Crop Insurance 2024 : अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास विमा कंपनीकडे अशाप्रकारे ऑनलाईन तक्रार नोंदवा

Crop Insurance 2024 : अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास विमा कंपनीकडे अशाप्रकारे ऑनलाईन तक्रार नोंदवा

Crop Insurance 2024 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 – 25 मधील पिक विमा धारक शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे आणि कायमच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास 72 तासाच्या आत विमा कंपनींना कळविणे बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश राज्यामध्ये सध्या अतिवृष्टी होत असल्याने खूप साऱ्या पिकाचे नुकसान होत आहे आणि या झालेल्या पिकाच्या नुकसानाची भरपाई घेण्यासाठी विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपनीला 72 तासांच्या आत कळविणे बंधनकारक असणार आहे. 

Crop Insurance 2024
Crop Insurance 2024

शेतकरी हेल्पलाइन क्रमांक 

राज्य सरकारने शेतकऱ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. यापैकी एक महत्त्वाची पद्धत म्हणजे शेतकरी हेल्पलाइन क्रमांक आहे. तक्रार नोंदविण्यासाठी संबंधित विभागाकडून टोल फ्री क्रमांक 14447 उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. शेतकरी या क्रमांकावर कॉल करून आपल्या झालेल्या शेत पिकाचे नुकसानाची तक्रार दाखल करू शकतात. (Crop Insurance 2024)

सर्व शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पिक विम्याची तक्रार नोंदविणे शक्य होत नाही. त्यामुळे सरकारने शेतातील झालेल्या पिकाची नुकसानाची तक्रार करण्यासाठी अशिक्षित शेतकऱ्यांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तक्रार कशी नोंदवायची हे खालील प्रमाणे देण्यात आले आहे, हे वाचून तुम्ही त्याप्रमाणे ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात. 

ऑनलाइन पद्धतीने तक्रार कशी नोंदवावी? 

शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदविण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स / Crop Insurance ॲपची मदत घ्यावी लागणार आहे. या ॲपवर नुकसान भरपाई ची नोंद केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर पावती स्वरुपात उपलब्ध होईल. त्यामध्ये डॉकेट क्रमांक मिळतो. ॲप डाऊनलोड करून तक्रार कशाप्रकारे नोंदवायची खाली प्रक्रिया दिली आहे. (Crop Insurance 2024)

  1. मोबाईल च्या प्लेस्टोर वरून प्रथम Crop Insurance / क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप इंस्टॉल करून घ्यायचे. 
  1. ॲप इन्स्टॉल करून ओपन केल्यानंतर Continue As Guest / कंटिन्यू ऍज गेस्ट हा पर्याय निवडायचा. 
  1. त्यानंतर क्रॉप लॉस /Crop Loss म्हणजेच पीक नुकसान हा पर्याय निवडायचा.
  1. पुढे Crop Loss Intimation / पीक नुकसानीची पूर्व सूचना हा पर्याय निवडायचा.
  1. पुढे कार्यरत असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा. 
  1. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी टाकून अर्ज सादर करायचा. 
  1. पुढे हंगाम खरीप वर्ष – 2024 योजना आणि राज्य निवडायचे
  1. नोंदणीचा स्रोत CSC निवडायचा आणि तुमच्याकडे असलेल्या पावतीचा क्रमांक, म्हणजेच पॉलिसी क्रमांक आहे का? या बटनावर क्लिक करायचे आणि तुमचा विमा पावती क्रमांक तेथे टाकायचा.
  1. पावती क्रमांक टाकल्यानंतर पावती क्रमांक वरती टिक करा. मग तुम्हाला तुमचा पॉलिसी क्रमांक चा तपशील दिसेल. 
  2. तुम्हाला ज्या गट क्रमांक मधील पिकाची तक्रार करायची असेल किंवा ज्या पिकाची तक्रार तुम्हाला करायची असेल. तो अर्ज निवडा प्रत्येक पिका करता आणि गटा करता तुम्हाला स्वतंत्र तक्रार करता येईल. 
  1. पुढे घटनेचा प्रकार पुढील प्रमाणे टाका Excess Rainfall किंवा Inubdation निवडा, त्यानंतर घटनेचा दिनांक- ज्या दिवशी अतिवृष्टी झाली असेल किंवा पिकाच्या नुकसान झाले असेल ती तारीख टाकायची. 
  1. त्यानंतर पीक वाढीचा टप्पा Standing Crop निवडायचे आणि ज्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे, त्याची टक्केवारी तेथे टाकायची. 
  1. संपूर्ण माहिती टाकून झाल्यानंतर नुकसान झालेल्या पिकाचा फोटो काढायचा आणि तो सबमिट करायचा. 
  1. तुमचा अर्ज योग्य पद्धतीने सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर तक्रार यशस्वी झाल्या संदर्भात एक Docket ID प्राप्त होईल तो Docket ID जपून ठेवायचा आहे. (Crop Insurance 2024)

अशाप्रकारे शेतकरी मोबाईल वरून झालेल्या पिकाच्या नुकसानाची तक्रार ऑनलाइन पद्धतीने करू शकतात.

हे देखील वाचा : Kanda Soyabin Bajar Bhav : आजचे कांदा आणि सोयाबीन बाजार भाव

Spread the love