Lightening : Mobile मुळे खरच वीज पडते का ?

Lightening : Mobile मुळे खरच वीज पडते का ?

Lightening
Lightening

Lightening : Mobile मुळे खरच वीज पडते का ?

 Lightening : वीज मुख्यत मे पासून ते जुलै महिन्यापर्यंत जास्त पडतात. विज पडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आपण त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकत नाही.वीज पडल्यामुळे जगात दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात.पावसळ्याला सुरुवात झाली की सुरुवातीच्या काळातच वीज ह्या जास्त पडत असतात. पावसाळ्याच्या तोंडी  वातावरण हे देखील भयानक असते. सुरुवातीच्या दोन महिन्यात आपणास विजांचा कडकडाट आणि वादळ जास्त बघायला मिळते.

Lightening जोऱ्याचा वारा,वादळआणि विजाचा कडकडाट यामुळे सुरुवातीला विजा या जास्त पडत असतात.या दिवसात पडणारा पाऊस हा अचानक येऊन कोसळतो यामुळे आपण जर कुठे बाहेर असेल तर आपणाला जास्त वेळही मिळत नाही की आपण लवकर कुठलाही निवारा घेऊ. अचानक येणारा पाऊस त्यामुळे बहुतांश लोक हे घराच्या बाहेर असतात आणि त्याच वेळेस जर पाऊस आला तर घरी पोहोचण्याच्या आतच पावसाला सुरुवात होते आणि विजांचा कडकडाला देखील सुरुवात होते आणि त्याच वेळेस जर वीज पडली तर जीवितहानी होण्याची शक्यता ही जास्त असते.वीज पडण्यावरून देखील लोकांमध्ये खूपच गैरसमज आहेत.

पाऊस पडणे,वीज पडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ती तर काय आपण कंट्रोल करू शकत नाही त्यासाठी आपण स्वतः काळजी घेणे गरजेचे असते.पावसाचे वातावरण झाले की लवकरच आपण घराचा आसरा घ्यावा.

चला तर जाणून घेऊया वीज का पडते ?

विज पडू नये किंवा त्यावर कंट्रोल करणे हे तर काय आपण करू शकत नाही ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे आपण त्याला थांबवू शकत नाही.Lightening परंतु भीती आणि अज्ञानामुळे  होणारे नुकसान आपण थांबवू शकतो त्यासाठी  वीज कशी बनते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

आकाशामध्ये थंड आणि गरम हवा यांचे मिश्रण असते आपल्याला जसे की माहित आहे थंड हवा हि जड असते तर गरम हवा ही वजनाने हलकी असते. ज्यावेळेस जमिनीवर गरम हवा तयार होते आणि ती आकाशात जाते आणि ती हवा वर गेल्यानंतर थंड होते त्यावेळेस गरम हवेचे रूपांतर हे थंड होऊन पावसाच्या थेंबा मध्ये होते आणि हेच पावसाचे थेंब थंड झाल्यामुळे त्यांचे रूपांतर हे  हिम  कणांमध्ये होते.Lightening हे हिम कन जड झाल्यामुळे जमिनीकडे येतात आणि खालून वर जाणारी गरम व्हावा त्याचबरोबर पाण्याचे थेंब यांच्यामध्ये घर्षण होण्यास सुरुवात होते.एकाच ठिकाणी जास्त गरम हवा पाण्याचे थेंब आणि हिम कन हे आल्यानंतर यांच्यामध्ये खूप असे घर्षण होते. आणि जास्त घर्षण झाले की त्यांच्यामध्ये विद्युतभार तयार होतो.

तोच विद्युतभार म्हणजे विज होय.हिमकानांमध्ये रुण भार तयार होतो. आणि तो ऋणभार हिमकना सोबत जमिनीकडे येऊ लागतो आणि गरम हवां सोबत असलेला धनभार हा आभाळाच्या वरील भागात जमा होतो. तसे तर हवा ही एक विद्युत रोधक आहे हवेमधून विद्युत ही वाहू शकत नाही. परंतु जेव्हा भार वाढतो तेव्हा हवेचे  आयोनायझेशन होऊन  हवा ही विद्युत वाहक होते. Lightening आणि मग तीच हवा आपल्या सोबत खूप सारा प्रचंड विद्युत भार घेऊन जमिनीकडे वेगाने येते आणि जवळील भाग बघून त्या ठिकाणी वीज ही पडते.

वीज ज्यावेळेस तयार होते तेव्हा तिच्यामध्ये प्रचंड असा विद्युतभार तयार होतो हा विद्युत भार आपल्या घरातील वापरात येणारे होल्टेज पेक्षा हजारो पटीने जास्त असते आणि हा प्रचंड असा विद्युतभार ज्यावेळेस जमिनीकडे वेगाने येतो त्यावेळेस त्यामध्ये उष्णता ही सूर्याच्या उष्णतेपेक्षा हजार पटीने जास्त असते त्यामुळे विज ही मुख्यतः ओल्या भागात पडते जसे की पाण्यावर किंवा एखाद्या झाडावर. जेणेकरून वीज मध्ये असणारी उष्णता ही निघून जाईल.Lighteningघरातील यंत्रणा या विजेवर चालत असतात आणि ही विज जिथे तयार होते तेथून आपल्या घरापर्यंत येण्यासाठी धातूच्या तारेचा उपयोग होतो.

म्हणजे असे की विद्युतभार हा एका भागावरून दुसरीकडे जाण्यासाठी विद्युत वाहक गरजेचे असते. तसेच आकाशात तयार होणारी वीज ही देखील एखाद्या विद्युत वाहकाचा आधार घेण्याच्या शोधात असते.जसे कि पाणी, धातू,झाडे हे सर्व विद्युत वाहक आहेत. त्यामुळे वीज हि जास्त करून झाडांवर किंवा एखाद्या ओल्या ठिकाणी पडत असते. 

मोबाईल वापरणे धोक्याचे !

आपण मोबाईलवर बोलत असताना आपला मोबाईल हा मोबाईल टावर सोबत कनेक्ट असतो. आपण ज्यावेळेस मोबाईलवर बोलतो त्यावेळेस आपला आवाज हा ध्वनी लहरी च्या आधारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो. या ध्वनी लहरी आकाशातून वाहत असतात. आणि ज्या वेळेस आपल्या मोबाईलचा डेटा हा ऑन असतो.

त्यावेळेस आपला मोबाईल हा सतत मोबाईल टावर आणि इंटरनेट सोबत कनेक्ट असतो. आणि ज्या वेळेस विजा चमकतात किंवा पडतात त्यावेळेस विजा या त्या लहरींचा आधार घेऊन आपल्यापर्यंत पोहोचू शकतात.त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते.Lightening म्हणून जेव्हा पावसाचे वातावरण तयार होते किंवा विजांचा आवाज येतो त्यावेळेस मोबाईलचा डेटा ऑफ,फ्लाईट मोड करून ठेवणे किंवा मोबाईल स्विच ऑफ करणे गरजेचे असते.

वीज कुठे पडते !

आकाशामध्ये विजा या कायमच होत असतात. संपूर्ण विजा या जमिनीवरच कोसळतात असे नाही.आकाशात होणाऱ्या विजांपैकी फक्त 4 ते 5 टक्केच विजा या जमिनीवर कोसळत असतात.आकाशामध्ये प्रत्येक सेकंदाला 40 ते 50 विजा या चमकत असतात.आकाशात असणारी गरम हवा आणि थंड हवा यांच्या  मधील ऋणभार आणि धन भार या फरकामुळे विज हया एकसारख्या उत्पन्न होतच असतात.यापैकी काही विजांचा आवाज हा जमिनीपर्यंत येतो तर काही  विजांचा आवाज हा जमिनीपर्यंत पोहोचत नाही.

संपूर्ण विजा या जमिनीपर्यंत देखील पोहोचत नाही त्यांचा विद्युत भार हा जमिनीपर्यंत पोहोचण्या अगोदरच संपून जातो. जास्त विजा या  समुद्रातील पाण्यावर पडत असतात.समुद्रावर होणारे बाष्पीभवन आणि आकाशात असणारी गरम हवा यामुळे तेथील वातावरनात बदल होतो आणि त्यामुळे तिथे जास्त विजा पडत असतात.Lightening वीज ही पडत असताना प्रचंड असा वेग असतो त्याचबरोबर तिच्यामध्ये हजारो व्होल्टेज इतका विद्युत भार असतो त्यामुळे जेव्हा वीज जमिनीवर कोसळते तेव्हा प्रचंड असा आवाज तयार होतो.

 विज ही सरळ माणसाच्या अंगावरच पडते असे नाही वेगवेगळ्या प्रकारे विज हि पडत असते. वीज ही आपल्या शेजारील वस्तूवर देखील पडू शकते आणि तेथून आपल्याला तिचा प्रभाव जाणू शकतो. किंवा वीज ही सरळ आपल्या शरीरावर देखील पडू शकते.किंवा वीज ही एखाद्या झाडावर देखील कोसळून शकते.

विजेमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण !

विजा या मुख्यतः मे पासून जुलै महिन्यांपर्यंत जास्त पडत असतात.weather या काळामध्ये जमिनीचे तापमान हे जास्त असते त्यामुळे जमिनीवरील गरम हवा हि एकसारखी आकाशाकडे जात असते. आकाशात असणारे पाण्याच्या वाफा आणि गरम हवा यांच्यात प्रक्रिया होऊन पाण्याचे थेंब तयार होते.पाण्याचे थेंब आणि गरम हवा यांच्यात घर्षण होऊन वीज तयार होते.Lightening सन 2003 ते 2013 यामध्ये भारतात विजे मुळे मृत्युमुखी पडलेल्या मध्ये 71% पुरुष तर 28 % स्त्रिया आहेत. भारतामध्ये सर्वात जास्त विजा मुळे होणारे मृत्यूचे प्रमाण हे मध्य प्रदेश राज्यांमध्ये जास्त आहे, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. मराठवाड्यात 2004 ते 2011 मध्ये विज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे.

विज पडल्यानंतर  मनुष्य हा मृत्युमुखीच  पडतो असे नाही . विज पडलेल्या पैकी फक्त  10 ते 20 % मनुष्य मृत्युमुखी पडतात.वीज पडल्यानंतर त्वरित त्या मनुष्यावर इलाज केला तर त्याचे जीव वाचू शकतात. विज ही जर मनुष्याच्या अंगावर सरळ पडलेली असेल तर जीव गमावण्याची शक्यता जास्त असते.Lightening परंतु तेच जर वीज काही अंतरावर पडली असेल तर मनुष्य  सुरक्षितपणे वाचू शकतो. विज पडण्याच्या अभ्यासावरून लक्षात येते की वीज जास्त करून मोकळ्या मैदानात, झाडांवर, पाण्यात, उंच ठिकाणी, डोंगरावर जास्त पडते.

काही लोकांमध्ये हा गैरसमज आहे की वीज पडणे हा देवाचा एक प्रकोप आहे. परंतु हे तसलं काही नसून ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.लोकांमध्ये वीज पडण्या संबंधित असणारे काही गैरसमज आपण जाणून घेऊ.

वीज पडण्या संबंधित असणारे काही गैरसमज

  • वीज  ही नेहमी लिंबाच्या झाडावर पडते :

काही लोकांमध्ये हा समज आहे की वीज ही नेहमी लिंबाच्या झाडावरच पडत असते परंतु तसे काही नाही वीज पडणे हे नैसर्गिक प्रक्रिया असून ती कोणत्याही झाडावर पडू शकते. लिंबाच्या झाडांमध्ये असे काही वेगळे सत्व नाही की वीज त्यावरच पडेल. वीज हि नेहमी आपल्या जवळच्या वस्तूवर पडत असते मग ते कोणतेही झाड असो किवा वस्तू.

  • काळया ढगांखाली उभे असल्यावर आपल्यावर वीज पडते 

असे 100% नाही की आपण काळया ढगांखाली उभे राहिल्यावर वीजच पडेल. परंतु वीज ही पडू पण शकते कारण काळे ढग म्हणजे आकाशात घन दाट असे हिमकण साचलेले असते आणि त्याचबरोबर तिथे खूप सारी गरम हवा देखील असते. Lightening यांचे प्रमाण जास्त असल्यावर ढग हे काळे दिसते आणि काळया ढगांमध्येच विजा जास्त उत्पन्न होतात. त्यामुळे तिथे वीज पडण्याचे शक्यता देखील असते. त्यामुळे आपण तेथून बाजूला गेलेलेच बरे. 

  • चार चाकी किंवा दुचाकी वाहनावर वीज पडत नाही ! 

हा एक गैरसमज आहे.वीज ही कोणत्याही वस्तूवर पडू शकते मग ती दुचाकी वाहन असो किंवा चार चाकी वाहन विजेला जी वस्तू जवळ असेल त्या ठिकाणी वीज हि पडते. 

  • ज्या माणसावर वीज पडते तो माणूस मरण पावतो !

विज पडलेल्या व्यक्तींपैकी फक्त 10 % हे मरण पावतात.Lightening त्यामुळे ज्या माणसावर वीज पडली तो माणूस मरण पावतो हा देखील गैरसमज आहे. वीज पडल्यानंतर आपण तत्काळ त्या व्यक्तीवर इलाज केल्यास ती व्यक्ती संपूर्णपणे धोक्यातून वाचू शकते. 

  • ज्या ठिकाणी एकदा वीज पडली त्या ठिकाणी परत वीज पडत नाही 

हा एक गैरसमज आहे विज पडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून वीज पडताना ती ढग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावरूनच खाली पडते आणि विज ही आपल्या जवळच्या वस्तू वर पडते त्यामुळे एकदा ज्या ठिकाणी वीज पडली त्या ठिकाणी देखील पुन्हा पडू शकते. 

  • विज पडलेल्या व्यक्तीला हात लावणे धोक्याचे आहे. 

विज ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर पडते त्यावेळेस विज मध्ये खूप सारे व्होल्टेज असते परंतु एकदा का वीज पडली त्यानंतर काहीच सेकंदातच वीज ही पूर्णतः जमिनीत निघून जाते आणि ती ज्या व्यक्तीवर पडली असेल किंवा जमिनीवर त्या ठिकाणी परत सर्वसाधारण परिस्थिती तयार होते. त्यामुळे वीज पडलेल्या व्यक्तीला हात लावून धोक्याचे अजिबात नाही. 

हे देखील वाचा : Dhruv Rathee : एका भारतीय युवकाने जर्मनी मध्ये बसून BJP पक्षाला घाम फोडला आहे.

विजा चमकत असताना घ्यावयाची काळजी 

  • आपण जर पाण्याच्या ठिकाणी असेल किंवा ओल्या जागेवर असेल तर तिथून त्वरित घराकडे किंवा एखाद्या कोरड्या जागेवर जाणे.Lightening
  • झाडापासून त्वरित दूर जाणे, एखाद्या उंच वस्तु पासून दूर जाणे. 
  • आपण जर शेतात काम करत असाल किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर असेल तर त्वरित घराचा आसरा द्यावा 
  • आपल्याला जर निवारा जवळ नसेल तर जमिनीपासून एखाद्या खोल भागाकडे जावे किंवा एखाद्या खड्ड्याकडे जाऊन बसणे. 
  • नदी किंवा धरणा जवळ असेल तर त्वरित तिथून लांब सुरक्षित ठिकाणी जाणे. Lightening
  • ओल्या जागेवर बसणे टाळावे. आणि खाली बसताना आपल्या तळ पायावर बसणे व आपले गुडघ्याला धरून बसावे. 
  • आपण जर वाहनांनी प्रवास करत असाल तर सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करून वाहनांमध्येच बसून राहावे. 
  • मोबाईलचा टावर किंवा इलेक्ट्रिसिटी चा खांब यांच्यापासून दूर उभे रहावे..
  • जर आपण सायकल दुचाकी किंवा ट्रॅक्टरने प्रवास करत असाल तर त्यावरून उतरून त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे. 
  • आपल्याजवळ एखादी लोखंडी वस्तू असेल तर ती त्वरित बाजूला करून तिच्यापासून दूर राहणे. विज ही धातूच्या वस्तूकडे आकर्षित होत असते त्यामुळे धातूच्या वस्तू पासून दूरच राहावे.Lightening
  • घरातील विजेवर चालणारे सर्व यंत्रणा टीव्ही फ्रिज फॅन मोबाईल चार्जर आणि इतर सर्व यंत्रणा बंद करून ठेवणे. 
  • घरातील विजेवर चालणारे सर्व यंत्रणा पासून लांब उभे राहावे.
Spread the love