Ind vs Usa : भारताचा युएसए वर 7 विकेट्सने विजय, सुपर 8 मध्ये भारताची एंट्री

Ind vs Usa : भारताचा युएसए वर 7 विकेट्सने विजय, सुपर 8 मध्ये भारताची एंट्री

Ind vs Usa
Ind vs Usa

Ind vs Usa : भारताचा युएसए वर 7 विकेट्सने विजय, सुपर 8 मध्ये भारताची एंट्री

Ind vs Usa : T20 विश्वचषकातील 25 व्या सामन्यात भारताने यूएसएवर 7 विकेट्सने विजय मिळविला आहे.त्याचबरोबर भारताची सुपर एट सामन्यांमध्ये एन्ट्री झाली आहे. भारत विरुद्ध युएसए सामना अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटी मधील नसाउ काउंटिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये खेळविण्यात आला होता.(Ind vs Usa)अमेरिकेने भारतापुढे जिंकण्यासाठी 111 धावांचे आव्हान दिले होते भारताने हे आव्हान 3 गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले.

आणि टी 20 विश्वचषकातील आपला सलग तिसरा विजय नोंदविला या विजयाबरोबरच भारताने सुपर 8 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजी समोर यूएसएचा संघ पूर्ण ढसाळला गोलंदाजी मध्ये अर्शदीप  याने भेदक गोलंदाजी करत अमेरिकेच्या फलंदाजांना बाद केले. अमेरिका संघाचा कोणताही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही आणि 20ओव्हर मध्ये यूएसएने 8 गडी गमावत 110 धावा केल्या. 

यूएसए संघाची कमजोर सुरवात

भारताने नाणफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यूएसए संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी शयन आणि स्टीवन ही जोडी मैदानात आली होती. पहिली ओव्हर ही अर्शदीप  सिंग याची होती. (Ind vs Usa) मॅचच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीप  ने शयन याला पायचीत बाद केले. आणि अमेरिका संघाची शून्य धावांवर पहिली विकेट गेली.अमेरिका संघाची स्थिती शून्य धावा  1 गडी बाद अशी झाली होती त्यानंतर स्टीवन च्या साथीला अन्द्रीस हा फलंदाजीसाठी आला. अन्द्रीस याने 2 धावा केल्या आणि अर्शदीप च्या पहिल्या ओवरच्या शेवटच्या चेंडूवर तो देखील बाद झाला त्याला अर्शदीप ने हार्दिक पांड्याच्या हाती झेल देत बाद केले.

पहिल्याच ओवर मध्ये अमेरिका संघाच्या 2 विकेट पडल्या होत्या अमेरिका संघाची स्थिती 3 धावा 2 गडी बाद अशी झाली होती.अन्द्रीस आणि स्टीवन या दोघांमध्ये 5 चेंडू मध्ये 3 धावांची भागीदारी झाली होती.आता स्टीवन च्या साथीला फलंदाजीसाठी जोन्स हा मैदानात आला होता. या जोडीने सावधपणे खेळ करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु ही जोडी फार काळ मैदानात टिकू शकली नाही.(Ind vs Usa) संघाचे धावफलक 25 असताना अमेरिका संघाची तिसरी विकेट पडली.आठव्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर अमेरिका संघाचा कप्तान जोन्स हा बाद झाला त्याला हार्दिक पांड्याने सिराज च्या हाती झेल देत बाद केले. जोन्स यानी 22 चेंडूमध्ये 11 धावा केल्या त्यामध्ये 1 षटकार लगावला होता.

जोन्स आणि स्टीवन या दोघांमध्ये 38 चेंडू मध्ये 22 धावांची भागीदारी झाली होती कप्तान बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी नितेश कुमार हा मैदानात आला होता नितेश कुमार आणि स्टीवन या जोडीने संघाला सावरत धावसंख्या पुढे नेली आणि संघाला 50 धावांचे लक्ष गाठून दिले.(Ind vs Usa) संघाचा स्कोर 56 धावा असताना अमेरिका संघाची चौथी विकेट गेली.12 व्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर स्टीवन हा बाद झाला त्याला अक्सर पटेल यानी बोल्ड आउट केले. स्टीवन यानी 30 चेंडूमध्ये 24 धावा केल्या त्यामध्ये 2 षटकार लगावले होते.

नितीश कुमार आणि स्टीवन या दोघांमध्ये 26 चेंडूमध्ये 31 धावांची भागीदारी झाली होती. स्टीवन बाद झाल्यानंतर नितेश कुमारच्या साथीला कोरी अँडरसन हा मैदानात आला या जोडीने देखील चांगली खेळी करत संघाला सावरले आणि संघाचे धावफलक हलता ठेवला. या जोडीने आक्रमक खेळी करत 18 चेंडू मध्ये 25 धावांची भागीदारी केली आणि संघाचे धावफलक 81 असताना पंधराव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर नितेश कुमार बाद झाला.आता युएसए संघाची स्थिती 81 धावा आणि 5 गडी बाद अशी झाली होती.

नितीश कुमार याला अर्शदीप  सिंह ने मोहम्मद सिराज याच्या हाती झेल देत बाद केले. नितेश कुमार यानी 23 चेंडू मध्ये 27 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.(Ind vs Usa) आता कोरी अँडरसन च्या साथीला हरमित सिंग आला होता. संघाचे धावफलक 96 असताना कोरी अँडरसन देखील बाद झाला. सतराव्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर अमेरिका संघाची सहावी विकेट पडली कोरि अँडरसन याला हार्दिक पांड्याने ऋषभ पंत च्या हाती झेल देत बाद केले. कोरी अंडरसन यानी 12 चेंडूमध्ये 15 धावा केला त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावला. आता युएसए संघाची स्थिती 96 धावा आणि 6 गडी बाद अशी झाली होती.

कोरि अँडरसन बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी शाल्कविक हा फलंदाजीसाठी आला परंतु धावफलकांमध्ये 2 धावांची भर पडल्यानंतर हरमित सिंग हा देखील बाद झाला 98 धावावर यूएसए संघाची सातवी विकेट पडली.अठराव्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर हरमित सिंग बाद झाला त्याला अर्शदीप सिंग ने पंत च्या हाती झेल देत बाद केले. आता फलंदाजीसाठी मैदानात यश दीप सिंग हा आला. या जोडीने सावकाशपणे खेळत 15 चेंडू मध्ये 12 धावांची भागीदारी केली आणि संघाला 110 धावसंख्येपर्यंत नेऊन पोहोचविले.(Ind vs Usa) विसाव्या ओवरच्या शेवटच्या चेंडूवर जसदीपसिंग हा बाद झाला 2 धावा काढण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. युएसए संघाने 20 ओवर मध्ये 8 गडी गमावत 110 धावा केल्या आणि भारताला 111 धावांचे आव्हान दिले.

भारतीय गोलंदाजी समोर यूएसए संघाचे फलंदाज हे निष्फळ ठरले आणि कोणताही फलंदाज हा जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाही. भारतीय गोलंदाज भेदक गोलंदाजी करत अमेरिका संघाच्या फलंदाजांना स्वस्तात बाद करण्यात यशस्वी झाले भारताकडून अर्शदीप  सिंह यानी 4 ओव्हर मध्ये 9 धावा देत 4 गडी बाद केले. हार्दिक पांड्या याने 2 विकेट घेतल्या आणि अक्षर पटेल यानी 1 विकेट घेतली.

110 धावांचे आव्हान हे जरी छोटे असले तरी युएसए संघाचे गोलंदाज हे उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने भारतीय संघाला हे आव्हान देखील कठीण जाणार होते. यूएसए संघाचे क्षेत्ररक्षण देखील चांगले आहे.

भारतीय संघाची सलामीची जोडी पुन्हा फेल

भारतीय संघाकडून सलामीसाठी कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी मैदानात उतरली होती. ही जोडी भारतीय संघासाठी दमदार सुरुवात करून देईल अशी आशा होती. परंतु या सामन्यात देखील विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला आणि तो शून्य धावांवर बाद झाला. (Ind vs Usa) मागील 2 सामन्यात देखील विराट कोहली चांगली कामगिरी करू शकला नव्हता. पहिल्या चेंडूवर रोहित शर्मा ने 1 धाव काढली आणि विराट कोहली हा स्ट्राइक वर आला गोलंदाजीसाठी यूएसए संघाचा भेदक गोलंदाज सौरभ नेत्रवळकर हा होता.

दुसरा चेंडू हा विराट कोहली यानी खेळला. परंतु विराट कोहली चुकीचा फटका मारून सौरभ च्या गोलंदाजीवर अँड्रेस च्या हाती झेल देत शून्य धावांवर बाद झाला भारतीय संघाची स्थिती ही एक धाव आणि 1 गडी बाद अशी नाजूक झाली होती. अमेरिका संघाने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली. विराट कोहली बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी रिषभ पंत हा मैदानात आला आता ही जोडी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती.(Ind vs Usa) परंतु अमेरिका सारख्या नवख्या संघासमोर भारतीय संघ देखील अयशस्वी ठरत होता. संघाचे धावफलक 10 धावा असताना भारतीय संघाची दुसरी विकेट पडली. तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्मा हा बाद झाला त्याला नेत्रवळकर यानी हरमित सिंग च्या हाती झेल देत बाद केले. रोहित शर्मा यानी 6 चेंडू मध्ये 3 धावा केल्या होत्या.

हे देखील वाचा : Aus vs Nam ऑस्ट्रेलियाचा नामिबिया वर 9 विकेट्सनी विजय; सुपर – ८ चे तिकीट कन्फर्म 

अशाप्रकारे भारताची सलामीची जोडी अयशस्वी ठरली. भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला वृषभ पंत आणि सूर्यकुमार यादव या जोडीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. ऋषभ पंत हा मोठे टोले लगावण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो अडखळत होता. भारतीय संघाला हे आव्हान सहजासहजी पार होणार नव्हते. संघाचे धावफलक 39 असताना भारतीय संघाची तिसरी विकेट पडली. आठव्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर रिषभ पंत हा बाद झाला भारतीय संघाची स्थिती आता 39 धावा 3 गडी बाद अशी झाली होती. ऋषभ पंत याला अली खान यानी बोल्ड आऊट केले. रिषभ पंत याने  18 चेंडू मध्ये 20 धावा केल्या.

त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव या दोघांमध्ये 32 चेंडू मध्ये 29 धावांची भागीदारी झाली होती. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी शिवम दुबे हा आला.या जोडीने संयमाने खेळत धावफलक हलते ठेवले. भारतीय संघाच्या कोणत्याही फलंदाजाला सहजासहजी खेळता येत नव्हते. अमेरिकेच्या उत्कृष्ट गोलंदाजी समोर भारतीय फलंदाज हे देखील डगमगत होते. 110 धावांचे छोटे आव्हान देखील भारतीय संघाला सोपे नव्हते. सहजासहजी पार होईल असे आव्हान देखील भारतीय संघ अवघड जात होते. शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यानी कुठलीही चूक न करता संयमाने खेळत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

सूर्यकुमार यादव यानी आपली टी ट्वेंटी विश्वचषकातील पहिले अर्धशतक पूर्ण केले. सूर्य कुमार यादव यानी 49 चेंडू मध्ये 50 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार लगावले तर दुसऱ्या बाजूने शिवम दुबे याने देखील चांगली कामगिरी करत सूर्यकुमार यादव याला साथ दिली. शिवम दुबे यानी नाबाद 35 चेंडू मध्ये 31 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावला. (Ind vs Usa) भारतीय संघाने हे आव्हान 3 गडींच्या मोबदल्यात 19 व्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर पूर्ण केले. या विजयाबरोबरच भारताने सलग 3 सामने जिंकले आणि गुणतालिकेत 6 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

आता भारतीय संघाचे सुपर 8 सामन्यांमध्ये स्थान निश्चित झाले आहे. अमेरिका संघाने 3 सामन्यांमधील 2 सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे  तर एका सामन्यात पराभव झाल्याने अमेरिका संघाकडे 4 गुण आहे. 4 गुणांसह अमेरिका गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

हे देखील वाचा : Pak Vs Can सलग दोन पराभवानंतर पाकिस्तानी विजयी,पाकिस्तानचा कॅनडा वर 7 विकेटन विजय

सामन्याचा मानकरी 

अमेरिका संघाच्या फलंदाजांच्या नाकी दम आणणारा भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यानी 4 ओव्हर मध्ये 9 धावा देत यूएसए संघाचे 4 गडी बाद केले.(Ind vs Usa) त्याची ही कामगिरी उत्कृष्ट राहिली आणि तो या सामन्याचा मानकरी ठरला.

Spread the love