IND VS ENG Semi final Highlights : इंग्रजांचा 68 धावांनी उडविला धुव्वा, भारताची फायनल मध्ये थाटात एन्ट्री
IND VS ENG Semi final Highlights: T20 World Cup 2024 मधील सेमी फायनल सामन्या मध्ये भारत आणि इंग्लंड हे 2 संघ भिडले होते. भारताने या सामन्यात 68 धावांनी विजय मिळवित इंग्लंडला धूळ चारली आहे. गत विजेत्या इंग्लंड संघाला भारताने अक्षरशा गुडघे टेकविण्यास भाग पाडले होते. या सामन्यात भारताने एकेरी विजय मिळवित फायनल मध्ये एन्ट्री केलेली आहे. हा सामना गोयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळविण्यात आला होता.
IND VS ENG Semi final Highlights इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर मध्ये 7 गडी गमावत 171 धावा केल्या होत्या. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने सामना हा उशिरा सुरू झाला होता.पावसामुळे मैदान ओलसर असताना देखील भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली. भारतीय संघाकडून रोहित शर्मा 57 धावा, सूर्यकुमार यादव 47 धावा, हार्दिक पांड्या 23 आणि रविंद्र जडेजा 17 अशा धावा केल्या.
भारतीय संघाकडून सलामीला रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने सावधपणे खेळण्यास सुरुवात केली होती. मैदान ओलसर असताना हे मैदान गोलंदाजांसाठी चांगले असते. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी सावकाशपणे खेळण्यास सुरुवात केली होती. परंतु थोड्या वेळानेच विराट कोहली बाद झाला.IND VS ENG Semi final Highlights विराट कोहली बाद झाल्यानंतर रोहितच्या साथीला ऋषभ पंत हा फलंदाजीसाठी आला होता. परंतु तोही जास्त वेळ साथ न देता लवकरच बाद झाला. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव यानी रोहितला चांगली साथ देत दोघांनी संघासाठी चांगले धावफलक पुढे नेले.
रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी 50 बॉल मध्ये 73 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ने 57 धावा 39 बॉल मध्ये केल्या. त्यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. तर सूर्यकुमार यादव यानी 36 चेंडू मध्ये 47 धावा केल्या त्यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकार लगावले होते. टीम इंडियाकडून 172 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर इंग्लंड संघाची सलामीची जोडी मैदानात आली आणि दोघेही आक्रमक फलंदाज जॉस बटलर आणि साल्ट यानी संघाला चांगली सुरुवात करून दिली. हि जोडी भारतीय संघा साठी घातक ठरली असती.या दोघांनी 26 धावांची भागीदारी केली होती. इंग्लंड संघाचे असणारी आक्रमक फलंदाजी यामुळे भारतीय संघावर दडपण होते.
परंतु अक्षर पटेल हा भारतीय संघाच्या मदतीला धावून आला. आणि त्याने इंग्लंड संघाची पहिली विकेट घेतली. मग येथूनच इंग्लंड संघाच्या विकेट पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर इंग्लंड संघ सावरू शकला नाही. मग भारतीय गोलंदाजांनी जणू इंग्लंड संघावर हल्लाच चढविला त्यानंतर कोणताही फलंदाज मैदानात जास्त वेळ टिकू शकला नाही. भारतीय संघाकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना 3-3 विकेट मिळाल्या. तर जसप्रीत बुमरा याला 1 विकेट मिळाली.
भारतीय संघाला योग्य वेळेस विकेट मिळून देणारा अक्षर पटेल हा सामन्याचा मानकरी ठरला. या विजया सोबतच भारत आता फायनल मध्ये पोहोचला आहे.(IND VS ENG Semi final Highlights) फायनल मध्ये भारताचा मुकाबला हा दक्षिण आफ्रिका सोबत होणार आहे. दक्षिण आफ्रिका हा पहिल्यांदाच टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधील फायनल मध्ये पोहोचला आहे. अंतिम सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत 29 जूनला होणार आहे.
इंग्लंड संघ
फिलिप्स सॉल्ट,जोस बटलर, मोईन अली, हॅरी ब्रूक, जॉनी बेरस्टो, आदिल रशीद, रीस टोपले, लिविंग स्टोन, सेम करण, जोफरा आर्चर, क्रिस जॉर्डन.
भारतीय संघ
रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल,अर्शदिप सिंग जसप्रीत बुमरा.
भारतीय संघाची फलंदाजी (IND VS ENG Semi final Highlights)
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघ हा प्रथम फलंदाजी करणार होता पावसाचा व्यक्ती आल्याने हा सामना उशिरा सुरू झाला. पाऊस झाल्याकारणाने मैदान हे ओलसर असल्याने याचा फायदा इंग्लंड संघाला होणार होता. थोड्यावेळाने सामना सुरू झाल्यानंतर भारतीय संघाची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी मैदानात उतरली. टी ट्वेंटी वर्ल्ड कप सामन्यात विराट कोहली चा असलेला खराब फॉर्म या सामन्यात देखील बघायला मिळाला. या सामन्यात देखील विराट कोहली जास्त धावा न करता लवकरच बाद झाला. विराट कोहली याने आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली होती.
परंतु तो लगेच बाद झाला संघाचे धावफलक 19 असताना भारतीय संघाची पहिली विकेट विराट कोहलीच्या रूपात पडली. तिसऱ्या ओवरच्या चौथ्या बॉल मध्ये तो बाद झाला विराट कोहली याला टोपले यानी बोल्ड केले. कोहली ने 9 चेंडूमध्ये 9 धावा केल्या. त्यामध्ये 1 षटकार लगावला होता. दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा हा चांगला खेळत होता रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांमध्ये 16 चेंडू मध्ये 19 धावांची भागीदारी झाली होती. विराट कोहली बाद झाल्यानंतर रोहित शर्माच्या साथीला ऋषभ पंत हा आला. परंतु ऋषभ पंत देखील थोडा वेळ मैदानात टिकला आणि तोही बाद झाला रिषभ पंत यानी 6 चेंडू मध्ये 4 धावा केल्या आणि तो बाद झाला.
जोरदार टोला लगावण्याच्या प्रयत्नात तो सॅम च्या गोलंदाजीवर बेअरस्टोच्या हाती झेल देत बाद झाला. पंत यानी 6 चेंडू मध्ये 4 धावा केल्या होत्या. दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा हा जोरदार खेळी करत होता 6 व्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर ऋषभ पंत बाद झाला. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत या दोघांमध्ये 16 चेंडू मध्ये 21 धावांची भागीदारी झाली होती. भारतीय संघाचे धावफलक 40 धावा 2 गडी बाद असे झाले होते. (IND VS ENG Semi final Highlights) ऋषभ पंत बाद झाल्यानंतर रोहित शर्माच्या साथीला भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव आला. सूर्यकुमार यादवने मागील काही सामन्यात संघाला मोठे योगदान दिले होते. या सामन्यात देखील त्याने त्याचप्रमाणे खेळी केली आणि रोहित शर्माला चांगली साथ दिली.
या दोघांनीही इंग्लंड च्या गोलंदाजांवर हल्ला चढवत भारतीय संघाचे धावफलक पुढे नेले. भारतीय संघाने 100 धावांचा पल्ला गाठला आणि रोहित शर्मा ने आपले फिफ्टी पूर्ण केली. संघाचे धावफलक 113 असताना भारतीय संघाची तिसरी विकेट ही रोहित शर्मा च्या रूपाने पडली. 14व्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्मा याला आदिल रशीद यानी बोल्ड केले. रोहित शर्मा यानी 39 चेंडू मध्ये 57 धावा केल्या त्यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. रोहित शर्मा हा महत्त्वाची भूमिका बजावून बाद झाला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यादव यांनी 50 चेंडू मध्ये 73 धावांची मोठी भागीदारी झाली होती. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव च्या साथीला हार्दिक पांड्या हा आला.
या दोघांनीही आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली होती. परंतु थोड्याच वेळाने सूर्यकुमार यादव देखील बाद झाला. संघाचे धावफलक 124 असताना सूर्यकुमार यादव बाद झाला. 16 व्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर त्याला जोफरा आर्चर यानी ख्रिस जॉर्डनच्या हाती झेल देत बाद केले. (IND VS ENG Semi final Highlights) सूर्यकुमार यादव यानी 47 धावांची मोठी खेळी केली. त्यानी 36 झेंडूमध्ये 47 धावा केल्या त्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या दोघांमध्ये 12 चेंडूमध्ये 11 धावांची भागीदारी झाली होती. आता भारतीय संघाची स्थिती ही 124 धावा 4 गाडी बाद अशी झाली होती. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या च्या साथीला रवींद्र जडेजा हा फलंदाजीसाठी आला. या दोघांनीही संयमाने खेळी करत धावफलक हलते ठेविले.
सतराव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्या देखील बाद झाला. भारतीय संघाचे धावफलक 140 असताना 5 वी विकेट पडली. हार्दिक पांड्या याला क्रिस जॉर्डन यानी सेम करन च्या हाती झेल देत बाद केले. हार्दिक पंड्या यानी 13 चेंडू मध्ये 23 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. हार्दिक पांड्या आणि जडेजा या दोघांमध्ये 12 चेंडू मध्ये 22 धावांची भागीदार झाली होती. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाच्या साथीला शिवम दुबे हा आला. शिवम दुबे हा मागील काही सामन्यात चांगली खेळी करू शकलेला नव्हता. या सामन्यात देखील तो शून्य धावांवर बाद झाला.
पहिल्या चेंडूवर जोरदार टोला लगावला आणि चेंडूला सीमा रेखा पार पाठविण्याच्या प्रयत्नात तो ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर बटलरच्या हाती झेल देत बाद झाला. शिवम दुबे हा पहिल्या चेंडूवर एकही धाव न करता बाद झाला. शिवम दुबे बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी अक्सर पटेल हा आला. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या जोडीने चांगली खेळी केली आणि भारतीय संघाला 150 धावांच्या पुढे नेले. या दोघांनी भारतीय संघाला 170 धावांचा हल्ला गाठून दिला. शेवटच्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर अक्षर हा बाद झाला. अक्षर पटेल याला क्रिस जॉर्डन यानी सॉल्टच्या हाती झेल देत बाद केले.
अक्सर पटेल यानी 6 चेंडू मध्ये 10 धावा केल्या त्यामध्ये 1 षटकार लगावला होता. अक्षर पटेल यानी अखेरच्या ओव्हर मध्ये भारतीय संघाला चांगले योगदान दिले. अक्सर पटेल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 12 चेंडू मध्ये 24 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती. तो बाद झाल्यानंतर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंग हा मैदानात आला. शेवटच्या चेंडू वर त्याने 1 धाव काढली. आणि भारतीय संघाने 20 ओवर मध्ये 7 गडी गमावत 171 धावा केल्या. रवींद्र जडेजा यानी नाबाद 9 चेंडू मध्ये 17 धावा केल्या.
त्यामध्ये 2 चौकार लगावले होते. आणि अर्शदिप सिंग यानी 1 चेंडूमध्ये 1 धाव करत नाबाद राहिला. भारतीय संघाकडून रोहित शर्मा यानी सर्वाधिक 57 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादव यानी 47 धावांचे योगदान दिले. इंग्लंड संघाकडून गोलंदाजी मध्ये 4 गोलंदाजांना 1-1 विकेट मिळाली. रीस टोपले, जोफ्रा आर्चर, स्याम करण आणि आदिल रशीद यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. तर क्रिस जॉर्डन याला 3 विकेट मिळाली.
इंग्लंड संघाची फलंदाजी (IND VS ENG Semi final Highlights)
भारतीय संघाने दिलेल्या 20 ओवर मध्ये 172 धावांचे आव्हान हे इंग्लंड संघाच्या आक्रमक फलंदाजी पुढे कमी होते. कारण इंग्लंड संघ हा पूर्ण फलंदाजी करू शकतो. इंग्लंड संघ हा सामना जिंकेल असे वाटत होते. इंग्लंड संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी फिलीप साल्ट आणि जोस बटलर ही जोडी मैदानात आली. नेहमीप्रमाणेच या दोघांनी देखील या सामन्यात आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानी 3 ओव्हर मध्ये 26 धावांची भागीदारी केली होती. इंग्लंड संघाची सुरुवात बघून भारतीय संघ हा दडपणात आलेला होता.
परंतु इंग्लंड संघाचे धावफलक 26 असताना. चौथ्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर इंग्लंड संघाची पहिली विकेट पडली. इंग्लंड संघाचा आक्रमक फलंदाज जोस बटलर हा बाद झाला. जोस बटलर याला अक्षर पटेल यानी पंथच्या हाती झेल देत बाद केले. जोस बटलर यानी 15 चेंडू मध्ये 23 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 4 चौकार ठोकले होते जोस बटलर आणि साल्ट या दोघांमध्ये 19 चेंडू मध्ये 26 धावांची भागीदारी झाली होती. जोस बटलर बाद झाल्यानंतर मोईन अली हा आला. या दोघांनी सावकाशपणे खेळण्यास सुरुवात केली होती. परंतु पुढच्या ओव्हर मध्ये इंग्लंड संघाची दुसरी विकेट पडली. इंग्लंड संघाचा सलामीचा फलंदाज फिलिप्स साल्ट हा बाद झाला.
संघाचे धावफलक 34 असताना 5 व्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर इंग्लंड संघाची दुसरी विकेट पडली. फिलिप्स सॉल्ट याला बुमरा याने बोल्ड आऊट केले. फिलिप्स याने चेंडू 8 मध्ये 5 धावा केल्या होत्या फिलिप्स सॉल्ट आणि मोईन अली या दोघांमध्ये 9 चेंडूंमध्ये 8 धावांची भागीदारी झाली होती. (IND VS ENG Semi final Highlights) आता इंग्लंड संघाची स्थिती 34 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. फिलिप्स बाद झाल्यानंतर मोईन अलीच्या साथीला इंग्लंड संघाचा आक्रमक फलंदाज जॉनी बियरस्टो हा फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने सावकाशपणे खेळण्यास सुरुवात केली होती.
परंतु अवघे 3 बॉल खेळल्यानंतर तो बाद झाला. त्याला अक्सर पटेल यानी बोल्ड केले. संघाचे धावफलक 35 असताना इंग्लंड संघाची तिसरी विकेट पडली. 6 व्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर अक्सर पटेल यानी बीअरस्टो याला बोल्ड केले. मोइन अली आणि बेअरस्टो या दोघांमध्ये 3 चेंडू मध्ये 1 धावांची भागीदारी झाली होती. अक्षर पटेल यानी इंग्लंड संघाचे 2 महत्त्वाचे फलंदाज बाद केले होते. आता इंग्लंड संघ हा दडपणा खाली आला होता. आता 5 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी हॅरी ब्रूक हा आला.
(IND VS ENG Semi final Highlights) मोइन अली आणि हरी ब्रूक या दोघांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु ते अपयशी ठरले 8 व्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर मोईन अली देखील बाद झाला. संघाचे धावफलक्ष 40 असताना इंग्लंड संघाची चौथी विकेट पडली. याला अक्सर पटेल याने रिषभ पंत यानी यष्टीचीत बाद केले. मोईन अली यानी 10 चेंडू मध्ये 8 धावा केल्या होत्या. मोईन अली आणि हॅरी ब्रूक या दोघांमध्ये 12 चेंडू मध्ये 11 धावांची भागीदारी झाली होती. आता इंग्लंड संघाची स्थिती 46 धावा 4 गाडी बाद अशी झाली होती. मोईन अली बाद झाल्यानंतर सेम करण हा फलंदाजीसाठी आला. परंतु ही जोडी ही मैदानात जास्त वेळ टिकली नाही.
पुढच्या ओव्हर मध्ये सेम करन देखील बाद झाला. नवव्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर सेम करण याला कुलदीप यादव यानी पायचीत बाद केले. सेम करण आणि 4 चेंडू मध्ये 2 धावा केल्या होत्या. सॅम करण आणि ब्रूक या दोघांमध्ये 6 चेंडू मध्ये 3 धावांची भागीदारी झाली होती. आता इंग्लंड संघाची स्थिती 49 धावा 5 गाडी बाद अशी नाजूक स्थिती झाली होती. आता फलंदाजीसाठी 6 व्या क्रमांकाचा घातक फलंदाज लिविंगस्टोन हा फलंदाजीसाठी आला. हॅरी ब्रुक आणि लिविंगस्टोन या जोडीने सावकाशपणे खेळत संघाचे धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु आज इंग्लंड संघाचा दिवस नव्हता थोडी धावांची भर पडल्यानंतर ब्रूक बाद झाला संघाचे धावफलक 68 असताना इंग्लंड संघाची 6 वी विकेट पडली.
11 व्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर हॅरी ब्रूक हा बाद झाला. हॅरी ब्रुक याला कुलदीप यादव यानी बोल्ड केले. हॅरी ब्रुक याने 19 चेंडू मध्ये 25 धावा केल्या. त्यामध्ये 3 चौकार लगावले होते. लिविंग स्टोन आणि हॅरी ब्रुक या दोघांमध्ये 15 चेंडू मध्ये 19 धावांची भागीदारी झाली होती. आता इंग्लंड संघाची स्थिती 68 धावा 6 गाडी बाद अशी झाली होती. हॅरी ब्रुक बाद झाल्यानंतर लिविंग स्टोनच्या साथीला क्रिस जॉर्डन हा फलंदाजीसाठी आला परंतु 4 धावांची भर पडल्यानंतर इंग्लंड संघाची 7 वी विकेट पडली. 13 व्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर क्रिस जॉर्डन हा बाद झाला. इंग्लंड संघाचे धावफलक 72 असताना क्रिस जॉर्डन याला कुलदीप यादव यानी पायचीत बाद केले.
क्रिस जॉर्डन यानी 5 चेंडू मध्ये 1 धाव केली होती. लिविंगस्टोन आणि क्रिस जॉर्डन या दोघांमध्ये 10 चेंडूंमध्ये 4 धावांची भागीदारी झाली होती. जॉर्डन बाद झाल्यानंतर लिविंग स्टोनच्या साथीला जोफरा आर्चर हा फलंदाजीसाठी आला. जोफरा आर्चर ने आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली होती. परंतु आता इंग्लंड संघ हा अतिशय नाजूक स्थितीत होता. या परिस्थितीमधून संघाला सावरणे मुश्किल होते. संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 90 धावांची गरज होती. इंग्लंड संघाचे धावफलक 80 असताना 8 वी विकेट पडली. (IND VS ENG Semi final Highlights) 15 व्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर लिविंगस्टोन याला कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या दोघांनी धावबाद केले. लिविंगस्टोन यानी 16 चेंडूमध्ये 11 धावा केल्या होत्या.
लिविंगस्टोन आणि जोफरा आर्चर या दोघांमध्ये 15 चेंडू मध्ये 14 धावांची भागीदारी झाली होती. लिविंगस्टोन बाद झाल्यानंतर जोफरा आर्चर च्या साथीला 10 व्या क्रमांकाचा खेळाडू आदिल रशिद हा फलंदाजीसाठी आला. परंतु संघाच्या धावफलकामध्ये 2 धावांची भर पडली. अदील रशीद देखील बाद झाला. 16 व्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर अदिल रशीद बाद झाला. त्याला सूर्यकुमार यादव यानी धावबाद केले. आदिल रशीद यानी 2 चेंडू मध्ये 2 धावा केल्या होत्या. आता इंग्लंड संघाची स्थिती 88 धावा 9 गडी बाद अशी झाली होती. इंग्लंड संघ आता 100 धावा आहे गाठतो की नाही असे झाले होते.
हे देखील वाचा : AFG VS BAN : अफगाणिस्तानची सेमी फायनल मध्ये एन्ट्री, अफगाणिस्तानने रचला इतिहास
आता फलंदाजीसाठी 11व्या क्रमांकाचा खेळाडू रीस टॉपले हा फलंदाजीसाठी आला या दोघांनी संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला. संघाचे धावफलक 103 असताना इंग्लंड संघाची शेवटची विकेट पडली. 17 व्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर जोफरा आर्चर याला बुमराणे पायचीत बाद केले आणि इंग्लंड संघ हा 16.4 ओव्हर मध्ये 103 धावा आणि सर्व गडी बाद झाला. जोफरा आर्चर आणि रीस टोपले या जोडीने 8 चेंडू मध्ये 15 धावांची भागीदारी केली. भारतीय संघाने हा सामना 68 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड संघाला सावरू दिले नाही.
एकापाठोपाठ एक इंग्लंड संघाची विकेट जातच राहिली. कोणताही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही. इंग्लंड संघाकडून हॅरी ब्रूक 25, जोस बटलर 23, लिविंग स्टोन 11,जोफरा आर्चर 21 या 4 खेळाडू व्यतिरिक्त कोणताही खेळाडू 2 अंकी धावसंख्या गाठू शकला नाही. (IND VS ENG Semi final Highlights) इंग्लंड संघाकडून हॅरी ब्रूक याने सर्वाधिक 25 धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी मध्ये सर्व गोलंदाजांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली. जसप्रीत बुमरा 2 विकेट, अक्षर पटेल 3 विकेट आणि कुलदीप यादवने 3 विकेट घेतल्या. अक्सर पटेल यानी गोलंदाजी मध्ये महत्त्वाच्या 3 विकेट घेतल्या.
अक्सर पटेल यानी इंग्लंड संघाचा कप्तान आणि घातक फलंदाज जोस बटलर याला बाद केले इंग्लंड संघाची पहिली विकेट अक्सर पटेल. यानीच घेतली त्यानंतर मोईन अली याला अक्षर पटेल यानी बाद केले. आणि तिसरी विकेट ही इंग्लंड संघाचा घातक फलंदाज जॉनी बेअरस्टो याला शून्य धावांवर बाद करत इंग्लंड संघाच्या मुख्य विकेट घेतल्या. T-20 World Cup मधील अंतिम सामना हा दक्षिण आफ्रिका आणि भारत या 2 संघांमध्ये 29 तारखेला खेळविण्यात येणार आहे.
(IND VS ENG Semi final Highlights) भारतीय संघ यापूर्वी 2007 साली T-20 World Cup चषक जिंकलेला आहे. तर दक्षिण आफ्रिका हा पहिल्यांदाच फायनल मध्ये पोहोचला आहे. भारतीय संघाचे लक्ष असेल की दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकायचा तर दुसऱ्या बाजूने दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल की पहिला विश्वचषक जिंकण्याचा.
सामन्याचा मानकरी
भारतीय संघाचा स्पिनर गोलंदाज अक्षर पटेल हा या सामन्याचा मानकरी ठरला. अक्षर पटेल यानी 4 ओव्हर मध्ये 23 धावा देत 3 गडी बाद केले. (IND VS ENG Semi final Highlights) अक्षर पटेल यानी इंग्लंड संघाचा कप्तान जोस बटलर, मोईन अली आणि आक्रमक फलंदाज जॉनी बेअरस्टो अशा 3 मुख्य विकेट घेतल्या.