Site icon Get In Marathi

IND Vs SL 2nd T20 Highlights : भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव भारताची 2-0 अशी आघाडी

IND Vs SL 2nd T20 Highlights : भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव भारताची 2-0 अशी आघाडी

IND Vs SL 2nd T20 Highlights : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या t20 सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेवर 7 विकेट्सनी दणदणीत विजय मिळविला आहे.डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेने दिलेले आव्हान हे कमी करण्यात आले होते आणि भारतीय संघाने ते आव्हान सहजपणे पार करत, हा सलग दुसरा सामना आपल्या नावावर केला आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवित 2-0 अशी श्रीलंके संघावर आघाडी घेतली आहे.

IND Vs SL 2nd T20 Highlights


IND Vs SL 2nd T20 Highlights : भारतीय संघ हा 5 T-20 सामन्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला असून या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजयी मिळविला होता आणि आता दुसऱ्या t20 सामन्या देखील भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सलग दुसरा विजय नोंदविला आहे. (IND Vs SL 2nd T20 Highlights) हा सामना श्रीलंकेतील पालेकेले या स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय भारतीय संघाचा कप्तान सूर्यकुमार यादव याचा योग्य ठरला.

(IND Vs SL 2nd T20 Highlights) श्रीलंका संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्या नंतर श्रीलंका संघ हा 20 ओवर मध्ये 9 विकेट्स गमावून 161 धावा करू शकला. त्यानंतर भारतीय संघाला मिळालेले 162 धावांचे आव्हान हे पावसाच्या व्यत्ययामुळे कमी करण्यात आले. भारताची इनिंग चालू होण्याअगोदरच पाऊस आल्यामुळे मॅच ही उशिरा सुरू करण्यात आली. पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय संघाला मिळालेले आव्हान कमी करण्यात आले डकवर्थ नियमानुसार भारतीय संघाला जिंकण्यासाठी 8 ओव्हर मध्ये 78 धावांची आव्हान देण्यात आले. 78 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर भारतीय संघ हा फलंदाजीसाठी मैदानात आला.

भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली आणि हे आव्हान 6.3 ओव्हर मध्ये 3 गडी गमावत पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाकडून कुशल परेरा यानी अर्धशतकी खेळी केली. पहिल्या फळीतील सर्व फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती. (IND Vs SL 2nd T20 Highlights) परंतु श्रीलंका संघाचा अर्धा संघ बाद झाल्यानंतर त्या नंतर कोणताही फलंदाज मैदानात जास्त वेळ टिकला नाही. त्यामुळे श्रीलंका संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय संघाने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. भारतीय संघाकडून रवी बिश्नोई यानी 3 विकेट घेतल्या होत्या. 

श्रीलंका संघाची फलंदाजी (IND Vs SL 2nd T20 Highlights)

भारतीय संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंका संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. श्रीलंका संघ कडून सलामीला फलंदाजीसाठी पथुन निसंका आणि कूसल मेंडीस ही जोडी मैदानात आली होती. या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली होती. (IND Vs SL 2nd T20 Highlights) परंतु ही जोडी जास्त वेळ मैदानात टिकली नाही. चौथ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर कूसल मेंडीस हा बाद झाला. संघाचे धावफलक 26 असताना श्रीलंका संघाची पहिली विकेट पडली. कूसल मेंडीस ला अर्षदीप याने रवी बिश्नोईच्या हाती झेल देत बाद केले.

कूसल मेंडीस याने 11 चेंडू मध्ये 10 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार लगावले होते. कूसल मेंडीस आणि पथुन निसंका या जोडीमध्ये पहिल्या विकेटसाठी 21 चेंडू मध्ये 26 धावांची भागीदारी झाली होती. आता कूसल मेंडीस बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कुशल परेरा हा आला. (IND Vs SL 2nd T20 Highlights) या जोडीने संयमाने खेळ करत संघाला 50 धावांचा पल्ला गाठून दिला. श्रीलंका संघाने पावर प्ले मध्ये 54 धावा काढल्या होत्या. संघाचे धावफलक 80 असताना पथुन निसंका रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. पथुन निसंका याने 24 चेंडूंचा सामना करताना 32 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 5 चौकार लगावले होते. 10 व्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर पथुन निसंका बाद झाला.

आता श्रीलंका संघाची स्थिती 80 धावा 2 बडी बाद अशी झाली होती. पथुन निसंका बाद झाल्यानंतर कुशल च्या साथीला चौथ्या क्रमांकाला कमिंडू मेंडीस हा फलंदाजीसाठी आला. या जोडीने देखील चांगली खेळी केली. या जोडीने आक्रमकपणे खेळी करत श्रीलंका संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला. (IND Vs SL 2nd T20 Highlights) श्रीलंका संघाने अवघ्या 10 ओव्हर मध्येच 100 धावांचा पल्ला गाठला होता. एका बाजूने कुशल परेरा हा आक्रमकपणे खेळी करत होता तर दुसऱ्या बाजूने कमिंडू मेंडीस हा त्याला चांगली साथ देत होता. परंतु संघाचे धावफलक 130 असताना कमिंडू मेंडीस बाद झाला. 16 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर कमिंडू मेंडीस हा झेल बाद झाला. कमिंडू मेंडीस ला हार्दिक पांड्या याने रिंकू सिंग च्या हाती झेल देत बाद केले.

कमिंडू मेंडीस ने 23 चेंडूंचा सामना करत 26 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 4 चौकार लगावले होते. आता श्रीलंका संघाची स्थिती 130 धावा 3 गडी बाद अशी झाली होती. (IND Vs SL 2nd T20 Highlights) कमिंडू मेंडीस बाद झाल्यानंतर 5 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी असलंका हा मैदानात आला. परंतु या जोडीला संघासाठी मोठे योगदान देता आले नाही. संघाच्या धावफलकामध्ये अवघ्या 9 धावांची भर पडली आणि कुसल परेरा बाद झाला. कुशल परेरा यानी 34 चेंडूंमध्ये 54 धावा फटकावल्या होत्या. त्यामध्ये 2 षटकार आणि 6 चौकार लगावले होते. त्याला  हार्दिक पांड्या यांनी रिंकू सिंग च्या हाती झेल देत बाद केले. कुसल परेरा आपले अर्धशतक करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी क्षणाका हा आला.

परंतु संघाच्या धावफलकामध्ये 1 धावांची भर पडली आणि क्षणाका बाद झाला 16 व्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर श्रीलंका संघाची 5 वी विकेट गेली. शनाका याला रवी बिश्नोई यानी बोल्ड आऊट केले. शनाका याला आपले खाते ही खोलता आले नाही. आता श्रीलंका संघाची स्थिती 140 धावा 5 गाडी बाद अशी झाली होती. (IND Vs SL 2nd T20 Highlights) क्षनाका बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी हसरंगा हा मैदानात आला परंतु पुढच्या चेंडूवर तो देखील बाद झाला. रवी बिश्नोई यानी त्याला बोल्ड आऊट केले 140 धावांवर श्रीलंका संघाचे 6 वी विकेट पडली. रवी बिश्नोई यानी लगातार 2 गडी बाद केले. आता श्रीलंका संघाची स्थिती नाजूक झाली होती. हसरंगा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मेंडीस हा आला.

या जोडीने संघाचे धावफलक पुढे नेत श्रीलंका संघाला 150 धावांचा पल्ला गाठून दिला आणि संघाचे धावफलक 151 असताना श्रीलंका संघाचा कप्तान देखील बाद झाला. 19 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर असलंका बाद झाला. त्याला अर्शदीप यानी संजू सॅमसनच्या हाती झेल देत बाद केले. (IND Vs SL 2nd T20 Highlights) असलंका बाद झाल्यानंतर नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तीक्षणा हा आला. 1 वेळेस वाटत होते श्रीलंका संघ हा 200 धावांचा पल्ला गाठील परंतु भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजी समोर श्रीलंका संघाचे फलंदाज हे निष्फळ ठरले. श्रीलंका संघाचे धावफलक 154 असताना श्रीलंका संघाची 8 वी विकेट पडली.

तीक्षणा याला अक्सर पटेल यानी बोल्ड आऊट केले. शेवटच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला आता 4 चेंडू शिल्लक होते फलंदाजीसाठी मथीषा हा मैदानात आला. श्रीलंका संघ हा 161 धाव संख्या पर्यंत पोहोचला आणि शेवटच्या चेंडूवर मेंडीस हा बाद झाला तो अक्षरच्या गोलंदाजीवर पंत च्या हातून यष्टीचीत बाद झाला. (IND Vs SL 2nd T20 Highlights) श्रीलंका संघाने 20 ओव्हर मध्ये 9 गडी गमावत 161 धावा केल्या आणि भारतीय संघाला जिंकण्यासाठी 162 धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाकडून गोलंदाजींमध्ये रवी बिश्नोई याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. रवी बिश्नोई यांनी 4 ओव्हर मध्ये 26 धावा देत 3 गडी बाद केले.

अक्षर, अर्षदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. श्रीलंका संघाकडून कुशल परेरा यानी अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज हा अर्धशतक करू शकला नाही. मथीस याने 32 धावा करत संघासाठी चांगली योगदान दिले. (IND Vs SL 2nd T20 Highlights) भारतीय संघाला जिंकण्यासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. परंतु भारतीय संघाची फलंदाजी चालू होण्याअगोदरच पावसाने सुरुवात केली. त्यामुळे बराच वेळ हा सामना थांबला होता अखेर पाऊस उघडल्यानंतर सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु सामना उशिरा सुरू झाल्यामुळे, डकवर्थ नियमानुसार भारतीय संघाला जिंकण्यासाठी 8 ओव्हर मध्ये 78 धावांचे आव्हान देण्यात आले. 

भारतीय संघाची फलंदाजी IND Vs SL 2nd T20 Highlights

पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ नियमानुसार भारतीय संघाला जिंकण्यासाठी 8 ओव्हर मध्ये 78 धावांचे आव्हान देण्यात आले होते. भारतीय संघ हे आव्हान सहजपणे पार करेल असे वाटत होते. परंतु भारतीय संघाची सलामीची जोडी फेल ठरली. पहिल्या ओवरमध्ये यशस्वी जयस्वाल यानी चांगली फलंदाजी करत भारतीय संघाला 12 धावसंख्या पर्यंत नेऊन पोहोचविले. परंतु दुसरी ओवर मध्ये संजू सॅमसन स्ट्राइक वर आल्यानंतर तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. (IND Vs SL 2nd T20 Highlights) संजू सॅमसन याला पहिल्या चेंडूवर तीक्षणा याने बोल्ड आउट केले. संजु सॅमसन याला आपले खाते हि खोलता आले नाही. तो 1 चेंडूमध्ये शून्य धावा करत बाद झाला. भारतीय संघाची 12 धावसंख्येवर पहिली विकेट पडली.

संजु सॅमसन बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी भारतीय संघाचा कप्तान सूर्यकुमार यादव हा मैदानात आला. सूर्यकुमार यादव यानी पुन्हा आपल्या आक्रमक फलंदाजीच्या स्टाईल मध्ये खेळण्यास सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि सूर्यकुमार यादव या जोडीने भारतीय संघाला 4 ओव्हर मध्ये 50 धावांचा पल्ला गाठून दिला. संघाचे धावफलक 51 असताना भारतीय संघाची दुसरी विकेट पडली 5 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव हा बाद झाला. (IND Vs SL 2nd T20 Highlights) त्याला मतिशा याने तीक्षणाच्या हाती झेल देत बाद केले. सूर्यकुमार यादव याने 12 चेंडू मध्ये 26 धावा कुटल्या होत्या. त्यामध्ये 1 षटकार आणि 4 चौकार लगावले होते. यशस्वी जयस्वाल आणि सूर्यकुमार यादव या दोघांमध्ये 39 धावांची भागीदारी झाली होती.

हे देखील वाचा : Tata Punch CNG : Tata ची CNG व्हेरियंट मधील सर्वात बेस्ट कार, जाणून घ्या कींमत

सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी हार्दिक पांड्या हा मैदानात आला. भारतीय संघाला जिंकण्यासाठी 22 चेंडू मध्ये 27 धावांची गरज होती. हार्दिक पांड्या मैदानात आल्यानंतर त्याने जोरदारपणे खेळण्यास सुरुवात केली. या जोडीने संघाला 65 धाव संख्येपर्यंत पोहोचविले आणि 6 व्या वरच्या चौथ्या चेंडूवर भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल बाद झाला. त्याला हसरंगा याने तीक्षणा च्या हाती झेल देत बाद केले. यशस्वी जयस्वाल यानी 15 चेंडू मध्ये 30 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 2 षटकार 4 चौकार लगावले होते. आता भारतीय संघाची स्थिती 65 धावा 3 घडी बाद अशी झाली होती. भारतीय संघाला जिंकण्यासाठी अजून 14 चेंडू मध्ये 13 धावांची गरज होती.

यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याच्या साथीला फलंदाजीसाठी भारतीय संघाचा एसटी रक्षक रिषभ पंत हा फलंदाजीसाठी आला. हार्दिक पंड्या यानी आक्रमकपणे खेळी करत जोरदार टोले लगावण्यास सुरुवात केली आणि भारतीय संघाने अखेर 7 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर विजय मिळविला. (IND Vs SL 2nd T20 Highlights) भारतीय संघाने 6.3 ओव्हर मध्ये 81 धावा केल्या. त्या बदल्यात 3 गडी गमावले आणि भारतीय संघाने हा सामना सहज जिंकला. हार्दिक पंड्या यानी नाबाद 9 चेंडूमध्ये 22 धावा केल्या.

त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर दुसऱ्या बाजूने ऋषभ पंत यानी 2 चेंडू मध्ये 2 धावा करत नाबाद राहिला. श्रीलंका संघाकडून गोलंदाजी मध्ये तीक्षणा याने 2 ओवरमध्ये 16 धावा देते 1 गडी बाद केला. तर हसरंगा याने 2 ओवर मध्ये 34 धावा देत 1 गडी बाद केला आणि मथीस पथीराणा याने 1.3 ओव्हर मध्ये 18 धावा देत 1 गडी बाद केला. (IND Vs SL 2nd T20 Highlights) अशा प्रकारे भारतीय संघाने हा दुसरा T20 सामना देखील आपल्या नावावर करत 5 सामन्याच्या मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने पावर प्ले मध्ये 14 धावा काढल्या होत्या. 

हे देखील वाचा : New Maruti Suzuki Swift : मारुती च्या या कार ने पुन्हा केला धमाका, 4 थ्या जनरेशनची नवीन स्विफ्ट मार्केट मध्ये दाखल

सामन्याचा मानकरी IND Vs SL 2nd T20 Highlights

भारतीय संघाचा युवा स्पिनर गोलंदाज रवी बिश्नोई हा या सामन्याचा मानकरी ठरला. रवी बिश्नोई याने 4 ओव्हर मध्ये 26 धावा देत श्रीलंका संघाचे महत्त्वाचे 3 गडी बाद केले. (IND Vs SL 2nd T20 Highlights) रवी बिश्नोई याने श्रीलंका संघाचा सलामीचा फलंदाज पथुन निसंका याला बाद केले. त्याचबरोबर हसरंगा आणि शनाका या दोघांना शून्य धावांवर बाद करत श्रीलंका संघाचा डाव कोलमडिस आणला होता.

हे देखील वाचा : Tata Altroz Racer Launch : टाटा ची ही नवीन कार लॉन्च, कोणत्या कार ची लावणार वाट

Spread the love
Exit mobile version