IND VS ZIM 3rd T20 Highlights : भारताने झिम्बाब्वेला 23 धावांनी चारली धूळ, 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने घेतली आघाडी

IND VS ZIM 3rd T20 Highlights : भारताने झिम्बाब्वेला 23 धावांनी चारली धूळ, 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने घेतली आघाडी

IND VS ZIM 3rd T20 Highlights : भारतीय संघाने 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये झिम्बाब्वे संघाला सलग दुसऱ्यांदा पराभूत केले आहे. याआधी झालेल्या 2 सामन्यांमध्ये 1 सामना जिम्बाब्वेने जिंकला होता तर दुसरा सामना हा भारताने जिंकला होता. बरोबरीत झालेल्या सामन्यांमध्ये तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

IND VS ZIM 3rd T20 Highlights
IND VS ZIM 3rd T20 Highlights

IND VS ZIM 3rd T20 Highlights : तिसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने झिम्बाब्वेचा 23 धावांनी धुव्वा उडविला आहे. आता या मालिकेमधील 2 शिल्लक आहे भारतीय संघाने आता 1 सामना जिंकला तरी मालिका आपल्या नावावर होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे झिम्बाब्वे पेक्षा जड आहे.

भारतीय संघात बदल देखील मोठे बदल करण्यात आले होते. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल,खलील अहमद आणि T20 World Cup मध्ये खेळलेला भारतीय संघाचा युवा खेळाडू शिवम दुबे याला देखील या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. (IND VS ZIM 3rd T20 Highlights) या 4 खेळाडूंना संघात स्थान मिळाले होते. तर रियान पराग ध्रुव जुरेल आणि मुकेश कुमार या तिघांना बेंचवर ठेवण्यात आले होते. T20 वर्ल्ड कप नंतर भारतीय संघाचे कोच हे व्ही.व्ही.एस लक्ष्मण आहे.

हा सामना झिम्बाब्वेच्या हरारे येथील हरारे स्पोर्ट क्लब या मैदानावर खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

भारतीय संघाची फलंदाजी (IND VS ZIM 3rd T20 Highlights)

भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी भारतीय संघात नव्याने स्थान मिळविलेला यशस्वी जयस्वाल हा सलामीला फलंदाजीसाठी आला होता. आणि त्याच्यासोबत भारतीय संघाचा कप्तान शुभमन गील हा मैदानात आला होता. या जोडीने भारतीय संघासाठी दमदार अशी सुरुवात करून दिली. या दोघांनी पावर प्ले मध्ये भारताला 55 धावांचे योगदान दिले. एकाबाजूने शुभमन गील हा जोरदार खेळ करत होता तर दुसऱ्या बाजूने यशस्वी जयस्वाल संयमाने खेळी करत होता या जोडीने एकही विकेट न गमवता भारतीय संघाला 50 धावांचा पल्ला गाठून दिला. भारतीय संघाचे धावफलक 67 असताना पहिली विकेट पडली.

पहिल्या विकेटच्या रूपांत यशस्वी हा झेल बाद झाला. नवव्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर यशस्वी जयस्वाल बाद झाला त्याला झिम्बाब्वे संघाचा कप्तान सिकंदर राजा यानी ब्रायन बेनेटच्या हाती झेल देत बाद केले. यशस्वी याने 27 चेंडू मध्ये 36 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गील या दोघांमध्ये 67 धावांची भागीदारी झाली होती. (IND VS ZIM 3rd T20 Highlights) यशस्वी बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अभिषेक शर्मा आला मागील सामन्यात शतक ठोकणारा अभिषेक शर्मा या सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही.

संघाचे धावफलक 81 असताना अभिषेक शर्मा बाद झाला अभिषेक शर्मा याला झिम्बाब्वे संघाचा कप्तान सिकंदर राजा यानी मारुमनी च्या हाती झेल देत बाद केले. अभिषेक शर्मा यानी 9 चेंडूंचा सामना करताना 10 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार लगावला होता भारतीय संघाची 81 धावांवर दुसरी विकेट पडली होती. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गील च्या साथीला फलंदाजीसाठी ऋतुराज गायकवाड हा आला. ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गील या दोघानी संघाला चांगले योगदान दिले. या दोघांनी संयमाने खेळत भारतीय संघाचे धावफलक पुढे नेले.

कोणत्याही प्रकारची घाई न करता सावधपणे खेळत या दोघांनी भारतीय संघाला 150 धावांचा पल्ला गाठून दिला. भारतीय संघाचा कप्तान शुभमन गील यानी आपले अर्धशतक पूर्ण केले होते. संघाचे धावफलक 153 असताना भारतीय संघाची तिसरी विकेट पडली. (IND VS ZIM 3rd T20 Highlights) शुभमन गील याला ब्लेसिंग मुजाराबाणी याने सिकंदर राजाच्या हाती झेल देत बाद केले. शुभमन गील याने 49 चेंडू मध्ये 66 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 7 चौकार आणि 3 षटकार लगावले होते. शुभमन गील बाद झाल्यानंतर ऋतुराज च्या साथीला भारतीय संघाचा एसटी रक्षक संजु सॅमसंन फलंदाजीसाठी आला. संजु सॅमसंन याला नव्यानेच भारतीय संघामध्ये स्थान मिळाले होते.

भारतीय संघाची स्थिती 153 धावा 3 गडी बाद 18 ओवर अशी झाली होती. आता 2 च ओव्हर शिल्लक होत्या.संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यानी जोरदार खेळण्यास सुरुवात केली होती. परंतु ऋतुराज गायकवाड 49 धावांवर असताना तो झेलबाद झाला ऋतुराज गायकवाड याला मुजरबनी यानी वेसली माधेवेरेच्या हाती झेल देत बाद केले. ऋतुराज गायकवाड यानी 28 चेंडूमध्ये 49 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 4 चौकार आणि 3 षटकार लगावले होते. ऋतुराज गायकवाडचे 1 धाववरून अर्धशतक हुकले भारतीय संघाचे धावफलक 177 असताना चौथी विकेट पडली. 20 व्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड बाद झाला.

आता 2 च चेंडू शिल्लक होते. आणि फलंदाजीसाठी आक्रमक फलंदाज रिंकू सिंग हा आला होता. रिंकू सिंग यानी 1 धाव काढली आणि अखेरच्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड यानी चौकार लगावला आणि भारतीय संघाला 20 ओवर मध्ये 182 धावांपर्यंत नेऊन पोहोचविले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर 4 विकेट गमावत 182 धावा केल्या. आणि झिम्बाब्वे संघाला जिंकण्यासाठी 183 धावांचे आव्हान दिले. झिम्बाब्वे संघाकडून गोलंदाजी मध्ये ब्लेसिंग मुजाराबाणी आणि सिकंदर राजा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट मिळविल्या. 

झिम्बाब्वे संघाची फलंदाजी 

भारतीय संघाकडून झिम्बाब्वे संघाला जिंकण्यासाठी 183 धावांची आव्हान मिळाले होते. झिम्बाब्वे संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी वेसली माधेवेरा आणि मारुमनी ही जोडी मैदानात उतरली होती. झिम्बाब्वे संघाने आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला चांगली टक्कर दिलेली होती. या सामन्यात देखील भारतीय संघाला मोठ्या धावांचा पल्ला गाठू दिला नाही. झिम्बाब्वे संघाची सलामीची जोडी जास्त वेळ मैदानात टिकली नाही. संघाचे धावफलक 9 असताना झिम्बाब्वे संघाची पहिली विकेट पडली. दुसऱ्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर वेसली माधेवेरे हा बाद झाला. वेसली माधेवेरे याला आवेश खान याने अभिषेक शर्माच्या हाती झेल देत बाद केले.

वेसली माधेवेरे यानी 2 चेंडूंचा सामना करताना 1 धाव गेली होती. पहिल्या ओवरमध्ये झिम्बाब्वे संघाने चांगली सुरुवात केली होती. (IND VS ZIM 3rd T20 Highlights) पहिल्या ओव्हर मध्ये झिम्बाब्वे संघाने 9 धावा काढल्या होत्या. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये झिम्बाब्वेची पहिली विकेट गेली. वेसली माधेवेरे बाद झाल्यानंतर तडीवांशे मारूमनीच्या साथीला फलंदाजीसाठी झिम्बाब्वे संघाचा आक्रमक फलंदाज ब्रायन बेनेट हा फलंदाजीसाठी आला. आता ही जोडी झिम्बाब्वे संघाला चांगली सुरुवात करून देईल अशी अपेक्षा होती. परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये झिम्बाब्वे संघाची दुसरी विकेट पडली. तिसऱ्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर झिम्बाब्वे संघाचा सलामीचा फलंदाज तडीवांशे मारूमनी हा बाद झाला.

मारोमणी याला खालील अहमद याने शिवम दुबे च्या हाती झेल देत बाद केले. तडीवांशे मारूमनी याने 10 चेंडू मध्ये 13 धावा केल्या होत्या त्यामध्ये 3 चौकार लगावले होते. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 19 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. तडीवांशे मारूमनी बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी डीऑन मायर हा आला. डीऑन मायर हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे. (IND VS ZIM 3rd T20 Highlights) संघाच्या धावफलकामध्ये एकही धावसंख्येची भर पडली नाही आणि झिम्बाब्वे संघाची तिसरी विकेट पडली. ब्रायन बेनेट हा 4 धावांवर बाद झाला संघाचे धावफलक १९ असताना ब्रायन बेनेट याला आवेश खान ने रवी बिश्नोईच्या हाती झेल देत बाद केले.

हे देखील वाचा : IND VS ZIM 4th T20 Highlights : भारतीय संघाने तुफान फटकेबाजी करत 10 विकेट्सने सामना जिंकत, 3-1 अशी आघाडी घेत मालिकाही जिंकली

ब्रायन बेनेट यानी 5 चेंडूंचा सामना करताना 4 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार लगावला होता ब्रायन बेनेट आणि मायर या दोघांमध्ये शून्य धावांची भागीदारी झाली होती. ब्रायन बेनेट बाद झाल्यानंतर मायरच्या साथीला झिम्बाब्वे संघाचा कप्तान सिकंदर राजा हा फलंदाजीसाठी आला. या दोघांनी संघाला सावरत संघाचे धावफलक पुढे नेले. परंतु ही जोडी देखील फार काही करू शकली नाही. भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजी समोर झिम्बाब्वे संघाचे फलंदाज हे फेल ठरत होते. झिम्बाब्वे संघाचे धावफलक 37 असताना चौथी विकेट पडली. 7 व्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर झिम्बाब्वे संघाचा कप्तान सिकंदर राजा हा बाद झाला.

सिकंदर राजा याला वाशिंग्टन सुंदर याने रिंकू सिंगच्या हाती झेल देत बाद केले. सिकंदर राजा यानी 16 चेंडू मध्ये 15 धावा केल्या होत्या त्यामध्ये 3 चौकार लगावले होते सिकंदर राजा आणि डीऑन मायर या दोघांमध्ये 19 धावांची भागीदारी झाली होती. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 37 धावा 4 गडी बाद अशी झाली होती. झिम्बाब्वे संघाचा कप्तान बाद झाल्यानंतर डीऑन मायरच्या साथीला फलंदाजीसाठी जोन्याथन कॅम्पबेल हा आला. परंतु संघाच्या धावफलकामध्ये 2 धावांची भर पडली आणि झिम्बाब्वे संघाची 5 वी विकेट पडली. जोन्याथन कॅम्पबेल हा 1 धाव करून बाद झाला.

हे देखील वाचा : Maruti Suzuki EECO : या कार ने मार्केट मध्ये घातलाय धुमाकूळ, जाणून घ्या कींमत

संघाचे धावफलक 39 असताना जोन्याथन कॅम्पबेल याला वाशिंग्टन सुंदर यानी रियान पराग च्या हाती झेल देत बाद केले. जोन्याथन कॅम्पबेल आणि डीऑन मायर या दोघांमध्ये 2 धावांची भागीदारी झाली होती. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 39 धावा 5 गडी बाद अशी झाली होती. (IND VS ZIM 3rd T20 Highlights) 39 धावांवर झिम्बाब्वे संघाचा अर्धा संघ बाद झाला होता. आता झिम्बाब्वे संघ हा 100 धावांच्या आत सर्व बाद होणार असे वाटत होते. परंतु 7 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी क्लिव मदंडे हा आला. क्लिव मदंडे आणि डीऑन मायर या दोघांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी करत झिम्बाब्वे संघाला चांगले धावांचे योगदान दिले.

या दोघांनी सावकाशपणे खेळत झिम्बाब्वे संघाला संकटातून बाहेर काढले 39 धावांवर 5 गडी बाद असताना. या दोघांनी चांगली फलंदाजी केली या दोघांनी झिम्बाब्वे संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला. डीऑन मायर यानी आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. झिम्बाब्वे संघाचे धावफलक 116 पर्यंत या दोघांनी मिळून पोहोचविले. एक वेळेस 39 धावांवर 5 गडी बाद अशी नाजूक अवस्था असताना या स्थिती मधून या जोडीने संघाला सावरले आणि एका सन्माजनक जनक धाव संख्येपर्यंत येऊन पोहोचविले. अजूनही संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 67 धावांची गरज होती. हा सामना झिम्बाब्वे संघाला जिंकणे अवघड होते.

हे देखील वाचा : IND VS ZIM : झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव, भारतीय युवा खेळाडूंकडून निराशा जनक कामगिरी

संघाचे धावफलक 116 असताना क्लिव मदंडे का बाद झाला क्लिव मदंडे याला वॉशिंग्टन सुंदर याने रिंकू सिंग च्या हाती झेल देत बाद केले. (IND VS ZIM 3rd T20 Highlights) क्लिव मदंडे याने 26 चेंडूंचा सामना करताना 37 धावा केल्या. त्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. एका बाजूने डीऑन मायरा हा टिकून खेळत होता. क्लिव मदंडे आणि डीऑन मायर या दोघांमध्ये 77 धावांची भागीदारी झाली होती. क्लिव मदंडे बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी विलिंग्टन मसाकादजा हा मैदानात आला. विलिंग्टन मसाकादजा आणि डीऑन मायर यांनी आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली होती. परंतु आता संघाला जिंकून देणे कठीण झाले होते.

विलिंग्टन मसाकादजा आणि डीऑन मायर या दोघांनी नाबाद फलंदाजी केली. या जोडीने संघाला जिंकून देण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु भारतीय संघाच्या गोलंदाजीपुढे ते अपयशी ठरले. या जोडीने नाबाद खेळी केली. डीऑन मायर आणि विलिंग्टन मसाकादजा या दोघांमध्ये नाबाद 43 धावांची उत्कृष्ट अशी भागीदारी झाली होती. ही जोडी संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपयशी ठरली परंतु या दोघांनी चांगली फलंदाजी करत झिम्बाब्वे संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेऊन पोहोचविले.

झिम्बाब्वे संघ हा वीस ओव्हर मध्ये 6 विकेट गमावून 159 धावा बनवू शकला आणि भारतीय संघाने या सामन्यामध्ये 23 धावांनी विजय मिळविला. डीऑन मायर आणि विलिंग्टन मसाकादजा या जोडीने नाबाद खेळी केली. विलिंग्टन मसाकादजाने 10 चेंडूंचा सामना करताना 18 धावा केल्या त्यांमध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लावला. तर डीऑन मायर यानी 49 चेंडू मध्ये 65 धावा केल्या त्यामध्ये 7 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. (IND VS ZIM 3rd T20 Highlights) झिम्बाब्वे संघाकडून डीऑन मायर, विलिंग्टन मसाकादजा आणि क्लिव मदंडे या तिघांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केले. डीऑन मायर याने संघाला सावरण्यात मुख्य भूमिका निभावली तो नाबाद राहिला होता.

भारतीय संघाकडून गोलंदाजी मध्ये खलील अहमद याला 1 विकेट, आवेश खान याला 2 विकेट, तर वाशिंग्टन सुंदर याला 3 विकेट मिळाल्या. 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाने सलग दुसरा विजय मिळवित या मालिकेमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली आहे. 

हे देखील वाचा : IND VS ZIM 2nd T20 Highlights : पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेत भारतीय संघाने झिम्बाब्वेचा केला दारुण पराभव

सामन्याचा मानकरी (IND VS ZIM 3rd T20 Highlights)

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज वाशिंग्टन सुंदर हा या सामन्याचा मानकरी ठरला. वाशिंग्टन सुंदर यानी झिम्बाब्वे संघाच्या महत्त्वाच्या 3 विकेट घेतल्या वाशिंग्टन सुंदर याने 4 ओव्हर मध्ये 15 धावा देत 3 विकेट घेतल्या.

Spread the love