Site icon Get In Marathi

Maher Ghar Yojana 2024|माहेर घर योजना 2024|

Maher Ghar Yojana 2024| माहेर घर योजना 2024

Maher Ghar Yojana 2024

Maher Ghar Yojana 2024 : केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेत बचत गत, दारिद्र्य रेषेखालील समाजाला लाभ होणार आहे.यापैकी काही सोयी फक्त महिलांसाठी महाराष्ट्र सरकार गरोदर स्त्रियांसाठी नवीन उपक्रम राबवत आहे. दुर्गम भागात असणारी लोकवस्ती आणि त्या ठिकाणी खंडित होणारी दूरध्वनी सेवा यामुळे तेथील नागरिकांना सर्व सुविधा वेळेवर पोहचविणे शक्य नसते.सरकारचे ध्येय आहे कि राज्यातील दुर्गम भागात देखील सर्व आरोग्य सेवा पोहचविणे. या योजनेमुळे मुख्यत आदिवासी समाजाला लाभ होणार आहे.

Maher Ghar Yojana 2024 डोंगराळ भागातील लोकवस्ती साठी आरोग्य उपचार वेळेवर पोहचणे अवघड असते त्या कारणाने गरोदर महिलांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते.डोंराल भागात अपुर्या सोयी सुविधा आणि वाहतुकीस होणारे अडथळे यामुळे काही गरोदर महिलांना आणि बाळांना मृतुला सामोरे जावे लागते . या सर्व समस्यांवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने माहेर घर योजना उपक्रम राबवत आहे. सरकारचे उद्दिष्ट आहे कि या योजनेतून जास्ती जास्त आदिवसी आणि दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या लोकांना लाभ मिळावा .आणि लहान मुलांचे उप्चार्विना मृत्यूंचे प्रमाण कमी करणे . maher ghar yojana 2024 सरकार या योजने साठी जास्त भर देत आहे. या योजनेत सरकारला चांगला प्रतीसाद लाभत आहे . या योजनेमुळे वर्षाखेरीज ६०% लहान मुलाचं मृत्यू दर देखील कमी झाला आहे.

गर्भवती महिले सोबत असणार्या एक नातेवाईकाची राहण्याची आणि खाण्याची सोय देखील केलेली असते.तसेच या योजने अंतर्गत लाभ घेणारे जर दारिद्र्य रेषेखालील असतील तर लाभार्थ्याला ५००/- दिले जातात .

गरोदर महिलेला आरोग्य केंद्रात आणण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येते.गरोदर महिलेला ४ ते ५ दिवस अगोदर आरोग्य केंद्रात आणण्यात येते.Maher Ghar Yojana या योजनेत मिळणारी खोली (माहेर घर) मध्ये मुलभूत सोयी देखील दिलेल्या असतात. या घरामध्ये एक बेड , शौचालय ,स्नानगृह ,चूल,किचन ओटा , गरम पाण्यासाठी सोलर हिटर या सोयी दिलेल्या असतात.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या हि वर्षानुसार वाढत असल्याचे दिसत आहे. सन २०१० – ११ या यामध्ये लाभ घेणाऱ्यानची संख्या हि ९६९ होती.त्ती संख्या वाढत २०११- १२ मध्ये १७४० झाली . सरकार या योजनेचा प्रसार करण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवीत आहे.या योजनेसाठी सरकारने रु ८५ लक्ष्य अनुदान मंजूर केले होते.

या योजनेत ऐकून ९ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आले आहे. या जिल्हयामध्ये तुलनेने जास्त आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे. यात समावेश झालेले जिल्हे हे ९ असून यात ऐकून ५७ प्राथमिक आरोग्य केंद्र येत आहे. यात सहभागी असलेले ९ जिल्हे हे खालील प्रमाणे.

समावेश झालेले ९ जिल्हे खालील प्रमाणे.

१) माहेर घर योजना केव्हापासून राबविण्यात येत आहे ?

:- सन २०१०-२०११ या वर्षी पासून माहेर घर योजना राबविण्यात येत आहे.

२) या योजनेत लाभार्थ्याला कोणत्या सुविधा भेटतात ?

:- या योजने अंतर्गत गरोदर स्त्री आणि सोबत एक नातेवाईक यांना राहण्यासाठी एक खोली, राहण्याची आणि खाण्याची सोय केलेली असते.

३) लाभार्थ्याला आर्थिक मदत किती रुपयांची होते ?

:- या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला सरकार कडून ५००/- ची आर्थिक मदत मिळते .

४) योजनेत एकूण किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ?

:- या योजनेत महाराष्ट्रातून एकूण ९ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

५) योजनेत एकूण किती आरोग्य केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे ?

:- या योजनेत एकूण ५७ आरोग्य केंद्रांचा समावेश करण्यात आलेला आहे.

६) या योजनेचा लाभ सन २०२४ पर्यंत किती महिलांनी घेतला आहे ?

:- या योजनेचा लाभ आतापर्यंत एकूण २२४२३ महिलांनी घेतला आहे.

7) या योजनेत कोणते जिल्हे सहभागी झाले आहे ?

:- या योजनेत एकूण ९ जिल्ह्यांचा समावेश आहे.

Spread the love
Exit mobile version