Afg Vs Png, Super 8: अफगाणिस्तानचा विजय, सुपर 8 मध्ये दणक्यात एन्ट्री

Afg Vs Png, Super 8: अफगाणिस्तानचा विजय, सुपर 8 मध्ये दणक्यात एन्ट्री

Afg Vs Png
Afg Vs Png

Afg Vs Png T-20 World Cup 2024 मधील 29 व्या सामन्यात अफगाणिस्तान आणि पापुआ न्यू गिनी हे 2 संघ आमने सामने आले होते Afg Vs Png या सामन्यात अफगाणिस्तानने पीएनजी वर 7 विकेट्सने विजय मिळविला. अफगाणिस्तान संघाने सलग 3 सामने जिंकले आहे. (Afg Vs Png) आणि 6 गुणांसह अफगाणिस्तान संघ सुपर 8 सामन्यांसाठी पात्र झाला आहे. अफगाणिस्तान ने आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही.

तर दुसरीकडे पीएनजी संघाने एकही सामना जिंकलेला नाही पीएनजी संघाने सलग 3 सामने हरलेले आहे. गुणतालिकेत शून्य गुणांसह पीएनजी संघ वर्ल्डकपच्या स्पर्धेमधून बाहेर झाला आहे. (Afg Vs Png) त्याचबरोबर न्यूझीलंड सारखा संघ हा देखील वर्ल्ड कपच्या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. न्यूझीलंड संघांनी आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. न्यूझीलंड संघाने 2 सामने खेळले आणि दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला. युगांडा हा देश देखील स्पर्धेच्या बाहेर झाला आहे युगांडाने 3 सामने खेळणे त्यामधील 2 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला तर 1 सामन्यात विजय मिळविला आहे.

वेस्टइंडीज हा संघ सुपर 8 सामन्यांसाठी पात्र झाला आहे. ग्रुप सी मधून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज हे 2 संघ सुपर 8 सामन्यांसाठी पात्र झाले आहे.(Afg Vs Png) अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पीएनजी संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.5 ओवर मध्ये 10 गडी गमावत 96 धावांचे लक्ष दिले होते.अफगाणिस्तान संघाने हे लक्ष 15.1 ओवर मध्ये 3 गडी गमावत पूर्ण केले.

पीएनजी संघाची खराब सुरुवात 

पीएनजी संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी असाद आणि टोनी हे दोघे फलंदाजीला मैदानात आले. अफगाणिस्तान संघाकडून फारुकी  यानी  पहिली ओव्हर घेतली पहिल्या ओवरमध्ये पीएनजी संघाने सावकाशपणे सुरुवात केली. परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये पीएनजी संघाची पहिली विकेट पडली.(Afg Vs Png) दुसऱ्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर पीएनजी संघाचा कप्तान असाद  हा बाद झाला. त्याला गुरबाज याने धावबाद केले. पीएनजी संघाची पहिली विकेट 12 धावांवर पडली.

असाद आणि टोनी या दोघांमध्ये 12 धावांची भागीदारी झाली होती. तो बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी लेगा हा आला. परंतु संघ सावरण्याच्या अगोदर पीएनजी संघाची दुसरी विकेट पडली. लेगा याला फारुकी  ने गुरुबाज च्या हाती झेल देत बाद  केले. (Afg Vs Png) आता पीएनजी संघाची स्थिती 12 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. आता फलंदाजीसाठी मैदानात सेसे आला होता. परंतु ही जोडी देखील चांगली खेळी करू शकली नाही.

पहिल्या चेंडूवर सेसे हा देखील बाद झाला त्याला फारुकी याने गुरबजच्या हाती जेल देत बाद  केले. आता पीएनजी संघाची स्थिती 12 धावा 3 गडी बाद अशी नाजूक झाली होती. आता फलंदाजीसाठी मैदानात हिरी हा आला. परंतु कोणताही फलंदाज अफगाणिस्तान संघाच्या धारदार गोलंदाजी समोर टिकु शकत नव्हता. संघाचे धावफलक 17 असताना पीएनजी संघाची चौथी विकेट पडली.

नवीन अलहक यानी हिरी याला बोल्ड आऊट केले. हिरी याने 3 चेंडू मध्ये 1 धाव केली होती. हिरी आणि टोनी या दोघांमध्ये 5 चेंडूमध्ये 5 धावांची भागीदारी झाली होती. हीरी बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात चाड हा आला.चाड आणि टोनी या जोडीने संघाला सावरत धावफलकांमध्ये थोडी धावांची भर पाडली. या जोडीने संघाचे धावफलक 30 धावांपर्यंत नेले. संघाचा स्कोर 30 असताना पीएनजी संघाचा कर्णधार टोनी हा बाद झाला. 30 धावांवर पीएनजी संघाचा अर्धा डाव संपला होता.

टोनी आणि चाड या जोडीमध्ये 15 चेंडूमध्ये 13 धावांची भागीदारी झाली होती. टोनी याला नवीन अल हक याने बोल्ड आउट केले. (Afg Vs Png) टोनी याने 18 चेंडू मध्ये 11 धावा केल्या. त्यामध्ये 1 चौकार लगावला. तो बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी किपलिन हा मैदानात आला. दहाव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर पीएनजी संघाची सहावी विकेट पडली. संघाचे धावफलक 46 असताना चाड हा बाद झाला त्याला राशिद खान यानी  धावबाद केले.चाड याने 26 चेंडू मध्ये 9 धावा केल्या होत्या.

आता पीएनजी संघाची स्थिती 46 धावा 6 गडी बाद अशी झाली होती. चाड बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी नॉर्मन हा मैदानात आला. परंतु धावफलकामध्ये 4 धावांची भर पडल्यानंतर नॉर्मन  हा देखील बाद झाला तेराव्या वर्षाच्या पहिल्या चेंडूवर राशीद खान यानी  त्याला धावबाद केले. नॉर्मन  याने 7 चेंडू मध्ये शून्य धावा केल्या होत्या. किपलिन आणि नॉर्मन  या दोघांमध्ये 15 चेंडू मध्ये 4 धावांची भागीदारी झाली होती.

नॉर्मन  बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी अली हा आला. या दोघांनी चांगली खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आणि संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवीले. या जोडीने संयमाने खेळी करत संघाला 88 धावांपर्यंत पोहोचवली. अठराव्या ओवरच्या सहाव्या चेंडूवर किपलीन हा बाद झाला त्याला नूर अहमद यानी  त्याला पायाचीत बाद केले. किपलिन यानी  32 चेंडू मध्ये 27 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार लगावले. किपलिन आणि अली या जोडीने 34 चेंडू मध्ये 38 धावांची भागीदारी केली.(Afg Vs Png) किपलीन बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी जॉन हा आला. परंतु ही जोडी बाद झाल्यानंतर कोणीही पण संघाला सावरू शकले नाही.

जॉन आणि आली या दोघांमध्ये 3 चेंडू मध्ये 1 धावांची भागीदारी झाली. आणि 19 व्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर आली हा देखील बाद झाला. आलि याने 19 चेंडू मध्ये 13 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार लगावले. आता जॉनच्या साथीला शेवटचा फलंदाज सेमो हा मैदानात आला. संघाच्या स्कोर मध्ये 6 धावांची भर पडल्यानंतर पीएनजी संघाचा अखेरचा फलंदाज देखील बाद झाला आणि विसाव्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर पीएनजी संघाची दहावी विकेट पडली सेमो यायला गुरूबाज यानी  धावबाद केले.

या जोडीने 9 चेंडू मध्ये 6 धावांची भागीदारी केली.अशा प्रकारे पीएनजी संघाने 19.5 ओवर मध्ये 10 गडी गमावत 95 धावा केल्या आणि अफगाणिस्तान संघासमोर 96 धावांचे लक्ष ठेवले अफगाणिस्तान संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करत पीएनजी संघाला थोड्या स्कोरवर थांबवले. अफगाणिस्तान संघाकडून फारुकी  याने 4 ओव्हर मध्ये 16 धावा देत 3 गडी बाद केले. नवीन अलहक यानी  3 ओव्हर मध्ये 4 धावा देत 2 गडी बाद  केले. नूर अहमद यानी 4 ओव्हर मध्ये 14 धावा देत 1ग डी बाद केला.

अफगाणिस्तान संघाची फलंदाजी 

पीएनजी संघाने अफगाणिस्तान संघासमोर 96 धावांचे लक्ष ठेवले होते. हे लक्ष जरी छोटे असले तरी ते सहजासहजी पार होणारे नव्हती. पीएनजी संघाचे गोलंदाज हे देखील चांगली गोलंदाजी करता त्याचबरोबर संघाचे  क्षेत्ररक्षण देखील चांगले आहे. (Afg Vs Png) अफगाणिस्तान संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी गुरबाज आणि इब्राहिम ही जोडी आली. या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला परंतु दुसऱ्यावर ओवरच्या चेंडूवर अफगाणिस्तान संघाची पहिली विकेट पडली इब्राहिम याला सेमो यानी  बोल्ड केले. इब्राहिम यानी 7 चेंडूमध्ये शून्य धावा केल्या होत्या.

हे देखील वाचा : Pak Vs Can सलग दोन पराभवानंतर पाकिस्तानी विजयी,पाकिस्तानचा कॅनडा वर 7 विकेटन विजय

इब्राहिम आणि गुरबाज या दोघांमध्ये 10 चेंडूमध्ये 8 धावांची भागीदारी झाली होती. आता संघाची स्थिती 8 धावा 1 गडी बाद अशी झाली होती. इब्राहिम बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात गुलाबदिन हा आला. या जोडीने आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली आणि संघाचे धावफलक मध्ये भर पाडली.(Afg Vs Png) संघाचे धावफलक 22 असताना अफगाणिस्तान संघाची दुसरी विकेट पडली तिसऱ्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर गुरबाज हा बाद झाला त्याला आली याने बोल्ड केले आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 22 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. गुरूबाज बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात अजमतुल्ला हा आला.

या जोडीने संघाला सावरत संघाचे धावफलक 50 धावांच्या पार केले. संघाचे धावफलक 55 धावा असताना अफगाणिस्तान संघाची तिसरी विकेट पडली. नवव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर अजमतुल्ला बाद झाला. त्याला नॉर्मन यानी  बोल्ड आउट केले. गुलाबदिन आणि अजमतुल्ला या दोघांमध्ये 35 चेंडू मध्ये 33 धावांची भागीदारी झाली. आता फलंदाजीसाठी नाबी हा आला.(Afg Vs Png) या जोडीने संघाला सावरले एका बाजूने मोहम्मद नाबी यानी संयमान खेळी केली तर गुरबाज हा आक्रमकपणे खेळी करत होता. या जोडीने चांगले खेळी करत अफगाणिस्तान संघाला विजय मिळवून दिला अफगाणिस्तान संघाने 15.1 ओव्हर मध्ये 101 धावा केल्या. त्याबद्दल 3 गडी गमावले.

गुलाबदिन याने नाबाद 36 चेंडू मध्ये 49 धावा केल्या त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार लगावले. गुलाबदिन याला मोहम्मद नाबी याने चांगली साथ दिली. (Afg Vs Png) मोहम्मद नाबी याने नाबाद 23 चेंडू मध्ये 16 केल्या त्यामध्ये 1 चौकार लगावला. मोहम्मद नाबी आणि गुलाबदिन या जोडीने नाबाद 39 चेंडू मध्ये 49 धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर अफगाणिस्तान संघाने सलग 3 सामन्यांमध्ये विजय मिळवून सुपर 8 सामन्यांमध्ये आपली जागा निश्चित केली आहे अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही. अफगाणिस्तान संघाने सलग 3 सामने जिंकलेले आहे त्याचबरोबर पीएनजी संघाने सलग 3 सामने हरल्यामुळे आता तो संघ टी-20 विश्वचषकातील स्पर्धेमधून बाहेर झाला आहे. 

हे देखील वाचा : Ind vs Usa भारताचा युएसए वर 7 विकेट्सने विजय, सुपर 8 मध्ये भारताची एंट्री

सामन्याचा मानकरी 

4 ओव्हर मध्ये 16 धावा देत 3 गडी बाद करणारा अफगाणिस्तान संघाचा गोलंदाज फारुकी हा या सामन्याचा मानकरी ठरला.

Spread the love