Mahindra Supro Mini Truck : आला आहे महिंद्राचा नवीन छोटा ट्रक,500 किलोमीटर पर्यंत रेंज आहे.

Table of Contents

Mahindra Supro Mini Truck : आला आहे महिंद्राचा नवीन छोटा ट्रक,500 किलोमीटर पर्यंत रेंज आहे.

Mahindra Supro Mini Truck
Mahindra Supro Mini Truck

Mahindra Supro Mini Truck : महिंद्रा कंपनीने या पूर्वी आपल्या तीन व्हेरिएंट मध्ये ही गाडी लॉन्च केली होती. पेट्रोल डिझेल आणि सीएनजी असे 3 ऑप्शन मध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आली होती परंतु आता Mahindra Supro Mini Truck या गाडीमध्ये आपल्याला सीएनजी  सोबत पेट्रोल इंजिन मिळणार आहे. दोन ऑप्शन एकाच गाडीमध्ये दिल्या कारणाने आता ग्राहकांना याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. या पूर्वीच्या पेट्रोल डिझेल आणि सीएनजी व्हेरिएंट गाड्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत होता. कंपनीने ग्राहकांची गरज समजून यामध्ये सुधारणा करत.

सीएनजी आणि पेट्रोल ही गाडी लॉन्च केली आहे त्याचबरोबर गाडीचे लोड वाहून नेण्याची  कॅपॅसिटी देखील वाढवली आहे आणि नवीन काही फीचर्स देखील ऍड केले आहे. पेट्रोल पेक्षा सीएनजी गाडी परवडत असल्याने सीएनजी कडे ग्राहकांचा जास्त कल दिसत आहे. परंतु सध्या सीएनजी गॅस स्टेशन सर्वत्र उपलब्ध नसल्याने ग्राहकांना सीएनजी टंचाईला सामोरे जावे लागत होते. देशातील बहुतेक ठिकाणी सीएनजी गॅस उपलब्ध नाही.

Mahindra Supro Mini Truck back view
Mahindra Supro Mini Truck back view

त्यामुळे ज्या ग्राहकांकडे सीएनजी गाडी होती त्यांना वाहतूक करत असताना, गॅस संपेल की काय आणि गॅस कुठे उपलब्ध असेल ही भीती जास्त होत असत. Mahindra Supro Mini Truck ग्राहकांना वाहतूक करत असताना ज्या भागात सीएनजी गॅस उपलब्ध असेल त्या दृष्टीने वाहतूक करावी लागत असत परंतु आता कंपनीने यावर तोडगा काढत एकाच गाडीमध्ये सीएनजी आणि पेट्रोल असे ऑप्शन उपलब्ध करून दिल्याने आता ग्राहकांची चिंता मिटली आहे.

सीएनजी आणि पेट्रोल इंजिन गाडी असल्याकारण आता चालक कोणत्याही भागात गाडी घेऊन जाऊ शकतो. समजा गाडी सीएनजी वर चालवत असताना सीएनजी जर संपला तर पेट्रोल मोड मध्ये गाडी करून पेट्रोल वर गाडी चालवू शकतो. विना अडथळा शिवाय चालक हा गाडी चालवू शकतो. या गाडीमुळे आता ग्राहकांचे मोठी डोकेदुखी संपणारआहे. त्याचबरोबर Mahindra Supro Mini Truck या गाडीला मागणी देखील प्रचंड मिळत आहे.  

Mahindra Supro Mini Truck front view
Mahindra Supro Mini Truck front view

टायरची साईज किती आहे ? (Tyre Size) : 

Mahindra Supro Mini Truck गाडीमध्ये 4 टायर आहेत आणि 1 टायर स्पेअर मध्ये आहे. गाडीच्या पुढील टायरची साईज ही 145 R 12,8PR आहे तर मागील टायर्स ची साईज ही 145 R 12, 8PR ही आहे.

या गाडीची किंमत किती ? (Vehicle Price) : 

Mahindra Supro CNG Duo mini truck या गाडीची किंमत प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे असू शकते परंतु सरासरी या गाडीची किंमत ही 6.32 लाख ते 6.52 लाख पर्यंत असू शकते.

गाडी आत मधून ? (Vehicle Interior) : 

Mahindra Supro Mini Truck Interior
Mahindra Supro Mini Truck Interior

Mahindra Supro Mini Truck या गाडीमध्ये आत मध्ये खूप सारे नवीन बदल करून आतील लुक एकदम चांगला करण्यात आलेला आहे. दोन सीट देण्यात आलेले आहे. सीट ची कुशनिंग चांगली देण्यात आलेली आहे. ड्रायव्हर सीट हे मागे पुढे सरकू शकते. डेस्कवर देण्यात आलेले सर्व स्विच हे अगोदरच्या मॉडेल प्रमाणेच आहेत. स्टेरिंग व्हील जवळ एक बटन देण्यात आलेले आहे. त्या स्विच ने आपण गाडीचा मोड चेंज करू शकता. पेट्रोल किंवा सीएनजी आपण त्या स्विच ने मोड चेंज करू शकतो.

स्टेरिंग व्हील समोर आपल्याला एक डिजिटल क्लस्टर देण्यात आलेले आहे. डिजिटल क्लस्टर मध्ये सीएनजी इंडिकेटर देण्यात आलेले आहे. डिजिटल घड्याळ देखील त्यामध्ये आहे. तसेच मोबाईल चार्जिंग करण्यासाठी 12 वॅट चे पोर्ट देखील देण्यात आलेले आहे. गाडीमध्ये वापरण्यात आलेला गिअर बॉक्स हा 5 स्पीड गिअर बॉक्स आहे. यामध्ये 4 गिअर फॉरवर्ड आणि 1 गिअर रिव्हर्स असे ऑप्शन मिळते. तसेच दोन्ही सीट च्या मागे स्लाईड ग्लास देण्यात आलेली आहे तेथून आपण मागे बघू शकतो.

गाडी बाहेरील बाजूने ? (Vehicle Exterior) : 

Mahindra Supro Mini Truck Exterior
Mahindra Supro Mini Truck Exterior

Mahindra Supro Mini Truck ही गाडी समोरून नोज डिझाईन मध्ये आहे. बाकी खूप सारे मिनी ट्रक या समोरून फ्लॅट मध्ये येतात त्यामुळे ड्रायव्हरला समोरील वाहनाचा लवकर अंदाज घेता येत नाही किंवा समोर जर एखाद्या वस्तूला धक्का लागणार असेल तर तो पूर्ण समोरच्या बॉडीवर येतो. परंतु नोज डिझाईन मुळे ड्रायव्हरला लवकर अंदाज येतो. आणि एक्सीडेंट झाला तरी ड्रायव्हरला दुखापत होण्याचे प्रमाण कमी असू शकते.

Mahindra Supro Mini Truck गाडीच्या समोर मध्य भागावर महिंद्राचा लोगो देण्यात आलेला आहे हा लोगो जुन्या पद्धतीचा आहे. महिंद्राच्या सर्व कमर्शियल व्हेईकलवर जुना लोगो देण्यात आलेला आहे आणि फक्त कार सेगमेंट मध्येच नवीन लोगो देण्यात आलेला. समोर दोन पावरफुल हेड लॅम्प देण्यात आलेले आहे. दोन्ही लाईटच्या मध्ये ग्रील बंपर देण्यात आलेला आहे.

साईडला दोन इंडिकेटर देण्यात आले आहे. गाडीला बंपर हे फायबरचे देण्यात आलेले आहेत. जे की काळया कलर मध्ये मिळते. आणि हेडलाईट च्या खाली दोन फॉगलाईट देण्यात आलेला आहे. समोरील विंडस्क्रीनवर दोन वायपर देण्यात आलेले आहेत. वायपरला पाण्याचे शावर देखील देण्यात आलेले आहेत.

Mahindra Supro Mini Truck गाडीच्या दोन्ही दरवाजांच्या बाजूला दोन आरसे देण्यात आलेले आहे. आणि दरवाजांच्या बाजूला दोन इमर्जन्सी इंडिकेटर देण्यात आलेले आहे. गाडीच्या मागील बाजूस मोठी ट्रॉलीआहे. तिची लांबी 8.2 फूट आहे. रुंदी ही 5 फूट आहे. या मोठ्या साईज मुळे गाडीचे लोड कॅरिंग कॅपॅसिटी वाढली आहे.

मागील बाजूस नंबर प्लेटच्या दोन्ही बाजूंना दोन रिवर्स पार्किंग सेन्सर देण्यात आलेली आहे. Mahindra Supro Mini Truck गाडीला खालून एक स्पेअर व्हील देण्यात आलेले आहे. सीएनजी गॅस टॅंक हा मागील टायरच्या थोडासा पुढे आणि वरती देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये वापरण्यात आलेली बॅटरी हि 12 volt ची आहे.

गाडीचे इंजिन (Vehicle Engine) :

सीएनजी साठी इंजिन मध्ये दोन सिलेंडर देण्यात आलेले आहे आणि इंजिन हे 909 CC आहे. यामध्ये मॅक्स पावर ही 27 BHP. आणि मॅक्स टॉर्क 60 nm पर्यंत जनरेट करू शकते.

गाडीची सीटिंग कॅपॅसिटी (Seating Capacity) :

Mahindra Supro Mini Truck गाडीची सीटिंग कॅपॅसिटी दोन लोकांची आहे.गाडीमध्ये दोन सीट देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये दोन जण आरामात बसू शकतात.

गाडीची पेलोड कॅपॅसिटी (Payload Capacity) : 

पेट्रोल आणि सीएनजी हे दोन ऑप्शन मध्ये गाडी उपलब्ध असल्याने दोन्ही मोडमध्ये गाडीची पे लोड कॅपॅसिटी वेगळी आहे. सीएनजी मध्ये या गाडीचे पे लोड कॅपॅसिटी ही 750 kg आहे.

Mahindra Supro Mini Truck
Mahindra Supro Mini Truck

गाडीचे टोटल वजन  (Vehicle Gross Weight) :

Mahindra Supro Mini Truck गाडीची लांबी रुंदी वाढल्याने त्याचबरोबर गाडीमध्ये काही नवीन फीचर्स ॲड केल्याने गाडीचे वजन देखील वाढलेले आहे गाडीचे टोटल वजन आता हे 1945 kg झाले आहे.

गाडीची साईज (Vehicle Dimension) : 

  • गाडीची लांबी ही 3927mm आहे.
  • गाडीची रुंदी ही 1540mm आहे.
  • टोटल गाडीची उंची ही 1900 mm आहे. 
  • ग्राउंड क्लिअरन्स हा 158 mm आहे. 
  • विल बेस हा 1950 mm आहे. 
  • ट्रान्समिशन हे मॅन्युअल आहे. 
  • गाडीची पे लोड कॅपॅसिटी 750 kgs आहे. 
  • गाडीचे पूर्ण वजन 1850 kg आहे. 

हे वाचा : Force Gurkha 2024 : 7 सीटर ऑफ रोडिंग कार लॉन्च,आता Mahindra Thar ला विसरून जाल

गाडीचे ब्रेक आणि सस्पेन्शन (Vehicle Brake And Suspension) :  

Mahindra Supro Mini Truck गाडीच्या पुढील टायरला हे डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे. तर मागील टायर ड्रम ब्रेक देण्यात आलेले आहे. गाडीच्या सस्पेन्शन साठी गाडीला पुढील भागात 8 लिफ स्प्रिंग सस्पेन्शन देण्यात आली आहे तर मागील भागात 7 लीफ स्प्रिंग सस्पेन्शन देण्यात आले आहे.

सीएनजी सिलेंडर किती आहे ? (CNG Cylinder) :

यापूर्वी या मॉडेलमध्ये दोन सीएनजी सिलेंडर देण्यात येत होते परंतु आता कंपनीने मॉडिफिकेशन करत या गाडीमध्ये दोन सिलेंडर ऐवजी 3 वापरलेले आहे. त्यामुळे गाडीची आता रेंज देखील वाढलेली आहे आता एकदा गॅस भरला की गाडी खूप सारे अंतर कव्हर करू शकते.Mahindra Supro Mini Truck या सिलेंडर मध्ये एक सिलेंडरची कॅपॅसिटी 45 लीटर आहे तर दोन सिलेंडरची कॅपॅसिटी 30,30 लिटर आहे.  या तीन सिलेंडर मध्ये एकूण 17.5 kg सीएनजी गॅस बसेल.

या गाडीची सीएनजी गॅसवर रेंज किती ?  (Range In Kilometer) :

Mahindra Supro Mini Truck या गाडीमध्ये तीन सीएनजी सिलेंडर वापरल्या कारणाने आता गाडीची सीएनजी स्टोरेज कॅपॅसिटी वाढल्याने गाडीची रेंज देखील वाढलेली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार एकदा सीएनजी टॅंक फुल केल्यानंतर ही गाडी 500 किलोमीटर जाऊ शकते.

पेट्रोल टॅंक ची कॅपॅसिटी (Fuel Capacity) :  

या गाडीमध्ये सीएनजी सोबत पेट्रोल ऑप्शन दिलेले आहे यामध्ये पेट्रोल टॅंक ची कॅपॅसिटी हि 5 लिटर आहे.

गाडीचे मायलेज (Vehicle Mileage) :

पेट्रोल इंजिन द्वारे आपल्याला या गाडीचे मायलेज हे 23.35 किलोमीटर पर्यंत मिळू शकते असे कंपनीचा दावा आहे. प्रत्यक्ष मध्ये मायलेज हे थोडेफार कमी जास्त असू शकते. 

या गाडीमध्ये कलर ऑप्शन (Colour Option) :

 Mahindra Supro Mini Truck गाडी तीन कलर मध्ये उपलब्ध आहे. ते तीन कलर लाल सफेद आणि निळा असे कलर मध्ये ही गाडी आपल्याला उपलब्ध आहे. 

हे देखील वाचा : TATA PUNCH EV 3.3 : इलेक्ट्रिक कार मध्ये सर्वात जास्त affordable कार,मार्केट मध्ये घातलाय धुमाकूळ,कींमत एकूण होणार तुम्ही थक्क

FAQ’S:

  1. Mahindra Supro Mini Truck या गाडीची किंमत किती आहे ? 

:- या गाडीची किंमत ही 6.32 लाख ते 6.52 लाख पर्यंत असू शकते.

  1. या गाडीचे मायलेज किती आहे ? 

           :- या गाडीचे मायलेज 23.35 किलोमीटर आहे. 

  1. ही गाडी किती कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे ?

           :- ही गाडी तीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध 

             आहे. 

  1. Mahindra Supro Mini Truck या गाडीच्या पेट्रोल टॅंक ची कॅपॅसिटी किती आहे ?                          

            :- या गाडीच्या पेट्रोल टॅंक ची कॅपॅसिटी 5 

               लिटर आहे. 

  1. या गाडीच्या सीएनजी स्टोरेज ची स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे ?

           :- या गाडीच्या सीएनजी स्टोरेज कॅपॅसिटी  

              17.5 kg आहे.

  1. Mahindra Supro Mini Truck या गाडीमध्ये सीएनजी सिलेंडर टॅंक किती देण्यात आली आहे ?

           :- या गाडीमध्ये सिलेंडर टॅंक तीन देण्यात आले 

           आहे. 

  1. गाडीची पे लोड कॅपॅसिटी किती आहे ?

          :- या गाडीची पे लोड कॅपॅसिटी 750 kg आहे.

  1. या गाडीमध्ये इंजिन किती CC चे वापरण्यात आले ?

           :- या गाडीमध्ये इंजिन हे 909 CC चे 

            वापरण्यात आले आहे.

Spread the love