Site icon Get In Marathi

IPL 2024 : Mumbai Indians चा RCB वर दणदणीत विजय, 7 गडी राखून विजय !

IPL 2024 : Mumbai Indians चा RCB वर दणदणीत विजय, 7 गडी राखून विजय !

IPL 2024 : Mumbai Indians चा RCB वर दणदणीत विजय, 7 गडी राखून विजय ! IPL 2024 :- मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा 7 गडी राखून पराभव केला. मुंबईने सर्वप्रथम नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर बेंगलोरला फलंदाजी साठी आमंत्रित केले. रॉयल चॅलेंजर बेंगलोर ने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात  196 धावा केल्या त्या बदल्यात 8 घडी गमावले  आणि मुंबई इंडियन्सला 197 धावांचे आव्हान दिले मुंबई इंडियन्सने हे आव्हान 16 शटकात सहजपणे पार करत फक्त 3 गडी गमावत हे आव्हान पार केले.

IPL 2024

IPL Highlights :- IPL 2024 मधील 25 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर या दोन संघांमध्ये खेळला गेला हा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियम वर खेळण्यात आला घरच्या मैदानावर खेळत असताना मुंबई इंडियन संघाने  दमदार खेळी करत रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा एक हाती पराभव केला.या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाचे पाच गडी बाद करणारा  जसप्रीत बुमरा हा सामन्याचा मानकरी ठरला. मुंबई इंडियन संघाचा कप्तान हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. कप्तानचा हा निर्णय योग्य ठरला.

 रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाची खराब  सुरुवात IPL 2024 :- रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाची सलामी जोडी ही विस्फोटक जोडी म्हणून ओळखली जाते.ऑरेंज कॅप विराट कोहली कडे असून तो ऑरेंज कॅप रेस मध्ये एक नंबर स्थानावर आहे या सामन्यात देखील तो चांगली खेळी करेल असे अपेक्षित होते परंतु तो दुसऱ्या ओवर्स मध्ये बूमराच्या गोलंदाजीवर ईशान-किशनच्या हाती झेल देऊन बाद झाला त्याने 9 चेंडू मध्ये 3 धावा केल्या संघाचा स्कोर 14 असताना कोहली बाद झाला त्यानंतर डुप्लेसिसच्या जोडीला विल जॅक हा फलंदाज आला परंतु तोही जास्त वेळ टिकला नाही

त्याने 6 चेंडू मध्ये 8 धावा केल्या आणि 2 चौकार लगावले संघाचे धावफलक 23 असताना रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाची दुसरी विकेट गेली.विल जॅकला आकाश ने बाद केले त्याचा झेल टीम डेविड ने घेतला. एका बाजूने बेंगलोर संघाचा कप्तान असलेला डुप्लेसीस हा सावधपणे खेळत होता तिसऱ्या नंबरवर रजत पाटीदार हा भारतीय  युवा फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात आला.

 दुप्लेसिस आणि रजत पाटीदारची चांगली भागीदारी :-  तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रजत पाटीदारणे आक्रमक सुरुवात केली त्याने प्रत्येक दिशेला चेंडू मारत संघाला सावरले डुप्लेसीस आणि रजत पाटीदार या दोघांनी चांगली खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपले आणि संघाला मजबूत स्थितीत नेले रजत पाटीदारणे 26 चेंडू मध्ये 50 धावा केल्या आणि त्यामध्ये चार षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे.IPL 2024 रजत पाटीदार हा आक्रमकपणे खेळत असतानाच तो चुकीचा फटका मारून बाद झाला

त्याने केवळ 26 चेंडूमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केले आणि अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर तो लगेच बाद झाला. रजत पाटीदारची विकेट गेराल्ड याने घेतली तो ईशान किशन च्या हाती झेल देत बाद झाला तो बाद झाला तेव्हा संघाचा स्कोर 105 धावा आणि 3 बाद असा झाला रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघ चांगल्या मजबूत स्थितीत पोहोचला होता केवळ 11 ओवर्स मध्ये संघाचा स्कोर हा शंभरच्या पार झाला होता.

 मॅक्सवेल पुन्हा एकदा फेल IPL 2024 :- रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाने चांगल्या किमतीत विकत घेतलेला ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज म्हणजेच ग्लेन मॅक्सवेल. त्याच्याकडून रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाला खूप मोठी आशा असताना तो आतापर्यंत पूर्ण सामन्यांमध्ये सपशेल फेल झाला आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध मॅक्सवेल चांगली खेळी करेल असे वाटत होते परंतु तो या सामण्यात देखील काहीच करू शकला नाही.

ग्लेन मॅक्सवेल चार चेंडूंमध्ये एक पण धाव न करता बाद झाला त्याची विकेट श्रेयश गोपालने घेतली ग्लेन मॅक्सवेल हा शून्य धावा वर बाद झाला आता रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचे धावफलक 108 धावांवर 4 गडी बाद असे होते ग्लेन मॅक्सवेल बाद झाल्यानंतर कप्तान डुप्लेसिसच्या साथीला दिनेश कार्तिक हा आला त्याने मैदानात येताच क्षणी मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला तो कुठलाही वेळ वाया न घालवता मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाची चांगलीच धुलाई करून लागला.

डुप्लेसिस आणि दिनेश कार्तिक या दोघांमध्ये केवळ 26 चेंडूंमध्ये 45 धावांची भागीदारी झाली संघाचा स्कोर 153 असताना रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचा कप्तान बाद झाला. डुप्लेसिस ने 40 चेंडूंमध्ये 61 धावा केल्या त्यामध्ये तीन षटकार आणि चार चौकार लगावले तो बुम्राच्या गोलंदाजीवर टीम डेविडच्या हाती झेल देत  बाद झाला  जसप्रीत बुमराणे रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचे सलामीचे दोन्ही फलंदाज बाद केले. कप्तान बाद झाल्यानंतर लोमरोर हा फलंदाजीसाठी आला परंतु तो एकही  बॉल खेळला नाही आणि तो   बुमराच्या पुढच्या चेंडूवर लगेच  बाद झाला बुमराणे सलग 2 फलंदाज बाद केले आता रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाची स्थिती ही 153 धावा आणि 6 गडी बाद असेल झाले होते तो बाद झाल्यानंतर सौरव चव्हाण हा फलंदाजीसाठी आला आणि त्याने दिनेश कार्तिकला चांगली साथ दिली.

एका बाजूने गडी बाद होत असताना दिनेश कार्तिक हा आक्रमकपणे खेळी करतच होता सौरव चव्हाण हा बुमराच्या गोलंदाजीवर आकाश च्या हाती झेल देत बाद झाला त्याने 8 चेंडूमध्ये 9 धावा केल्या आणि 1 चौकार लगावला आठव्या क्रमांकावर विजयकुमार हा फलंदाजीसाठी आला परंतु त्यालाही बुमराणे जास्त वेळ न देता पहिल्याच चेंडूवर त्याला बाद केले विजयकुमार नाबीच्या हाती  झेल देत शून्य धावांवर बाद झाला.

तो बाद झाला तेव्हा संघाचा स्कोर 170 धावा आणि 8ओवर्स असा होता. त्यानंतर नवव्या क्रमांकावर आकाशदीप हा दिनेश कार्तिकच्या साथीला आला आकाशदीपने दोन चेंडूमध्ये  दोन धावा केल्या दिनेश कार्तिकने जास्त स्ट्राइक स्वतःकडे ठेवत संघासाठी मोठे योगदान दिले.IPL 2024 आणि आरसीबी संघाने एकूण 20 ओव्हर मध्ये 196 धावांचा पल्ला गाठला आणि त्या बदल्यात 8 गडी गमावले. आणि मुंबई इंडियन्स संघाला 197 धावांचे  मोठे आव्हान दिले.

  IPL 2024 जसप्रीत बुमरा ची भेदक गोलंदाजी:-  जसप्रीत बुमराणे 4 ओवर्स मध्ये  फक्त 21 धावा दिल्या आणि त्या बदल्यात  मुंबई इंडियन्स संघाचे 5 गडी बाद केले. बुमराणे सुरुवातीपासूनच रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर अडचणीत आणले बुमराणे रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचे सलामीची जोडी बाद केली मुंबई इंडियन्स संघाचे फलंदाज बुमरा व्यतिरिक्त सर्व गोलंदाजांना टोले लगावण्यात यशस्वी झाले होते परंतु त्यांना  बुमराला चांगले फटके लगावण्यात अपयश आले. सातत्याने फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीला देखील  बुमराणी जास्त वेळ मैदानावर खेळू दिले नाही आणि त्याला फक्त 3 धावांवर बाद केले.

त्यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचा कप्तान डुप्लेसीस जो आक्रमक खेळी करत होता त्याला देखील बाद केले.ज्यावेळी रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघ चांगल्या स्थितीत येत आहे असे वाटत असतानाच जसप्रीत बुमरा हा आपल्या गोलंदाजांनी फलंदाजांना बाद करत होता. आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाला पुन्हा अडचणीत आणत होता. लोमरोर  याला एकही चेंडू न खेळू देता शून्य धावांवर बाद केले आणि आपली तिसरी विकेट घेतली त्यानंतर त्यांनी सौरव चव्हाण आणि विजयकुमार या दोघांना बाद करत आपला पंजा पूर्ण केला त्यांनी चार ओवर्समध्ये सर्वात कमी धावा देत 5 गडी बाद केले आणि तो सामन्याचा मानकरी ठरला. 

 IPL 2024 मुंबई इंडियन्स संघाच्या सलामीच्या फलंदाजांची धमाकेदार सुरुवात :-   197 धावांचे आव्हान घेऊन मुंबई इंडियन्स  संघाचे सलामीचे फलंदाज रोहित शर्मा आणि ईशान किशन हे मैदानात उतरले एवढे मोठे आव्हान असताना देखील दोघेही फलंदाज न डगमगता आक्रमकपणे खेळी करत होते आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करू लागले सलामीच्या या जोडीने केवळ 9  ओवर्स मध्ये संघाचे धावफलक हे शंभर धावांपर्यंत नेऊन पोहोचले या दोघांमध्ये 101 धावांची भागीदारी झाली त्यांनी ही भागीदारी केवळ 53 मध्ये केली संघाचे धावफलक हे 101 असताना ईशान किशन हा बाद झाला तो आकाशदीपच्या गोलंदाजीवर जोराचा फटका मारून सीमा रेखा पार चेंडू पाठवण्याच्या प्रयत्नात कोहलीच्या हाती झेल देत बाद झाला.

ईशान किशन बाद झाला परंतु त्यांनी संघासाठी मोठे योगदान दिले आणि संघाला चांगल्या मजबूत स्थितीत येऊन पोहोचविले होते त्यानंतर सूर्यकुमार यादव हा एक विस्फोटक फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात उतरला मागील काही सामन्यात निराशा जनक खेळणी करणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली एका बाजूने रोहित शर्मा आणि एका बाजूने सूर्यकुमार यादव हे रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करू लागले रोहित शर्मा यांनी 24 चेंडूंमध्ये 38 धावा केल्या त्यामध्ये तीन षटकार आणि तीन चौकार समाविष्ट आहेत तो विल ज्याक च्या गोलंदाजीवर टोपलेच्या हाती झेल देत बाद झाला रोहित शर्मा बाद झाला.

रोहित शर्मा बाद झाला तेव्हा संघाचा स्कोर हा 139 धावा आणि दोन बाद असा झाला होता रोहित शर्मा हा 12 व्या शतकात बाद झाला मुंबई इंडियन्स संघ हा आता चांगल्या मजबूत स्थितीत येऊन पोहोचला होता रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचे एकही गोलंदाज मुंबई इंडियन्स संघाच्या फलंदाजांसमोर टिकू शकले नाही  चौथ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स संघाचा कप्तान असलेला हार्दिक पांड्या हा फलंदाजीसाठी मैदान उतरला.IPL 2024  हार्दिक पांड्याने मैदानात येताच ताबडतोब फलंदाजी करण्यास सुरुवात केली त्याने सूर्यकुमार यादव ला चांगली साथ दिली.

सूर्यकुमार यादवने रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि फक्त 18 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले त्याने आयपीएल मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक आपल्या नावावर केले त्याने 19 चेंडू मध्ये 52 धावा केल्या त्यामध्ये चार उत्तुंग षटकार आणि पाच चौकारांचा समावेश आहे त्याला विजयकुमार ने लोमरोर  च्या हाती झेल देत बात केले सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर संघाचा स्कोर हा 176 धावा 3 गडी बाद 14 षटकार असा होता.

आता विजयासाठी फक्त 20 धावांची आवश्यकता होती हार्दिक पांड्याच्या सोबतीला तिलक वर्मा हा आला त्याने केवळ दहा चेंडू मध्ये तीन चौकार लगावत 16 धावा केल्या आणि हार्दिक पांड्याने सहा चेंडू मध्ये खणखणीत तीन षटकार लगावत 21 धावा केल्या हे दोघेही नाबाद राहिले.IPL 2024 या दोघांनी फक्त 12 चेंडू मध्ये 23 धावा चोपल्या आणि  आपल्या संघाला विजय मिळवून दिला रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाच्या गोलंदाजांना मुंबई इंडियन्स संघाच्या फलंदाजांनी चांगलेच  चोपले. गोलंदाजी मध्ये आकाशदीप, विजयकुमार आणि विल जॅक यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.

मुंबई संघाने IPL 2024 मधील आपला दुसरा विजयी नोंदविला आता पॉईंट्स टेबल मध्ये मुंबई सातव्या क्रमांकावर आहे तर  रॉयल चॅलेंजर बेंगलोर हा संघ शेवटच्या स्थानावर म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे आरसीबी संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले त्यात 5 सामन्यांमध्ये पराभव तर 1 सामन्यात विजय मिळविला आहे मुंबई संघाने 5 सामने खेळत 3 मध्ये पराभव तर 2 सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचे आयपीएल मधील अपयश यावर्षीही बघायला मिळत आहे.रॉयल चॅलेंजर संघाचे फॅन्स यावर्षी संघ जिंकेल या मोठ्या आशेत आहे परंतु सध्या आरसीबी संघ शेवटच्या स्थानावर आहे.आता राहिलेल्या सामन्यांमध्ये आरसीबी ला चांगल्या फरकाने विजय  मिळवावा लागेल तेव्हा संघ आपली क्वालीफाय जागा निश्चित करू शकतो या सामन्यात मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमरा याने 5 विकेट मिळवत सामन्याचा मानकरी ठरला.

हे वाचा !

FAQ’S

:- नाणेफेक मुंबई इंडियन्स संघाने जिंकली.

:-  प्रथम फलंदाजी रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाने केले

:-  सामन्याचा मानकरी जसप्रीत बुमरा हा ठरला.

:-  रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्सला जिंकण्यासाठी १९७ धावांची आव्हान दिले.

:- ईशान किशन ने मुंबई इंडिया संघासाठी सर्वात  69 धावा केले.

:-  सर्वात जास्त विकेट्स जसप्रीत बुमराणे 5 विकेट्स घेतले.

:-  मुंबई इंडियन्स संघाचा हा आय पी एल 2024 मध्ये दुसरा विजय आहे.

:-  मुंबई इंडियन्स संघ हा पॉईंट्स टेबल मध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

:-  रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघ पॉइंट टेबल मध्ये दहाव्या क्रमांकावर आहे.

:- आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकलेला आहे.

:-  मुंबई इंडियन संघाचा कप्तान हार्दिक पांड्या आहे.

Spread the love
Exit mobile version