Crop Insurance : अतिवृष्टी मुळे नुकसान झाले, शेतकऱ्यांनो 72 तासांच्या आत करा हे काम

Crop Insurance : अतिवृष्टी मुळे नुकसान झाले, शेतकऱ्यांनो 72 तासांच्या आत करा हे काम

Crop Insurance : नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झालेले आहे. या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकते, जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी “क्रॉप इन्शुरन्स” ” Crop Insurance” हे ॲप वापरण्याचा सल्ला दिला आहे. या ॲप ने शेतकरी आपली नुकसानाची माहिती लवकरात लवकर विमा कंपनीला कळवू शकतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना लवकर मदत मिळू शकेल. 

Crop Insurance
Crop Insurance

पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतातील पिकाचे झालेल्या नुकसानीचा फोटो आणि इतर माहिती 72 तासांच्या विमा कंपनीला द्यायची आहे. हे करण्यासाठी शेतकरी “क्रॉप इन्शुरन्स” ॲप वापरू शकतात. 

क्रॉप इन्शुरन्स हे ॲप कसे वापरायचे 

  • प्ले स्टोर वरून “क्रॉप इन्शुरन्स” हे ॲप डाऊनलोड करून घ्यायचे. 
  • Continue As Guest हा पर्याय निवडायचा 
  • त्यानंतर “Crop Loss” ऑप्शन निवडून “Crop Loss Intimation” हा पर्याय निवडून घेयचा
  • मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी मिळवून लॉगिन करून घ्यायचे (Crop Insurance)
  • वर्ष, हंगाम आणि राज्य निवडून त्यामध्ये पॉलिसी क्रमांक टाकायचा. 
  • पीक नुकसानीचे तपशील भरून घ्यायचे, जसे घटनेचा प्रकार, दिनांक, पीक वाढीचा टप्पा आणि नुकसान टक्केवारी 
  • झालेल्या पिकाच्या नुकसानीचा फोटो काढून तो सबमिट करून द्यायचा 

अशाप्रकारे शेतकऱ्यांनी मोबाईल मध्ये हे ॲप डाऊनलोड करून नुकसान भरपाई ची माहिती लवकरात लवकर कंपनीला कळवून द्यावी, त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर मदत मिळू शकेल. (Crop Insurance)

शेतकऱ्यांना विमा कंपनीला लवकरात लवकर नुकसानीची माहिती देणे गरजेचे आहे. कारण या पूर्वसूचनेत नमूद केलेले 72 तास संपण्याच्या आधी शेतकऱ्यांना ही माहिती देणे गरजेचे आहे. नुकसानीची कारवाई लवकरात लवकर व्हावी यासाठी ही माहिती लवकर दिली गेली पाहिजे. त्यानंतर तपासणी नुसार शेतकऱ्यांना विमा मिळेल. 

काही शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म भरायला अडचण येऊ शकते. अशा वेळी शेतकऱ्यांनी “युनायटेड स्टेट इन्शुरन्स” कंपनीच्या तालुका प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी किंवा तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे ऑफलाइन अर्ज दाखल करू शकतात. 

शेतकऱ्यांना हे ॲप वापरता यावे यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाकडून यासंबंधी जागरूकता मोहीम राबविल्या जात आहे. (Crop Insurance) गावागावांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांना याबद्दल माहिती देण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 14447 देण्यात आलेला आहे. या नंबर वर कॉल करून शेतकरी आपल्या समस्या सोडवू शकतात. 

ॲपच्या माध्यमातून नुकसान भरपाई करताना या गोष्टी लक्षात घ्या 

  • ॲप मध्ये घटनेचा प्रकार निवडताना “Access Rain Fall” किंवा Indudation” म्हणजेच अतिवृष्टी किंवा पूर या पर्यायांमधून एक पर्याय निवडायचा
  • पीक वाढी चा टप्पा “स्टॅंडिंग क्रॉप” “Standing Crop” निवडायचा म्हणजे उभे पिक 
  • नुकसान टक्केवारी बरोबर जमली नाही तर ॲपच्या द्वारे अर्ज सुधारणा करता येतील 

मोबाईल मधून ॲप द्वारे नुकसानीची माहिती पूर्ण दिल्यानंतर “Docket ID” हा मिळतो शेतकऱ्यांनी “Docket ID” सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. हा “Docket ID” पुढे उपयोगी पडू शकतो.

हे देखील वाचा : Lek Ladki Yojana : या योजनेचा पण घ्या लाभ, मिळतील तब्बल 1 लाख रुपये

Spread the love