Heist Viral Video : ज्वेलर्स च्या दुकानातून दिवसा कोटी रुपयाच्या सोन्याची चोरी, Video पाहून बसेल धक्का
Heist Viral Video : चोरीची ही घटना उत्तर प्रदेश मधील एका ज्वेलर्सच्या दुकानातली असून, चोरांनी दिवसा ज्वेलर्सच्या दुकानातून कोटी रुपयांची सोने चोरले आहे. या चोरीचा सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडीया वर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. (Heist Viral Video) चोर हे नवीन – नवीन युक्तीचा वापर करून चोरी करत असल्याने पोलिसांसाठी आता चोरांना पकडणे कठीण झाले आहे. तरी देखील चोरांना पकडण्याचे काम चालू आहे.
उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर शहरातील थाथेरी बाजारातील ज्वेलरीच्या दुकानामध्ये हा सदर प्रकार घडलेला आहे. ही चोरी दुपारच्या वेळेस करण्यात आली होती. पाच जणांनी दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील सर्व पैसे आणि सोन्याचे दागिने लुटले. यामध्ये चोरांनी चेहऱ्यावर कपडा गुंडाळलेला होता. (Heist Viral Video) या चोरांनी दुकानातील कर्मचारी आणि दुकानाच्या मालकाला बंदूक दाखवून भीती दाखवली आणि तिजोरी मध्ये ठेवलेले पैसे आणि दागिने चोरले.
सीसीटीव्ही फुटेज मध्ये रेकॉर्ड
या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असल्याने हा पूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. कॅमेरा मध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओ नुसार काही हल्लेखोर हेल्मेट आणि तोंडावर कपडा गुंडाळून दिसत आहे. दुकानात दोन आणखी कस्टमर बसलेले दिसत आहे. त्यावेळेस अचानक काही जण दुकानात येतात आणि बंदुकीचा धाक दाखवतात. काहीजण बंदूकिचा धाक कर्मचारी, मालकासह कस्टमरला दाखवतात.आणि तोपर्यंत काहीजन सोबत आणलेल्या बॅगामध्ये सोने आणि पैसे भरतात. या दरोड्यांमध्ये चोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दागिने आणि पैसे लुटले त्यांनी कोणालाही दुखापत केलेली नाही. दरोडेखोरांनी बॅगमध्ये सर्व पैसे आणि दागिने लुटले आणि तेथून पळ काढला.
पोलिसांची तातडीची कारवाई
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आणि घटनास्थळी पोहोचताच तपास सुरू केला आहे. (Heist Viral Video) या चोरी संदर्भात गुन्हा दाखल करून दरोदेखोऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सहा विशेष पथकांची निर्मिती केली आहे. सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे चोरांची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडण्यात पोलिसांना यश मिळेल.
नेटकर्यांची प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक नेटकर्यांनी याबाबत विविध प्रतिक्रिया दिल्या आहे. (Heist Viral Video) काही लोकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे, तर काही लोकांनी चोरांच्या धाडसाचा उल्लेख केलेला आहे.