IND VS ZIM 2nd T20 Highlights : पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेत भारतीय संघाने झिम्बाब्वेचा केला दारुण पराभव
IND VS ZIM 2nd T20 Highlights : पहिल्या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने पराभवाचा बदला घेत ऐतिहासिक विजय नोंदविला आहे. पहिल्या t20 सामन्यात भारतीय संघाला झिम्बाब्वे संघाकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचा परतफेड करत भारतीय संघाने दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे.
(IND VS ZIM 2nd T20 Highlights) भारतीय संघाने दुसऱ्या T20 सामन्यात इतिहास रचत मोठ्या फरकाने सामना जिंकला आहे. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो अभिषेक शर्मा. अभिषेक शर्माने फक्त 47 चेंडू मध्येच आपले T-20 मधील पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. या t20 सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत ठेवली होती.
भारतीय संघाने 20 ओवर मध्ये 2 गडी गमावत 234 धावा ठोकल्या त्या बदल्यात झिंबाब्वे संघाने या धावसंख्येचा पाठलाग करताना सर्व गडी बाद 134 धावाच करू शकला. या सामन्यात भारतीय संघाने 100 धावांनी विजय मिळविला आहे. या भारतीय संघामध्ये सर्व युवा खेळाडू आहे. मागील सामन्यांमध्ये सर्व खेळाडूंनी निराशा जनक कामगिरी केली होती. त्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला होता. परंतु या सामन्यांमध्ये भारतीय संघाने परत चांगली कामगिरी करत मोठे यश मिळविले आहे. या सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा याने 47 चेंडू मध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याला ऋतुराज गायकवाड कडून चांगली साथ मिळाली.
ऋतुराज गायकवाड ने देखील नाबाद 47 चेंडू मध्ये 77 धावांची खेळी केली. रिंकू सिंग यानी झिंबाब्वे गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने फक्त 22 चेंडूंमध्ये 48 धावा चोपल्या. झिम्बाब्वे संघाला 235 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर त्यांच्या संघातील खेळाडू चांगली कामगिरी करू शकले नाही. (IND VS ZIM 2nd T20 Highlights) झिम्बाब्वे संघाकडून वेसली माधवेरे, ब्रायन बेनेट आणि लूक जोंगवे या तिघांनी चांगली फलंदाजी केली. याव्यतिरिक्त कोणताही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
235 धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या ओवरमध्येच त्यांची पहिली विकेट गेली त्यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या आणि 18.4 मध्ये झिम्बाब्वे संघ सर्व बाद झाला आणि संघाने 134 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघातील गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत झिम्बाब्वे संघाला गुडघे टेकविण्यास भाग पाडले.
भारतीय संघाची फलंदाजी
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी अभिषेक शर्मा आणि शुभमन गील हि जोडी मैदानात उतरली होती. या सामन्यात देखील भारतीय संघाचा कप्तान शुभमन गील हा अपयशी ठरला. (IND VS ZIM 2nd T20 Highlights) दुसऱ्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर शुभमन गील बाद झाला. संघाचे धावफलक 10 असताना भारतीय संघाची पहिली विकेट पडली. भारतीय संघाचा कप्तान शुभमन गील हा 4 चेंडू मध्ये 2 धावा करून बाद झाला. त्याला मुझरबनी यानी ब्रायन बेनेटच्या हाती झेल देत बाद केले. शुभमन गील आणि अभिषेक शर्मा या दोघांमध्ये 8 चेंडू मध्ये 10 धावांची भागीदारी झाली होती.
भारतीय संघाचे 10 धावसंख्येवर 1 विकेट पडली होती. परंतु त्यानंतर ऋतुराज गायकवाड मैदानात आला आणि त्याने अभिषेक शर्माला चांगली साथ देत दोघांनी मिळून झिम्बाब्वे संघाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. अभिषेक शर्माने प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत चौकार षटकार लगावले. या जोडीने झिम्बाब्वे संघाच्या गोलंदाजांना कुठलीही संधी न देता जोरदार खेळी केली. या दोघांनी भारतीय संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला फक्त 10 ओव्हर मध्ये भारतीय संघाने शंभर धावा पार केल्या होत्या. अभिषेक शर्माने 47 चेंडू मध्ये 100 धावा करत आपले शतक पूर्ण केले. त्यामध्ये 8 षटकार आणि 7 चौकार ठोकले होते. पहिल्या सामन्यात शून्य धावांवर बाद होणारा अभिषेक शर्मा यानी बदला घेत दुसऱ्या सामन्यात शतक खोकले.
अभिषेक शर्माचे शतक झाल्यानंतर तो लगेच बाद झाला. संघाचे धावफलक 147 असताना भारतीय संघाची दुसरी विकेट पडली. अभिषेक शर्मा याला विलिंग्टन मसाकादजा यानी डीऑन मायरच्या हाती झेल देत बाद केले. अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड या दोघांमध्ये फक्त 76 चेंडू मध्ये 176 धावांची भागीदारी झाली होती. ऋतुराज गायकवाड यानी देखील आपले अर्धशतक पूर्ण केले होते. (IND VS ZIM 2nd T20 Highlights) ऋतुराज गायकवाड यानी अभिषेक शर्माला चांगली साथ दिली होती. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंग मैदानात आला. झिम्बाब्वे संघाच्या गोलंदाजांना जरी 1 विकेट मिळाली असली तरी आता मैदानात आलेला रिंकू सिंग हा आणखीनच धुलाई करणार होता.
रिंकू सिंग आल्याबरोबर त्याने झिम्बाब्वे गोलंदाजांवर हल्ला चढविला. रिंकू सिंग यानी चौकार षटकार लगावत झिम्बाब्वे संघाच्या गोलंदाजांना सळु कि पळू केले होते. रिंकू सिंग आणि ऋतुराज गायकवाड या जोडीने नाबाद खेळी करत भारतीय संघाला 234 धावा पर्यंत नेऊन पोहोचवीले. भारतीय संघाने 20 ओवर खेळत 234 धावा केल्या. त्या बदल्यात 2 गडी गमावले रिंकू सिंग आणि ऋतुराज गायकवाड या दोघांमध्ये 36 चेंडू मध्ये 87 धावांची भागीदारी झाली होती. झिम्बाब्वे संघाकडून गोलंदाजी मध्ये मुझरबनी आणि विलिंग्टन मसाकादजा या दोघांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
झिम्बाब्वे संघाची फलंदाजी
भारतीय संघाने 20 ओव्हर मध्ये झिम्बाब्वे संघाला जिंकण्यासाठी 235 धावांची आव्हान दिले होते. हे आव्हान खूप मोठे होते. हे आव्हान पार करणे झिम्बाब्वे संघाला सोपे नव्हते. झिम्बाब्वे संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी वेसली माधवेरे आणि इनोसंट काईया ही जोडी मैदानात आली. या जोडीला जास्त वेळ मैदानात न टिकू देतात भारतीय संघाने पहिल्याच ओव्हर मध्ये विकेट मिळविली. (IND VS ZIM 2nd T20 Highlights) पहिल्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर इनोसंट काईया हा बाद झाला. मुकेश कुमार यानी इनोसंट काईया याला बोल्ड आउट केले. इनोसंट काईया याने 3 चेंडू मध्ये 4 धावा केल्या होत्या.
त्यामध्ये 1 चौकार लगावला होता. इनोसंट काईया बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी ब्रायन बेनेट हा आला. ब्रायन बेनेट आणि वेसली माधवेरे या जोडीने संघाला सावरले. ब्रायन बेनेट यानी मैदानात येताच आक्रमक रूप धारण केले होते आणि प्रत्येक चेंडूवर जोरदार टोले लावण्यास सुरुवात केली. ब्रायन बेनेट याने फक्त 9 चेंडूमध्ये 26 धावा ठोकल्या. त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार लगावला होता. आणि संघाचे धावफलक 40 असताना ब्रायन बेनेट हा बाद झाला. ब्रायन बेनेट याला मुकेश कुमार यानी बोल्ड केले. दुसऱ्या ओवरच्या 6 व्या चेंडूवर मुकेश कुमार यानी त्याला बाद केले. ब्रायन बेनेट आणि वेसली माधवेरे या दोघांमध्ये 15 चेंडू मध्ये 36 धावांची भागीदारी झाली होती. आता झिम्बाब्वे संघाचे स्थिती 40 धावा 2 गडी बाद अशी झाली होती.
(IND VS ZIM 2nd T20 Highlights) ब्रायन बेनेट यानी 9 चेंडू मध्ये 26 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार लगावला होता. ब्रायन बेनेट बाद झाल्यानंतर डीऑन मायर हा आला. ब्रायन बेनेट याला आपले खातेही खोलता आले नाही. आवेश खान याने त्याला शून्य धावांवर बोल्ड आउट केले. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 41 धावा 3 गडी बाद अशी झाली होती. डीऑन मायर बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी झिम्बाब्वे संघाचा कप्तान सिकंदर राजा हा फलंदाजीसाठी मैदानात आला. सिकंदर राजा हा देखील वेसली माधवेरेला जास्त वेळ साथ देऊ शकला नाही. सिकंदरने 4 चेंडू मध्ये 4 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार लगावला होता.
आवेश खानच्या त्याच ओव्हर मध्ये सिकंदर राजा देखील बाद झाला चौथ्या ओवरच्या 6 व्या चेंडूवर सिकंदर राजा याला आवेश खान याने ध्रुव जुरेल च्या हाती झेल देत बाद केले. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 46 धावा 4 गडी बाद अशी झाली होती. सिकंदर बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी जोनॅथन कॅम्पबेल हा आला. जोनॅथन कॅम्पबेल आणि वेसली माधवेरे या जोडीने संघाला थोडीफार धावांची भर करून दिली या दोघांनी सावकाशपणे खेळत संघाला 50 धावांचा पल्ला गाठून दिला संघाचे धावफलक 72 असताना झिम्बाब्वे संघाची 5 वी विकेट पडली. जोनॅथन कॅम्पबेल याला वाशिंग्टन सुंदर यानी रवी बिश्नोईच्या हाती झेल देत बाद केले.
जोनॅथन कॅम्पबेल यानी 18 चेंडू मध्ये 10 धावा केल्या होत्या. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 72 धावा 5 गडी बाद अशी नाजूक स्तुती झाली होती.आता या स्थितीतून सावरणे संघाला शक्य नव्हते भारतीय संघाचे गोलंदाज हे उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत होते. जोनॅथन कॅम्पबेल बाद झाल्यानंतर वेसली माधवेरेच्या साथीला क्लीव मदंडे हा फलंदाजीसाठी आला. परंतु ही जोडी जास्त वेळ टिकली नाही. (IND VS ZIM 2nd T20 Highlights) पुढच्या ओव्हर मध्ये क्लीव मदंडे देखील बाद झाला.
संघाच्या धावफलकात 1 धावाची भर पडल्यानंतर झिम्बाब्वे संघाची 6 वी विकेट पडली संघाचे धावफलक 73 असताना क्लीव मदंडे याला रवी बिश्नोई याने पायचीत बाद केले. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 73 धावा 6 गडी बाद अशी झाली होती. एका बाजूने वेसली माधवेरे हा टिकून खेळत होता परंतु त्याला कोणताही फलंदाज साथ देत नव्हता.
क्लीव मदंडे बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी 18 क्रमांकाचा खेळाडू विलिंग्टन मसाकादजा हा मैदानात आला. संघाचे धावफलक 76 असताना झिम्बाब्वे संघाची 7 वी विकेट पडली. 12 वी ओवरच्या पहिल्या चेंडूवर विलिंग्टन मसाकादजा हा बाद झाला संघाचे धावफलक 76 असताना झिम्बाब्वे संघाची 7 वी विकेट पडली ध्रुव जुरेल याने विलिंग्टन मसाकादजा याला धावबाद केले.
विलिंग्टन मसाकादजा यानी 3 चेंडू मध्ये 1 धाव केली होती. आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 76 धावा 7 गडी बाद अशी स्थिती झाली होती. विलिंग्टन मसाकादजा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी लूक जोंगवे हा मैदानात आला. या जोडीने सावकाशपणे खेळत झिम्बाब्वे संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला. एकवेळेस झिम्बाब्वे संघ हा 100 धावा करतो की नाही.
या स्थितीमध्ये होता परंतु या जोडीने चांगली खेळी करत संघाला 100 धावांचा पल्ला गाठून दिला. या जोडीने संघाचे धावफलक 117 धावांपर्यंत नेले आणि झिम्बाब्वे संघाची 8 वी विकेट पडली. सतराव्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर वेसली माधवेरे बाद झाला वेसली माधवेरे यानी एकेरी झुंज देत त्याने 39 चेंडू मध्ये 43 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकार लगावले होते. (IND VS ZIM 2nd T20 Highlights) आता झिम्बाब्वे संघाचा पराभव निश्चित झाला होता.
संघाला जिंकण्यासाठी अजून 152 धावांची गरज होती आणि ती फक्त 21 चेंडू मध्ये. वेसली माधवेरे बाद झाल्यानंतर जोगवे च्या साथीला फलंदाजीसाठी मुझारबानी हा आला या दोघांनी 6 धावांची भर पाडल्यानंतर मुझरबनी हा बाद झाला. मुझरबनी 4 चेंडू मध्ये 2 धावा केल्या होत्या. मुझरबनी्याला आवेश खान यानी सुंदर च्या हाती झेल देत बाद केले.आता झिम्बाब्वे संघाची स्थिती 123 धावा 9 गडी बाद अशी झाली होती. मुझरबनी बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी झिम्बाब्वे संघाचा शेवटचा खेळाडू चतरा हा फलंदाजीसाठी आला. (IND VS ZIM 2nd T20 Highlights) या दोघांनी संघाचे धावफलक 134 धावांपर्यंत येऊन पोहोचविले. आणि 19 व्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर लूक जोंगवे हा बाद झाला.
लूक जोंगवे याला मुकेश कुमार यानी ऋतुराज गायकवाड च्या हाती झेल देत बाद केले.लूक जोंगवे याने 26 चेंडू मध्ये 33 धावा केल्या. त्यामध्ये 4 चौकार लगावले होते. झिम्बाब्वे संघाला जिंकण्यासाठी 101 धावांची गरज बाकी होती. 134 धावांवर झिम्बाब्वे संघ सर्व बाद झाला आणि 100 धावांनी भारतीय संघाचा विजय झाला. भारतीय संघाकडून गोलंदाजी मध्ये मुकेश कुमार आणि आवेश खान या दोघांना प्रत्येकी 3 विकेट मिळाल्या. रवी बिश्नोई याला 2 विकेट मिळाल्या तर वाशिंग्टन सुंदर याला 1 विकेट मिळाली.
सामन्याचा मानकरी (IND VS ZIM 2nd T20 Highlights)
भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज अभिषेक शर्मा हा या सामन्याचा मानकरी ठरला अभिषेक शर्मा यानी 47 चेंडू मध्ये आपले शतक पूर्ण केले यामध्ये त्यानी 8 षटकार आणि 7 चौकार लगावले होते.