Afg Vs Nz Highlights: न्यूझीलंडचा लाजिरवाना पराभव, न्यूझीलंडचा संघ 75 धावांमध्ये संपला

Afg Vs Nz Highlights: न्यूझीलंडचा लाजिरवाना पराभव, न्यूझीलंडचा संघ 75 धावांमध्ये संपला

Afg Vs Nz Highlights आज खेळला गेलेला 14 वा tT20 विश्वचषक सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला  75 धावांवर रोखले आणि सामना हा 84 धावांनी जिंकला.अफगाणिस्तान ने  प्रथम फलंदाजी करताना न्युझीलड संघाला 160 धावांच आव्हान दिले होते.Afg Vs Nz Highlights 160 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला न्यूझीलंडचा संघ फक्त 75 धावांमध्ये संपुष्टात आला. न्यूझीलंड ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 

Afg Vs Nz Highlights
Afg Vs Nz Highlights

अफगाणिस्तान संघाची दमदार सुरुवात 

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने दमदार अशी सुरुवात केली. (Afg Vs Nz Highlights)अफगाणिस्तान संघाकडून सलामीला गुरबाज आणि इब्राहिम ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने अफगाणिस्तान संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि संघाला 100 धावांचे धावफलक गाठून दिले. या जोडीने 87 चेंडू मध्ये 103 धावांची भागीदारी केली आणि संघाला 100 धावांच्या पार केले.

14 ओवर्स मध्ये अफगाणिस्तान संघाने शंभर धावांचा पल्ला गाठला होता.(Afg Vs Nz Highlights) अफगाणिस्तानची पहिली विकेट इब्राहिमच्या रूपाने पडली. अफगाणिस्तान संघाची स्थिती 103 धावा 14.3 ओवर्स आणि 1 विकेट अशी झाली होती. इब्राहिम याने 41 चेंडू मध्ये 44 धावा केल्या  त्यामध्ये 2 षटकार 3 चौकार लगावले त्याला हेन्री यानी चीत बाद केले.त्यानंतर गुरबाज च्या साथीला अजमतुल्ला हा आला, विकेट जर पडली होती तरी गुरबाज हा आक्रमक फलंदाजी करतच होता. त्याला रोखणे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना कठीण झाले होते.

अफगाणिस्तान संघाचे धावफलक 127 असताना दुसरी विकेट गेली. जोराचा टोला लगावताना अजमतुल्ला हा बाद झाला. तो हेन्री च्या गोलंदाजीवर फर्ग्युसन च्या हाती झेल देत बाद झाला.(Afg Vs Nz Highlights) त्याने 13 चेंडू मध्ये 22 धावा केल्या त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार लगावला आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 127 धावा 2 गडी बाद आणि 16.6 ओव्हर  अशी झाली होती त्यानंतर गुरबाज च्या साथीला मोहम्मद नाबी हा आला परंतु त्याला एकही चेंडू खेळता आला नाही.

आणि तो फर्ग्युसनच्या पहिल्याच चेंडूवर विल्यम्सन  याच्या हाती जेल देत बाद झाला एका बाजूने गुरबाज हा चांगली फलंदाजी करत असताना त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळत नव्हती.(Afg Vs Nz Highlights) आता संघाची स्थिती ही 136 धावा आणि 3 गडी बाद अशी झाली होती आणि 17.4 ओवर्स झाल्या होत्या आता गुरबाज च्या साथीला राशीद खान हा फलंदाजीसाठी मैदानात आला होता या दोघांनीही चांगली फलंदाजी केली.

या दोघांनी केवळ 9 चेंडू मध्ये 20 धावांची भागीदारी केली परंतु त्यानंतर राशीद खान हा देखील बाद झाला राशीद खान हा 2 धावा काढण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला.(Afg Vs Nz Highlights) त्याने 5 चेंडू मध्ये 6 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार लगावला. आता संघाची स्थिती ही 156 धावा आणि 4 गडी बाद अशी झाली होती आणि 19.1 ओवर झाल्या होत्या शेवटची ओव्हर असल्याकारणाने अफगाणिस्तान संघाचे फलंदाज हे प्रत्येक चेंडूवर टोला लगावण्याच्या प्रयत्नात होते. राशीद खान बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गुरुबाज हा देखील बाद झाला त्याला बोल्टने चित बात केले.

गुरुबाज याने संघासाठी महत्त्वाची खेळी केली त्यानी  56 चेंडू मध्ये 80 धावा लगावल्या त्यामध्ये 5 षटकार आणि 5 चौकार समाविष्ट होते.आता संघाची स्थिती 156 धावा आणि 5 गडी बाद अशी झाली होती आता 4 चेंडू शिल्लक होते फलंदाजीसाठी करीम आणि गुलाबद्दीन हे होते परंतु गोलंदाजीसाठी बोल्ट असल्याकारणाने फलंदाजांनी कुठल्याही प्रकारचे टोले लगावण्यात यश येत नव्हते.(Afg Vs Nz Highlights) धावफलकामध्ये 2 धावांची भर पडल्यानंतर गुलाबदिन हा देखील बाद झाला त्याला बोल्ट ने ग्लेन फिलिप्सच्या हाती झेल देत बाद केले त्याने 2 चेंडूमध्ये एकही धाव केली नव्हती.

आता फलंदाजीसाठी नजीबुल्लाह आला होता. त्याने शेवटच्या चेंडूवर एक धाव काढली आणि संघाचे धावफलक हे 159 धावा पर्यंत पोहोचले.अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 159 धावा केल्या आणि 6 गडी गमावले. न्यूझीलंड संघाला जिंकण्यासाठी 20 ओवर्स मध्ये 160 धावांचे आव्हान दिले.

न्युझीलँड कडून गोलंदाजी मध्ये बोल्ट याला 2 विकेट मिळाल्या मॅट हेन्री याला 2 विकेट मिळाले. तर फरगुशन ला 1 विकेट मिळाली. 

न्यूझीलंड संघाची निराशाजनक सुरुवात 

160 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेली न्यूझीलंड संघाची सलामीची जोडी फेल ठरली. न्यूझीलंड संघाकडून सलामीला ॲलन आणि कॉन्वे ही जोडी मैदानात उतरली होती.सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ॲलन हा बोल्ड बाद झाला. फारुकी यानी  आपल्या पहिल्याच चेंडूवर बोल्ड केले.(Afg Vs Nz Highlights) न्यूझीलंड संघाची स्थिती ही शून्य धावा आणि 1 गडी बाद अशी झाली होती. कॉन्व्हेच्या साथीला न्यूझीलंड संघाचा कप्तान विल्यम्सन हा आला परंतु त्यालाही यश आले नाही.

संघाचे धावफलक 18 धावा असताना न्युझीलंड ची दुसरी विकेट गेली कॉन्वे हा फारुकीच्या गोलंदाजीवर इब्राहिमच्या हाती झेल देत बाद झाला. त्याने 10 चेंडू मध्ये 8 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार लगावला. न्यूझीलंड संघाची स्थिती 18 धावा आणि 2 गडी बाद अशी झाली होती.(Afg Vs Nz Highlights) त्यानंतर फलंदाजीसाठी मिशेल हा आला असे वाटत होते की आता ही जोडी संघाला मोठी धावसंख्या उभारून देईल परंतु फक्त 10 धावांची भर पडल्यानंतर मिशेल हा देखील बाद झाला.

पाचव्या ओवर्स मध्ये न्युझीलँड ची तिसरी विकेट गेली.मिशेल याला फारुकी याने गुरबाज च्या हाती जेल देत बाद केले. मिशेल ने 5 चेडू मध्ये 5 धावा केल्या होत्या त्यामध्ये 1 चौकार लगावला.आता न्युझीलँड संघाची स्थिती 28 धावा 3 गडी बाद आणि 4.2 ओवर  अशी झाली होती त्यानंतर विल्यम्सन याच्या साथीला फिलिप्स हा फलंदाजीसाठी आला परंतु संघाच्या धावफलकामध्ये फक्त 5 धावांची भर पडली.(Afg Vs Nz Highlights) आणि न्यूझीलंड संघाचा कप्तान देखील बाद झाला.सातव्या ओवर च्या पहिल्या चेंडूवर विल्यम्सन हा बाद झाला त्याला राशिद खान याने गुलाबदिन याच्या हाती झेल देत बाद केले

हे देखील वाचा : Tata Curvv Launch : कोटीची कार केवळ लाखात,टाटा ची नवीन SUV मार्केटमध्ये येत आहे

Afg Vs Nz न्यूझीलंड संघाची मधली फळी देखील फेल

विल्यम्सन यानी 13 चेंडूमध्ये 9 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार लगावला.आता न्यूझीलंड संघाची स्थिती ही 33 धावा आणि 4 गडी बाद अशी नाजूक झाली होती.(Afg Vs Nz Highlights) विल्यम्सन बाद झाल्यानंतर फिलिप्सच्या साथीला चापमन आला या जोडीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजी समोर न्यूझीलंड संघाचे फलंदाज हे निष्फळ ठरत होते.कोणताही फलंदाज हा अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजांवर वर्चस्व साधू शकत नव्हता प्रत्येक फलंदाज हा अडथळत खेळत होता.संघाचे धावफलक 43 असताना चापमन देखील बाद झाला.

नवव्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर तो बाद झाला त्याला राशिद खान यानी  बोल्ड केले चापमन यानी  7 चेंडू मध्ये 4 धावा केल्या आता फलंदाजीसाठी ब्रेसवेल हा मैदानात आला होता. परंतु राशीद खान यानी आपल्या दुसऱ्या चेंडूवर त्यालाही बाद केले.राशिद खान यानी  ब्रेसवेल याला पायचीत बाद केले आणि ब्रेसवेल शून्य धावांवर माघारी परतला.आता न्युझीलँड संघाची स्थिती 43 धावा 6 गडी बाद अशी नाजूक झाली होती.

आता फलंदाजीसाठी मिशेल सेंटणर आला होता परंतु आता संघाला विजय मिळविणे अवघड होते.कारण 160 धावांचे आव्हान असतानाच न्यूझीलंड संघाचे 6 गडी बाद झाले होते.(Afg Vs Nz Highlights)आणि कोणताही खेळाडू का जास्त वेळ मैदानात टिकत नव्हता.फलंदाजांना 2 अंकी धावसंख्या मिळविणे देखील अवघड झाले होते.एका पाठोपाठ 1 विकेट जातच होते. न्यूझीलंड संघाचे धावफलक 53 असताना ग्लेन फिलिप्स हा बाद झाला.त्याने 18 चेंडू मध्ये 18 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार लगावले. आता सेंटनर च्या साथीला हेन्री आला होता.

हेन्री आणि सेंटनर या दोघांमध्ये 14 चेंडू मध्ये 6 धावांची भागीदारी झाली आणि सेंटनर हा देखील बाद झाला.त्याला मोहम्मद नाबी याने बोल्ड  केले. सेंट्नर याने 8 चेंडू मध्ये 4 धावा केल्या.(Afg Vs Nz Highlights) आता न्यूझीलंड संघाची स्थिती ही 59 धावा आणि 8 गडी बाद असी झाली होती. आता हेन्री च्या साथीला फरगुशन आला होता. न्यूझीलंड संघाची स्थिती खूपच नाजूक झाली होती. संघाला 100 पर्यंत धावा करणे कठीण झाले होते. संघाचा स्कोर 63 असताना लोकी फर्ग्युसन हा देखील बाद झाला फर्ग्युसन यानी 5 चेंडूमध्ये 2 धावा केल्या त्याला राशिद खानने झेलबाद केले.

यानंतर ट्रेंट बोल्ट हा दहावी विकेटसाठी फलंदाजीला आला आणि संघाचा स्कोर 75 असताना हेन्री बाद झाला फारुकी यानी त्याला करीम च्या हाती झेल देत बाद केले. 20 ओव्हर मध्ये न्युझीलंड चा संघ 75 धावाच करू शकला आणि 15.2 ओवर मध्ये पूर्ण संघ बाद झाला. अफगाणिस्तान संघ हा सामना 84 धावांनी जिंकला. अफगाणिस्तान संघाने सामना जिंकत इतिहास रचला यापूर्वी न्यूझीलंड हा संघ अफगाणिस्तान संघाकडून इतक्या मोठ्या फरकाने कधीही हरला नव्हता.

हे देखील वाचा : USA Vs PAK Highlights : अमेरिकेने पाकिस्तानचा उडविला धुव्वा ! सुपर ओवर मध्ये पाकिस्तानचा पराभव 

सामन्याचा मानकरी 

अफगाणिस्तान संघाचा सलामीचा फलंदाज गुरबाज हा सामन्याचा मानकरी ठरला. गुरबाज यानी 56 चेंडू मध्ये 80 धावा केल्या त्यामध्ये 5 चौकार आणि 5 षटकार लगावले.(Afg Vs Nz Highlights) त्याच्या या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तान संघाने 100 धावांचा पल्ला एकही विकेट न गमावता गाठला होता.

Spread the love