Site icon Get In Marathi

Lek Ladki Yojana : या योजनेचा पण घ्या लाभ, मिळतील तब्बल 1 लाख रुपये

Lek Ladki Yojana : या योजनेचा पण घ्या लाभ, मिळतील तब्बल 1 लाख रुपये

Lek Ladki Yojana : सध्या संपूर्ण राज्यभरात फक्त एकच योजना दुमदुमली आहे, ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना परंतु या योजनेच्या नादामध्ये आपण एका योजनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हि योजना लाडकी बहीण योजनेपेक्षाही सरस असून या योजनेत अधिक लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे.

Lek Ladki Yojana

या योजनेचे नाव लेक लाडकी योजना असे आहे. या योजनेअंतर्गत भरगच्च रक्कम सरकारकडून मिळणार आहे. या योजनेनुसार एखाद्या घरात मुलीने जन्म घेतला तर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने 101000/- रुपये देण्यात येतात. ही योजना नेमकी काय आहे, तिची अट काय आहे जाणून घेऊया. 

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच राज्य सरकारने अनेक घोषणा केल्या आहे. लाडकी बहीण या योजनेला मोठा प्रतिसाद राज्यातून मिळाला आहे. Lek Ladki Yojana त्यानंतर शिंदे सरकारने लाडका भाऊ योजनाही घोषित केली आहे. लाडकि बहिण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा 1500/- रुपये दिले जातात. पण या योजने अगोदरच सरकारने मुलींसाठी लेक लाडकी योजना ही घोषित केली होती. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

लेक लाडकी योजना / Lek Ladki Yojana

राज्य सरकारने महिलांसाठी या अगोदरच अनेक योजना सुरू केलेल्या आहे. लाडकी बहीण योजनेपूर्वीच लेक लाडकी योजना सरकारने सुरू केली होती. या योजने अंतर्गत मुलीच्या जन्मापासून तर ती 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये रक्कम सरकारकडून देण्यात येते. या योजनेमध्ये पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचा लाभ हा 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या मुलींना घेता येतो. 

कोणत्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार?

या योजनेचे पैसे हे टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. यामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर 5 हजार रुपये कुटुंबाला मिळणार आहेत. त्यानंतर मुलगी पहिली मध्ये गेल्यानंतर 6 हजार रुपये मिळतील. मुलगी सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये कुटुंबाला मिळणार आहे. तसेच पुढच्या शिक्षणासाठी ही सरकारकडून पैसे देण्यात येणार आहे. मुलगी अकरावीत गेली की 8 हजार रुपये मिळतील आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर एकूण 75 हजार रुपये सरकारकडून मिळणार आहे.

या योजनेसाठी काय अटी आहे?

या योजनेचा लाभ फक्त त्याच मुलींना घेता येणार आहे, ज्या मुलींचा जन्म हा 1 एप्रिल 2023 या दिवसानंतर झालेला असेल. तसेच पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंब या योजनेसाठी पात्र असणार आहे. तसेच ज्या मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. या कुटुंबाचे बँकेत खाते असणे देखील गरजेचे आहे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच पहिले आपत्य तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्य दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आणिवार्य असणार आहे. 

अर्ज कसा भरायचा? 

Lek Ladki Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना हा तुमच्या अंगणवाडीत देखील अर्ज करू शकता. या अर्जामध्ये वैयक्तिक, माहिती मोबाईल नंबर, रहिवासी पत्ता, बँक खात्याची माहिती मुलीची माहिती द्यावी लागते. 

या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहे? 

Lek Ladki Yojana लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेले कागदपत्र आवश्यक असणार आहे. 

हे देखील वाचा : Manikpunj Dam : माणिकपुंज धरण भरले, या गावांना होणार फायदा

Spread the love
Exit mobile version