IPL 2024 : कोण जिंकणार ? मुंबई इंडियन्स कि चेन्नई सुपर किंग्स

IPL 2024 : कोण जिंकणार ? मुंबई इंडियन्स कि चेन्नई सुपर किंग्स

IPL 2024 कोण जिंकणार ?
IPL 2024

IPL 2024 : कोण जिंकणार ? :- 2024 चा IPL चषक खूप रोमांचक होणार आहे. कारण यंदाच्या IPL मध्ये खूप मोठे उलटफेर दिसणार आहेत.गतवर्षी विजेता चेन्नई संघाचा कर्णधार एम एस धोनी हि शेवटची आयपीएल खेळणार आहे. तर मागील 2 वर्ष गुजरात टायटस संघाच्या कप्तानी पदाची धुरा सांभाळणारा हार्दिक पंड्या पुन्हा मुंबई इंडियन्स कडून खेळणार आहे.हार्दिक पंड्या मुंबई चा कर्णधार आहे. आणि रोहत शर्मा आता फक्त एक फलंदाज म्हणून खेळणार आहे.मुंबई इंडियन्स टीमचे कप्तानपद हार्दिक पांड्याकडे गेल्यामुळे रोहित शर्माचे चाहते नाराज झाले.आपण बघुयात कोण आहे IPL 2024 चा प्रबळ दावेदार.

संघ आणि कर्णधार :-

  • 1 ) मुंबई इंडियन्स :- हार्दिक पंड्या
  • 2) चेन्नई सुपर किंग्स :- एम एस धोनी
  • 3) रॉयल चालेन्जेर बेंगलोर :- फाफ दुप्लेसीस
  • 4) दिल्ही क्यापिटल :- रिषभ पंत
  • 5) कोलकाता नाईट रायडर्स :- श्रेयश अय्यर
  • 6) राजस्थान रॉयल :- संजू स्यामसन 
  • 7) पंजाब किंग्स :- शिखर धवन
  • 8) सनाराय्जार हैदराबाद :- प्याट कन्मीस
  • 9) लखनव सुपर जायन्ट :- के एल राहुल
  • 10) गुजरात टायतस :- शुभमन गिल

2024 च्या IPL मध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. आतापर्यंत जास्त IPL जिंकलेले फक्त दोन संघ आहे ती म्हणजे चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडींस या दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 IPL चषक जिंकले आहे

IPL चषक विजेता संघ :-

  • 1) सन 2008 विजेता :- राजस्थान रॉयल
  • 2) सन 2009 विजेता :- डेक्कन चार्जर्स
  • 3) सन 2010 विजेता :- चेन्नई सुपर किंग्स
  • 4) सन 2011 विजेता :- चेन्नई सुपर किंग्स
  • 5) सन 2012 विजेता :- कोलकाता नाईट रायडर्स
  • 6) सन 2013 विजेता :- मुंबई इंडियन्स
  • 7) सन 2014 विजेता :- कोलकाता नाईट रायडर्स
  • 8) सन 2015 विजेता :- मुंबई इंडियन्स
  • 9) सन 2016 विजेता :- सनराईजर हैदराबाद
  • 10) सन 2017 विजेता :- मुंबई इंडियन्स
  • 11) सन 2018 विजेता :- चेन्नई सुपर किंग्स
  • 12) सन 2019 विजेता :- मुंबई इंडियन्स
  • 13) सन 2020 विजेता :- मुंबई इंडियन्स
  • 14) सन 2021 विजेता :- चेन्नई सुपर किंग्स
  • 15) सन 2022 विजेता :- गुजरात टायतंस
  • 16) सन 2023 विजेता :- चेन्नई सुपर किंग्स

सर्वाधिक IPL चषक विजेते संघ :-

  • 1) मुंबई इंडियन्स  :- 5  
  • 2) चेन्नई सुपर किंग्स :- 5 
  • 3) कोलकाता नाईट रायडर :- 2 
  • 4) गुजरात टायतंस :- 1
  • 5) सनराईजर हैदराबाद :- 1
  • 6) राजस्थान रॉयल :- 1
  • 7) डेक्कन चार्जर्स :- 1

पूर्ण IPL च्या काळात आता पर्यंत फक्त मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघाचा बोलबाला राहिला आहे. पण यया वर्षी पूर्ण संघ मध्ये खूप फेर बदल केल्याने आता प्रत्येक संघ हा फलंदाज आणि गोलंदाज सर्व उत्कृष्ट आहे. त्यामुळे या वर्षी सर्व संघ हे अग्रेसर आहे.

IPL 2024 : कोण जिंकणार ? मुंबई आणि चेन्नई हे संघ जरी मजबूत स्थितीत असले तरी बाकी संघ हि खूप मजबूत स्थितीत आहे.प्रत्येक IPL मध्ये सुरवातीपासून एकदम फॉर्म मध्ये असणारी टीम म्हणजे रॉयल च्यालेन्जेर .रॉयल च्यालेन्जेर प्रत्येक वर्षी अप्रतिम कामगिरी करून अव्वल स्थानी असते परंतु प्ले ऑफ ला आल्यानंतर टीम आपला फॉर्म गमावून देत होती आणि एक पाऊला वर विजतेपद असताना खाली हात माघारी परतावे लागत होते. पण यावर्षी रॉयल च्यालेन्जेर संघ हा सर्वात मजबूत संघ दिसत आहे.

विराट कोहली च्या नेतृत्वाखाली संघ एकदाही विजेता झाला नाही. संघाकडे एके काळी सगळ्यात विस्फोटक फलंदाज होते. ए बी दिविलिअर्स आणि क्रिस गेल या दोन महान फलंदाज च्या जोरावर संघ अनेकदा विजेताप्दाच्या जवळ जावून माघारी परतत होता. आता संघाकडे त्या डोंघाची उणीव भरून काढण्यासाठी फाफ दुप्लेसीस आणि ग्लेन म्याक्स्वेल उपस्थित आहे.

अनेक नवीन चेहऱ्यांना देखील संधी भेटलेली आहे. तर गोलंदाजी मध्ये संघाकडे आक्रमक गोलंदाज अल्झारी जोसेफ आणि टोम करण हे भेदक गोलंदाज उपलब्ध आहे.गुजरात टायतंस हा संघ हि आता हार्दिक पंड्या च्या अनुउपस्थितीत चांगली कामगिरी करू शकेल.संघाची कमान आता शुभमन गिल च्या खांद्यावर आहे. शुबमन गिल 2023 मध्ये प्लेयर ऑफ दि सिरीज चा मानकरी ठरला होता.शुभमन गिल याने IPL मध्ये सर्वात वेगवान 2000 धावा काढण्याचे रेकॉर्ड देखील आपल्या नावावर केले आहे.

जे रेकॉर्ड रोहित शर्मा आणि विरत कोहली ला देखील जमले नाही ते रेकॉर्ड शुभमन गिल ने केले आहे. त्याने त्याच्या ७४ व्या सामन्यात २००० धावा पूर्ण केल्या आहे.IPL 2024 : कोण जिंकणार ? मुंबई आणि चेन्नई नंतर सर्वात स्थितीत असलेला संघ हा गुजरात टायतंस आहे. गुजरात कडे भेदक गोलंदाज चा मारा आहे. संघाकडे अष्टपैलू रशीद खान आहे.रशीद खान आतापर्यंत ipl कारकिर्दीत एक हिरो ठरला आहे. त्यानंतर भारताचा असा गोलंदाज ज्याच्या पुढे कोणताच फलंदाज टिकू शकत नाही आणि त्याने वर्ल्ड कप मध्ये फलंदाजांना घाम फोडला होता तो मोहम्मद शमी.

मोहम्मद शमी ने वर्ल्ड कप मध्ये सर्वात अधिक विकेट घेतल्या होत्या. आता तो IPL मध्ये हि तीच कामगिरी करून संघाला IPL चषक जिंकण्याचा तयारीत असेल. नूर अहमद हा देखील एक उत्कृष्ट स्पिनर संघाकडे आहे. 2023 च्या IPL मध्ये त्याने सर्वांचे लक्ष्य आपल्या कडे केंद्रित केले होते.गिल,डेविड मिलर,म्याथ्यु वेड,वृद्धिमान सहा आणि केन विल्यम्सन असे उत्कृष्ट फलंदाज आहे.

गुजरात संघ मुंबई आणि चेन्नई नंतर IPL चषक चा एक प्रमुख दावेदार ठरू शकेल. रॉयल च्यालेन्जेर संघाला आतापर्यंत एकदाही आपल्या नावावर विजेतापादाचा शिक्का मोर्तब नाही करता आला. प्रत्येक वर्षी हा संघ पूर्ण IPL मध्ये धुमाकूळ घालत आला आहे. परंतु अंतिम टप्प्यावर चषक आल्या नंतर या संघाला हार पत्करावी लागली आहे. विराट कोहली साठी IPL  चषक हा जणू एक श्राप ठरला आहे.

IPL 2024 : कोण जिंकणार ? विरत कोहलीच्या कप्तानी वर देखील खूप सारे प्रश्न उभे राहिले असता त्याने कप्तान पदावरून आपला राजीनामा दिला आणि आता संघाचे नेतृत्व फाफ दुप्लेसीस कडे सोपवण्यात आले आहे.फलंदाजी मध्ये विराट कोहली, ग्लेन म्याक्स्वेल  आणि फाफ दुप्लेसीस असे घातक फलंदाज आहे. तसेच गोलंदाजी मध्ये मोहम्मद सिराज,अल्झारी जोसेफ,लोकी फर्ग्युसन हे वेगवान गोलंदाज आहे.रॉयल च्यालेन्जेर ला नेहमी हर पत्करावी लागत असल्याने सोशल मिडीयावर देखील संघाला खूप ट्रोल करण्यात आली आहे.

आपल्याला लागलेला श्राप मिटवून IPL चषक मिळवण्याचा संघाचा प्रयत्न असेल. कोलकाता नाईट रायडर ने आतापर्यंत दोन वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केला आहे. IPL 2024 : कोण जिंकणार ? कोलकाता नाईट रायडर ने 2012 साली  आणि 2014 साली  आयपीएल चषक जिंकलेले आहे.2023 च्या आयपीएल मध्ये श्रेयस अय्यर चांगला खेळत असतानाच त्याला दुखापत झाली आणि तो संघ बाहेर गेला आणि संघाचे कप्तानपद श्रेयश अय्यर कडून नितीश राणाला देण्यात आले परंतु 2024 च्या आयपीएलसाठी श्रेयस तंदुरुस्त असल्याने आता संघाचे कप्तानपद पुन्हा श्रेयस अय्यर कडे आहे आणि नितीश राणा उपकप्तान  म्हणून खेळेल रणजी ट्रॉफी दरम्यान श्रेयश अय्यरला थोडीशी दुखापत झाली होती परंतु काही उपचारानंतर  क्रिकेट बोर्डाने श्रेयस अय्यर ला फिट असल्याचे घोषित केले त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स वरचे संकट टळले.

Mitchel Starc ची विक्रमी खरेदी :- संघाकडे मिशेल स्टार्क वेगवान गोलंदाज असून संघाने त्याला विक्रम किमतीत खरेदी केले त्याला रुपये सुमारे 25  कोटी 70 लाख मध्ये विकत घेतले.मागील वर्षी स्टार ठरलेला रिंकू सिंग यावर्षी देखील संघाने त्याला रिटेन केले आहे.राजस्थान रॉयल संघाने काही खेळाडू रिटेन केले आहे.IPL 2024 : कोण जिंकणार ? देवदत्त पंडिकल आणि जो रूट या दोघांना संघातून  रिलीज केले आहे आणि संघात रोमन पॉवेल, शुभम दुबे या खेळाडूंना संधी दिली आहे.

संघातील वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला डाव्या खांद्याला दुखापत झाल्याने तो संपूर्ण IPL बाहेर  असणार आहे. यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल  आणि जोश बटलर यासारखे तुफानी फनंदाज संघामध्ये समाविष्ट आहे आणि गोलंदाजी मध्ये युजवेंद्र चहल,रविचंद्र अश्विन आणि ट्रेन्त बोल्ट हे अनुभवी चेहरे आहेत.संघाचे  कप्तानपद हे संजू सॅमसंग कडे देण्यात आले आहे.यावर्षी दिल्ली संघाचा कप्तान रिषभ पंत याचे पुनरागमन संघात पुन्हा झाले आहे.

कार अपघातात जखमी झालेला रिषभ पंत आता फिट आहे. तो आता एक वर्षानंतर पुन्हा मैदानात दिसणार आहे. 2023 मध्ये त्याच्या अनुपस्थित संघाचे कर्णधार पद डेव्हिड वार्नर कडे होते.डेव्हिड वार्नरने  आपल्या कप्तानी खाली संघाला आयपीएलच्या शर्यत मध्ये शेवटपर्यंत टिकून ठेवले होते.संघाने सरफराज खान याला रिलीज केले आहे आणि कुमार कुशाग्र याला संघात स्थान दिले आहे.शिखर धवन चा नेतृत्वाखाली पंजाब किंग्स इलेव्हन संघ पुन्हा एकदा सज्ज आहे.IPL 2024 : कोण जिंकणार ? एक दिवसीय सामन्यात स्थान न मिळाल्याने शिखर धवन एक वर्षानंतर पुन्हा एकदा आयपीएल सामन्यांमध्ये मैदानात दिसणार आहे. संघाने पाच   खेळाडूंना रिलीज  केले आहे आणि काही नवीन खेळाडूंना संधी दिली आहे.एकदाही आयपीएल चषक न जिंकलेली किंग्स इलेव्हन या सीझनमध्ये तरुण खेळाडूंसोबत चषक जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरेल.

भारतीय संघातील सलामीचा आक्रमक फलंदाज के एल राहुल लखनऊ सुपर जायंटस संघाची धुरा सांभाळणारा आहे.तर संघाचे उपकर्णधार पद हे निकोलस पुरण कडे आहे भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना के एल राहुल ला  दुखापत झाल्याने तो आयपीएल खेळेल की नाही यावर संभ्रम तयार होता पण भारतीय क्रिकेट बोर्डाने केल राहुल फिट असल्याचे  घोषित केले संघामध्ये एकाहून एक सरस फलंदाज आणि गोलंदाज यांचा समावेश  आहे.IPL 2024 : कोण जिंकणार ? क्विंटन डी कॉक, मायर्स, मार्क वूड दीपक हुडा स्तोइनिस असे उत्कृष्ट खेळाडू आहेत.

हे वाचा 

Spread the love