Sandal Farming : अहमदनगर च्या शेतकऱ्याने तब्बल 27 एकरात केली चंदन शेती

Sandal Farming : अहमदनगर च्या शेतकऱ्याने तब्बल 27 एकरात केली चंदन शेती

Sandal Farming
Sandal Farming

Sandal Farming : सध्या देशभरात पावसाचे असंतुलन असल्याने शेतकऱ्याला मोठ्या संकटाला सामोरे जागत लागत आहे. वेगवेगळ्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. (Sandal Farming) मात्र शेतकरी राजा सर्व संकटातून मार्ग काढत असतो. शेतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग करत शेतकरी बांधव उत्तम असा पर्याय शोधत असतो. 

याचे एक उत्तम उदाहरण अहमदनगर येथून समोर आले आहे. नगर मधील एका प्रयोगशील शेतकऱ्याला 2014 च्या दुष्काळात मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे त्याला आर्थिक मोठा फटका बसला होता. मात्र या आर्थिक संकटांना घाबरून न जाता या शेतकऱ्यांनी हार मानली नाही आणि त्याने चंदन लागवड करून आपली आर्थिक स्थिती फक्त सुधारलीच नाही तर करोडो रुपयांची उलाढाल देखील केली आहे. यामुळे या शेतकऱ्याचे नाव संपूर्ण देशभरात गाजले आहे.

नगर मधील एक सर्वसाधारण शेतकरी राजेंद्र रावसाहेब गाडेकर यांनी आपल्या शेतीत चंदन लागवड करून कोट्यावधी रुपयांची लढाई केली आहे. (Sandal Farming) राजेंद्र गाडेकर यांनी पिंपळनेर येथील 27 एकर शेतीमध्ये आवळा, संत्रा, डाळिंब, सीताफळ या फळांची लागवड केली आहे आणि या फळबागांमध्ये आंतर पीक म्हणून चंदनाची देखील लागवड केली. 

ही लागवड एकूण 27 एकर क्षेत्रात करण्यात आलेली आहे आणि या 27 एकरामध्ये 14000 चंदन झाडांची लागवड केली आहे. या चंदन लागवडीसाठी त्यांना केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजनांचा लाभ देखील मिळाला आहे आणि आपल्या चंदन शेतीमधून ते अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट बनवतात. 

चंदनापासुन अगरबत्ती, चंदन पावडर, तेल या अनेक गोष्टी तयार करून त्यांची विक्री करतात. राजेंद्र गाडेकर यांनी 2017-18 मध्ये तामिळनाडू येथून सफेद चंदनाची रोपे आणली होती आणि एकाच वर्षात त्यांनी संपूर्ण 27 एकरात 14000 चंदनाच्या रोपांची लागवड केली. 

चंदनाची पिके अगदी कमी पाण्यात आणि कमी खर्चात येणारे पीक आहे. तसेच या पिकावर कुठल्याही प्रकारचे रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. (Sandal Farming) त्यांनी फळबागासाठी आणि चंदन शेतीसाठी पाण्याची सोय म्हणून शेततळे केलेले आहे, त्यासोबतच त्यांच्याकडे दोन विहिरी आहेत. 

राजेंद्र गाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चंदनाच्या झाडांना 3 वर्षांनी बिया येतात आणि याच बिया बाजारात 300 ते 600/- रुपये प्रति किलो दराने विकल्या जातात. चंदनाचे झाड हे स्वतः अन्न तयार करत नाही ते परपोषी आहे. यामुळे प्रत्येक चंदनाच्या झाडाजवळ एक कडू लिंबाचे झाड लावलेले आहे. 

(Sandal Farming) राजेंद्र गाडेकर यांनी केलेल्या फळबागा आणि चंदनाची लागवड या सर्व पिकांमधून करोडो रुपयांची कमाई होत आहे. यामुळे राजेंद्र गाडेकर यांचा हा अनोखा प्रयोग शेतकरी वर्गासाठी महत्त्वाचा ठरत आहे. तसेच त्यांनी स्वतःच्या या प्रयोगानंतर अनेक शेतकऱ्यांना देखील मदत केली आहे. त्यांनी नवीन शेतकऱ्यांना चंदन लागवडीसाठी मार्गदर्शन देखील केले आहे. आतापर्यंत 400 हून अधिक शेतकऱ्यांनी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंदन लागवड केली आहे.

हे देखील वाचा : Color Voter ID : मोबाईल वरून फक्त 2 मिनटात कलरफुल मतदान कार्ड डाऊनलोड करा

Spread the love