊन आपले बँक सीडिंग स्टेटस चेक करा. (Ladki Bahin Yojana Installment) या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे. 

तिसरे मुख्य कारण 

तुम्ही अर्ज भरून देखील तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही. अजून तुमचा अर्ज Pending, Review  या स्टेटस मध्ये असेल. म्हणजे तुमच्या अर्जाची अजून छाननी झालेली नाही. तुमचा अर्ज अजून प्रतीक्षा मध्ये आहे, ज्यावेळेस तुम्ही भरलेल्या अर्जाची छाननी होईल, त्यानंतर तो अर्ज पात्र ठरवला जाईल. म्हणजेच Approved केला जाईल. त्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील जर तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असून देखील पैसे आले नसतील तर 17 ऑगस्ट पर्यंत वाट बघावी लागणार आहे. (Ladki Bahin Yojana Installment) कारण सरकारने घोषित केले आहे कि 17 ऑगस्ट पर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्या मध्ये हप्ता जमा होणार आहे.

हे देखील वाचा : लाडकी बहिण योजनेचे पैसे कोणत्या खात्यात येणार ? तुमचा आधार नंबर टाकून चेक करा, आधार नंबर लिंक आहे कि नाही ? : DBT Status Check

Spread the love