IND Vs AFG Highlights : भारतीय संघाची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल, अफगाणिस्तान संघाचा 47 धावांनी केला पराभव

IND Vs AFG Highlights : भारतीय संघाची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल, अफगाणिस्तान संघाचा 47 धावांनी केला पराभव

IND Vs AFG Highlights T20 World Cup 2024 मधील 43 व्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान हे 2 संघ आमने सामने आले होते. सुपर 8  मधील हा ग्रुप 1मधील पहिला सामना होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सुपर 8 मधील पहिला सामना खेळली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघासमोर विजयासाठी 182 धावांचे आव्हान दिले होते.

IND Vs AFG Highlights
IND Vs AFG Highlights

IND Vs AFG Highlights182 या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाने 20 ओवर मध्ये 134 धावा पर्यंत मजल मारली. शेवटच्या चेंडूवर अर्शदीप सिंग ने विकेट घेतली आणि अफगाणिस्तान संघाचा डाव संपला. या विजयासोबतच भारतीय संघाने सेमी फायनल च्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या विजयामध्ये भारताचे गोलंदाज अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह हे स्टार ठरले.

या दोघांनी प्रत्येकी 3 -3 विकेट घेतल्या. तर फलंदाजी मध्ये सूर्यकुमार यादव यानी अर्धशतकीय पारी खेळली. आणि भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या यानी 32 धावा ठोकल्या. हा सामना भारतीय संघाने 47 धावांनी जिंकला. भारतीय संघाचा हा सलग पाचवा विजय आहे.(IND Vs AFG Highlights) T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान हे 2 पहिल्यांदाच भिडले होते. भारतीय संघासाठी हा सामना कठीण होता कारण प्रतिस्पर्धी संघ अफगाणिस्तान या संघाने दिग्गज संघांना पराभूत करून सुपर 8  मध्ये एन्ट्री केलेली होती.

अफगाणिस्तान संघाकडे असणारे अष्टपैलू खेळाडू हे भारतीय संघासाठी घातक ठरणार होते. अफगाणिस्तान संघाची गोलंदाजी देखील चांगली आहे. अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजांना यश देखील मिळाले त्यानी भारतीय फलंदाजाना अडखळत खेळण्यास भाग पाडले. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे देखील दोघे स्वस्तात बाद झाले. टीम इंडियाचा सुपर 8  मधील दुसरा सामना हा 22 जून ला बांगलादेश विरुद्ध होणार आहे. 

भारतीय संघाची फलंदाजी (IND Vs AFG Highlights)

भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे मैदानात उतरले होते. या दोघांनी सुरुवातीपासूनच आक्रमकपणा दाखविला होता. परंतु दोघेही फलंदाज अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजी समोर निष्पळ ठरत होते.(IND Vs AFG Highlights) दोघेही फलंदाजांना जोरदार टोले लगावण्यात अपयश येत होते. अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजी समोर रोहित देखील अपयशी ठरत होता. ही जोडी भारतीय संघासाठी चांगली सुरुवात करून देईल अशी अपेक्षा होते.

(IND Vs AFG Highlights) परंतु या सामन्यात देखील भारतीय संघाची सलाम ची जोडी अपयशी ठरली. आणि तिसऱ्या ओवरच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला रोहित शर्मा जोरात टोला लगावण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याला फारुकी यानी राशीद खानच्या हाती झेल देत बाद  केले. रोहित शर्मा ने 13  चेंडू मध्ये 8 धावा केल्या त्यामध्ये 1चौकार लगावला होता. सिक्स मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा बाद झाला त्याने जोरदार टोला लगावला परंतु चेंडू हा जागेवर उंच गेला आणि राशीद खान याने झेल घेतला.

रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारतीय संघाची स्थिती 11 धावा 1 गडी बाद अशी झाली होती. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी रिषभ पंत हा आला विराट कोहली आणि ऋषभ पंत या जोडीने संयमाने केली. कोहली देखील चेंडू सीमारेखा पार पाठवण्याचा प्रयत्न करत होता.

परंतु अफगाणिस्तान संघाच्या भेदक गोलंदाजी समोर तोही निष्क्रिय ठरत होता. 7 व्या ओवरच्या 6 व्या चेंडूवर ऋषभ पंत बाद झाला. ऋषभ पंत याला राशिद खान यानी पायचीत बाद केले. रिषभ पंत यानी 11 चेंडू मध्ये 20  धावा केल्या. त्यामध्ये 4 चौकार लगावले होते.(IND Vs AFG Highlights) आता भारतीय संघाची स्थिती 54 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. भारतीय संघाला पावर-प्ले मध्ये जास्त धावा काढता आल्या नाही.

ऋषभ पंत बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव हा फलंदाजीसाठी आला सूर्यकुमार यादव याचे T-20 सामन्यांमध्ये रेकॉर्ड चांगले आहे. सूर्यकुमार यादव हा देखील शांतपणे खेळणार नव्हता. तोही आल्यापासूनच जोरदार फलंदाजी करत होता. परंतु दुसऱ्या बाजूने असलेला विराट कोहली याला मात्र अपयश येत होते.

अखेर संघाच्या धावा 62 असताना भारतीय संघाची तिसरी विकेट पडली विराट कोहली हा राशीद खानच्या गोलंदाजीवर मोहम्मद नाबी च्या हाती झेल देत बाद झाला. विराट कोहली यानी 24 चेंडू मध्ये 24 धावा केल्या त्यामध्ये 1 षटकार लगावला. विराट कोहलीने चौकार लगावण्याच्या प्रयत्नात झेल दिला. नवव्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर विराट कोहली बाद झाला. आता भारतीय संघाची स्थिती 62 धावा 3 गडी बाद अशी झाली होती.

(IND Vs AFG Highlights) विराट कोहली सूर्यकुमार यादव या दोघांमध्ये 9  चेंडूमध्ये 8  धावांची भागीदारी झाली होती. आता फलंदाजीसाठी शिवम दुबे हा आला.आतापर्यंतच्या T-20 वर्ल्ड कप मध्ये सामन्यांमध्ये शिवम दुबे अपयशी ठरला आहे. कोणत्याही सामन्यांमध्ये तो मोठी धावसंख्या उभारू शकलेला नव्हता. आणि या सामन्यात देखील तो जास्त धावा करू शकला नाही.

शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव मध्ये 14 चेंडू मध्ये 28 धावांची भागीदारी झाली. आणि संघाचे धावफलक 90 असताना शिवम दुबे देखील बाद झाला. 11 व्या ओवरच्या पाचव्या चेंडूवर शिवम दुबे बाद झाला. त्याला राशिद खान यानी पायचीत बाद केले. शिवम दुबे यानी 7  चेंडू मध्ये 10 धावा केले त्यामध्ये 1 षटकार लगावला होता. आता भारतीय संघाची स्थिती 90 धावा 4 गडी बाद अशी झाली होती.(IND Vs AFG Highlights) आता 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या हा आला. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी संघाला सावरत चांगली भागीदारी केली. या जोडीने आक्रमक खेळी करत भारतीय संघाला 150 धावांचा पल्ला गाठून दिला.

सूर्यकुमार यादव ला हार्दिक पांड्या यानी चांगली साथ दिली. सूर्यकुमार यादव हा  अफगाणिस्तान संघाचे गोलंदाजांचा चांगला समाचार घेत होता. सूर्यकुमार यादव ने चेंडू मध्ये  28 मध्ये 53 धावा केले. त्यामध्ये 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. आणि त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर सूर्यकुमार यादव देखील बाद झाला. सूर्य कुमार यादव हा फारुकीच्या गोलंदाजीवर नाबीच्या हाती झेल देत बाद झाला.

षटकार लागवण्याच्या प्रयत्नात चेंडू उंच गेला आणि झेल घेतला. सूर्यकुमार यादव बाद झाला तेव्हा भारतीय संघाचे धावफलक 150 धावा 5 गडी बाद  आणि 17 ओव्हर अशी झाली होती. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या जोडीने अफगाणिस्तान संघाची गोलंदाजींची धुलाई करत 37 चेंडू मध्ये 60 धावा कुटल्या होत्या.

सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी रवींद्र जडेजा हा आला. भारतीय संघाची फलंदाजी ही खूप मोठी होती. परंतु अफगाणिस्तान संघाच्या आक्रमक गोलंदाजी पुढे भारतीय फलंदाज हे कमजोर ठरत होते. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा ही जोडी जास्त वेळ मैदान टिकली नाही. या जोडीने 6  चेंडू मध्ये 9  धावांची भागीदारी केली. आणि संघाचे धावफलक 169 असताना 18 व्या ओवर मध्ये हार्दिक पांड्या बाद झाला. हार्दिक पांड्या याला नवीन अलहक याने अजून अब्दुल्ला च्या हाती झेल देत बाद  केले.

हार्दिक पांड्या यानी 24 चेंडूमध्ये 32 धावा केल्या त्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी अक्सर पटेल हा आला आता 12  चेंडू शिल्लक राहिले असताना भारतीय संघाचे फलंदाज हे आक्रमकपणे खेळत होते. संघाचे धावफलक 165 असताना रवींद्र जडेजा देखील बाद झाला.

रवींद्र जडेजा यानी 5 चेंडू मध्ये 7 धावा केले. (IND Vs AFG Highlights) त्यामध्ये 1 चौकार लगावला रवींद्र जडेजा याला फारुकी याने गुलाबदीनच्या हाती झेल देत बाद केले. रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी अर्शदीप सिंग हा आला. अर्शदीप सिंग आणि अक्सर पटेल या जोडीने 8  चेंडू मध्ये 16 धावांची भागीदारी केली आणि भारतीय संघाला 181 धावा पर्यंत पोहोचले शेवटच्या चेंडूवर अक्सर पटेल हा धावबाद झाला आणि भारतीय संघाने 20 ओवर मध्ये 8  गडी गमावत 181 धावा काढल्या. 

अफगाणिस्तान संघाकडून गोलंदाजी मध्ये फारुकी याने 3 विकेट घेतल्या आणि अफगाणिस्तान संघाचा कप्तान राशीद खान यानी देखील 3 विकेट घेतल्या. नवीन अलहक  याला 1 विकेट मिळाली. 

अफगाणिस्तान संघाची फलंदाजी (IND Vs AFG Highlights)

अफगाणिस्तान संघासमोर जिंकण्यासाठी 182 धावांचे आव्हान दिले होते. अफगाणिस्तान संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी गुरबाज आणि हजरतुल्लाह  ही जोडी मैदानात उतरली. अफगाणिस्तान संघाच्या फलंदाजांनी देखील आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली होती. पहिल्याच ओव्हर मध्ये गुरबाज यानी भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला गुरबाज यानी पहिल्या ओवर मध्येच 1 चौकार आणि 1 षटकार लगावला. परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये बुमराह यानी गुरबाज याला बाद केले. गुरबाज यानी 8  चेंडूमध्ये 11 धावा केल्या. त्या मध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. बुमराह याने गुरबाज याला पंथ च्या हाती झेल देत बाद केले.

गुरबाज आणि  हजरतुल्लाह  या जोडीने 8  चेंडू मध्ये 13  धावांची भागीदारी केली होती अफगाणिस्तान संघाची स्थिती 13 धावा 1 गडी बाद अशी झाली होती. गुरबाज बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी इब्राहिम हा आला भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजी समोर अफगाणिस्तान संघाचे फलंदाज देखील निष्क्रिय ठरत होते. भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तान संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते. इब्राहिम आणि हजरतुल्लाह   ही जोडी देखील मैदानात जास्त वेळ टिकली नाही. चौथ्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर इब्राहिम हा बाद झाला.

IND Vs AFG Highlights
IND Vs AFG Highlights

त्याला अक्सर पटेल याने रोहित शर्माच्या हाती झेल देत बाद केले. इब्राहिम याने 11 चेंडूंमध्ये 8  धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार लगावला होता. (IND Vs AFG Highlights) आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 23 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. या जोडीने 14 चेंडू मध्ये 10 धावांची भागीदारी केली होती. इब्राहिम बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी गुलाबदिन हा आक्रमक फलंदाज आला परंतु संघाच्या धावफलकामध्ये कुठलीही भर न पडता 23 धावांवर अफगाणिस्तान संघाची तिसरी विकेट पडली. पाचव्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर हजरतुल्लाह हा देखील बाद झाला.

हजरतुल्लाह  याला बुमराणे रवींद्र जडेजाच्या हाती झेल देत बाद केले. हजरतुल्लाह  याने 4 चेंडू मध्ये 2 धावा केल्या होत्या. आता अफगाणिस्तान संघाची स्थिती ही 23 धावा 3 गाडी बाद अशी नाजूक झाली होती. हजरतुल्लाह बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आझमतुलाह हा आला या जोडीने संघाला सावरत धावफलक हलते ठेवले. या जोडीने आक्रमकपणे खेळत अफगाणिस्तान संघाला सामनामध्ये टिकून ठेवले. परंतु संघाचे धावफलक 67 असताना ही जोडी देखील फुटली 67 धावांवर अफगाणिस्तान संघाची चौथी विकेट पडली. 11 व्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर गुलाबदिन हा बाद झाला. त्याला कुलदीप यादव यानी पंथच्या हाती झेल देत बाद केले गुलाबदिन यानी 21 चेंडू मध्ये 17 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावला होता.

गुलाब आणि आझमतुलाह या दोघांनी 38 चेंडू मध्ये 44 धावांची भागीदारी केली होती गुलाबदिन बाद झाल्या नंतर फलंदाजीसाठी नाझीबुल्लाह हा आला. ही जोडी मैदानात जास्त वेळ टिकली नाही या जोडीने 5 चेंडू मध्ये 4 धावांची भागीदारी केली. संघाचे धावफलक 71 असताना आझमतुलाह हा देखील बाद झाला 12 व्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर आझमतुलाह बाद झाला. (IND Vs AFG Highlights) त्याला रवींद्र जडेजा यानी अक्सर पटेल च्या हाती झेल देत बाद केले. आझमतुलाह यानी 20 चेंडूमध्ये 26 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 71 धावा 5 गाडी बाद अशी झाली होती.

आझमतुलाह बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मोहम्मद नाबी हा मैदानात आला या जोडीने संघाला सावरत शंभर धावांचा पल्ला गाठून दिला परंतु अजूनही संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 82 धावांची गरज होती ही जोडी आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करत होती. परंतु भारतीय संघाचे भेदक गोलंदाजी समोर ते जोरदार टोले लगावण्यात अपयशी ठरत होते. संघाचे धावफलक 102 असताना नाझीबुल्लाह हा देखील बाद झाला. 16 व्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर अफगाणिस्तान संघाची 6 वी विकेट पडली.

(IND Vs AFG Highlights) नाझीबुल्लाह याला बुमरा यानी अर्शदीप सिंग च्या हाती झेल देत बाद केले. नाझीबुल्लाह यानी 17  चेंडूमध्ये 19 धावा केल्या त्यामध्ये 2 षटकार लगावले होते. आता अफगाणिस्तान संघाची स्थिती नाजूक झाली होती. नाझीबुल्लाह आणि मोहम्मद नाबी या दोघांमध्ये 25 चेंडू मध्ये 31 धावांची भागीदारी झाली होती.

हे देखील वाचा : Maruti Suzuki Wagonr आली आहे मारुतीची नवीन कार Wagonr Top Model

नाझीबुल्लाह बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी अफगाणिस्तान संघाचा कप्तान राशीद खान हा आला. आता अफगाणिस्तान संघाला या परिस्थितीतून सामना जिंकणे कठीण होते. तरी देखील अफगाणिस्तान संघाचे फलंदाज हे प्रयत्न करत होते. या जोडीने 7 चेंडूमध्ये 12 धावांची भागीदारी केली आणि संघाचे धावफलक 114 असताना अफगाणिस्तान संघाची 7 वी विकेट पडली. 17 व्या वरच्या तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद नाबी हा बाद झाला.

मोहम्मद नाबी याला कुलदीप यादव यानी रवींद्र जडेजाच्या हाती जेल देत बाद  केले. मोहम्मद नाबी याने 14 चेंडू मध्ये 14 धावा केल्या. त्यामध्ये 1 षटकार  लगावला होता. आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 114 धावा आणि 7  गाडी बाद अशी झाली होती. या परिस्थितीतून सामना जिंकणे कठीण होते. आता राशीद खान च्या साथीला फलंदाजीसाठी नूर अहमद हा आला.

या दोघांनी 7  चेंडूमध्ये 7  धावांची भागीदारी केली. आणि संघाचे धावफलक 121 असताना राशिद खान हा देखील बाद झाला. 18 व्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर अफगाणिस्तान संघाचा कप्तान राशीद खान हा बाद झाला. राशीद खान यानी 6  चेंडूमध्ये 2 धावा केल्या होत्या. (IND Vs AFG Highlights) त्याला अर्शदीप सिंग यानी रवींद्र जडेजाच्या हाती झेल देत  बाद केले. आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 121 धावा 8  गाडी बाद अशी झाली होती. त्यानंतर फलंदाजीसाठी नवीन अलहक हा आला परंतु पुढच्या चेंडूवर नवीन हा देखील बाद झाला. अर्शदीप सिंग यानी नवीन अलहक याला पंथच्या हाती झेल देत बाद  केले. नवीन अलहक याने 1 चेंडूमध्ये शून्य धावा केल्या.

आता अफगाणिस्तान संघाचे शेवटची विकेट नूर अहमद हा फलंदाजीसाठी आला. या जोडीने टोले लगावत संघाचे धावफलकामध्ये भर पाडली. या जोडीने 13 चेंडूमध्ये 13 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर नूर अहमद बाद झाला. त्याला अर्शदीप सिंग यानी पंथ च्या हाती झेल देत बाद केले. नूर अहमद यानी 18 चेंडू मध्ये 12 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. आणि फारुकी याने 1 चेंडू मध्ये 4 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार लगावला होता. अशाप्रकारे अफगाणिस्तान संघ हा 20 ओवर मध्ये 134 धावांवर आटोपला आणि अफगाणिस्तान संघ हा सामना 47 धावांनी पराभूत झाला.

हे देखील वाचा : WI vs ENG : फील सॉल्ट ची तुफान फटकेबाजी, या चुकीमुळे वेस्टइंडीज संघाचा सुपर 8 मध्ये झाला पराभव

सामन्याचा मानकरी 

भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव हा या सामन्याचा मानकरी ठरला. सूर्यकुमार यादव यानी अर्धशतकीय खेळी केली होती. सूर्यकुमार यादव यानी 28 चेंडूंमध्ये 53 धावा केल्या त्यामध्ये 5 चौकार आणि 3 षटकार लगावले होते. (IND Vs AFG Highlights) भारतीय संघाची स्थिती 90 धावा 4 गडी बाद अशी नाजूक झाली होती. परंतु सूर्यकुमार यादव यानी चांगली खेळी करत संघाला सावरले सूर्यकुमार यादव याला भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या याने देखील चांगली साथ दिली.

Spread the love