IPL 2024 KKR VS RCB 10 | सुनील नारायण बरसला, RCB चा उडवला धुव्वा !
IPL 2024 KKR VS RCB 10 :- IPL 2024 च्या रणसंग्रमातील 10 वा सामना हा RCB विरुध्द KKR या दोन संघात खेळला गेला आणि या सामन्यात KKR संघाने RCB संघाचा धुव्वा उडवत आपला IPL मधील सलग दुसरा विजय नोंदविला.KKR संघाने RCB संघाचा 7 विकेट्स राखून सहज पराभव केला.चला जाणून घेवूया सविस्तर वृत्त.
IPL 2024 KKR VS RCB 10 :- IPL 17 व्या सीजन मधील 10 सामना हा KKR विरुद्ध RCB मध्ये खेळला गेला.RCB या सिजनमधील आपला 3 रा सामना खेळत होती. यापूर्वी झालेला सामना RCB ने जिंकत , मजबूत स्थितीत तिसऱ्या सामन्यात प्रदार्पण केले. तर दुसरीकडे KKR हा आपला दुसरा सामना खेळत होती KKR देखील यापूर्वीचा सामना जिंकला होता. KKR ने पहिल्या सामन्यात सनरायजर हैद्राब्द्चा 4 धावांनी पराभव केला होता.
IPL 2024 चा 10 वा सामना :- हा बेंगलोर च्या चिन्नास्वामी या स्टेडीयम वर खेळवण्यात आला होता. या सामन्यात KKR नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. RCB ने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावत 183 धावा काढल्या. KKR हे आव्हान फक्त 3 विकेटच्या मोबदल्यात 16.5 षटकात पूर्ण केले.कोलकाता साठी सुनील नारायण हा सान्याचा खरा हिरो ठरला . त्याने 22 चेंडूत 47 धावा ठोकल्या आणि त्याला साथ देत व्यंकटेश अय्यर ने 30 चेंडूत 50 धावा काढल्या. त्याच बरोबर हा KKR या सिजानमधील हा सलग दुसरा विजय ठरला तर RCB चा त्यांच्या तिसर्या सामन्यातील हा दुसरा पराभव ठरला.
प्रथम RCB संघाची फलंदाजी :- KKR ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षनाचा निर्णय घेतला आणि RCB संघाला प्रथम फलंदाजीस निमंत्रण दिले. नेहमी प्रमाणे सलामीला कोहली आणि फाफ दुप्लेसीस हि जोडी मैदानात उतरली. ह्या सलामीच्या जोडीकडून चांगली भागीदारीची अपेक्षा होती. मागील सामन्यात चांगली खेळी करणारा फाफ दुप्लेसीस या सामन्यात काही चांगले फटके नाहि लगावू शकला आणि स्वस्तात बाद झाला. त्याची विकेट हर्षित रानाने घेतली.
फाफ दुप्लेसीस ने मिशेल स्टार्क च्या हाती झेल देत बाद झाला.त्याने 6 चेंडू मध्ये 8 धावा केल्या. सलामीच्या जोडीत केवळ 17 धावांचीच भागीदारी झाली.IPL 2024 KKR VS RCB 10एका बाजूने विराट कोहली चांगले फटके लगावत संघाचा स्कोर वाढवत होता. दुप्लेसीस बाद झाल्यानंतर कोहलीच्या साथीला क्यामेरून ग्रीन आला.दोघांनी सावधपणे खेळ करत संघाचा स्कोर वाढवला.संघाचा स्कोर 82 असताना ग्रीन देखील बाद झाला.
Cameron Green :- ग्रीन ने 21 चेंडू खेळत 33 धावा काढल्या त्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. त्याला रसेल ने चीत् बाद केले.दुसरीकडे कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. तिसऱ्या क्रमांकावर आलेला ग्लेन म्याक्सवेल ने कोहलीला चांगली साथ दिली.दोघांनी हंगली फटकेबाजी केली. दोघंमध्ये 31 चेंडू मध्ये 42 धावांची भागीदारी झाली.सुनील नारायण च्या गोलंदाजीवर रिंकू सिंघ च्या हाती झेल देत म्याक्सवेल बाद झाला. त्याने 19 चेंडू मध्ये 3 चौकार आणि 1 षटकार चा समावेश आहे. म्याक्सवेल बाद झाला तेंव्हा संघाचा स्कोर 124 धावा 3 बाद आणि 14.1 षटकार झाले होते.
4 थ्या रजत पाटीदार फक्त ३ धावा करून बाद झाला.IPL 2024 KKR VS RCB 10 त्याने 4 चेंडूत 3 धावा केल्या रसेल च्या गोलंदाजीवर त्याने रिंकू सिंघ च्या हाती झेल देत तो बाद झाला. त्या पाठोपाठ अनुज रावत हि बाद झाला त्याने 3 चेंडूत 3 धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा संघाचा स्कोर 151 वर 5 बाद असा होता.परंतु 6 व्या क्रमांकावर आलेल्या दिनेश कार्तिक ने तुफान फलंदाजी केली. त्याने 3 मोठे षटकार लगावले. आणि फक्त 8 चेंडूत 20 धावा काढल्या.
तो शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. विराट कोहलीने नाबाद खेळी केली. त्याने 59 चेंडूत 83 धावा काढल्या त्यात 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. RCB संघाने एकूण 20 षटकात 6 बाद 182 धावा काढल्या आणि KKR ला विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य दिले. KKR ने गोलंदाजी करताना हर्षित राना, रसेल ने प्रत्येकी 2 गडी बाद केले.आणि सुनील नारायण ला एक बळी मिळाला.
KKR संघाची फलंदाजी :-
183 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेली संघाची सुरवात चांगली झाली.2023 च्या IPL सलामीला फलंदाजीला संधी नाही भेटलेल्या सुनील नारायण ला 2024 च्या IPL मध्ये पहिल्या सामन्यापासूनच सलामीला खेळण्याची संधी देण्यात आली. आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा सुनील नारायण ने घेतली आहे. KKR संघाने फलंदाजीला येताच क्षणी जोरदार फटकेबाजी करायला सुरवात केली. सुनील नारायण प्रत्येक गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेत होता.
IPL 2024 KKR VS RCB 10 तो प्रत्येक चेंडूवर आक्रमक पणे वार करत चेंडूला सिमा रेखा पार पोहचविण्याचा प्रयत्न करत होता.दुसर्या बाजूने फिलीप साल्ट हा देखील् फटकेबाजी करत होता. या सलामीच्या जोडीने संघाला चांगल्या मजबूत स्थितीत पोहचविले होते.या जोडीने 39 चेंडू मध्ये 86 धावांची धुवाधार खेळी केली. 7 व्या षटकात सुनील नारायण हा मयंक डागर च्या गोलंदाजीवर चीत बाद झाला. त्याने केवळ 22 चेंडू मध्ये 47 धावा काढल्या आणि त्यामध्ये 5 षटकार,2 चौकारांचा समावेश आहे. त्या नंतर व्यंकटेश अय्यर ने देखील RCB च्या गोलंदाजांना चांगलेच चोपले.संघाचा स्कोर 92 असताना फिलीप साल्ट हा विजयकुमार वश्यक च्या गोलंदाजीवर ग्रीन च्या हाती झेल देत बाद झाला. साल्ट ने 20 चेंडू मध्ये 30 धावा काढत 2 चौकार आणि 2 षटकार लगावले.
IPL 2024 KKR VS RCB 10 RCB चा कप्तान असलेला फाफ दुप्लेसीस गोलंदाजीत तसेच क्षेत्ररक्षनात बदल करून KKR संघावर दबाव करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु कुठल्याही दबावात न येता KKR संघ हा आक्रमक अशी खेळी करत होता. 4 थ्या क्रमांकावर KKR चा कप्तान श्रेयश अय्यर हा आला. त्यानेही आक्रमक खेळी ला सुरवात केली. RCB संघाला कुठलिही संधी न देता दोघांनी फटकेबाजी चालूच ठेवली.व्यंकटेश अय्यर ने 30 चेंडू मध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.आणि संघाला विजयाच्या उबरठ्यावर नेऊन ठेवले. तो यश दयाळ च्या गोलंदाजीवर कोहलीच्या हाती झेल देत बाद झाला. त्याने 30 चेंडूत 50 धावा काढल्या त्यात 4 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे. संघाचा स्कोर 167 असताना वेंकटेश बाद झाला.
चौथ्या क्रमांकावर आलेल्या रिंकू सिंघ ने श्रेयश अय्यर ला साथ देत जिंकण्यासाठी लागणाऱ्या थोड्या धावांची भागीदारी पूर्ण केली . श्रेयश अय्यर नाबाद खेळी करत त्याने 24 चेंडू मध्ये 39 धावा काढल्या आणि 2 चौकार,2 षटकात हि लगावले.IPL 2024 KKR VS RCB 10 रिंकू सिंघ ने नाबाद 5 चेंडू मध्ये 5 धावा काढल्या आणि आपला संघ KKR च्या नावावर सलग 2 विजय नोंदविला.
या सामन्यात तुफान फटकेबाजी करत केवळ 22 चेंडूमध्ये 47 धावा करणारा आणि 1 विकेट घेणारा सुनिल् नारायण सामन्याचा मानकरी ठरला.RCB संघासाठी यश दयाळ, मयंक डागर, विजयकुमार वश्यक यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. RCB संघासाठी हा सामना घरच्या मैदानावर असूनही कोलकाता नाईट रायडर्स संघाने RCB ला धूळ चारत. घरच्याच मैदानावर RCBसंघाला पराभूत केले. आणि सलग 2 सामने जिंकत IPL मध्ये अजिंक्य म्हणून राहिला या सामण्यात विजय मिळवत KKR संघाला एकूण 4 गुण मिळाले. तर RCB ने आपला तिसरा सामन्यात दुसर्यांदा पराभव स्वीकारत एकूण 2 गुण मिळवले.
यानंतर चा RCB चा 4 था सामना लखनौ सुपर जायन्ट्स विरुद्ध 2 एप्रिल ला मुंबई च्या वानखेडे येथील स्टेडीयम वर होणार आहे. RCB हा सामना जिंकून IPL च्या शर्यतीत आपले स्थान अग्रस्थानी नेण्याचा प्रतन करेल . तर KKR आपला 3 रा सामना दिल्ही विरुद्ध विशाखापट्टनम येथे जिंकून आपला IPL मधील अजिंक्य प्रवास टिकून ठेवण्याचा प्रयत्न करेल. KKR संघ हा आपला दुसरा सामना जिंकत गुणतालिकेत 2 र्या स्थानावर पोहचला. तर RCB आपल्या 3 र्या सामन्यात पराभूत होत गुणतालिकेत 6 व्या स्थानावर पोहचला आहे. कोहलीच्या नाबाद 83 धावांच्या खेळीने कोहली ऑरेंज क्याप चा मानकरी आहे.तर पर्पल क्याप चा मानकरी मुस्ताफिझुर रेहमान हा आहे.