Ind Vs Sl Highlights : भारत श्रीलंका सामना बरोबरीत सुटला, 0 धावांवर भारताच्या 2 विकेट पडल्या

Ind Vs Sl Highlights : भारत श्रीलंका सामना बरोबरीत सुटला, 0 धावांवर भारताच्या 2 विकेट पडल्या

Ind Vs Sl Highlights : भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेला पहिला एकदिवसीय सामना का टाय झाला. भारताच्या शून्य धावांवर 2 विकेट गेल्या. एक वेळेस भारताला जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये फक्त 1 धावांची गरज होती आणि हातामध्ये 2 विकेट होत्या, परंतु एका पाठोपाठ 2 विकेट पडल्या आणि भारतीय संघ हा सामना जिंकण्यापासून एकदा दूर राहिला.

Ind Vs Sl Highlights
Ind Vs Sl Highlights

Ind Vs Sl Highlights : या सामन्यामध्ये रोहित शर्मा याने अर्धशतक झळकावले. हा सामना श्रीलंका येथील कोलंबो च्या आर प्रेमा दासा येथील मैदानावर खेळविण्यात आला होता. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 230 धावा केल्या होत्या. त्या बदल्यात भारतीय संघाने 47.5 ओव्हर मध्ये 10 विकेट गमावत 230 धावा केल्या आणि हा सामना बरोबरीत सुटला.

या सामन्यामध्ये भारतीय संघाने धावांचा पाठलाग करत असताना सामन्यात चांगली पकड मजबूत केली होती शेवटच्या 3 ओव्हर मध्ये भारताला जिंकण्यासाठी फक्त 1 धावांची गरज होती. (Ind Vs Sl Highlights) परंतु शिवम दुबे हा बाद झाला तेव्हा भारतीय संघाची स्थिती 230 धावा 9 गडी बाद अशी झाली होती आणि फलंदाजीसाठी अर्षदीप सिंग हा आला आता भारताला जिंकण्यासाठी फक्त एक धावांची गरज होती परंतु  अर्षदीप सिंग हा पहिल्या चेंडूवर बाद झाला, भारतीय संघ हा 230 धावांवर आटोपला.

आणि हा सामना बरोबरीत सुटला. श्रीलंकेचा कर्णधार असलंका याने 48 वी ओवर टाकली यामध्ये त्याने भारतीय संघाच्या एका पाठोपाठ 2 विकेट घेतल्या त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यामध्ये श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 

श्रीलंका संघाची फलंदाजी (Ind Vs Sl Highlights)

श्रीलंका संघाकडून सलामी ला फलंदाजीसाठी पथूम निसंका आणि आविष्का फ्रनार्डो हि जोडी मैदानात आली. श्रीलंका संघाची सलामीची जोडी संघासाठी मोठे योगदान देऊ शकली नाही संघाचे धावफलक 7 असताना तिसऱ्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर आविष्का फ्रनार्डो बाद झाला. त्याला सिराज याने अर्षदीप सिंग च्या हाती झेल देत बात केले. आविष्का फ्रनार्डो याने 7 चेडूमध्ये 1 धाव केली होती. श्रीलंका संघाची स्थिती 7 धावा एक गडी बाद अशी झाली होती. (Ind Vs Sl Highlights) आविष्का फ्रनार्डो बाद झाल्यानंतर पथम निसंका च्या साथीला फलंदाजीसाठी कुशल मेंडीस हा आला. या जोडीने सावकाश पणे खेळी करत संघाचे धावफलक पुढे नेले

संघाचे धावफलक 46 असताना कुशल मेंडीस बाद झाला. 46 धाव संख्येवर श्रीलंका संघाची दुसरी विकेट पडली चौदाव्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर कुशल मेंडीस याला शिवम दुबे याने पायचीत बाद केले. कुशल मेंडीस यानी 31 चेंडूंचा सामना करताना 14 धावा केल्या होत्या. (Ind Vs Sl Highlights) त्यामध्ये एक चौकार लगावला होता कुशल मेंडीस बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी समरविक्रमा हा आला समरविक्रमा आणि पथम निसंका या जोडीने सावधपणे खेळण्यास सुरुवात केली या जोडीने संघाला 50 धावांचा पल्ला गाठून दिला. परंतु पुढे ही जोडी जास्त वेळ टिकली नाही. धावफलक 60 असताना समरविक्रमा बाद झाला.

19 व्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर समरविक्रमा याला अक्षर पटेल यानी शुभमन गिल च्या हाती झेल देत बात केले.आता श्रीलंका संघाची स्थिती 60 धावा 3 गडी बाद अशी झाली होती. समरविक्रमा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी पथम निसंका च्या साथीला असलंका आला. (Ind Vs Sl Highlights) या जोडीने संघाचे धावफलक थोडे पुढे नेले. या दोघांमध्ये 31 धावांची भागीदारी झाली आणि संघाचे धावफलक 91 असताना असलंका देखील बाद झाला. 24 व्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर असलंका बाद झाला. असलंका याला कुलदीप यादव यानी रोहित शर्माच्या हाती झेल देत बाद केले. (Ind Vs Sl Highlights) असलंका यानी 21 चेंडूमध्ये 14 धावा केल्या होत्या त्यामध्ये 2 चौकार लगावले होते.

आता श्रीलंका संघाची स्थिती 91 धावा 4 गडी बाद अशी झाली होती.असलंका बाद झाल्यानंतर पथम निसंका च्या साथीला जनिथ लियानागे हा आला परंतु ही जोडी देखील जास्त वेळ टिकली नाही. संघाच्या धावफलकांमध्ये 10 धावांची भर पडली श्रीलंका संघाने शंभर धावांचा पल्ला गाठला आणि लगेच पथम निसंका बाद झाला. 27 व्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर पथम निसंका हा बाद झाला. त्याला वाशिंग्टन सुंदर याने पायचीत बाद केले. पथम निसंका यानी 75 चेंडू मध्ये 56 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 9 चौकार लगावले होते. आता श्रीलंका संघाची स्थिती 101 धावा 5 गडी बाद अशी झाली होती.

पथम निसंका बाद झाल्यानंतर जनिथ लियानागे च्या साथीला दुनिथ वेलालागे हा फलंदाजीसाठी आला. या जोडीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आणि सावकाशपणे खेळत संघाचे धावफलक पुढे नेले. जनिथ लियानागे ला 35 व्या ओवरच्या च्या दुसऱ्या चेंडूवर त्याला अक्षर पटेल यानी रोहित शर्माच्या हाती झेल देत बात केले. जनिथ लियानागे याने 26 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या होत्या. त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावला होता जनिथ लियानागे आणि दुनिथ वेलालागे या दोघांमध्ये 41 धावांची भागीदारी झाली होती. आता फलंदाजीसाठी दुनिथ वेलालागेच्या साथीला हसरंगा हा मैदानात आला.

(Ind Vs Sl Highlights) भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजी पुढे श्रीलंका संघाचे फलंदाज हे टिकू शकत नव्हते. श्रीलंका संघाचे फलंदाजे संथपणे फलंदाजी करत धावसंख्या पुढे नेत होते. या जोडीने संघाला 150 धावांचा पल्ला गाठून दिला आणि संघाचे धावफलक  178 असताना हसरंगा बाद झाला.त्याला अर्षदीप सिंग यानी अक्षर पटेल च्या हाती झेल देत बाद केले. हसरंगा याने 35 चेंडू मध्ये 24 धावा केल्या. त्यामध्ये एक चौकार आणि 2 षटकार लगावले होते. आता दुनिथ वेलालागेच्या साथीला फलंदाजीसाठी दनंजाया हा आला. या जोडीने उत्कृष्ट अशी फलंदाजी करत संघाला 210 धावांचा पल्ला गाठून दिला. आणि संघाचे धावफलक 224 असताना दनंजाया बाद झाला.

शेवटच्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर दनंजाया बाद झाला. त्याला अर्षदीप सिंग यानी वाशिंग्टन सुंदर च्या हाती झेल देत बाद केले. त्याने 21 चेंडू मध्ये 17 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार लगावले होते. आता दुनिथ वेलालागेच्या साथीला फलंदाजीसाठी मोहम्मद शिराझ हा आला आणि 3 च चेंडू शिल्लक होते. या जोडीने नाबाद खेळी केली आणि संघाला 230 धावसंख्येपर्यंत नेऊन पोहोचविले.श्रीलंका संघाने 50 ओव्हर मध्ये 8 विकेट गमावत 230 धावा पूर्ण केल्या. श्रीलंका संघाकडून पथूम निसंका याने 75 चेंडू मध्ये 56 धावा केल्या त्यामध्ये 9 चौकार लगावले आणि दुनिथ वेलालागे याने नाबाद खेळी करत 65 चेंडू मध्ये 67 धावा केल्या. त्यामध्ये 2 चौकार आणि 7 षटकार लगावले.

(Ind Vs Sl Highlights) दुनिथ वेलालागे यानी संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या पर्यंत नेऊन पोहोचविले. भारताकडून गोलंदाजी मध्ये अर्षदीप सिंग आणि अक्षर पटेल याना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या तर सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव, सुंदर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. 

भारतीय संघाची फलंदाजी (Ind Vs Sl Highlights)

भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी मैदानात आली. श्रीलंके संघाकडून मिळालेले 231 धावांचे आव्हान हे भारतीय संघासाठी फारसे अवघड नव्हते. भारतीय संघ मजबूत संघ होता आणि भारतीय संघामध्ये सर्व फलंदाज हे अव्वल दर्जाचे होते. त्यामुळे भारतीय संघ सहजपणे जिंकेल असे वाटत होते. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली या दोघांनी आक्रमकपणे खेळी करत भारतीय संघाला 50 धावांचा पल्ला गाठून दिला. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानी आक्रमकपणे खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले.

संघाचे धावफलक 75 असताना भारतीय संघाची पहिली विकेट पडली. शुभमन गिल हा 16 धावांवर बाद झाला. त्याला दुनिथ वेलेलागे यानी कुशल मेंडीस च्या हाती झेल देत बाद केले. (Ind Vs Sl Highlights) शुभमन गिल यानी 35 चेंडू मध्ये 16 धावा केल्या. त्यामध्ये 2 चौकार लगावले होते शुभमन गिल आणि रोहित शर्मा या जोडीमध्ये 75 धावांची भागीदारी झाली होती. 13 व्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. भारतीय संघाची स्थिती 75 धावा एक गडी बाद अशी झाली होती. (Ind Vs Sl Highlights) शुभमन गिल बाद झाल्यानंतर रोहित शर्माच्या साथीला फलंदाजीसाठी विराट कोहली हा मैदानात आला परंतु ही जोडी जास्त वेळ मैदानात टिकली नाही. संघाच्या धावफलकामध्ये 5 धावांची भर पडली आणि रोहित शर्मा बाद झाला.

पंधराव्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. त्याला दुनिथ वेलेलागे यानी पायचीत बाद केले. रोहित शर्मा यानी 47 चेंडू मध्ये 58 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 3 षटकार आणि 7 चौकार लगावले होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांमध्ये 5 धावांची भागीदारी झाली होती. (Ind Vs Sl Highlights) आता फलंदाजीसाठी वाशिंग्टन सुंदर हा मैदानात आला. परंतु तो देखील जास्त वेळ मैदानात टिकला नाही. संघाच्या धावफलकामध्ये 7 धावांची भर पडली आणि वाशिंग्टन सुंदर देखील बाद झाला वॉशिंग्टन सुंदर याला धनंजया  यानी पायचीत बाद केले.

वॉशिंग्टन सुंदरने 4 चेंडूमध्ये 5 धावा केल्या होत्या. त्यामध्ये एक चौकार लगावला होता विराट कोहली आणि वाशिंग्टन सुंदर या जोडीमध्ये 7 धावांची भागीदारी झाली होती. सोळाव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर तो बाद झाला आता भारतीय संघाची स्थिती 87 धावा 3 गडी बाद अशी झाली होती.तो बाद झाल्यानंतर विराट कोहलीच्या साथीला फलंदाजीसाठी श्रेयस अय्यर हा मैदानात आला. या जोडीने सावकाशपणे खेळत भारतीय संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला. या दोघांमध्ये 43 धावांची भागीदारी झाली होती आणि संघाचे धावफलक 130 असताना विराट कोहली बाद झाला.

24 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहली याला हसरंगा याने पायचीत बाद केले. आता भारतीय संघाची स्थिती 131 धावा 4 गाडी बाद अशी झाली होती. (Ind Vs Sl Highlights) विराट कोहली यानी 32 चेंडूंचा सामना करताना 24 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 2 चौकार लगावले होते विराट कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर च्या साथीला फलंदाजीसाठी भारतीय संघाचा एसटी रक्षक के.एल.राहुल हा मैदानात आला. परंतु ही जोडी ही लगेच बाद झाली. संघाचे धावफलक 132 असताना श्रेयस अय्यर बाद झाला त्याला आविष्का फ्रनार्डो याने बोल्ड आउट केले.

श्रेयश यानी 23 चेंडूमध्ये 23 धावा केल्या. त्यामध्ये 4 चौकार लगावले होते तो बाद झाल्यानंतर येईल राहुलच्या साथीला फलंदाजीसाठी अक्षर पटेल हा आला. या जोडीने आता सावकाशपणे खेळत भारतीय संघाचे धावफलक पुढे नेले. या जोडीने भारतीय संघाला 150 धावांचा पल्ला गाठून दिला. (Ind Vs Sl Highlights) संघाचे धावफलक 189 असताना के.एल.राहुल बाद झाला. त्याला हसरंगा याने दुनिथ वेलालागे च्या हाती झेल देत बाद केले. के.एल.राहुल यानी 43 चेंडू मध्ये 31 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 2 चौकार लगावले होते. के.एल.राहुल बाद झाल्यानंतर अक्षर पटेल च्या साथीला फलंदाजीसाठी भारतीय संघाचा युवा फलंदाज शिवम दुबे हा मैदानात आला. परंतु ही जोडी देखील जास्त वेळ मैदानात टिकली नाही.

संघाचे धावफलक 197 असताना अक्षर पटेल देखील बाद झाला. त्याला असलंका याने कुशलच्या हाती झेल देत बाद केले. अक्षर पटेल यानी 24 चेंडू मध्ये 25 धावा केल्या. (Ind Vs Sl Highlights) त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार लगावला होता. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर शिवम दुबे च्या साथीला फलंदाजीसाठी कुलदीप यादव हा आला. आता भारतीय संघाची स्थिती 197 धावा 7 गाडी बाद अशी झाली होती. अजूनही भारतीय संघाला जिंकण्यासाठी 34 धावांची गरज होती. शिवम दुबे याने आक्रमकपणे खेळी करत भारतीय संघाला विजया जवळ नेले. संघाचे धावफलक 211 असताना कुलदीप यादव बाद झाला. त्याला हसरंगा याने बोल्ड आऊट केले. कुलदीप यादव यानी 10 चेंडू मध्ये 2 धावा केल्या होत्या आता भारतीय संघाची स्थिती 211 धावा 8 गडी बाद अशी झाली होती.

कुलदीप यादव बाद झाल्यानंतर शिवम दुबे च्या साथीला फलंदाजीसाठी मोहम्मद सीराज हा आला या जोडीने सावकाशपणे खेळी करत भारतीय संघाला विजयाच्या जवळ नेले. मोहम्मद सिराज यानी शिवम याला चांगली साथ दिली. 48 व्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर शिवम दुबे यानी चौकार लगावला आणि भारतीय संघ हा 230 धावसंख्येपर्यंत पोहोचला. आता भारतीय संघाला जिंकण्यासाठी एक धावांची गरज होती. गोलंदाजी करण्यासाठी श्रीलंका संघाचा कप्तान असलंका होता आता पुढच्या चेंडूवर असलंका यानी शिवम दुबे याला पायचीत बाद केले.

भारतीय संघाची नववी विकेट पडली. शिवम दुबे यानी 24 चेंडू मध्ये 25 धावा केल्या होत्या. त्यामध्ये एक चौकार आणि 2 षटकार लगावले होते. आता भारतीय संघाला जिंकण्यासाठी एक धावांची गरज होती आणि फलंदाजीसाठी अर्षदीप सिंग हा मैदानात आला एका बाजूने मोहम्मद सीराज होता. तर स्ट्राइक वर अर्षदीप सिंग हा आला. भारतीय संघाला जिंकण्यासाठी फक्त 1 धावांची गरज होती. परंतु पुढच्या चेंडू वर अर्षदीप सिंग बाद झाला. त्याला असलंका याने पायचीत बाद केले. त्यानंतर अर्षदीप सिंग यानी रिव्ह्यू घेतला परंतु रेव्ह्यू मध्ये देखील अर्षदीप सिंग बादच राहिला आणि भारतीय संघ 230 धावांवर सर्व गाडी बाद झाला.

हा सामना बरोबरीत सुटला अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आलेला असताना भारतीय संघ हा एक धावा मुळे विजयापासून वंचित राहिला. (Ind Vs Sl Highlights) भारतीय संघाकडून रोहित शर्मा यानी एकट्याने अर्धशतक केले बाकी कोणताही खेळाडू अर्धशतक करू शकला नाही. त्यानंतर शिवम दुबे यानी संघाला योग्य वेळी चांगली मदत करत 25 धावा केल्या. श्रीलंका संघाकडून गोलंदाजी मध्ये आविष्का फ्रनार्डो याने एक विकेट घेतली दनंजाया यानी एक विकेट घेतली. तर दुनिथ वेलालागे याने 2 विकेट घेतल्या, हसरंगा आणि असलंका या दोघांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या. 

हे देखील वाचा : Mini Cooper : मार्केटमध्ये हि कार घालणार धुमाकूळ, फक्त 7 सेकंदात घेते एवढा स्पीड

सामन्याचा मानकरी (Ind Vs Sl Highlights)

 श्रीलंके संघाचा युवा खेळाडू दुनिथ वेलालागे हा या सामन्याचा मानकरी ठरला. त्याने फलंदाजी मध्ये देखील नाबाद खेळी करत श्रीलंका संघाला कठीण परिस्थितीमधून चांगल्या धावसंख्येपर्यंत नेऊन पोहोचविले. (Ind Vs Sl Highlights) दुनिथ वेलालागे याने फलंदाजी करताना 65 चेंडू मध्ये 67 धावा केल्या. त्यामध्ये 7 चौकार आणि 2 षटकार लगावले त्याने नाबाद खेळी केली. त्याचबरोबर गोलंदाजी मध्ये देखील त्यानी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. गोलंदाजी मध्ये त्याने भारतीय संघाचे सलामीची जोडी बाद केली. त्याने गोलंदाजी मध्ये 9 ओवर मध्ये 39 धावा देत 2 गडी बाद केले.

हे देखील वाचा : Maruti Suzuki Grand Vitara : हि आहे सर्वात जास्त मायलेज देणारी हायब्रीड कार, कींमत किती असणार?

Spread the love