Site icon Get In Marathi

IPL Winner Team List : आत्तापर्यंत आयपीएल जिंकलेल्या सर्व संघांची यादी, सर्वात जास्त वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेला संघ

IPL Winner Team List : आत्तापर्यंत आयपीएल जिंकलेल्या सर्व संघांची यादी, सर्वात जास्त वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेला संघ

IPL Winner Team List : आयपीएल ही जगातील सर्वात मोठी T-20 फ्रॅंचायजी आहे. आता भरपूर देशांमध्ये आयपीएल सारख्या अनेक लीग होत आहे परंतु आयपीएल ही सर्वात मोठी T-20 फ्रॅंचाईजी क्रिकेट लीग आहे.

IPL Winner Team List

IPL Winner Team List : आयपीएल या लीगला सुरुवाती भारतानेच केलेली आहे. 2008 साली आयपीएल ला सुरुवात झालेली आहे. 2007 साली भारताने आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष हे T-20 सामन्याकडे वळले होते.

विश्वचषक जिंकल्यानंतर दुसऱ्याच वर्षी बीसीसीआयने आयपीएल ची घोषणा केली. यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयची परवानगी घेण्यात आली होती. सर्वप्रथम झी एंटरटेनमेंट या फ्रेंचाईजीद्वारे आयसीएल (ICL) क्रिकेट लीगची घोषणा करण्यात आली होती परंतु बीसीसीआय आणि आयसीसी ने खेळाडूंना या सामन्यांसाठी खेळण्यास निर्बंध लावले होते. यामध्ये बदल करून नंतर आयपीएलची स्थापना करण्यात आली. 2008 साली आयपीएलचे पहिले पर्व पार पडले होते.

पहिल्या आयपीएल हंगामामध्ये राजस्थान रॉयल संघाने विजेतेपद पटकावले होते. त्यावेळेस राजस्थान रॉयल संघाचा कर्णधार शेण वॉर्न हा होता. आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन संघाने सर्वाधिक आई पी एल चषक जिंकले आहे. (IPL Winner Team List) मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाने आतापर्यंत 5-5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केलेला आहे. तर 2024 या वर्षी कोलकाता नाईट रायडर्स ने बाजी मारत तिसऱ्यांदा आयपीएलच्या चषक आपल्या नावावर केला आहे. आरसीबी हा संघ आतापर्यंत एकही आयपीएल चषक जिंकलेला नाही. चला तर बघूया आतापर्यंत झालेल्या सर्व आयपीएल सामन्याचे विजेते संघ.

IPL विजेते संघ यादी

क्रमांक  वर्ष विजेता संघ अश्या प्रकारे विजयी उपविजेता संघ स्थान 
12024कोलकाता नाईट रायडर्स8 विकेट्सनेसनरायझर्स हैदराबादचेन्नई
2023चेन्नई सुपर किंग्स5 विकेट्सनेगुजरात टायटन्सअहमदाबाद
32022गुजरात टायटन्स7 विकेट्सनेराजस्थान रॉयल्सअहमदाबाद
42021चेन्नई सुपर किंग्स27 धावांनीकोलकाता नाईट रायडर्सदुबई
52020मुंबई इंडियन्स5 विकेट्सनेदिल्ली कॅपिटल्सदुबई
62019मुंबई इंडियन्स1 धावानी चेन्नई सुपर किंग्सहैदराबाद
72018चेन्नई सुपर किंग्स8 विकेट्सनेसनरायझर्स हैदराबादमुंबई
82017मुंबई इंडियन्स1 धावानी रायझिंग पुणे सुपर जायंट्स हैदराबाद
92016सनरायझर्स हैदराबाद8 धावांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरबेंगलोर
102015मुंबई इंडियन्स41 धावांनीचेन्नई सुपर किंग्सकोलकाता
112014कोलकाता नाईट रायडर्स3 विकेट्सनेकिंग्स इलेव्हन पंजाबबेंगलोर
122013मुंबई इंडियन्स23 धावांनीचेन्नई सुपर किंग्सकोलकाता
132012कोलकाता नाईट रायडर्स5 विकेट्सनेचेन्नई सुपर किंग्सचेन्नई
142011चेन्नई सुपर किंग्स58 धावांनीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई
152010चेन्नई सुपर किंग्स22 धावांनी मुंबई इंडियन्समुंबई
162009डेक्कन चार्जर्स6 धावांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरजोहान्सबर्ग
172008राजस्थान रॉयल्स3 विकेट्सनेचेन्नई सुपर किंग्समुंबई
IPL Winner Team List
IPL Winner Team List
2008 विजेता संघ (राजस्थान रॉयल) 

आयपीएल ला 2008 या सालापासून सुरुवात झालेली आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल संघाने विजेतेपद पटकावले होते.(IPL Winner Team List) या हंगामातील अंतिम सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल आणि चेन्नई सुपर किंग हे दोन संघ भिडले होते. हा सामना मुंबई येथे पार पडला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल संघाने चेन्नई सुपर किंग्स वर 3 विकेट्सनी विजय मिळविला होता. राजस्थान रॉयल संघाचे नेतृत्व त्यावेळेस शेन वॉर्न यानी केले होते. राजस्थान रॉयल संघानी यानंतर परत एकदा आयपीएल चषक जिंकलेले नाही. राजस्थान रॉयल संघाचे नावावर आतापर्यंत 1 वेळेस आयपीएल चषक विजेतेपद आहे.

2009 विजेता संघ (डेक्कन चार्जेस)

2009 साली पार पडलेल्या आयपीएल मध्ये डेक्कन चार्जेस या संघाने विजेतेपद पटकाविले होते. या हंगामातील अंतिम सामन्यांमध्ये डेक्कन चार्जेस आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर हे दोन संघ आमने सामने आले होते. हा सामना जोहान्सबर्ग येथे खेळविण्यात आला होता. या सामन्यांमध्ये डेक्कन चार्जस संघांनी प्रथम फलंदाजी केली होती. धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर संघाचा 6 धावांनी पराभव झाला होता. 2009 साली डेक्कन चार्जेस संघाचे नेतृत्व ऍडम गिलक्रिस्त हा करत होता. 

2010 विजेता संघ (चेन्नई सुपर किंग्ज)

2010 साली पार पडलेला आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ भीडले होते. हा सामना मुंबई येथे पार पडला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारत पहिल्यांदा आयपीएल चषक आपल्या नावावर केला होता. (IPL Winner Team List) या सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी पराभव केला होता. चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी हा करत होता. 

2011 विजेता संघ (चेन्नई सुपर किंग)

2011 साली पार पडलेल्या आयपीएल चषक स्पर्धेमध्ये चेन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर हे दोन संघ अंतिम सामन्यात पोहोचले होते. (IPL Winner Team List) हा सामना चेन्नई येथील मैदानात खेळविण्यात आला होता. या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने प्रथम फलंदाजी केली होती धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचा 58 धावांनी पराभव झाला होता. रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचे नेतृत्व विराट कोहली करत होता. तर चेन्नई सुपर किंग संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी हा करत होता. चेन्नई सुपर किंग संघाने सलग दोन वेळेस आयपीएल चषक जिंकले होते. 

2012 विजेता संघ (कोलकाता नाईट रायडर्स)

कोलकाता संघ हा पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. 2012 सालचा अंतिम सामना हा कोलकाता आणि चेन्नई सुपर किंग या दोन संघात झाला होता. हा सामना चेन्नई येथील मैदानावर खेळण्यात आला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग संघाचा 5 विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारत पहिल्यांदा आयपीएल चषक जिंकले होते. 

2013 विजेता संघ (मुंबई इंडियन्स) (IPL Winner Team List)

2013 सालचा आयपीएलचा अंतिम सामना हा कोलकाता येथील स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. हा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन संघांमध्ये पार पडला होता. या अगोदर 2010 साली हे दोन संघ आमने सामने आले होते. 2013 सालच्या आयपीएल चषक मध्ये मुंबई इंडियन्स ने 23 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी केली होती. धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग संघाचा 23 धावांनी पराभव झाला होता. मुंबई इंडियन्स संघाने पहिल्यांदाच आयपीएल चषक जिंकले होते. 

2014 विजेता संघ (कोलकाता नाईट रायडर्स)

आयपीएलच्या सातव्या हंगामातील अंतिम सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे दोन संघ भिडले होते. (IPL Winner Team List) हा सामना बेंगलोर येथील मैदानावर खेळविण्यात आला होता. या सामन्यामध्ये किंग इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी केली होती. धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने दिलेले आव्हान हे 7 विकेटच्या मोबदल्यात पार केले आणि हा सामना तीन विकेट राखून जिंकला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने दुसऱ्या वेळेस आयपीएल चषक जिंकले होते. 

2015 विजेता संघ (मुंबई इंडियन्स)

एक वेळेस आयपीएल चषक जिंकलेला मुंबई इंडियन्स या संघाने या हंगामात बाजी मारत दुसऱ्यांदा ipl चषक आपल्या नावावर केले. (IPL Winner Team List) हा सामना कोलकाता येथील मैदानावर खेळविण्यात आला होता. 2015 सालचा आयपीएल मधील अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघात खेळण्यात आला होता. या अंतिम सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी केली होती. धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्स संघाचा 41 धावांनी पराभव झाला होता. चेन्नई सुपर किंग संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी हा करत होता तर मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व रोहित शर्मा हा करत होता. या सामन्यात विजय मिळवीत मुंबई इंडियन्स संघाने दोन वेळेस आयपीएल जिंकले होते. 

2016 विजेता संघ (सनरायझर्स हैदराबाद)

(IPL Winner Team List) आयपीएलच्या 9 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर हे दोन संघ अंतिम सामन्यात पोहोचले होते. हा अंतिम सामना बेंगलोर येथील मैदानावर खेळविण्यात आला होता. रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचे नेतृत्व विराट कोहली करत होता. तर सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व डेविड वॉर्नर हा करत होता. या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी केली होती. दिलेला आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचा 8 धावांनी पराभव झाला. आणि हा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाने जिंकत पहिल्यांदा आयपीएल चषक हे जिंकले.

2017 विजेता संघ (मुंबई इंडियन्स) (IPL Winner Team List)

2017 सालच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स ने परत एकदा बाजी मारली. या हंगामातील अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स या दोन संघात खेळविण्यात आला होता. हा सामना हैदराबाद येथील मैदानावर पार पडला होता. हा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. या अंतिम सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाने एक धावानी विजय मिळविला होता. या सामन्यात विजय मिळवत मुंबई इंडियन्स संघाने तिसऱ्यांदा आयपीएल चषक आपल्या नावावर केले. 

2018 विजेता संघ (चेन्नई सुपर किंग्स)

2018 सालचे आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली परत एकदा आयपीएल चषक जिंकले. या हंगामातील अंतिम सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ भिडले होते. (IPL Winner Team List) हा सामना मुंबई येथील मैदानावर खेळविण्यात आला होता या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने एक हाती विजय मिळविला होता. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी केली होती. दिलेला आव्हानांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग संघाने अवघ्या दोन विकेट गमावून आव्हान पार केले. चेन्नई सुपर किंग संघाने तिसऱ्यांदा आयपीएल चषक जिंकले होते. 

2019 विजेता संघ (मुंबई इंडियन्स)

2019 च्या आयपीएल चषक मधील अंतिम सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ पुन्हा आमने सामने आले होते. हा सामना हैदराबाद येथील मैदानावर पार पडला. हा सामना अतिशय चुरशीचा झाला होता या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी केली होती. तर चेन्नई सुपर किंग संघाने दिलेला आव्हानाचा पाठलाग करताना एक धावांनी पराभव झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारली आणि चौथ्यांदा आयपीएल चषक आपल्या नावावर केला. मुंबई इंडियन्स संघ हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत होता. 

2020 विजेता संघ (मुंबई इंडियन्स)

2020 सालचा आयपीएल चषक मधील अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये झाला होता. (IPL Winner Team List) हा सामना दुबई येथील स्टेडियम वर खेळविण्यात आला होता. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाने पाच विकेट्सने विजय मिळविला. तसेच या आयपीएल सामन्यात विजय मिळवून मुंबई इंडियन्स संघाने पाचव्यांदा आयपीएल चषक आपल्या नावावर केला होता. मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळेस आयपीएल चषक जिंकलेला होता आणि मुंबई इंडियन्स संघ हा सर्वात जास्त आयपीएल चषक जिंकणारा संघ बनला होता. 

2021 विजेता संघ (चेन्नई सुपर किंग्स)

या हंगामातील अंतिम सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग संघाने बाजी मारली या अंतिम सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ अंतिम सामन्यात पोहोचले होते. हा सामना दुबई येथील स्टेडियमवर खेळण्यात आला होता. या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने 27 धावांनी विजय मिळविला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग संघाने चौथ्यांदा आयपीएल चषक जिंकला होता. 

2022 विजेता संघ (गुजरात टायटन्स) (IPL Winner Team List)

नव्याने बनलेला संघ गुजरात टायटन्स या संघाने आपला पहिल्याच आयपीएल हंगामामध्ये आयपीएल चषक आपल्या नावावर केला. (IPL Winner Team List) गुजरात टायटन्स हा संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळत होता या हंगामातील अंतिम सामन्यामध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमने-सामने आले होते. हा सामना अहमदाबाद येथील स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. या अंतिम सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्स वर 6 विकेट्स सहज विजय मिळविला. पहिल्याच आयपीएल चषकमध्ये गुजरात टायटन संघाने आयपीएल चषक जिंकला होता. 

2023 विजेता संघ (चेन्नई सुपर किंग्स)

2023 च्या आयपीएल चषक मधील अंतिम सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ भिडले होते. हा सामना अहमदाबाद येथील मैदानावर खेळविण्यात आला होता. या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग संघाने गुजरात टायटन्स वर 5 विकेट्सनी विजय मिळविला. गुजरात टायटन संघ हा दुसऱ्यांदा फायनल मध्ये पोहोचला होता. या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग संघाने बाजी मारत पाचव्यांदा आयपीएल चषक आपल्या नावावर केला. आणि मुंबई इंडियन संघाची बरोबरी केली मुंबई इंडियन संघ आणि चेन्नई सुपर किंग संघ या दोन्ही संघाने 5-5 वेळेस आयपीएल चषक जिंकले आहेत. 

हे देखील वाचा : IND VS ZIM 3rd T20 Highlights : भारताने झिम्बाब्वेला 23 धावांनी चारली धूळ, 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने घेतली आघाडी

2024 विजेता (कोलकाता नाईट रायडर्स)

2024 च्या आयपीएल चषक मधील अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ पोहोचले होते. (IPL Winner Team List) हा सामना चेन्नई येथील मैदानावर पार पडला या अंतिम सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर संघाने 8 विकेट्स ने बाजी मारली आणि तिसऱ्यांदा आयपीएल चषक आपल्या नावावर केला. कोलकाता नाईट रायडर्स हा श्रेयस अय्यर च्या नेतृत्वाखाली खेळत होता.

सर्वात जास्त वेळा आयपीएल जिंकलेला संघ 

क्रमांक IPL संघ IPL चषक जिंकलेले वर्ष 
1मुंबई इंडियन्स5 वेळा 2013,2015,2017,2019,2020
2चेन्नई सुपर किंग्स5 वेळा 2010,2011,2018,2021,2023
3कोलकाता नाईट रायडर्स3 वेळा 2012,2014,2024
4सनरायझर्स हैदराबाद1 वेळा 2016
5राजस्थान रॉयल्स1 वेळा 2008
6डेक्कन चार्जर्स1 वेळा 2009
7गुजरात टायटन्स1 वेळा 2022
Most IPL Trophy Winner Team List

आतापर्यंत झालेल्या सर्व आयपीएस सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांनी 5-5 वेळेस आयपीएल चषक जिंकलेला आहे. (IPL Winner Team List) पहिल्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स या संघाने 5 वेळा दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स या संघाने देखील 5 वेळा आयपीएल चषक जिंकलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स या संघाने 3 वेळा आयपीएल चषक जिंकलेला आहे.

हे देखील वाचा : Maruti Suzuki EECO : या कार ने मार्केट मध्ये घातलाय धुमाकूळ, जाणून घ्या कींमत

चौथ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद या संघाने 1 वेळेस आयपीएल ट्रॉफी जिंकलेली आहे. पाचव्या क्रमांकावर राजस्थान रॉयल संघ आहे या संघाने 1 वेळेस आईपीएल ट्रॉफी जिंकलेली आहे. सहाव्या क्रमांकावर डेक्कन चार्जेस या संघाने 1 वेळेस आयपीएल ट्रॉफी जिंकलेली आहे. (IPL Winner Team List) सातव्या क्रमांकावर गुजरात टायटन्स या संघाने देखील 1 वेळेस आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केलेली आहे.

Spread the love
Exit mobile version