Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर कारखान्याला मिळाला देशातील “सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार”
Bhimashankar Sugar Factory : शनिवारी 10 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लिमिटेड यांच्या वार्षिक सभा व शुगर केन अँड बायो एनर्जी पावर ऑफ विकसित भारत या एक दिवसीय परिषदेमध्ये देशातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना पुरस्कार देण्यात आले होते.
देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार हा आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रय नगर पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास प्रदान झाला आहे. (Bhimashankar Sugar Factory) सन 2022-23 हंगामा मधील वसंत दादा पाटील देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल, तसेच उत्तर प्रदेश राज्याचे साखर व विकास मंत्री चौधरी लक्ष्मण नारायण, नॅशनल फेडरेशन ऑफ शुगर फॅक्टरी लिमिटेड चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतन भाई पटेल, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे, गुजरातचे माजी मंत्री ईश्वरभाई पटेल, तसेच देशातील साखर उद्योगांमधील अनेक मान्यवर या सोहळ्यामध्ये उपस्थित होते.(Bhimashankar Sugar Factory)
पुरस्काराचे वितरण करताना भीमाशंकर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, शांताराम हिंगे, बाबासाहेब खालकर, आनंदराव शिंदे, अंकित जाधव, मच्छिंद्र गावडे, अरुण चासकर, सिताराम लोहट, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, नितीन वाव्हळ, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, गणेश कोकणे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, तांत्रिक व्यवस्थापक शिरीष सुर्वे व सचिव रामनाथ हिंगे यांनी केला.
(Bhimashankar Sugar Factory) कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पुरस्काराबाबत म्हणाले आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, साखर उतारा, अधिक उत्तम ऊस गाळप, ऊस वाढीच्या योजना, केलेली गुंतवणूक, कमीत कमी उत्पादन खर्च, खर्चात केलेली बचत, कर्ज परतफेड, व्याज, वेळेत मिळालेला ऊस दर, उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुक, संचित नफा, कारखान्याचे नक्त मूल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून व सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
तसेच हा पुरस्कार प्राप्त होण्यास कारखान्याचे संस्थापक व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची दूरदृष्टी नेतृत्व, मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन या सर्व गोष्टींमुळेच या कारखान्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कारखान्यास प्राप्त झालेले एकूण पुरस्कार
(Bhimashankar Sugar Factory) भीमाशंकर सहकारी कारखान्यास देश पातळीवर 13 व राज्य पातळीवर 14 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार हा या कारखान्याला सहाव्यांदा मिळाला असून देशातील हा एकमेव कारखाना आहे की ज्याला 6 वेळा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशी माहिती उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.