IND VS ZIM : झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव, भारतीय युवा खेळाडूंकडून निराशा जनक कामगिरी

IND VS ZIM : झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव, भारतीय युवा खेळाडूंकडून निराशा जनक कामगिरी

IND VS ZIM
IND VS ZIM

IND VS ZIM : T-20 World Cup नंतर भारत पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर गेला होता. शुभमन गीलच्या कप्तानी खाली भारतीय संघ हा झिम्बाब्वे दौऱ्यावर 5 T-20 सामने खेळायला गेला असून भारतीय संघाचा पहिल्याच टी ट्वेंटी सामन्यात दारून पराभव झाला आहे. झिंबाब्वे संघाकडून मिळालेले 116 धावांची आव्हान देखील भारताला पूर्ण करता आले नाही. (IND VS ZIM)T-20 World Cup जिंकून 7 दिवस झाल्यानंतर भारताचा पराभव झाला आहे. टीम इंडियाचे अजून देशभरात जल्लोष चालू असतानाच युवा भारतीय संघाकडून निराशा जनक कामगिरीमुळे भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. कारण या संघामध्ये भारतीय संघाचे युवा खेळाडू सहभागी होते व हे सर्व खेळाडूनी आयपीएल सामन्यांमध्ये चांगली खेळी केलेली होती या संघात दिग्गज युवा फलंदाज हे असताना देखील भारतीय संघ हा सामना पराभूत झाला आहे. (IND VS ZIM) आयपीएल सामन्यांमध्ये एकहाती विजय मिळवून देणारे दिग्गज खेळाडू या टीम मध्ये शामील होते. हा सामना झिम्बाब्वे च्या हरारे स्पोर्ट क्लब मैदानावर खेळविण्यात आला होता. या सामन्यात झिंबाब्वेने भारताला पराभूत करून t20 विश्वचषक विजयाच्या जल्लोषाला ब्रेक लावला आहे.

जगभरात भारतीय संघाचे नाव गाजत असतानाच युवा भारतीय संघ हा पराभूत झाला आहे. (IND VS ZIM) हरारे स्पोर्ट क्लब मैदानावर झालेल्या या पहिल्या t20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे ने भारतीय संघाला जिंकण्यासाठी 116 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पार करताना भारतीय संघाने 19.5 षटकांमध्ये सर्व गडी गमावत 102 धावा करू शकला आणि भारतीय संघ हा सामना 13 धावांनी पराभूत झाला. T-20 World Cup साठी पात्र न ठरलेल्या संघा सोबत भारतीय संघाचा सामना असताना देखील भारतीय संघ हा सामना पराभूत झाला आहे.

या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणारा झिम्बाब्वे संघाच्या कर्णधार सिकंदर राजा हा या सामन्याचा मानकरी ठरला. भारतीय संघ हा शुभमन गीलच्या नेतृत्वाखाली झिंबाब्वे दौऱ्यावर 5 t20 सामने खेळण्यासाठी गेला आहे. भारतीय संघामध्ये सर्व युवा खेळाडू असून या सर्व खेळाडूंनी IPL मध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. (IND VS ZIM) परंतु झिम्बाब्वे दौऱ्यावर या खेळाडूंनी निराशा जनक कामगिरी करत चाहत्यांना निराश केले आहे. भारतीय संघाकडून शुभमन गील आणि सुंदर या दोघांव्यतिरिक्त कोणीही चांगले खेळी करू शकला नाही. 

भारतीय संघ

अभिषेक शर्मा, शुभमन गील, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, वाशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद 

झिम्बाब्वे संघ

मधेवरे, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर राजा, डियोन मायर, जोनाथन कॅम्पबेल, क्लिवे मदांदे, मसकादझा, जोंगवे, मुजार्बानी, चतारा 

भारत आणि झिम्बाब्वे या 2 संघादरम्यान 5 t20 सामन्यांचा दौरा असून या दोन्ही संघातील पहिला सामना हा हरारे स्पोर्ट क्लब मैदानावर खेळविण्यात आला होता. (IND VS ZIM) या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. 

झिंबाब्वे संघाची फलंदाजी 

प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मिळाल्यानंतर झिम्बाब्वे संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी मधेवरे आणि इनोसंट कैया ही जोडी मैदानात उतरली होती. ही जोडी संघाला चांगली सुरुवात करू देऊ शकली नाही आणि संघाचे धावफलक 6 असतानाच झिंबाब्वे संघाची पहिली विकेट पडली. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर इनोसंट कैया हा बाद झाला. (IND VS ZIM) इनोसंट कैया याला मुकेश कुमार यानी बोल्ड आउट केले. इनोसंट कैया हा आपले खाते ही उघडू शकला नाही आणि शून्य धावांवर बाद झाला. मधेवरे आणि इनोसंट कैया या 2 फलंदाजांमध्ये 7 चेंडू मध्ये 6 धावांची भागीदारी झाली होती. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 6 धावा 1 गडी बाद अशी झाली होती.

हे देखील वाचा : IND VS ZIM 2nd T20 Highlights : पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेत भारतीय संघाने झिम्बाब्वेचा केला दारुण पराभव

कीया बाद झाल्यानंतर मधेवरेच्या साथीला ब्रायन बेनेट हा फलंदाजीसाठी आला. या दोघांनी सावकाशपणे खेळत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला या जोडीने संयमाने खेळी करत संघाला 40 धावांपर्यंत नेऊन पोहोचविले. ही जोडी चांगली खेळी करत असतानाच झिंबाब्वे संघाची दुसरी विकेट पडली. 6 व्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर ब्रायन बेनेट हा बाद झाला. (IND VS ZIM) ब्रायन बेनेट याला रवी बिश्नोई याने बोल्ड केले. मधेवरे आणि ब्रायन बेनेट या जोडीमध्ये 24 चेंडू मध्ये 34 धावांची भागीदारी झाली होती. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 40 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. ब्रायन बेनेट यानी 15 चेंडू मध्ये 22 धावा केल्या त्यामध्ये 5 चौकार लगावले होते.

ब्रायन बेनेट बाद झाल्यानंतर मदकच्या साथीला झिम्बाब्वे संघाचा कप्तान सिकंदर राजा हा फलंदाजीसाठी झाला या दोघांनी सावधपणे खेळी करत संघाला 50 धावांचा पल्ला गाठून दिला. परंतु ही जोडी जास्त वेळ मैदानात टिकली नाही संघाचे धावफलक 51 असताना झिम्बाब्वे संघाची तिसरी विकेट पडली. 8 व्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर मधेवरे हा बाद झाला मधेवरे याला रवी बिश्नोई यानी बोल्ड आउट केले. (IND VS ZIM) मधेवरे याने 22 चेंडू मध्ये 21 धावा करत 3 चौकार लगावले होते. मधेवरे आणि सिकंदर राजा या दोघांमध्ये 16 चेंडूमध्ये 11 धावांची भागीदारी झाली होती. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 51 धावा 3 गडी बाद अशी झाली होती.

मधेवरे बाद झाल्यानंतर सिकंदर राजाच्या साथीला फलंदाजीसाठी मायर हा आला या जोडीने देखील चांगली खेळी करत संघाला चांगले योगदान दिले. या जोडीने 11 ओव्हर मध्ये 70 धावांचा पल्ला गाठून दिला. संघाचे धावफलक 74 असताना झिम्बाब्वे संघाची चौथी विकेट पडली. (IND VS ZIM) 12 व्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर झिंबाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर राजा हा बाद झाला. सिकंदर राजा याने 19 चेंडू मध्ये 17 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. सिकंदर राजा याला आवेश खान यानी रवी बिश्नोईच्या हाती झेल देत बाद केले. सिकंदर राजा हा महत्वपूर्ण कामगिरी करून बाद झाला. चेंडू सीमारेखे पार पाठविण्याचा प्रयत्नात सिकंदर राजा याचा झेल रवी बिश्नोई याच्या हातात गेला.

सिकंदर राजा आणि मायर या दोघांमध्ये 24 चेंडू मध्ये 23 धावांची भागीदारी झाली होती. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 74 धावा 4 गडी बाद अशी झाली होती. झिंबाब्वे संघाचा कर्णधार बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी जोनाथन कॅम्पबेल हा आला. परंतु जोनाथन कॅम्पबेल पहिल्या चेंडूवर धावबाद झाला त्याला आपले खाते खोलता आले नाही. आवेश खान च्या गोलंदाजीवर वाशिंग्टन सुंदर याने जोनाथन कॅम्पबेलियाला धावबाद केले. (IND VS ZIM) आणि 74 धावांवर झिम्बाब्वे संघाची 5 वी विकेट पडली. (IND VS ZIM) जोनाथन कॅम्पबेल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मायरच्या साथीला क्लिवे मदांदे हा आला. या जोडीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सावकाशपणे खेळत संघाला थोडीफार धावांची भर करून दिली. संघाचे धाव फलक 89 असताना मायर हा बाद झाला.

15 व्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर मायरला वाशिंग्टन सुंदर यानी बाद केले. मायर याने महत्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी दिले होते. मायर यानी 22 चेंडू मध्ये 23 धावा करत 2 चौकार लगावले होते. मायर आणि क्लिवे मदांदे या दोघांमध्ये 14 चेंडू मध्ये 15 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली होती. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 89 धावा 6 गडी बाद अशी झाली होती. मायर बाद झाल्यानंतर क्लिवे मदांदे च्या साथीला फलंदाजीसाठी मसकादझा हा आला. परंतु तो एकही धाव न करता बाद झाला. वाशिंग्टन सुंदर यानी आपल्या दुसऱ्या चेंडूवर त्याला बाद केले. मसकादझा याला वाशिंग्टन सुंदर याने ध्रुव जुरेलच्या हातून एसटीचीत बाद केले. मसकादझा 1 चेंडू खेळून बाद झाला आणि झिंबाब्वे संघाची स्थिती आता 89 धावा 7 गाडी बाद अशी नाजूक स्थिती झाली.

मसकादझा बाद झाल्यानंतर क्लिवे मदांदेच्या साथीला फलंदाजीसाठी जोगवे हा आला. परंतु तोही संघासाठी जास्त योगदान देऊ शकला नाही. 16 व्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर जोंगवे देखील बाद झाला. जोगवे याला रवी बिश्नोई याने पायचीत  बाद केले. (IND VS ZIM) जोंगवे यानी 3 चेंडूंचा सामना करताना 1 धाव केली होती. क्लिवे मदांदे आणि जोंगवे या दोघांमध्ये 4 चेंडू मध्ये 1 धावांची भागीदारी झाली होती. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 90 धावा 8 गाडी बाद अशी झाली होती. जोंगवे बाद झाल्यानंतर क्लिवे मदांदेच्या साथीला मुजार्बानी हा फलंदाजीसाठी आला. परंतु रवी बिश्नोई च्या त्याच ओव्हर मध्ये मुजार्बानी देखील बाद झाला.

16 व्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर मुजार्बानी याला रवी बिश्नोई यानी बोल्ड आऊट केले. मुजार्बानी यानी 2 चेंडू मध्ये शून्य धावा केल्या होत्या. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 90 धावा नऊ गडी बाद अशी झाली होती. झिम्बाब्वे संघ हा 100 धावा हि करतो की नाही असे झाले होते. (IND VS ZIM) आता झिम्बाब्वे संघाची एकच विकेट हातात होती. झिम्बाब्वे संघाकडून अखेरचा फलंदाज  चातारा हा क्लिवे मदांदेच्या साथीला आला. चतरा यानी क्लिवे मदांदे ला चांगली साथ दिली या जोडीने सावकाशपणे खेळत संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला. या जोडीने संयमाने खेळी करत संघाला 115 धावांचा पल्ला गाठून दिला. या जोडीने नाबाद खेळी करून संघाला मोठे योगदान दिले. क्लिवे मदांदे आणि चतारा या दोघांमध्ये 27 चेंडू मध्ये 25 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली.

(IND VS ZIM) चतरा यानी नऊ चेंडूमध्ये शून्य धावा केल्या तर क्लिवे मदांदे याने 25 चेंडूंचा सामना करताना 29 धावा केल्या. त्यामध्ये 4 चौकार लगावले होते. झिम्बाब्वे संघाच्या अखेरच्या जोडीन चांगली खेळी करत संघाला सन्मान जनक स्कोर उभारून दिला. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वे संघाचा एक ही फलंदाज जास्त वेळ मैदानात खेळू दिला नाही. आणि थोड्या अंतराने झिंबाब्वे संघाला एकामागोमाग 1 झटका देत राहिले. भारतीय संघाकडून गोलंदाजी मध्ये रवी बिश्नोई याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली.

रवी बिश्नोई याने 4 ओव्हर मध्ये 13 धावा देत झिंबाब्वे संघाचे 4 गडी बाद केले. वॉशिंग्टन सुंदर याने 4 ओव्हर मध्ये 11 धावा देत 2 गडी बाद केले आवेश खान याने 4 ओव्हर मध्ये 29 धावा देत एक गडी बाद केला. मुकेश कुमार यानी 3 ओव्हर मध्ये 16 धावा देत 1 गडी बाद केला. भारतीय संघाकडून सर्व गोलंदाजांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. झिम्बाब्वे संघाने 20 ओव्हर मध्ये 9 गडी गमावत 115 धावांचा पल्ला गाठला आणि भारतीय संघाला 20 ओव्हर मध्ये 116 धावांचे आव्हान दिले.

भारतीय संघाची फलंदाजी 

झिम्बाब्वे संघाकडून 116 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी अभिषेक शर्मा आणि भारतीय संघाचा कप्तान शुभमन गिल ही जोडी मैदानात आली. या दोघांनीही आयपीएलमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. अभिषेक शर्मा यानी आयपीएल मध्ये धुमाकूळ घातला होता. अभिषेक शर्मा आणि शुभमन गील हे दोन्ही आयपीएल मधील ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये अग्रेसर होते. ही जोडी भारतीय संघासाठी खूप चांगली कामगिरी करेल असे वाटत होते.

परंतु ही जोडी फेल ठरली पहिल्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर अभिषेक शर्मा बाद झाला. अभिषेक शर्मा याला आपले खातेही खोलता आले नाही. शून्य धावांवर भारताची पहिली विकेट पडली. अभिषेक शर्मा याला ब्रायन बेनेट याने मसकादझा च्या हाती झेल देत बाद केले. (IND VS ZIM) आता भारतीय संघाची स्थिती शून्य धावा 1 गडी बाद अशी झाली होती. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गील च्या साथीला भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड हा फलंदाजीसाठी आला.

1 गडी बाद झाल्यानंतर आता भारतीय संघ चागली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. परंतु ही जोडी अपयशी ठरली. संघाचे धावफलक 15 धावांवर पोहोचले आणि भारतीय संघाची दुसरी विकेट पडली. चौथ्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड बाद झाला. ऋतुराज गायकवाड याला मुजराबाणी यानी कैया च्या हाती झेल देत बाद केले. ऋतुराज गायकवाड यानी 9 चेंडू मध्ये 7 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार लगावला होता ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गील या दोघांमध्ये 17 चेंडू मध्ये 15 धावांची भागीदारी झाली होती. आता भारतीय संघाची स्थिती 15 धावा 2 गडी बाद अशी झाली होती.

ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माच्या साथीला रियान पराग हा फलंदाजीसाठी मैदानात आला. रियान पराग यानी नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल मध्ये अप्रतिम अशी कामगिरी केली होती. रियान पराग हा एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. एका बाजूने संघाचा कप्तान शुभमन गील सावधपणे खेळी करत होता. परंतु दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळत नव्हती. संघाच्या धावफलकामध्ये 7 धावांची भर पडल्यानंतर भारतीय संघाची तिसरी विकेट पडली. रियान पराग याला चतारा याने ब्रँडन च्या हाती झेल देत बाद केले. रियांन पराग याने 3 चेंडू मध्ये 2 धावा केल्या होत्या. शुभमन गिल आणि रियान पराग या दोघांमध्ये 7 चेंडू मध्ये 7 धावांची भागीदारी झाली होती. आता भारतीय संघाची स्थिती 22 धावा 3 गडी बाद अशी झाली होती.

आता शुभमन गील च्या साथीला मैदानात फलंदाजीसाठी रिंकू सिंग हा आक्रमक फलंदाज आला. आयपीएल मध्ये धुमाकूळ घालणारा रिंकू सिंग या सामन्यात मोठी कामगिरी बजावेल अशी अपेक्षा होती. परंतु त्याला आपले खातेही खोलता आले नाही तो शून्य धावांवर बाद झाला. रियान पराग बाद झाल्यानंतर त्याच ओव्हर मध्ये रिंकू सिंग देखील बाद झाला. 22 धावांवर भारतीय संघाची चौथी विकेट पडली 5 व्या ओवरच्या 6 व्या चेंडूवर रिंकू सिंग याला चतारा याने ब्रायन बेनेटच्या हाती झेल देत बाद केले. (IND VS ZIM) रिंकू सिंग यानी 2 चेंडूमध्ये शून्य धावा केल्या होत्या. रिंकू सिंग आणि शुभमन गील या दोघांमध्ये 2 चेंडूमध्ये शून्य धावांची भागीदारी झाली होती. आता भारतीय संघाची स्थिती 22 धावा 4 गडी बाद अशी नाजूक स्थिती झाली होती.

रिंकू सिंग बाद झाल्यानंतर शुभमन गील च्या साथीला ध्रुव जुरेल फलंदाजीसाठी मैदानात आला. ध्रुव जुरेल आणि शुभमन गील या दोघांनी संथपणे खेळत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आणि धावफलकामध्ये थोड्या धावांची भर पाडली. 116 धावांचे आव्हान हे जर विकेट न गमावता सावकाशपणे खेळले तरी पार होऊ शकत होते. या जोडीने सावकाशपणे खेळत भारतीय संघाला 43 धावांपर्यंत नेऊन पोहोचविले आणि भारतीय संघाची 5 वी विकेट पडली 10 व्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर ध्रुव जुरेल हा बाद झाला. (IND VS ZIM) जोगवे याने मधेवरे च्या हाती झेल देत बाद केले. ध्रुव जुरेल याने 14 चेंडू मध्ये 6 धावा केल्या होत्या.

त्यामध्ये 1 चौकार लगावला होता ध्रुव जुरेल याने देखील आयपीएलमध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. परंतु तो या t20 सामन्यांमध्ये अपयशी ठरला. आता भारतीय संघाची स्थिती 43 धावा 5 गडी बाद नाजूक स्थिती झाली होती. ध्रुव जुरेल आणि शुभमन गील या दोघांमध्ये 3 चेंडू मध्ये 4 धावांची भागीदारी झाली होती. 43 धावांवर अर्धा भारतीय संघ हा बाद झाला होता. (IND VS ZIM) आता भारतीय संघ हा 100 धावा ही गाठतो की नाही अशी स्थिती झाली होती. ध्रुव जुरेल बाद झाल्यानंतर शुभमन गील च्या साथीला वाशिंग्टन सुंदर हा अष्टपैलू खेळाडू मैदानात आला. आतापर्यंत शुभम गिल ला कोणताही फलंदाज चांगली साथ देऊ शकला नव्हता.

आता त्याच्या साथीला वाशिंग्टन सुंदर हा फलंदाजीसाठी आला होता. या दोघांनी सावकाशपणे खेळण्यास सुरुवात केली होती परंतु संघाच्या धावफलकामध्ये 4 धावांची भर पडली आणि भारतीय संघाचा कप्तान शुभमन गील देखील बाद झाला. (IND VS ZIM) 11 व्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर शुभमन गील बाद झाला. शुभमन गील याला सिकंदर राजा यानी बोल्ड आउट केले. शुभमन गील याने 29 चेंडू मध्ये 31 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 5 चौकार लगावले होते शुभमन गील आणि वाशिंग्टन सुंदर या दोघांमध्ये 3 चेंडूंमध्ये 4 धावांची भागीदारी झाली होती. भारतीय संघाची आता नाजूक स्थिती झाली होती.

47 धावांवर भारतीय संघाचे 6 गडी बाद झाले होते. आता भारतीय संघ हा पराभूत होईल परंतु मोठ्या फरकाने पराभूत होईल असे वाटत होते भारतीय संघाची अगदी लाजिरवाणी स्थिती झाली होती.झिम्बाब्वे संघ हा टी ट्वेंटी विश्वचषकासाठी पात्र ठरला नव्हता. (IND VS ZIM) अशा संघासोबत भारतीय संघाची दयनिय स्थिती झाली होती. शुभमन गील बाद झाल्या वाशिंग्टन सुंदर च्या साथीला फलंदाजीसाठी रवी बिश्नोई हा मैदानात आला. आता भारतीय संघाचा एकच चांगला फलंदाज मैदानात होता. आता भारतीय संघाची पूर्ण जबाबदारी ही वाशिंग्टन सुंदर वर आली होती. वाशिंग्टन सुंदर यानी सावकाशपणे खेळत धावफलकाला हलते ठेवीले.

या जोडीने संघाला 61 धावांपर्यंत नेऊन पोहोचविले. 13 व्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर रवी बिश्नोई देखील बाद झाला. संघाचे धावफलक 61 असताना भारतीय संघाची 7 वी विकेट पडली (IND VS ZIM) . रवी बिश्नोई याला सिकंदर राजा यानी पायचीत बाद केले.रवी बिश्नोई याने  8 चेंडूमध्ये 9 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 2 चौकार लगावले होते. रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांमध्ये 15 चेंडू मध्ये 14 धावांची भागीदारी झाली होती. आता भारतीय संघाची स्थिती 61 धावा 7 गडी बाद अशी झाली होती. अजूनही भारतीय संघाला जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता होती परंतु आता भारतीय संघाच्या हातात फक्त 3 गडी शिल्लक होते. भारतीय संघाची एकापाठोपाठ एक विकेट पडतच राहिली.

रवी बिश्नोई विष्णू बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आवेश खान हा आला आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी संघाला पुढे नेले. या दोघांनी चांगली खेळी करत भारतीय संघाला 84 धावांपर्यंत नेऊन पोहोचविले.84 धावसंख्या धावफलकावर असताना आवेश खान बाद झाला. (IND VS ZIM) 16 व्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर आवेश खान बाद झाला. त्याला मसकादझा याने सिकंदर राजाच्या हाती झेल देत बाद केले. आवेश खान यानी 12 चेंडू मध्ये 16 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 3 चौकार लगावले होते आता भारतीय संघाला जिंकण्यासाठी 25 चेंडू मध्ये 32 धावांची गरज होती. आणि 2 गडी हातात होते वॉशिंग्टन सुंदर हा टिकून खेळत होता.

हे देखील वाचा : T-20 World Cup Winner List : आत्तापर्यंतच्या सर्व T-20 विश्वचषक विजेत्यांची यादी

आवेश खान बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मुकेश कुमार हा मैदानात आला. एकाबाजूने वॉशिंग्टन सुंदर हा चांगला खेळत होता. त्याला दुसऱ्या बाजूने चांगली साथ हवी होती. (IND VS ZIM) परंतु मुकेश कुमार हा 0 धावांवर बाद झाला.संघाचे धावफलक 80 असताना भारतीय संघाची नववी विकेट पडली. 17 व्या ओवरच्या 6 व्या चेंडूवर मुकेश कुमार बाद झाला.

मुकेश कुमार याला सिकंदर राजा यानी बोल्ड केले. मुकेश कुमार आणि वाशिंग्टन सुंदर या दोघांमध्ये 7 चेंडू मध्ये 2 धावांची भागीदारी झाली होती. (IND VS ZIM) आता भारतीय संघाची स्थिती 86 धावा 9 गडी बाद अशी  झाली होती. आता भारतीय संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू ते 30 धावांची गरज होती. मुकेश कुमार बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर च्या साथीला अखेरचा फलंदाज खलील अहमद हा आला.

खलील अहमद याने वॉशिंग्टन सुंदर याला चांगली साथ दिली. या जोडीने संयमाने खेळणी करत भारतीय संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिलं परंतु जिंकण्यासाठी असणाऱ्या धावांची गरज आणि चेंडू यामधील फरक वाढत चालला होता. (IND VS ZIM) शेवटच्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदर बाद झाला आणि भारतीय संघ 102 धावांवर आटोपला. वॉशिंग्टन सुंदर याला चतारा याने मुजार्बानीच्या हाती झेल देत बाद केले. वॉशिंग्टन सुंदर यानी 34 चेंडूमध्ये 27 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावला होता.

वॉशिंग्टन सुंदर आणि खलील अहमद या दोघांमध्ये 17 चेंडू मध्ये 16 धावांची भागीदारी झाली होती. भारतीय संघ हा 19.5 ओव्हर मध्ये 102 धावा करू शकला आणि भारतीय संघाचा 13 धावांनी पराभव झाला. झिम्बाब्वे संघाकडून गोलंदाजी मध्ये चतारा याला 3 विकेट मिळाल्या सिकंदर राजा याला देखील 3 विकेट मिळाल्या तर ब्रायन बेनेट, मसकादझा, मुझाराबानी, जोन्गवे यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. 

हे देखील वाचा : Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update : माझी लाडकी बहीण योजने मध्ये झाले मोठे बदल, जाणून घ्या

सामन्याचा मानकरी (IND VS ZIM)

झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर राजा हा या सामन्याचा मानकरी ठरला. सिकंदर राजा यानी अष्टपैलू खेळी करत संघाच्या विजयामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला होता. (IND VS ZIM) सिकंदर राजा यानी 19 चेंडू मध्ये 17 धावा करत 1 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. तसेच गोलंदाजी मध्ये देखील त्यानी उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती. सिकंदर राजा यानी गोलंदाजी मध्ये 4 ओव्हर मध्ये 25 धावा देत भारतीय संघाचे 3 गडी बाद केले होते.

या सामन्यात प्रथम फलंदाजी कोणत्या संघाने केली?

या सामन्यात प्रथम फलंदाजी झिम्बाब्वे संघाने केली.

या सामन्यात नाणेफेक कोणत्या संघाने जिंकले?

या सामन्यात नाणेफेक भारतीय संघाने जिंकले होते.

या सामन्यात भारतीय संघाने किती धावसंख्या केली?

या सामन्यात भारतीय संघाने 102 धावसंख्या केली.

या सामन्यात भारतीय संघाचा किती धावांनी पराभव झाला?

या सामन्यात भारतीय संघाचा 13 धावांनी पराभव झाला.

या सामन्याचा मानकरी कोणता खेळाडू ठरला?

या सामन्याचा मानकरी झिम्बाब्वे संघाचा कप्तान सिकंदर राजा हा ठरला.

या सामन्यात झिम्बाब्वे संघाने किती धावसंख्या उभारली होती?

या सामन्यात झिम्बाब्वे संघाने 115 धावसंख्या उभारली होती.

या सामन्यात भारतीय संघाचा कप्तान कोणता खेळाडू होता?

या सामन्यात भारतीय संघाचा कप्तान शुभमन गिल हा होता.

या सामन्यात भारतीय संघाच्या किती विकेट पडल्या होत्या?

या सामन्यात भारतीय संघाच्या सर्व विकेट पडल्या होत्या.

हा सामना कोणत्या संघाने जिंकला?

हा सामना झिम्बाब्वे संघाने जिंकला.

या संघांमधील दुसरा सामना केव्हा खेळला जाणार आहे?

या संघांमधील दुसरा सामना 7 जुलै 2024 ला हरारे क्लब येथील मैदानावर खेळला जाणार आहे.

Spread the love