Site icon Get In Marathi

Mahavitran Solar Pump : सोलर पंप साठी महावितरण कडून अर्ज सुरू, हे शेतकरी ठरणार अपात्र, या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करा

Mahavitran Solar Pump : सोलर पंप साठी महावितरण कडून अर्ज सुरू, हे शेतकरी ठरणार अपात्र, या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करा

Mahavitran Solar Pump

Mahavitran Solar Pump : महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या कुसुम सोलर पंप योजनेला प्रचंड असा प्रतिसाद लाभलेला असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. याचा अनुषंगावर आता महावितरण कंपनी कडून देखील शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यासाठी महावितरण कंपनीने नवीन पोर्टल तयार केले असून यामध्ये पात्र शेतकरी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज करू शकता. (Mahavitran Solar Pump) सोलर पंप या योजनेला सुरुवात झालेली आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे आहे. 

कुसुम सोलर पंप योजना पात्रता 

काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेल्या कुसुम सोलर पंप योजने प्रमाणेच आता शेतकऱ्यांना महावितरण कडून देखील एक लाख कृषी सौर पंप देण्यात येणार आहे. यासाठी महावितरण कंपनीकडून नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. याकरिता शेतकऱ्यांना संबंधित वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला या लेखाच्या शेवटी देण्यात आलेली आहे. परंतु या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी काही अटी आहे, या अटी वाचल्यानंतर शेतकऱ्यांनी अर्ज करावा खाली देण्यात आलेल्या अटी वाचून पात्र असल्यास या योजनेसाठी अर्ज करावा.

आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला असेल की कसम सोलर पंपाची नोंदणी सध्या तरी बंद आहे, मग ही नवीन सोलर पंप योजना कोणती ? महावितरण कंपनीने घेतलेल्या निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांनी नवीन वीज कनेक्शन साठी अर्ज केलेला आहे. परंतु त्यांची वीज जोडणी अजून प्रतीक्षेत आहे आणि ज्यांनी महावितरण कडे नवीन वीज कनेक्शन साठी पैसे भरलेले आहे. हेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे. म्हणजे ही योजना सरसकट सर्व शेतकऱ्यांसाठी असणार नाही. (Mahavitran Solar Pump)

या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नवीन वीज कनेक्शन साठी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांचे अजून वीज कनेक्शन स्थापित झालेले नाही आणि त्यांनी महावितरण कडे नवीन वीज कनेक्शन साठी पैसे देखील भरलेले आहे. याच अर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि यासाठी महावितरण कंपनी या अर्जदार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देणार आहेत. 

हे शेतकरी ठरणार अपात्र !

ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि तुम्ही परत या योजनेसाठी अर्ज करत असाल तर अर्ज करताना तुम्हाला तुमचा आधार क्रमांक यापूर्वी कुसुम सोलर पंप योजनेसाठी नोंदलेला आहे, असे दाखवण्यात येईल त्यामुळे आपण नवीन अर्जाची नोंदणी त्या आधार क्रमांक वर करू शकणार नाही याची नोंद घ्यावी. 

अर्ज कुठे आणि कसा करावा ?

तुम्ही जर नवीन वीज कनेक्शन साठी महावितरण कडे कोटेशन भरले आहे आणि तुमचे नाव हे प्रतीक्षा यादी मध्ये आहे आणि जर तुमची इच्छा असेल की विद्युत कनेक्शन ऐवजी कृषी सोलर पंप घेण्याची तर महावितरण कडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर तुमचा ग्राहक क्रमांक टाकून तुम्ही महावितरण कृषी सोलर पंप योजने साठी नोंदणी करू शकता. (Mahavitran Solar Pump) चला तर बघूया ऑनलाइन महावितरण कृषी सोलर पंप योजने साठी नोंदणी कशी करावी लागणार. 

  1. सर्वप्रथम खाली देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करावे त्यानंतर तिथे तुम्हाला “ पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का ” येथे Yes बटनावर क्लिक करा. 

नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा .

  1. त्यानंतर तुम्हाला ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा असे दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला महावितरण करून देण्यात आलेला ग्राहक क्रमांक तेथे टाकावा लागेल 
  2. त्यानंतर तुमची सविस्तर माहिती तिथे तुम्हाला दिसेल 
  3. पुढे देण्यात आलेल्या सर्व ठिकाणी तुमची माहिती भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करा वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर देण्यात येईल. 
  4. युजर आयडी आणि पासवर्ड भेटल्यानंतर कुसुम सोलर पंप योजनेच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी तुमचा सोलर पंप साठी अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा, नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. (Mahavitran Solar Pump)

नोंदणी केल्यानंतर लॉग इन करण्यासाठी येथे क्लिक करा 

हे देखील वाचा : Ladki Bahin Yojana : आता या तारखेला जमा खात्यात जमा होणार 3000/- रुपये

Spread the love
Exit mobile version