Site icon Get In Marathi

AFG VS BAN : अफगाणिस्तानची सेमी फायनल मध्ये एन्ट्री, अफगाणिस्तानने रचला इतिहास

AFG VS BAN : अफगाणिस्तानची सेमी फायनल मध्ये एन्ट्री, अफगाणिस्तानने रचला इतिहास

AFG VS BAN : अफगाणिस्तान संघाने बांगलादेश संघावर विजय मिळवत सेमी फायनल मध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. अफगाणिस्तान संघाने ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या 2 बलाढ्य देशांना पराभूत करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या विश्वचषक विजेता संघाला देखील अफगाणिस्तान संघाने  मोठ्या फरकाने हरवत जगभराचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले आहे. बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना एरनॉस व्हॅले या मैदानावर खेळविण्यात आला होता.

AFG VS BAN

AFG VS BAN या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला.या सामन्यात एक मजेदार किस्सा देखील बघायला मिळाला. राशिद खान बॉलिंग करत असताना अफगाणिस्तानचा खेळाडू गुलबदिन हा अचानक खाली कोसळला. तो अचानक खाली पडल्यामुळे कोणाला काही समजले नाही नक्की काय झालेलं आहे.(AFG VS BAN) कारण गुलबदिन हा फील्डिंग करत असताना अचानक खाली पडतो तो हॅमस्ट्रीग दुखापत झाल्याचे खोटे नाटक करतो. त्यामुळे सामना थोड्यावेळ थांबवला जातो. 12 वी ओवर सुरू असताना पाऊस पडायला सुरुवात होते.मैदानाच्या बाहेर असलेले अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक हे अफगाणिस्तानच्या खेळाडूंना स्लो खेळण्याचा इशारा देतात.

त्यावेळेस अफगाणिस्तान हा डी एल एस नियमानुसार 2 धावांनी पुढे असतो. त्यामुळे गुलबदिन हा खाली पडण्याचे नाटक करतो. तेव्हा जर खराब हवामानामुळे सामना पुन्हा सुरू झाला नसता तर अफगाणिस्तान संघट डी एल एस नियमानुसार विजयी झाला असता. आता सोशल मीडियावर गुलबदिन याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान अफगाणिस्तान संघाने आता सेमी फायनल मध्ये एन्ट्री केलेली आहे.(AFG VS BAN) अफगाणिस्तान संघ सेमी फायनल मध्ये दक्षिण आफ्रिका संघासोबत खेळणार आहे. जर या सामन्यात अफगाणिस्तान संघांने दक्षिण आफ्रिका संघाला हरवले तर अफगाणिस्तान पहिल्यांदाच फायनल मध्ये जाणार आहे. 

सुपर 8 मधील अखेरचा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश असा झाला होता. हा सामना अर्णोस वेले या ग्राउंड वर खेळविण्यात आला होता. अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना अफगाणिस्तान संघासाठी महत्त्वाचा होता कारण अफगाणिस्तान संघ एक  सामना जिंकलेला होता आणि ऑस्ट्रेलिया संघ देखील 1 सामना जिंकलेला होता.दोन्ही संघाचे गुण हे सारखेच होते. जर अफगाणिस्तान संघ हा सामना हरला असता तर अफगाणिस्तान संघ वर्ल्डकप च्या बाहेर झाला असता.

AFG VS BAN

आणि जर हा सामना जिंकला असता तर सेमी फायनल मध्ये अफगाणिस्तानने आपली जागा निश्चित केली असते. तर बांगलादेश हा 2 सामन्यांमध्ये पराभूत होऊन गुणतालिकेत शून्य गुणांवर होता. बांगलादेश ला सेमी फायनल मध्ये एन्ट्री करण्यासाठी खूप मोठ्या फरकाने हा सामना जिंकावा लागला असता. दरम्यान अफगाणिस्तान संघाने हा सामना जिंकत 4 गुणांसह ऑस्ट्रेलियाला मागे टाकून सेमी फायनल मध्ये आपली जागा मिळविली आहे. अफगाणिस्तान संघ हा सामना हरला असता तर ऑस्ट्रेलिया सेमी फायनल मध्ये गेला असता. कारण की ऑस्ट्रेलिया संघाचे रन रेट हे अफगाणिस्तान संघापेक्षा जास्त होते. 

अफगाणिस्तान संघाची फलंदाजी (AFG VS BAN)

(AFG VS BAN Highlights)अफगाणिस्तान संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी अफगाणिस्तान संघाचा एसटी रक्षक गुरबाज आणि इब्राहिम जडरन ही जोडी मैदानात आली या दोघांनी संयमाने खेळत संघासाठी चांगली सुरुवात करून दिली. 10 ओव्हरपर्यंत अफगाणिस्तान संघाची 1 ही विकेट पडली नव्हती. इब्राहिम जडरन आणि बुरबाज या दोघांनी 59 धावांची भागीदारी केली. 11 व्या ओवर चौथ्या चेंडूवर इब्राहिम जडरन बाद झाला. इब्राहिम जडरन याला रिषद यानी ताजींम च्या हाती झेल देत बाद केले. इब्राहिम जडरन ने 29 चेंडू मध्ये 18 धावा केल्या होत्या.

त्यामध्ये 1 चौकार लगावला होता.आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 59 धावा 1 गडी बाद अशी झाली होती. इब्राहिम जडरन  बाद झाल्यानंतर गुरबाज च्या साथीला अझमतुल्लाह हा फलंदाजीसाठी मैदानात आला या दोघांनी देखील सावकाशपणे खेळत संघाचे धावफलक पुढे नेले. धावफलकामध्ये थोडी धावांची भर पडल्यानंतर अझमतुल्लाह हा बाद झाला. संघाचे धावफलक 84 असताना 16 व्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर अझमतुल्लाह याला मुस्तफीजूर याने लिटन दास च्या हाती झेल देत बाद केले. अझमतुल्लाह याने 12 चेंडू मध्ये 10 धावा केल्या या दोघांमध्ये 31 चेंडू मध्ये 25 धावांची भागीदारी झाली होती.

हे देखील वाचा : Semi Final AFG VS SA : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तान वर दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेची दणक्यात फायनल मध्ये एन्ट्री

अझमतुल्लाह बाद झाल्या नंतर गुरबाजच्या साथीला फलंदाजीसाठी गुलबदिन हा आला. परंतु या दोघांमध्ये मोठी भागीदारी होऊ शकली नाही. संघाच्या धावफलकात 4 धावांची भर पडल्यानंतर गुरुबाज हा बाद झाला. 17 व्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर गुरबाज हा बाद झाला संघाचे धावफलक 88 असताना गुरबाज याला हुसेन यानी सोमय्या सरकारच्या हाती झेल देत बाद केले.(AFG VS BAN) गुरुबाज याने चांगली खेळी केली त्याने 55 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या. त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार लगावला होता.

आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 88 धावा 3 गाडी बाद अशी झाली होती. गुरबाज बाद झाल्यानंतर गुलबदिन च्या साथीला मोहम्मद नाबी हा फलंदाजीसाठी आला परंतु 17 व्या वरच्या चौथ्या चेंडूवर गुलबदिन हा देखील बाद झाला गुलबदिन याला  रीश्द हुसेन यानी सोमय्या सरकारच्या हाती झेल देत बाद केले. गुलबदिन याने 3 चेंडू मध्ये 4 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार लगावला होता. गुलबदिन आणि नबी या दोघांमध्ये 3 चेंडू मध्ये 1 धावांची भागीदारी झाली होती. संघाचे धावफलक 89 असताना गुलबदिन बाद झाला आता संघाची स्थिती 89 धावा 4 गाडी बाद अशी झाली होती. त्यानंतर नबीच्या साथीला फलंदाजीसाठी करीम जनत हा फलंदाजीसाठी आला.

परंतु ही जोडी ही जास्त वेळ टिकली नाही संघाचे धावफलक 93 असताना नबी बाद झाला 17 व्या ओवर चौथ्या चेंडूवर नबी याला तास्कीन अहमद याने शांतो च्या हाती झेल देत बाद केले. नबि याणे 5 चेंडू मध्ये 1 धाव केली होती. नबी आणि जनत या दोघांमध्ये 6 चेंडूमध्ये 4 धावांची भागीदारी झाली होती. नबी बाद झाल्यानंतर जनतच्या साथीला फलंदाजीसाठी अफगाणिस्तान संघाचा कर्णधार राशीद खान हा मैदानात आला. संघाच्या धावफलका मध्ये जणू ब्रेकच लागलेला असताना या जोडीने तुफानी खेळी करत संघाच्या धावफलकामध्ये भर पाडली.

रशीद खान यानी आक्रमकपणे खेळी करत 3 षटकार लगावले आणि संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला. राशीद खान आणि करीम जनत या दोघांमध्ये 14 चेंडू मध्ये 22 धावांची भागीदारी झाली होती. ही जोडी नाबाद राहिली यामध्ये करीम जनत यानी 6 चेंडू मध्ये 7 धावा केल्या. त्यामध्ये 1 चौकार लगावला तर राशीद खान यानी 10 चेंडूमध्ये 19 धावा करत 3 षटकार ठोकले आणि संघाला 115 धावांपर्यंत नेऊन पोहोचविले.

अफगाणिस्तान संघाने फलंदाजी करताना 20 ओवर मध्ये 5 गडी गमावत 115 धावा केल्या आणि बांगलादेश संघाला 116 धावांचे आव्हान दिले. गोलंदाजी मध्ये बांगलादेश संघाकडून रिषद हुसेन यानी 3 विकेट घेतल्या तर मुस्तफिजूर आणि तास्कीन अहमद या दोघांना 1-1 विकेट मिळाली. अफगाणिस्तान संघाने पावर प्ले मध्ये 27 धावा काढल्या होत्या. 

बांगलादेश संघाची फलंदाजी (AFG VS BAN)

अफगाणिस्तान संघ उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो. अफगाणिस्तान संघाकडे असणारा नवीन अलहक, फारुकी आणि अफगाणिस्तान संघाचा कर्णधार राशीद खान हे अव्वल गोलंदाज आहेत. या गोलंदाजी पुढे चांगले बलाढ्य संघ देखील निष्क्रीय ठरले आहे. बांगलादेश संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी लिटन दास आणि तंजीद हसन ही जोडी मैदानात आली. या दोघांनी आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली. लिटन दास हा अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजांना चांगलेच टोले लगावत होता. परंतु दुसऱ्या बाजूने हसन हा अडखळत खेळत होता.

अखेर दुसऱ्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर तंजीद हसन हा बाद झाला. संघाचे धावफलक 16 असताना बांगलादेश संघाची पहिली विकेट पडली. हसन याला फारुखि याने पायचीत बाद केले. हसन याने 3 चेंडू मध्ये 0 धावा केल्या. लिटन दास आणि तंजीद हसन या दोघांमध्ये 9 चेंडूमध्ये 16 धावांची भागीदारी झाली होती. तो बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बांगलादेश संघाचा कप्तान शांतो हा आला परंतु ही जोडी मैदानात फार काळ टिकली नाही. संघाचे धावफलक 23 असताना बांगलादेश संघाची दुसरी विकेट पडली तिसऱ्या ओवर च्या चौथ्या चेंडूवर शांतो हा बाद झाला.

(AFG VS BAN Highlights ) शांतो याने 5 चेंडू मध्ये 5 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार लगावला होता. शान्तो याला नवीन अलहक् याने नबीच्या हाती झेल देत बाद केले. बांगलादेश संघाचा कप्तान शांतो बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात शकिब अल हसन हा अष्टपैलू खेळाडू आला. परंतु पुढच्या चेंडूवर तो देखील बाद झाला. तिसऱ्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर नवीन अलहक याने स्वतः झेल घेत शकिब अलहसन ला शून्य धावांवर बाद केले. शकीबने 1 चेंडूमध्ये 1 ही धाव न करता बाद झाला आता बांगलादेश संघाची स्थिती नाजूक झाली होती.

बांगलादेश संघाचे धावफलक 23 धावा 3 गडी बाद असे झाले होते. शकिब बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात लिटन दास च्या साथीला सोमय्या सरकार हा आला या दोघांनी सावकाशपणे खेळत संघाचे धावफलक पुढे नेले. परंतु थोड्या वेळाने बांगलादेश संघाची चौथी विकेट देखील पडली 7व्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर सोमय्या सरकार हा बाद झाला. सोमय्या सरकार याला राशीद खान यानी बोल्ड केले. सोमय्या सरकार यानी 10 चेंडू मध्ये 10 धावा केल्या. त्यामध्ये 1 चौकार लगावला होता. लिटन दास आणि सोमय्या सरकार या दोघांमध्ये 22 चेंडू मध्ये 25 धावांची भागीदारी झाली होती.

आता बांगलादेश संघाचा ताउहिद ह्रोदोय हा फलंदाज मैदानात आला या दोघांनी सावकाशपणे खेळत संघाचे धावफलक पुढे नेले. संघाचे धावफलक 64 असताना बांगलादेश संघाची 5 वी विकेट पडली. नवव्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर ताउहिद ह्रोदोय हा बाद झाला. ताउहिद ह्रोदोय  याला राशीद खान यानी इब्राहिम जडरन च्या हाती जेल देत बाद केले. ताउहिद ह्रोदोय यानी 9 चेंडू मध्ये 14 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 2 षटकार लगावले होते आता बांगलादेश संघाची स्थिती 64 धावा 5 गाडी बाद अशी झाली होती. ताउहिद ह्रोदोय बाद झाल्यानंतर लिटन दास च्या साथीला फलंदाजीसाठी महमदुल्ला हा फलंदाजीसाठी आला.

या दोघांनी संघाच्या धावफलकामध्ये थोडीफार भर पाडली लिटन दास हा एकेरी झुंज देत होता. परंतु त्याला दुसऱ्या बाजूने कोणीही साथ देत नव्हता संघाचे धावफलक 80 असताना महंमदुल्ला हा देखील बाद झाला. 80 धावांवर बांगलादेश संघाची 6 वी विकेट पडली. 11व्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर महमदुल्ला बाद झाला. महमदुल्ला याला राशिद खान यानी मोहम्मद इसाक च्या हाती झेल देत बाद केले. मोहमदुल्ला यानी 9 चेंडूमध्ये 6 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार लगावला होता. तो बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी रिषद हुसेन हा आला. राशिद खान यानी आपल्या पुढच्या चेंडूवर त्याला लगेच बाद केले.

11व्या ओवरच्या 6 व्या चेंडूवर राशिद खान याने रिषद हुसेन  याला बाद केले. रिषद हुसेन याने 1 चेंडू खेळला आणि आपले खाते उघडू शकला नाही. राशिद खान याने त्याला बोल्ड आऊट केले. आता बांगलादेश संघाची स्थिती 80 धावा 7 गाडी बाद अशी झाली होती.(AFG VS BAN) रिषद बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी तंजीम हसन शकीब हा मैदानात आला. आता सामना हा अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचला होता. अजूनही बांगलादेश संघाला जिंकण्यासाठी 54 चेंडू मध्ये 36 धावांची गरज होती. तंजीम हसन आणि लिटन दास या दोघांनी सावकाशपणे खेळत संघाला थोडी धावांची भर करून दिली.

संघाचे धावफलक 92 असताना बांगलादेश संघाची 8 वी विकेट पडली 15 व्या ओवर च्या दुसऱ्या चेंडूवर ताणजीम हा बाद झाला. तानजीम याने 10 चेंडूमध्ये 3 धावा केल्या होत्या. त्याला गुलबदिन याने नबीच्या हाती झेल देत बाद केले. तानजीम ने लिटन दास या दोघांमध्ये 20 चेंडू मध्ये 12 धावांची भागीदारी झाली होती. ताजीम बाद झाल्यानंतर बांगलादेश संघाचा नवव्या क्रमांकाचा खेळाडू तास्कीन हा मैदानात आला. या जोडीने सावकाशपणे खेळत संघाला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला.

हे देखील वाचा : USA VS ENG : इंग्लंडची सेमी फायनल मध्ये एन्ट्री, यु एस ए वर 10 विकेट्स ने विजय

बांगलादेश संघाचा सलामीचा फलंदाज लिटन दास हा अजूनही मैदानात एकटा लढत होता. परंतु त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळत नव्हती संघाचे धावफलक 105 असताना बांगलादेश संघाची नववी विकेट पडली. 18 व्या ओवर च्या चौथ्या चेंडू वर तास्किन अहमद बाद झाला. (AFG VS BAN) तस्किनअहमद याला नवीन अलहक याने बोल्ड केले. तस्कीन अहमद याने 9 चेंडू मध्ये 2 धावा केल्या होत्या. या दोघांमध्ये 20 चेंडू मध्ये 13 धावांची भागीदारी झाली होती. आता बांगलादेश संघाकडे एकच विकेट शिल्लक होती.

अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज होती. परंतु पाऊस आल्याने सामना थोड्या वेळासाठी स्थगित करण्यात येतो.थोड्या वेळाने पुन्हा सामना सुरु होतो. डीएलएस नियमानुसार 20 ओवरचा सामना हा 19 ओव्हरचा करण्यात आला. आणि जिंकण्यासाठी लक्ष हे 114 धावांचे ठेवण्यात आले. आता बांगलादेश संघाला जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता होती. आता स्ट्राइक वर मुस्तफिजूर रहमान हा आला. आणि गोलंदाजीसाठी नवीन अल हक हा होता. मुस्तफिजूर रहमान हा 1 धाव काढून लिटन दास ला स्ट्राइक देणार होता.

परंतु नवीन अल हक याने बरोबर पायावर चेंडू टाकत मुस्तफिजूर रहमान याला पायचीत बाद केले. आणि बांगलादेश संघ 105 धावांवर आटोपला आणि अफगाणिस्तान संघ हा सामना 8 धावांनी जिंकला. त्याचबरोबर अफगाणिस्तान संघाने या विजय सोबत सेमी फायनल मध्ये देखील जागा मिळवली. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघ हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप च्या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. अफगाणिस्तान संघाकडून गोलंदाजी मध्ये नवीन अलहक आणि संघाचा कप्तान राशीद खान या दोघांना प्रत्येकी 4 -4 विकेट मिळाल्या. तर फारुकी याला 1 विकेट आणि गुलबदिन याला 1 विकेट मिळाली.

हे देखील वाचा : SA VS WI : वेस्टइंडीज T-20 World Cup 2024 मधून बाहेर, दक्षिण आफ्रिकेचा विजय

सामन्याचा मानकरी 

(AFG VS BAN) अफगाणिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज नवीन अल हक हा या सामन्याचा मानकरी ठरला. नवीन अल हक याने 4 ओव्हर मध्ये 4 विकेट घेतल्या. सामना हा अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचलेला असताना बांगलादेश संघाला जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता होती. परंतु नवीन अल हक याने सलग  2 विकेट घेतल्या त्यामुळे अफगाणिस्तान संघ हा सामना जिंकला. अफगाणिस्तान संघ हा सेमी फायनल पोहोचला आहे आणि त्याचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे..

Spread the love
Exit mobile version