Farm Pond Scheme : कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेत तळे योजना
Farm Pond Scheme : राज्यातील कोरडवाहू शेतीला उपलब्ध जल साठा आणि जलसंवर्धनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार द्वारे मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर करण्यात आली आहे.
अर्ज करण्याबाबतची माहिती
या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून संमती द्यावी लागेल, अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्जाचे नमुने https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. येथून शेतकरी प्रपत्र – 2 डाऊनलोड करू शकतात. तसेच अर्ज भरल्यानंतर त्याची पावती डाऊनलोड करून ठेवणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी “आपले सरकार” या संकेतस्थळावर जाऊन मागेल त्याला शेततळे या लिंक वर क्लिक करायचे आहे. अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्याकडे मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. जो सीएससी मध्ये शेतकऱ्याची प्रोफाइल तयार करताना वापरला जातो. (Farm Pond Scheme) अर्ज करण्यासाठी अर्जदार स्वतः मोबाईल मधून किंवा सायबर कॅफेच्या संगणकावरून अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी 20/- रुपये शुल्क असणार आहे.
शेततळे योजनेसाठी अटी आणि पात्रता
पात्रता व अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी लागेल. आणि जास्त जास्त क्षेत्राची मर्यादा दिलेली नाही. तसेच ज्या शेतामध्ये शेततळे करायचे आहे ते तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे गरजेचे आहे. तसेच हा अर्ज करताना शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्याही योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थीची निवड करण्याची पद्धत : दारिद्र्यरेषेखालील शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त कुटुंब वारसांना अगोदर प्राधन्य दिले जाईल. त्यानंतर जेष्ठता यादीमध्ये अर्ज करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
शेतात तळ्याचे आकारमान काय असायला पाहिजे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेततळ्याचे आकारमान योजनेच्या अनुसार असणे आवश्यक आहे. यासाठी शेततळ्याचे आकारमान हे कमीत कमी 15 बाय 15 बाय 3 मीटर आणि जास्तीत जास्त 30 बाय 30 बाय 3 मीटर आकारमानाचे शेततळे असणे आवश्यक आहे. दिलेल्या आकारमानाचे शेततळे असणे आवश्यक आहे, तरच या योजनेचा लाभ मिळू शकतो.
शासनाचा निर्णय
मागेल त्याला शेततळे या योजनेची अंमलबजावणी सरकारने 17 फेब्रुवारी 2016 पासून सुरू केली आहे. जिल्हा निहाय मंजूर लक्षांक आणि मार्गदर्शक सूचनांमध्ये शेततळ्याच्या अंमलबजावणी बाबतच्या अटी व शर्ती, अनुज्ञेय आकारमान व अनुदान, अंमलबजावणीची पद्धत, तांत्रिक मान्यता, लाभार्थ्यांची जबाबदारी याबाबत सर्व माहिती दिलेली आहे. (Farm Pond Scheme)
लाभ घेणाऱ्यांसाठी सूचना : Farm Pond Scheme शेतकऱ्यांनी योजनेच्या प्रत्येक टप्प्यावर सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यानुसार शेततळ्याचे काम करणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा : Crop Insurance : अतिवृष्टी मुळे नुकसान झाले, शेतकऱ्यांनो 72 तासांच्या आत करा हे काम