Site icon Get In Marathi

David Wiese Retirement : देविड वीसे ने घेतला सन्यास,इंग्लडचा नामीबिया वर विजय

David Wiese Retirement : देविड वीसे ने घेतला सन्यास,इंग्लडचा नामीबिया वर विजय

David Wiese Retirement

David Wiese Retirement :T20 विश्वचषकातील 34 व्या सामन्यात इंग्लंड आणि नामीबिया हे 2 संघ आमनेसामने आले होते. इंग्लंडला सुपर 8  मध्ये जागा मिळविण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते हा सामना सर व्ही व्ही एन रिचर्ड स्टेडियमवर खेळविण्यात आला होता.(David Wiese Retirement) या सामन्यामध्ये इंग्लंडने नामीबिया वर 41 धावांनी विजय मिळविला आहे. या सामन्यातील पराभवाने आता नामीबिया संघ टी-20 विश्वचषकामधून बाहेर झाला आहे. 

डेव्हिड विसा निवृत्त (David Wiese Retirement)

Eng Vs Nam इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात इंग्लंडने नामीबिया वर  41 धावांनी विजय मिळविला आहे. त्याचबरोबर नामीबिया संघासाठी T ट्वेंटी विश्वचषकातला प्रवास आता संपला आहे. आतापर्यंत नामीबिया या संघाने 4 सामने खेळले असून त्यातील फक्त 1सामन्यांमध्ये नामीबिया संघाला विजय मिळविता आला आहे.(David Wiese Retirement) हा सामना झाल्यानंतर उत्कृष्ट असा फलंदाज डेव्हिड विसा यानी निवृत्ती घेतली आहे. इंग्लंड विरुद्ध चा हा त्याचा सामना शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.आतापर्यंतच्या T-20 विश्वचषकामध्ये त्यानी त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना आकर्षित केले होते. शेवटच्या सामन्यात देखील त्यानी चांगली कामगिरी केले.

त्याने गोलंदाजी करताना 2 षटके टाकले त्यामध्ये फक्त 6 धावा दिल्या. आणि त्या बदल्यात 1 विकेट घेतली त्याचबरोबर त्याने फलंदाजी देखील उत्कृष्ट अशी केली. फलंदाजी करताना त्यानी फक्त 12 चेंडू मध्ये 27 धावा ठोकल्या त्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्याची एकेरी झुंज संघाला विजय मिळवू शकली नाही. 

डेव्हिड विसा हा नामीबियाचा अष्टपैलू खेळाडू आहे. ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव केले आहे. डेव्हिड विसा हा 18 मे 1985 रोजी दक्षिण आफ्रिकेमधील रोड पोर्ट येथे जन्मला. डेव्हिड विसा हा 2 देशांकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला खेळाडू आहे. (David Wiese Retirement) तो उजव्या हाताचा फलंदाज त्याच बरोबर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज देखील आहे.

त्यानी आतापर्यंत दक्षिण आफ्रिका आणि नामीबिया या दोन्ही संघाकडून खेळत आपले कौशल्य दाखविले आहे. डेव्हिड विसा यानी प्रांतीय पातळीवर खेळण्यास सुरुवात ही 2005 साली केली तसेच देशांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये देखील तो टायटन्स संघाकडून खेळला होता.

डेव्हिड विसा यानी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये प्रदारपण हे 2015 मध्ये केले व त्याने दक्षिण आफ्रिका संघाकडून खेळत पहिला सामना हा न्यूझीलंड विरुद्ध खेळला.(David Wiese Retirement) त्याने आयपीएल मध्ये देखील सामने खेळले आहे तो आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर या संघाकडून खेळला होता. डेव्हिड विसा याने आतापर्यंत त्याच्या कारकीर्दीत 15 एकदिवसीय सामने खेळले आहे आणि 54 T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात 330 धावा तर T-20 सामन्यांमध्ये 624 धावा केल्या आहेत. आणि गोलंदाजी मध्ये विसा याने एकदिवसीय सामन्यात 15 आणि T-20 सामन्यांमध्ये 66 बळी घेतले आहेत.

डेव्हिड विसा याने 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पदार्पण केले होते. त्यानी 2013 साली साऊथ आफ्रिका कडून खेळताना आपल्या कारकीर्द सुरुवात केली होती. त्यानंतर 2021 साली त्यानी नामीबिया संघाकडून खेळण्यास सुरुवात केली होती. नामीबिया कडून खेळताना त्याने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये 5 ऑक्टोबर 2021 मध्ये प्रदार्पण केले होते. (David Wiese Retirement)नामीबिया संघाकडून खेळताना त्यानी आतापर्यंत 34 T-20 सामने खेळले आहेत.

त्यामध्ये त्यानी 35 विकेट देखील मिळविल्या आहेत आणि फलंदाजी मध्ये त्याने 538 रन देखील केले आहे. त्यामध्ये 3 अर्धशतक लावले आहे तर 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 1अर्धशतक केले आहे. त्यामध्ये 228 रन बनविले आणि 6 विकेट मिळविले आहे.

इंग्लंड संघाची जोरदार सुरवात

(David Wiese Retirement) T20 विश्वचषकातील 34 व्या सामन्यात नामीबिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता पावसामुळे सामन्याला उशिरा सुरुवात झाली होती. त्यामुळे हा सामना 20 ओव्हरचा न ठेवता 10 ओव्हरचा ठेवण्यात आला होता. डी एल एस नियमानुसार हा सामना 10 ओव्हरचा ठेवण्यात आला होता.इंग्लंड संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी साल्ट आणि जॉस बटलर  ही जोडी मैदानात उतरली होती. सामना हा केवळ 10 ओव्हरचा असल्यामुळे पहिल्या चेंडूपासूनच फलंदाज हे आक्रमकपणे खेळत होते.

दुसऱ्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर इंग्लंड संघाचा कप्तान जोस बटलर हा बाद झाला त्याला ट्रम्पल मॅन याने बोल्ड आउट केले. जॉस बटलर  याने 4 चेंडूंमध्ये शून्य धावा केल्या होत्या. इंग्लंड संघाची स्थिती 2 धावा 1 गडी बाद अशी झाली होती. इंग्लंड संघाचा कप्तान बाद झाल्यानंतर इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जॉनी बेअरस्टो हा फलंदाजीसाठी आला. या जोडीने देखील आक्रमक अशी खेळी केली तिसऱ्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर साल्ट का बाद झाला.

त्याला विसा याने ग्रीनच्या हाती झेल देत बात केले साल्ट याने 8 चेंडूमध्ये 11 धावा केल्या. त्यामध्ये 2 चौकार लगावले होते. इंग्लंड संघाची स्थिती आता 13 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. साल्ट बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी हॅरी ब्रूक हा आला. या जोडीने जोरदार खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली.

संघाचे धावफलक 69 असताना जॉनी बेअरस्टो  हा बाद झाला त्याला. बेरनर्द  याने बाद केले. जॉनी बेअरस्टो यानी 18 चेंडू मध्ये 31 धावा केल्या त्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते. आता हॅरी ब्रूक च्या साथीला मोईन आला होता या जोडीने 9 ओव्हर मध्ये संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला त्यानंतर संघाचे धावफलक 107 असताना मोइन हा बाद झाला.(David Wiese Retirement) मोईन याने 6 चेंडू मध्ये 16 धावा केल्या त्यामध्ये 2 षटकार लगावले. मोईनला ट्रम्पल मॅन यानी निको च्या हाती झेल देत बात केले.

इंग्लंडची स्थिती 107 धावा 4 गडी बाद आणि 9.2 ओवर झाल्या होत्या. आता फलंदाजीसाठी लिविंग स्टोन हा आला होता. त्याने 2 षटकार ठोकले आणि 4 चेंडू मध्ये 13 धावा केल्या. हॅरी ब्रूक याने 20 चेंडू मध्ये 47 धावा केल्या त्यामध्ये 2 षटकार आणि 4 चौकार लगावले होते.

इंग्लंड संघाने 10 ओव्हर मध्ये 5 गडी गमावत 122 धावा केल्या आणि नामीबीया संघासमोर 123 धावांचे आव्हान दिले. हॅरी ब्रूक आणि जॉनी बेअरस्टो या दोघांमध्ये सर्वात जास्त धावांची भागीदारी झाली या दोघांमध्ये 30 चेंडू मध्ये 56 धावांची भागीदारी झाली.नामीबिया संघाकडून गोलंदाजी मध्ये वाईस यानी उत्कृष्ट गोलंदाजी करत 2 ओव्हर मध्ये फक्त 6 धावा दिल्या त्या मध्ये 1 विकेट मिळविली. ट्रम्पल मॅन याने 2 ओव्हर मध्ये 31 धावा 2 विकेट मिळविल्या. बेरनर्ड यानी 2 ओव्हर मध्ये 24 धावा देत 1 विकेट मिळविली. गेरहार्ड याने 2 ओव्हर मध्ये 26 धावा दिल्या आणि जॅक ब्रासेल याने 2 ओव्हर मध्ये 32 धावा दिल्या.

हे देखील वाचा: Ind vs Usa : भारताचा युएसए वर 7 विकेट्सने विजय, सुपर 8 मध्ये भारताची एंट्री 

नामीबिया संघाची चांगली सुरुवात 

नामीबिया संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी मायकल आणि निकोलस ही जोडी मैदानात आली होती. या जोडीने संयमाने खेळत संघाला चांगली सुरुवात करून दिली संघाचे धावफलक 44 धावा असताना नामीबिया संघाची पहिली विकेट पडली. निकोलस याला दुखापत झाल्याने तो मैदानातून परत गेला. आता मायकलच्या जोडीला नामीबिया संघाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड विसा हा फलंदाजीसाठी आला.(David Wiese Retirement) या जोडीने आक्रमकपणे खेळी करत संघाला सावरले. संघाचे धावफलक 80 असताना नामीबिया संघाची दुसरी विकेट पडली नवव्या ओवरच्या शेवटच्या चेंडू वर मायकल बाद झाला. त्याला जॉर्डन याने हॅरी ब्रूक च्या हाती झेल देत बाद केले.

शेवटच्या ओव्हर मध्ये नामीबीया संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 43 धावांची गरज होती. आता हा सामना जिंकणे नामीबिया संघासाठी अशक्य होते.Eng Vs Nam Scorecard दहाव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर डेव्हिड वाईस हा देखील बाद झाला वाईस यानी 12 चेंडूमध्ये 27 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. डेविड वाईस याला झोफ्रा आर्चर याने ब्रुक च्या हाती झेल देत बाद केले. (David Wiese Retirement)आता मैदानात फलंदाजीसाठी स्मित हा आला होता परंतु सामना आता हातातून गेला होता. स्मित आणि गेरहार्ड ही जोडी नाबाद राहिली. गेरहार्ड याने 3 चेंडू मध्ये 1धाव केली. तर स्मित याने 1चेंडू मध्ये शून्य धाव करत नाबाद राहिला. नामीबिया संघ हा 10 ओव्हर मध्ये फक्त 84 धावा करू शकला.

आणि नामीबिया संघाचा 41 धावांनी पराभव झाला. इंग्लंड संघाकडून गोलंदाजी मध्ये झोफ्रा आर्चर याने 2 ओव्हर मध्ये 15 धावा देत 1 विकेट मिळविली. क्रिस जॉर्डन यानी 2 ओव्हर मध्ये 19 धावा देत 1 विकेट मिळविली. टोपले याने 2 वर मध्ये 6 धावा दिल्या. स्याम करण यानी 2 ओव्हर मध्ये 13 धावा दिल्या. आदिल रशीद यानी 2 ओवर मध्ये 29 धावा दिल्या.या सामन्यात इंग्लंड संघाने विजय मिळवून आपला सुपर 8  सामन्यांमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

हे देखील वाचा: Afg Vs Png, Super 8: अफगाणिस्तानचा विजय, सुपर 8 मध्ये दणक्यात एन्ट्री

सामन्याचा मानकरी 

इंग्लंड संघाचा आक्रमक फलंदाज हॅरी ब्रूक हा या सामन्याचा मानकरी ठरला. त्याने 20 चेंडू मध्ये 47 धावांची नाबाद खेळी केली.(David Wiese Retirement) त्यामध्ये त्यानी 2 षटकार आणि 4 चौकार लगावले. इंग्लंड संघाचे 13 धावांमध्ये 2 गडी बाद झाले होते. या नाजूक स्थिती मधून याने संघाला सावरत नाबाद खेळी केली आणि संघाला 122 धावा पर्यंत पोहोचविण्यास मुख्य भूमिका पार पाडली.

Spread the love
Exit mobile version