Mahindra Bolero Power Plus : आली आहे महिंद्राची नवीन 9 सीटर बोलेरो, देशातील No 1 कार
Mahindra Bolero Power Plus : Mahindra कंपनीने 2021 मध्ये Bolero Neo Plus 9 सीटर व्हर्जन लॉन्च केले होते. या कारला देशभरात प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. आता Mahindra कंपनी Bolero मधील नवीन व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. (Mahindra Bolero Power Plus) नवीन व्हर्जन मध्ये कंपनी आता 7 सीटर कॅपॅसिटी ठेवणार आहे. Bolero Neo Plus या कार ला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे कंपनीने आता त्याच व्हर्जन मधील नवीन मॉडेल लाँच करण्याचे ठरविले आहे. हे नवीन मॉडेल Bolero Power Plus या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे.
Mahindra Bolero Power Plus मार्केटमध्ये नवीन नवीन कार सध्या येत आहे त्याचबरोबर सर्व कंपन्या नवीन कार मध्ये अत्याधुनिक फीचर्स वापरत आहे. तसेच Mahindra कंपनीने देखील या जुन्या मॉडेलमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करत नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. 2000 ते 2010 या कालावधीत Mahindra ची सर्वात टॉपला Bolero ही कार होती. त्या काळामध्ये Bolero कार चे खूपच आकर्षण होते. Bolero ही गाडी मजबूत असून चांगले मायलेज देते. त्याचबरोबर या गाडीची जमिनीपासून उंची जास्त असल्याने ग्रामीण भागात देखील ही गाडी परवडणारी होती.
तसेच ही सिटी आणि ऑफ रोडिंग यासाठी योग्य असल्याने ही एक अलराऊंडर गाडी ठरली होती. कंपनीने आता Bolero कार मध्ये नवीन डिझाईन, फीचर्स ॲड करत नवीन Bolero Power Plus ही गाडी मार्केटमध्ये लॉन्च करण्याचे ठरविले आहे. या नवीन डिझाईन केलेला गाडीमध्ये आता कंपनीने इंजिनची क्षमता देखील वाढविले आहे. जुन्या मॉडेलमध्ये हे इंजिन कमी Power चे होते आता या नवीन कार मध्ये या इंजिनची Power क्षमता आणि टोर्क जनरेट करण्याची क्षमता जास्त असणार आहे. चला तर जाणून घेऊया या नवीन Mahindra च्या 7 सीटर Bolero Power Plus गाडीबद्दल
Mahindra Bolero Power Plus शक्तिशाली इंजिन
या गाडीमध्ये कंपनीने आता नवीन अत्याधुनिक इंजिन वापरले आहे. ही गाडी डिझेल इंजिन असणार आहे या गाडीमध्ये M2Dicr डिझेल इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे. या इंजिनची क्षमता 1493 CC आहे. त्याचबरोबर हे इंजिन 62bhp@3200rpm एवढी Power जनरेट करू शकते. आणि 195nm@1400- 2200 rpm एवढा टोर्क जनरेट करू शकते.
या इंजिन ची क्षमता जास्तअसल्याने या इंजिनमध्ये चार सिलेंडरचा वापर करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक सिलेंडर सोबत 4 वाल दिलेले आहे. या वालचे कॉन्फिगरेशन SOHC या प्रकाराचे असून या इंजिनमध्ये इंधन सप्लाय साठी CRDI टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आलेला आहे. या इंजिनला टर्बो चार्जर ची सुविधा देण्यात आलेली आहे. यामध्ये ट्रान्समिशन हे मॅन्युअल असून 5 स्पीड गिअर देण्यात आलेले आहे आणि या गाडीमध्ये इंजिनची ताकद ही मागच्या चाकांना देण्यात आलेली आहे.
Mahindra Bolero Power Plus price
महिंद्राची ही 7 सीटर गाडी लवकरच मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहेत. या गाडीचे 7 व्हेरियंट असणार आहे. आणि या गाडीमध्ये एकूण 4 कलर उपलब्ध आहेत. 7 व्हेरियंट मध्ये उपलब्ध असणारी महिंद्राची ही गाडी ची किंमत ही व्हेरियंट नुसार वेगळी असणार आहे. बेसिक मॉडेल पासून तर टॉपच्या मॉडेल पर्यंत या गाडीमध्ये असणाऱ्या फीचर्स नुसार गाडीची किंमत ही असणार आहे. या मॉडेल मधील बेस मॉडेलची किंमत ही 7.43 /- लाख रुपये आहे आणि टॉप चे मॉडेलची किंमत 9.08 /- लाख रुपये असणार आहेत.
Mahindra Bolero Power Plus Mileage गाडीचे मायलेज
Bolero Power Plus ही गाडी डिझेल इंधन प्रकारात उपलब्ध आहे आणि या गाडीचे मायलेज हे कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 16.5 kmpl इतके आहे. त्याचबरोबर या गाडीमध्ये इंधन स्टोरेज करण्याची टाकीची कॅपॅसिटी ही 60 लिटर इतकी आहे आणि ही गाडी BS VI या नॉर्म्सवर आधारित आहे. तसेच या गाडीचा जास्त स्पीड हा 117 kmph इतका आहे.
Mahindra Bolero Power Plus सस्पेन्शन आणि ब्रेक
Mahindra ची Bolero Power Plus ही एक भक्कम गाडी असून तिचे वजन जास्त आहे. ही मोठी गाडी असल्याने या गाडीमध्ये सस्पेन्शन हे जास्त लोड कॅपॅसिटी चे वापरण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये पुढील चाकांसाठी IFS कॉईल स्प्रिंग वापरण्यात आली आहे. तर मागील चाकांसाठी इलेक्ट्रिकल लिफ स्प्रिंग वापरण्यात आले आहे. या सस्पेन्शन चा वापर हा मोठ्या गाड्यांसाठी होतो. ज्या गाडींचा ग्राउंड क्लिअरन्स जास्त असतो आणि ज्या गाडीचे वजन जास्त असते.
त्यासाठी या पद्धतीच्या सस्पेन्शन चा वापर करण्यात येतो. या गाडीमध्ये स्टेरिंग हे Power फुल देण्यात आलेले आहेत. त्यामुळे चालकाला सहजपणे गाडी वळवतात येते या गाडीचा टर्निंग रेडीयस 5.8 मीटर इतका आहे. या गाडीमध्ये पुढील चाकांसाठी डिस्क ब्रेक वापरली आहे. तर मागील चाकांसाठी ड्रम ब्रेक वापरण्यात आलेले आहे. या गाडीला 0 ते 100 kmph एवढा स्पीड मिळविण्याकरता फक्त 30 सेकंद लागतात.
Mahindra Bolero Power Plus गाडीचा आकार
Mahindra Bolero Power Plus ही एक मोठी गाडी असून या गाडीची सीटिंग कॅपॅसिटी ही 7 व्यक्तींची आहे. या गाडीची लांबी 4107 mm, रुंदी 1745 mm, उंची 1880 एम एम आणि जमिनीपासून ग्राउंड क्लिअरन्स 180 mm इतका आहे. या गाडीचा व्हील बेस 2680 mm आहे. या गाडीचे वजन 1450 किलोग्रॅम इतके आहे.
Mahindra Bolero Power Plus नवीन सुविधा
Mahindra च्या या नवीन डिझाईन केलेल्या Bolero Power Plus गाडीमध्ये कंपनीने खूप साऱ्या सुविधा दिल्या आहेत. या गाडीमध्ये Power स्टेरिंग देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पुढील आणि मागील काचा या Power ऑपरेटेड आहे. तसेच गाडीमध्ये Power फुल AC दिलेला असून त्यासोबत हीटर देखील दिले आहे. या गाडीमध्ये रिमोट इंधन लीड ओपनर देण्यात आले आहे. ज्यामुळे आपण गाडीमध्ये बसूनच इंधन टाकीचे झाकण ओपन करू शकतो. त्यासाठी गाडीमधून उतरायची गरज पडत नाही.ॲक्सेसरीज Power आउटलेट देखील देण्यात आलेले आहे. ज्यामध्ये गाडीला लागणाऱ्या सर्व गरजेचे ॲक्सेसरीज देण्यात येतात. या गाडीमध्ये व्हॅनिटी मिरर देखील दिलेला आहे.
त्याचबरोबर पाठीमागे रीडिंग लॅम्प आणि हेड रेस्ट देण्यात आलेले आहे. तसेच मागील सीटच्या सेंटरला आर्म रेस्ट देण्यात आलेले आहे. हे आर्म रेस्ट खाली वर करता येते त्यामुळे गाडीतील स्पेस जास्त वापरता येतो.गाडीच्या पुढील आणि मागील सीटाना कप होल्डर देण्यात आलेले आहे. हे कप होल्डर ला अटॅच आहे. या नवीन डिझाईन केलेल्या गाडीमध्ये पाठीमागे पार्किंग सेन्सर देण्यात आलेला आहे. तसेच गाडीच्या मागचे सीट हे फोल्ड देखील होऊ शकतात. तसेच गाडीमध्ये ग्लो बॉक्स दिलेला आहे आणि गाडीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्हाईस कमांड देखील दिलेले आहे. गाडीच्या डॅशबोर्ड वरती यूएसबी चार्जर देण्यात आलेले आहे, सेंट्रल कन्सोल दिलेले आहे. तसेच गिअर वरती गिअर शिफ्ट इंडिकेटर देण्यात आलेले आहे.
Mahindra Bolero Power Plus गाडीच्या आत मधून लूक
या गाडीला आत मधून नवीन पद्धतीचे डिझाईन देण्यात आली आहे. खूप सारे फीचर्स देखील दिलेले आहे. कारच्या डॅशबोर्ड वरती ट्याकोमीटर देण्यात आलेले आहे. तसेच इलेक्ट्रिक मल्टी ट्रिप मीटर देखील दिलेले आहे. या गाडीचे सीट हे लेदरचे आहे आणि त्यावरती फॅब्रिकचे कव्हर देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये आपल्याला ग्लो बॉक्स देखील मिळतो आणि डॅशबोर्ड च्या वरती सेंटरला डिजिटल घड्याळ दिलेले आहे. तसेच गाडीमध्ये डिजिटल ओडोमीटर देखील दिलेले आहे. गाडीचे क्लस्टर हे देखील डिजिटल दिलेले आहे.
Mahindra Bolero Power Plus गाडीचा बाहेरून लुक
गाडीचा समोरून लुक हा एकदम जबरदस्त आणि भरगच्च असा दिसतो. यामुळे गाडी एकदम रुबाबदार दिसते. या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जास्त असल्याने ही गाडी खराब रोडवर देखील सहजपणे चालू शकते. आणि ऑफ रोडिंगला देखील ही गाडी अगदी सहजपणे चालू शकते. या गाडीला देण्यात आलेला रियर व्ह्यू कॅमेरा हा ऍडजेस्टेबल आहे. Mahindra Bolero Power Plus तसेच गाडी चालवत असताना पाठीमागच्या वाहनांना बघण्यासाठी देण्यात आलेला आरसा त्यामध्ये मध्ये स्पष्ट दिसण्यासाठी मागील काचला वायपर देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर वाशर आणि डीफॉगर काच साफ करण्यासाठी देण्यात आलेले आहे.
यामुळे मागील काच ही स्वच्छ करता येते आणि चालकाला मागील वाहने हे आरशामध्ये स्पष्टपणे दिसतात. या कारच्या सर्व चाकांना कव्हर देण्यात आलेली आहे. या गाडीला अलॉय व्हील दिलेले नाही. तसेच गाडीच्या वरती Power अँटिना देण्यात आलेला आहे. कारच्यासमोर ऍडजेस्टेबल हेड लॅम्प देण्यात आलेले आहे तसेच हेड लॅम्प हॅलोजन प्रकाराचे आहे. या गाडीमध्ये आपल्याला सनरूफ मिळत नाही. या गाडीच्या सर्व टायरची साईज ही 215/75R15 अशी आहे. तसेच हे सर्व टायर ट्यूबलेस रेडियल आहे. या गाडीमध्ये वापरलेल्या सर्व टायरची साईज ही 15 इंच इतकी आहे.
Mahindra Bolero Power Plus या गाडीची सुरक्षा बाबत सुविधा
Mahindra Bolero Power Plus या गाडीमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिमचा वापर करण्यात आलेला आहे. या ब्रेकिंग सिस्टीम मुळे गाडी ही स्लिप होत नाही अचानक जरी ब्रेक दाबला तरी गाडीचा स्पीड हा हळुवार कमी होत जातो. परंतु गाडीचे चाक आहे स्लीप मारत नाही आणि त्यामुळे गाडी पलटी होण्याची भीती राहत नाही. Mahindra Bolero Power Plus या गाडीला सेंट्रल लॉकिंग देण्यात आलेले आहे त्यामुळे फक्त एका स्विच ने गाडीचे सर्व दरवाजे हे लॉक होऊ शकतात. तसेच गाडीचे लॉक हे Power ऑपरेटेड आहे. Mahindra कंपनीने या गाडीमध्ये एकच एअर बॅग दिलेली आहे.
जी फक्त ड्रायव्हर साठी आहे पॅसेंजर च्या साईडने एअरबॅग देण्यात आलेली नाही. तसेच पॅसेंजर साईडने रियर व्ह्यू आरसा देखील दिलेला आहे. या गाडीच्या मागील आणि पुढील सीटांना सीट बेल्ट देण्यात आलेले आहे. तसेच आधुनिक टेक्नॉलॉजीचा देखील यामध्ये वापर करण्यात आलेला आहे जसे की सीट बेल्ट वार्निंग, डोअर अजर वार्निंग, साईड इम्पॅक्ट या पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा देखील वापर करण्यात आलेला आहे. या गाडीमधील सीट हे ऍडजेस्टेबल देण्यात आलेले आहे तसेच इंजिन इमोबलाइजर, सेंट्रल माउंटिंग, इंजिन चेक वार्निंग, अँटी थिफ्ट डिवाइस, अशा अनेक सुरक्षा सुविधांचा उपयोग या गाडीमध्ये करण्यात आलेला आहे.
Mahindra Bolero Power Plus मनोरंजनात्मक सुविधा
या गाडीमध्ये कंपनीने सीडी प्लेयर दिलेले आहे त्याचबरोबर रेडिओ देण्यात आलेला आहे. या गाडीच्या पुढील आणि मागील दरवाजांना स्पीकर दिलेले आहे. Mahindra Bolero Power Plus तसेच कंपनीने या गाडीसोबत ऑडिओ सिस्टीम देखील दिलेली आहे आणि या म्युझिक सिस्टीमला यूएसबी कनेक्टिंग सुविधा दिलेली आहे. तसेच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये एकूण 4 स्पीकर दिलेले आहेत. तसेच गाडीमध्ये व्हॉइस मेसेज टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे.
हे देखील वाचा : TATA Nexon CNG : आली आहे देशातील no 1 CNG कार, जाणून घ्या कींमत