Live Score : SA vs BAN रोमहर्षक सामन्यात साऊथ आफ्रिकेचा बांगलादेश वर 4 धावांनी विजय !
Live Score : T20 विश्वचषकातील 21 व्या सामन्यात साऊथ आफ्रिकेने बांगलादेश संघावर 4 धावांनी विजय मिळविला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात साऊथ आफ्रिका संघाने बांगलादेश संघाच्या हातातून हा सामना ओढून विजय मिळविला. Live Score साऊथ आफ्रिका संघाने 20 ओव्हर मध्ये 6 गडी गमावून बांगलादेश संघाला 114 धावांचे आव्हान दिले होते. त्या मोबदल्यात बांगलादेश संघाने 20 ओव्हर मध्ये 7 गाडी गमावत 109 धावसंख्या उभारू शकला. आणि या सामन्यात साऊथ आफ्रिकाने 4 धावांनी विजय मिळविला.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटीतील नसाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये हा सामना खेळविण्यात आला होता. साऊथ आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. Live Scoreआतापर्यंतच्या झालेल्या सामन्यांना कोणत्याही संघाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. अमेरिकेचे स्टेडियम हे गोलंदाजीसाठी चांगले असल्या कारनाने फलंदाजाला येथे यश मिळत नाही.ऑस्ट्रेलिया संघाव्यतिरिक्त कोणत्याही संघाला 200 चा पल्ला गाठता आलेला नाही.
साऊथ आफ्रिका संघाची निराशा जनक सुरुवात
साऊथ आफ्रिका संघाकडून सलामीच्या जोडीला डी कॉक आणि हॅन्ड्रीक्स हे फलंदाजीसाठी आले होते. पहिल्या ओव्हर मध्ये डिकॉक ने आक्रमक फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला परंतु पहिल्या ओवरच्या शेवटच्या चेंडूवर हॅन्ड्रीक्स हा स्ट्राइकला आल्यानंतर तो पहिल्या चेंडूवर बाद झाला.(Live Score) साऊथ आफ्रिकेची धावसंख्या ही 11 धावा 1 गडी बाद आणि 1 ओवर अशी झाली. हॅन्ड्रीक्स हा शून्य धावांवर बाद झाला. त्याला तांजीम हसन यानी पायचीत बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी साउथ आफ्रिका संघाचा कप्तान मारक्रम हा मैदानात आला.
तिसऱ्या ओव्हर मध्ये डी कॉक बाद झाला. संघाचे धावफलक १९ धावा असताना डीकॉक बाद झाला. त्याला ताजीम हसन यानी बोल्ड आऊट केले. डीकॉक यानी 11 चेंडू मध्ये 18 धावा केल्या त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. (Live Score)आता फलंदाजीसाठी आफ्रिका संघाचा आक्रमक फलंदाज स्टब हा फलंदाजीसाठी आला. परंतु धाव संख्या मध्ये 4 धावांची भर पडल्यानंतर आफ्रिका संघाचा कप्तान मार्कक्रम हा देखील बाद झाला. साऊथ आफ्रिका संघाची स्थिती आता 23 धावा 3 गडी बाद अशी झाली होती. मारक्रम याला तासस्किन अहमद यानी बोल्ड आऊट केले. मारक्रम यानी 8 चेंडू मध्ये 4 धावा केले त्यामध्ये 1 चौकार लगावला.
या दोघांमध्ये फक्त 4 धावांची भागीदारी तयार झाली. आता फलंदाजीसाठी साऊथ आफ्रिका संघाचा विस्फोटक फलंदाज क्लासेन हा आला. परंतु स्टब हा पाचव्या ओवर्स मध्ये शून्य धावांवर बाद झाला. त्याला तांजीम हसन यानी शकीब च्या हाती झेल देत बाद केले. स्टब यानी 5 चेंडू 0 धावा केल्या. आता आफ्रिका संघाची स्थिती ही खूप नाजूक झाली होती साऊथ आफ्रिके संघाचा धावफलक 23 धावा 4 गडी बाद अशी झाली होती. (Live Score) आता फलंदाजीसाठी मैदानात डेव्हिड मिलर हा आला. मिलर आणि क्लासेन या जोडीने आफ्रिका संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आणि दोघांनीही टिकून सावधपणे खेळी केली. या दोघांमध्ये 79 चेंडूमध्ये 79 धावांची भागीदारी झाली.
या जोडीने साउथ आफ्रिका संघाचा शंभर धावांचा पल्ला गाठून दिला. संघाचे धावफलक 102 असताना क्लासेन हा बाद झाला. अठराव्या ओवर मध्ये साऊथ आफ्रिका संघाची विकेट पाचवी गेली. क्लासेन यानी 44 चेंडू मध्ये 46 धावा केल्या त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार लगावले. क्लासेन याला तास्किन अहमद याने बोल्ड बाद केले. आता मिलरच्या साथीला जेन्सन हा आला. (Live Score) पुढील ओव्हर मध्ये मिलर देखील बाद झाला. त्याला रीषद हुसेन यानी बोर्ड केले. 106 धावसंख्या वर साऊथ आफ्रिका संघाची सहावी विकेट पडली. आता फलंदाजीसाठी महाराज आला. या दोघांनी आफ्रिका संघाचे धावफलक 113 पर्यंत पोहोचविले. आफ्रिका संघाने 20 ओवर मध्ये 6 विकेट च्या मोबदल्यात 113 धावा केल्या. बांगलादेश संघाला जिंकण्यासाठी 114 धावांचे आव्हान दिले.
बांगलादेश संघा च्या गोलंदाजांनी आफ्रिका संघाच्या फलंदाजांना आपल्या धारदार गोलंदाजी पुढे गुडघे टेकविण्यास भाग पाडले. बांगलादेश संघाच्या तांझीम हसन याला 3 विकेट मिळाल्या. तास्किन अहमद याला 2 , रिषद हुसेन याला 1 विकेट मिळाली.
अफगाणिस्तान संघाची सलामीची जोडी फेल.
114 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेली बांगलादेश संघाची सलामीची जोडी ही देखील फेल ठरली. बांगलादेश संघाकडून सलामीला तंजीद हसन आणि नजमुल हुसैन शान्तो ही जोडी मैदानात उतरली. परंतु आफ्रिका संघा प्रमाणे बांगलादेश संघाची सुरुवात देखील खराब झाली. (Live Score) संघाचे धावफलक 9 असताना दुसऱ्यावर मध्ये तंजीद हसन बाद झाला त्याला रबाडा यानी डीकॉकच्या हाती झेल देत बाद केले. तंजीद हसन याने 9 चेंडूमध्ये 9 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार लगावले.आता नजमुल हुसैन शान्तो साथीला फलंदाजीसाठी लिटन दास हा आला.
या जोडीला देखील मोठे धावसंख्या भरता आली नाही. सातव्या ओवर मध्ये लिटन दास हा बाद झाला त्याने 13 चेंडू मध्ये 9 धावा केले त्यामध्ये 1 चौकार लगावला. त्याला महाराज यानी मिलर च्या हाती जेल देत बाद केले.आता संघाची स्थिती ही 29 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. (Live Score) आता नजमुल हुसैन शान्तो साथीला शकीब हा आला. शकीब याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. आफ्रिका संघाच्या भेदक गोलंदाजी समोर बांगलादेश संघाचे फलंदाज हे अपयशी ठरत होते. संघाचे धावफलक 37 असताना शकीब हा देखील बाद झाला आठव्या ओवर मध्ये बांगलादेश संघाची तिसरी विकेट गेली. शकीब याने 4 चेंडू मध्ये 3 धावा केल्या त्याला नॉर्जे यानी मारक्रमच्या हाती झेल देत बाद केले.
आता नजमुल हुसैन शान्तो साथीला फलंदाजीसाठी ताऊहिद हा आला. या जोडीने सावकाश खेळण्याचा प्रयत्न केला परंतु संघाचे धावफलक 50 असताना बांगलादेश संघाची पाचवी विकेट गेली. नजमुल हुसैन शान्तो हा नॉर्जे च्या गोलंदाजीवर मारक्रम च्या हाती झेल देत बात झाला त्याने 23 चेंडू मध्ये 14 धावा केले त्यामध्ये 1 षटकार लगावला. आता ताऊहिद च्या जोडीला महमदुल्ला हा फलंदाजीसाठी आला. या जोडीने सावधपणे खेळत आफ्रिका संघाच्या गोलंदाजांना सामोरे जात चांगली खेळी केली. या जोडीने 45 चेंडूमध्ये 44 धावांची भागीदारी केली.
अठराव्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर ताऊहिद हा बाद झाला त्याने 34 चेंडू मध्ये 37 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. आता बांगलादेश संघला 17 चेंडू मध्ये 20 धावांची गरज होती. आता फलंदाजीसाठी जाकीर अली हा फलंदाजीसाठी आला. या जोडीने सावधपणे खेळत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचविले. शेवटच्या ओव्हर मध्ये 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज होती. (Live Score) संघाची धावसंख्या 107 असताना जाकीर आली हा बाद झाला. जाकीर आली आणि महंमदुल्ला या दोघांमध्ये 14 चेंडू मध्ये 13 धावांची भागीदारी झाली. आता फलंदाजीसाठी मैदानात रिशाद हा आला. आता बांगलादेश ला जिंकण्यासाठी 7 धावांची गरज होती 3 चेंडू मध्ये.
चौथ्या चेंडूवर 1 धाव निघाली. आता 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज होती स्ट्राइक वर महमदुल्ला होता. महाराज ने पाचवा चेंडू टाकला आणि महामुदुल्ला याने जोरदार टोला लगावला. परंतु बॉल सीमा रेषा पलीकडे जाऊ शकला नाही. आणि महंमदुल्लाचा झेल मारक्रम ने सीमारेषे जवळ घेतला. (Live Score) आता बांगलादेश ला जिंकण्यासाठी 1 चेंडूवर 6 धावांची गरज होती. आणि स्ट्राइक वर नवीन फलंदाज तासकीन अहमद आला होता. शेवटचा चेंडू टाकला तास्किन ने जोरदार टोला लागण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या चेंडूवर एकच धाव निघाली आणि साऊथ आफ्रिकेने हा सामना 4 धावांनी जिंकला.
साऊथ आफ्रिका संघाकडून गोलंदाजी मध्ये रबाडा याला 2 विकेट मिळाल्या.केशव महाराज याला 3 विकेट मिळाल्या. आणि नॉर्जे याला 2 विकेट मिळाल्या. साऊथ आफ्रिकेच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिका संघाने हातात निसटलेला सामना अखेर जिंकला. ताऊहिद आणि महमदुल्ला या दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली या दोघांनी 45 चेंडू मध्ये 44 धावांची भागीदारी झाली. याव्यतिरिक्त कोणती जोडी जास्त मोठी धावांची भागीदारी करू शकली नाही.
साऊथ आफ्रिका हा सामना जिंकला पॉईंट टेबल मध्ये 1 नंबर स्थानावर आहे. साऊथ आफ्रिका संघ आतापर्यंत 3 सामने खेळला आणि तीनही सामने जिंकला आहे. आफ्रिका संघ 6 पॉईंट सोबत पॉईंट्स टेबल मध्ये 1 नंबर स्थानावर आहे. तर बांगलादेश संघ 2 सामने खेळला त्यामध्ये 1 सामन्यात विजय आणि 1 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. बांगलादेश संघ 2 गुणांसह पॉईंट्स टेबल मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सामन्याचा मानकरी
(Live Score) आफ्रिका संघाचा विस्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेन हा सामन्याचा मानकरी झाला. त्याने 44 चेंडूंमध्ये 46 धावा केल्या त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार लगावले. आफ्रिका संघाची ढासाळलेली फलंदाजी यामुळे 100 धावा करू शकतो का नाही असे वाटत होते परंतु क्लासेन याच्या चांगल्या फलंदाजीमुळे आफ्रिका संघ 100 धावा पार करू शकला. (Live Score) आफ्रिका संघाची स्थिती 23 धावा आणि 4 गडी बाद अशी नाजूक झाली असताना क्लासेन याने संघाला सावरत संघासाठी चांगली कामगिरी केली.
बांगलादेश संघाचा पुढील सामना हा नेदरलँड सोबत होणार हा सामना बांगलादेश संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. 13 जूनला हा सामना होणार आहे.