Pak Vs Can : सलग दोन पराभवानंतर पाकिस्तानी विजयी,पाकिस्तानचा कॅनडा वर 7 विकेटन विजय
Pak Vs Can T20 विश्वचषकातील 22 व्या सामन्यात पाकिस्तान आणि कॅनडा हे दोन संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पाकिस्तान ने कॅनडावर सात विकेटने विजय मिळवला. हा सामना अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटी मधील नसाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. Pak Vs Can पाकिस्तान संघाने सलग दोन पराभवानंतर तिसऱ्या सामन्यात विजय मिळविला आहे त्याचबरोबर सुपर एट मध्ये जागा बनविण्याच्या आशा ठेवल्या आहे. भारत आणि युएसए हे दोन्ही संघ पहिले दोन सामने जिंकले आहे. भारत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे आणि युएसए दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (Pak Vs Can)कॅनडा संघाने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकांमध्ये सात गडी गमावत 106 धावा केले आणि पाकिस्तान संघाला जिंकण्यासाठी 107 धावांचे आव्हान दिले. पाकिस्तान संघाने हे आव्हान तीन गडींच्या मोबदल्यात 18 व्या ओव्हर मध्ये पूर्ण केले.
कॅनडा संघाची खराब सुरवात
कॅनडा संघाकडून सलामीला जॉन्सन आणि नवनीत हे दोघे फलंदाजीसाठी मैदानात उतरले. या जोडीने पहिल्या ओवर पासून जोरदार खेळण्यास सुरुवात केली होती परंतु संघाचे धावफलक 20 असताना कॅनडा संघाची पहिली विकेट गेली. (Pak Vs Can) तिसऱ्या ओवरच्या शेवटच्या चेंडूवर नवनीत हा बाद झाला त्याला अमीर ने बोल्ड आउट केले. या दोघांमध्ये 18 चेंडू मध्ये 20 धावांची भागीदारी झाली होती. आता कॅनडा संघाची स्थिती 20 धावा आणि एक गडी बाद अशी झाली होती.
तो बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी सिंग हा आला. (Pak Vs Can) परंतु त्यालाही संघासाठी जास्त योगदान देता आले नाही संघाचा स्कोर 29 असताना सिंग बाद झाला. त्याने सहा चेंडू मध्ये दोन धावा केल्या होत्या. त्याला शाईन आफ्रिदी ने फाकर च्या हाती झेल देत बाद केले. आता कॅनडा संघाची स्थिती 29 धावा दोन गडी बाद अशी झाली होती. आता फलंदाजीसाठी निकोलस आला होता. निकोलसने जॉन्सन ला चांगली साथ दिली. या दोघांमध्ये अकरा चेंडू मध्ये 14 धावांची भागीदारी झाली. परंतु दोन धावा काढण्याचा प्रयत्न निकोलस हा धाव बाद झाला.
त्याने सहा चेंडू मध्ये एकदा केली होती. त्याला इमान ने धावबाद केले. आता कॅनडा संघाची स्थिती 43 धावा तीन गडी बाद आणि सात ओवर्स अशी झाली होती. आता जॉन्सनच्या साथीला श्रेयश आला होता. एका बाजूने विकेट जात असताना जॉन्सन हा जोरदार टोले लगावत होता.(Pak Vs Can) या जोडीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु संघाचे धावफलक 54 धावा असतात श्रेयश देखील बाद झाला त्याला हरीस याने रिजवान च्या हाती झेल देत बाद केले. श्रेयशनी नऊ चेंडू मध्ये दोन धावा केल्या होत्या.
आता फलंदाजीसाठी रवींद्र पाल हा आला होता परंतु तो जास्त वेळ मैदानात टिकला नाही. तो आपल्या दुसऱ्या चेंडूवरच बाद झाला त्याने दोन चेंडू मध्ये शून्य धावा केल्या होत्या. तो हरीस च्या गोलंदाजीवर फाकर च्या हाती झेल देत बाद झाला. जॉन्सन हा सलामीचा फलंदाज मात्र टिकून खेळत होता. त्याला कोणताही फलंदाज साथ देत नव्हतं परंतु तो आक्रमकपणे खेळ करत होता. कॅनडा संघाची स्थिती आता 54 धावा पाच गडी बाद अशी झाली होती आणि 9.5 ओवर्स झाल्या होत्या.
रवींद्र पाल बार झाल्यानंतर फलंदाजीसाठी साद आला होता. रवींद्र पाल बाद झाल्यानंतर साद यांनी जॉन्सनला चांगली साथ दिली आणि संघाचे धावफलक मध्ये भर पाडली. (Pak Vs Can) साद आणि जॉन्सन या दोघांमध्ये 22 चेंडू मध्ये 19 धावांची चांगली भागीदारी झाली. जॉन्सन यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले.संघाचे धावफलक 73 असताना कॅनडा संघाची सहावी विकेट पडली. जॉन्सन याला नासिम यांनी बोल्ड आउट केले. जॉन्सन यांनी 44 चेंडू मध्ये 52 धावा केल्या त्यामध्ये चार चौकार आणि चार षटकार लगावले. आता कॅनडा संघाची स्थिती 73 धावा सहा गडी बाद आणि 13.3 ओवर अशी झाली होती. आता फलंदाजीसाठी मैदाना कलीम आला होता.
कलीम आणि साद या जोडीने सावकाशपणे खेळत संघाचे धावफलक हालते ठेवले. संघाचे धावफलक 87 धावा असताना साद हा बाद झाला. त्यांनी 21 चेंडू मध्ये दहा धावा केले होत्या त्यामध्ये एक चौकार लगावला होता. त्याला आमिरने रिजवांच्या हाती झेल देत बाद केली.(Pak Vs Can) आता कलीम च्या साथीला दिलोन हा आला होता. या जोडीने नाबाद खेळी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेऊन पोहोचविले. या जोडीने संघाला 100 धावांच्या पार केले. कॅनडा संघाने 20 ओवर मध्ये सात गडी गमावत 106 धावा केल्या.
कलीम याने नाबाद 14 चेंडू मध्ये 13 धावा केल्या त्यामध्ये एक षटकार लगावला होता. तर दिलोन याने 11 चेंडूमध्ये नऊ धावा केले त्यामध्ये एक चौकार लगावला होता. पाकिस्तान संघाकडून गोलंदाजी मध्ये शाहीन आफ्रिदी आणि नासिम या दोघांना प्रत्येकी 1 विकेट्स मिळाल्या. तर आमिर आणि हरीस या दोघांना प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. कॅनडा संघाने पाकिस्तान संघाला 20 ओवर मध्ये 107 धावांचे आव्हान दिले.
पाकिस्तान संघाची चांगली सुरुवात
पाकिस्तान संघाकडे सलामीला फलंदाजीसाठी रिझवान आणि आयुब ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली होती. परंतु संघाचे धावफलक 20 धावा असताना पाकिस्तान संघाची पहिली विकेट पडली. आयुब हा 6 धावांवर बाद झाला. त्याला दिलोन यांनी श्रेयस च्या हाती झेल देत बाद केले. आता पाकिस्तान संघाची स्थिती 20 धावा आणि एक गडी बाद अशी झाली होती.
आता फलंदाजीसाठी पाकिस्तान संघाचा कप्तान बाबर आजम हा आला होता. या जोडीने संयमी खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. या जोडीने 62 चेंडू मध्ये 63 धावांची भागीदारी केली.(Pak Vs Can) संघाचे धावफलक 83 असताना पाकिस्तान संघाचा कप्तान बाबर आजम हा बाद झाला. त्याला दिलोन यांनी श्रेयस च्या हार्दिक झेलदेत बाद यांनी श्रेयस च्या हाती झेल देत बाद केले. त्याने 33 चेंडू मध्ये 33 धावा केल्या.
त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावला. आता फलंदाजीसाठी पाकिस्तान संघाचा आक्रमक फलंदाज फाकर आजम हा मैदानात आला. फाकर जामन आणि रिझवान या दोघांनी संयमाने खेळत धावफलकात भर पाडली. मोहम्मद रिजवान यांनी एकेरी झुंज देत आपले अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने संघाचे धावफलक शंभर धावांचे पार केले. संघाचे धावफलक 104 असताना 18 व्या वर्षाच्या दुसऱ्या चेंडूवर फकर जमन हा बाद झाला. त्याने सहा चेंडू मध्ये चार धावा केल्या
त्याला गॉर्डन यांनी दिलप्रीत च्या हाती झेलतेत बाद केले. फाकर जमण आणि रिजवान या दोघांमध्ये सोळा चेंडू मध्ये 21 धावांची भागीदारी झाली होती. आता जिंकण्यासाठी केवळ तीन धावांची आवश्यकता होती फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर उस्मान खान हा आला.(Pak Vs Can) रिजवान आणि उस्मान खान या जोडीने पाकिस्तानला विजयाचा पल्ला गाठून दिला. आणि पाकिस्तान संघाने हा सामना 17.3 ओवर मध्ये तीन गडी गमावत १०७ धावा पूर्ण केल्या.
कॅनडा संघाकडून गोलंदाजी मध्ये दिलोंन याला दोन विकेट मिळाल्या. तर गार्डन याला एक विकेट मिळाली. अमेरिकेचे स्टेडियम हे गोलंदाजी साठी अनुकूल असल्याने येथे फलंदाजांना खेळण्यात कठीणाई येते. या विश्वचषकामध्ये 200 धावा करणे कठीण होत आहे. आतापर्यंत झालेल्या विश्वचषक सामन्यांमध्ये फक्त ऑस्ट्रेलिया संघाने एकदाच 200 धावांचा पल्ला गाठला आहे. या विश्वचषकामध्ये दीडशे धावांचा पल्ला गाठणे देखील कठीण झाले आहे. 100 ते 150 या धावसंख्या मध्ये जास्त आव्हान बघायला मिळाले आहे.
आता पाकिस्तान संघाला पुढील दोन सामने जिंकणे अत्यावश्यक आहे.नाही तर पाकिस्तान संघ या विश्वाच्या शेताच्या स्पर्धेमधून बाहेर होऊन जाईल. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिका संघाला आता फक्त दोन गुणांची गरज अमेरिका संघाने एक विजय मिळविला तरी तो संघ सुपर 8 सामन्यांसाठी पात्र ठरेल.(Pak Vs Can) या विजयासोबतच पाकिस्तान संघाने आपला पहिला विजय मिळविला. पाकिस्तानने खेळलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये हार पत्करावी लागली होती. त्यात आता एक सामन्यांमध्ये विजय झाला आहे.
या विजयाने पाकिस्तान संघाला दोन गुण मिळाले आहे. ग्रुप ए मध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने दोन सामने खेळले आहे आणि दोन विजय मिळविला चार गुणांसह भारत हा अंक तालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Pak Vs Can)अमेरिका संघाने दोन सामने खेळले आहे आणि दोन्ही सामन्यात विजय मिळविला आहे. चार गुणांसह अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानी तीन सामने खेळले असून त्यातील दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
आणि एक सामन्यात विजय झाला आहे. पाकिस्तान संघ दोन गुणांसह पॉईंट्स टेबल मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. सुपरहिट मध्ये स्थान मिळवण्यासाठी ग्रुप ए मध्ये स्पर्धा सुरू आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही संघांना दोन गुणांची आवश्यकता आहे. ज्या संघाचे सहा गुण पूर्ण होतील तो सुपरहिट सामन्यांसाठी पात्र असेल. पाकिस्तान संघाला सुपरहिट मध्ये सामील होण्यासाठी अजून चार गुणांची आवश्यकता आहे.
हे देखील वाचा : Aus vs Nam : ऑस्ट्रेलियाचा नामिबिया वर 9 विकेट्सनी विजय; सुपर – ८ चे तिकीट कन्फर्म
सामन्याचा मानकरी
(Pak Vs Can) पाकिस्तान संघाचा विकेट कीपर मोहम्मद रिजवान याने नाबाद 53 चेंडूमध्ये 53 धावा केल्या त्यामध्ये दोन चौकार आणि एक षटकार लगावला. त्याने नाबाद अर्धशतकी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. मोहम्मद रिजवान हा या सामन्याचा मानकरी ठरला.