Mahindra Thar Roxx Launch : Thar चाहत्यांसाठी आनंदाची बातमी या तारखेला होणार Thar Roxx लॉन्च, जाणून घ्या कींमत

Mahindra Thar Roxx Launch : Thar चाहत्यांसाठी आनंदाची बातमी या तारखेला होणार Thar Roxx लॉन्च, जाणून घ्या कींमत

Mahindra Thar Roxx Launch
Mahindra Thar Roxx Launch

Mahindra Thar Roxx Launch : थार चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा नवीन Thar Roxx 15 ऑगस्ट ला लॉन्च करणार आहे. Mahindra कंपनीची 5 डोअर असणारी SUV कार आता लवकरच मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. (Mahindra Thar Roxx Launch) यापूर्वी Mahindra थार ही 3 डोअरमध्ये उपलब्ध होती परंतु आता तिच्यामध्ये खूप मोठे बदल करत आता हि थार आपल्याला 5 डोअरमध्ये उपलब्ध होणार असून तिच्यामध्ये भरपूर सारे बदल करण्यात आलेले आहेत. Mahindra ची थार ही देशभरात खूप प्रसिद्ध आहेच आणि देशात या कारचे लाखो चाहते आहेत. आता त्यामध्ये भर पाडत Mahindra कंपनीने आपली 5 डोअर असणारी नवीन SUV कार मार्केटमध्ये उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mahindra Thar Roxx बद्दल 

Mahindra कंपनीने जाहीर केले आहे की 15 ऑगस्टला त्यांची Mahindra Thar Roxx कार मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. Mahindra Thar Roxx ही 5 डोअरची असणार आहे, यापूर्वी Mahindra थार ही कार 3 डोअरंमध्ये उपलब्ध होती. परंतु कंपनीने आता 5 डोअरमध्ये हि कार उपलब्ध केली आहे. (Mahindra Thar Roxx Launch) Mahindra कंपनी 5 डोअर असलेली थार कार मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे हे अगोदरच माहीत होते, परंतु तिच्या नावाबद्दल मार्केटमध्ये खूप सारे गैरसमज होते.

Mahindra आपली ही नवीन 5 डोअर Thar ही कार आर्माडा या नावाने मार्केटमध्ये उतरवीणार असे सर्वाना वाटत होते. परंतु कंपनीने ते चुकीचे ठरवत आपल्या नवीन 5 डोअर असलेल्या थार चे नाव Thar Roxx हे ठेविले आहे. आता ही नवीन Mahindra Thar Roxx कार 15 ऑगस्टला बाजारात उपलब्ध होणार आहे. लुकच्या बाबतीत ही कार 3 डोअर असलेल्या थार या गाडीसारखी असणार आहे. परंतु आता या Thar Roxx कारची लांबी, रुंदी, केबिन हे वाढविण्यात आले आहे. 

Mahindra Thar Roxx Price कार ची किंमत 

Mahindra कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही Thar Roxx ऑगस्टमध्ये लॉन्च होणार असून त्याबद्दल संपूर्ण माहिती अजून मिळालेली नाही. तरीपण या कारची किंमत ही 3 डोअर असलेल्या Mahindra थार या गाडीपेक्षा जास्त असणार आहे. (Mahindra Thar Roxx Launch) कारण की या गाडीची लांबी रुंदी आणि केबिनची क्षमता वाढविली असून या कारला 5 दरवाजे देण्यात आलेले आहेत, तरीपण मिळालेल्या माहितीनुसार या कारची किंमत ही 15 लाख ते 22 लाख रुपये पर्यंत असू शकते. ही किंमत एक्स शोरूम असणार आहे यामध्ये आरटीओ चार्जेस आणि बाकीचे चार्जेस एक्स्ट्रा असणार आहेत. 

Mahindra Thar Roxx Engine Specifications कार इंजिन 

Mahindra Thar Roxx कार SUV सेगमेंट मध्ये आहे आणि ती ऑफ रोडींग साठी डिझाईन करण्यात आलेली आहे. ऑफ रोडींग साठी लागणारे सर्व फीचर्स या कारमध्ये देण्यात आलेले आहेत. या कारमध्ये आपल्याला डिझेल इंजिन मिळणार असून त्याची क्षमता ही 2184 CC असणार आहे. (Mahindra Thar Roxx Launch) या इंजिन मध्ये 4 सिलेंडर आणि 4 वाल मिळणार आहेत. तसेच या इंजिन मध्ये आपल्याला मॅन्युअल ट्रान्समिशन मिळणार आहे.

Mahindra कंपनी Thar Roxx ही कार पेट्रोल आणि डिझेल या 2 व्हेरियंट मध्ये कार उपलब्ध करणार आहेत. यामध्ये 2 Litre टर्बो पेट्रोल इंजिन आणि 2.2 Litre डिझेल इंजिन मिळू शकते. त्याचबरोबर ही कार 6 स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन वर उपलब्ध होऊ शकते. या कारमध्ये टू व्हील ड्राईव्ह आणि फोर व्हील ड्राईव्ह हे कॉन्फिगरेशन देखील मिळू शकते. ही कार ऑफ रोडींग असल्याकारणाने या नवीन डिझाईन केलेल्या Mahindra Thar Roxx या कार मध्ये फोर व्हील ड्राईव्ह दिलेले असणार आहे.

Mahindra Thar Roxx Seating Capacity सीटिंग कॅपॅसिटी 

Mahindra कंपनीने नवीन डिझाईन केलेली 5 डोअरची Mahindra Thar Roxx हि कार साईज मध्ये मोठी असून या कारमध्ये भरपूर स्पेस दिलेला आहे. (Mahindra Thar Roxx Launch) या कारची लांबी रुंदी देखील पूर्वीच्या 3 डोअर असलेल्या Mahindra थार या कारपेक्षा वाढविण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या कारला 5 दरवाजे देण्यात आलेले आहेत त्यामुळे या कारमध्ये आपल्याला स्पेसची कमतरता जाणवणार नाही.

या कारमध्ये सीटिंग कॅपॅसिटी ही 5 लोकांची आहेत. पुढे 2 आणि मागे 3 असे 5 जण या कार मध्ये आरामशीर बसू शकतात. तसेच मागील सीट आणि पुढील सिटी यामधील अंतर जास्त असल्याने मागे बसणाऱ्या प्रवाशांना कुठलीही अडचण येणार नाही आणि हेड रूम हे देखील या कारमध्ये भरपूर मिळते. त्यामुळे उंच असणारी व्यक्ती देखील या कारमध्ये सहज बसू शकते.

Thar Roxx Features कार फीचर्स

Mahindra Thar Roxx Launch
Mahindra Thar Roxx Launch

Mahindra कंपनीने नवीन Thar Roxx या कार मध्ये खूप सारे फीचर्स ॲड केलेले आहेत. या कारमध्ये आपल्याला नवीन मध्ये डिझाईन केलेले ग्रील मिळणार आहेत. त्याचबरोबर समोर फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे आणि 360 डिग्री कॅमेरा देखील या कारमध्ये मिळणार आहेत. (Mahindra Thar Roxx Launch) 3 डोअर असलेल्या थार मध्ये हेड लॅम्प हे हॅलोजन मध्ये देण्यात आले होते परंतु या नवीन डिझाईन केलेल्या Mahindra Thar Roxx या कारमध्ये आपल्याला एलईडी हेडलाईट आणि सी आकारामध्ये एलईडी डीआरएल मिळणार आहेत हे एल इ डीआरएल हेड लॅम्पला गोलाकार आकारात असणार आहेत.

Mahindra थार 3 डोअर आणि Mahindra Thar Roxx या कारमध्ये मुख्य बदल कारमध्ये उपलब्ध असलेला स्पेस मध्ये करण्यात आलेला आहेत. यामध्ये नवीन Thar Roxx या कारमध्ये मोठा लेगरूम देण्यात आलेला आहे आणि मागे असलेल्या सेट साठी स्पेस जास्त देण्यात आलेला आहे. तसेच Mahindra Thar Roxx या कार मध्ये आपल्याला 18 इंच चे ड्युअल टोन अलॉय व्हील मिळणार आहेत. 3 डोअर असलेल्या Mahindra दार या गाडीमध्ये 18 इंचाचे हे मोनो टोन मध्ये व्हील उपलब्ध होते.

त्याचबरोबर नवीन Thar Roxx या कार मध्ये अलॉय व्हील यावर स्क्वेअर शेपमध्ये डिझाईन देण्यात आलेली आहे. Mahindra Thar Roxx या कारच्या मागील बाजूस जास्त चेंजेस करण्यात आलेले नाही. (Mahindra Thar Roxx Launch) Mahindra थार या कारचे मागे ज्या प्रकारे डिझाईन आहे त्याच प्रकारे Thar Roxx या कारच्या मागे आहे, यामध्ये फार मोठे बदल काही करण्यात आलेले नाहीत.तसेच मागे देण्यात आलेले टेल लाईट हे एलईडी आहे आणि त्यांचा आकार हा सी शेपमध्ये देण्यात आलेला आहे.

Mahindra Thar Roxx Launch
Mahindra Thar Roxx Launch

Safety And Interiors सेफ्टी आणि इंटेरियर

नवीन डिझाईन केलेल्या या कारमध्ये छोट्याशा गोष्टींवर देखील खूप सारे काम करण्यात आलेले आहेत आणि सर्व गोष्टी या एकदम मजबूत देण्यात आलेल्या आहेत. (Mahindra Thar Roxx Launch) या कार मध्ये आपल्याला समोरील बाजूस डॅश बोर्डला 10.25 इंच चा डिजिटल डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या डिस्प्ले ची साईज ही मोठी असल्याने ड्रायव्हरला त्यावर असलेले सर्व इंडिकेटर हे सहज दिसू शकतात. त्याच प्रकारे हा डिस्प्ले टच स्क्रीन देण्यात आलेला आहे आणि यामध्ये असलेले इन्फोटेनमेंट सिस्टीम हे वायरलेस एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड या दोन्ही सिस्टीमला सपोर्ट करते. त्याचबरोबर या कार मध्ये आपल्याला पॅनोरमिक सनरूफ देण्यात आलेला आहे आणि कारला चालू बंद करण्यासाठी पुश बटन दिलेले आहे. कीलेस एन्ट्री फीचर्स देखील दिले आहेत. 

सेफ्टी बद्दल बोलायचे झाल्यास या कार मध्ये एकूण 6 एअर बॅग देण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर कारच्या समोर पार्किंग सेन्सर दिलेला आहे आणि मागील बाजूने देखील पार्किंग सेन्सर देण्यात आलेला आहेत. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल देखील दिलेले आहे या कार मध्ये आपल्याला 360 डिग्री कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. (Mahindra Thar Roxx Launch) तसेच कंपनीने ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंस सिस्टीम देखील दिलेली आहे. ब्रेकिंग सिस्टम बद्दल बोलायचे झाल्यास या कारमध्ये एबीएस आणि ईबिडी हे इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टीम दिलेली आहेत.

Mahindra Thar Roxx Launch
Mahindra Thar Roxx Launch

Mahindra Thar Roxx Color कलर 

Mahindra Thar Roxx ही कार सध्या Mahindra कंपनीने काळया कलर मार्केटमध्ये दाखविली आहे. या कारमध्ये एकूण किती कलर असणार आहे हे अजून माहित झालेले नाहीत. सध्या कंपनीने फक्त काळया कलर मध्ये हि कार मार्केटमध्ये दाखविली आहे. या कारमध्ये काळा आणि लाल कलर उपलब्ध असू शकतो.

हे देखील वाचा : Mahindra Thar Price : हि आहे देशातील सर्वात जास्त लोकप्रिय SUV, जाणून घ्या कींमत

Mahindra Thar Roxx Competitor या कारची स्पर्धा

Mahindraच्या या Thar Roxx कारची स्पर्धा आता मारुती सुझुकीच्या जिम्मी या कार सोबत आणि तसेच 5 डोअर असलेल्या फोर्स गुरखा या कार सोबत होणार आहेत. (Mahindra Thar Roxx Launch) मारुती सुझुकीची जिम्मी ही कार देखील ऑफ रोडींग साठी प्रसिद्ध आहे आणि मारुती सुझुकी कंपनीने देखील जिम्मी या कार मध्ये खूप सारे बदल केले आहे आणि नवीन फीचर्स देखील समाविष्ट केले आहे. तसेच दुसरीकडे फोर्स कंपनीने आपली 5 डोअर असणारी फोर्स गुरखा ही नवीन ऑफ रोडींग कार मार्केटमध्ये नुकतीच उतरवली आहे.

फोर्स कंपनी देखील कमबॅक करत आता Mahindra च्या कारला टक्कर देणार आहेत. फोर्स कंपनीने नुकतेच आपले 5 डोअर असणारे फोर्स Gurkha हे मॉडेल मार्केटमध्ये उतरविले आहे आणि या 5 डोअर कारला लोकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. (Mahindra Thar Roxx Launch) त्यामुळे आता Mahindra Thar Roxx या कारचे कॉम्पिटिशन आता मारुती सुझुकी जिम्मी आणि 5 डोअर फोर्स Gurkha या दोन ऑफ रोडींग कार सोबत होणार आहे.

Mahindra कंपनीच्या यापूर्वी SUV टाईप मध्ये भरपूर कार आहेत त्यामध्ये आता कंपनीने भर पाडली आहे. Mahindra च्या SUV कार मध्ये बोलेरो, बोलेरो निओ, बोलेरो निओ प्लस, XUV 3xo, थार, स्कार्पिओ एन, XUV 700 अशा अनेक कार मार्केटमध्ये Mahindra ने लाँच केलेल्या आहेत. (Mahindra Thar Roxx Launch) आता त्यामध्ये भर पाडत Mahindra कंपनीने आपली 5 डोअर असलेली Mahindra Thar Roxx ही कार मार्केटमध्ये उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टला हि कार मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहेत देशभरातील थार चाहते या कारच्या प्रतीक्षेत आहेत. 

हे देखील वाचा : Tata Curvv EV Launch : लवकरच येत आहे टाटाची जबरदस्त इलेक्ट्रिकल Curvv EV कार, किंमत किती असेल 

Spread the love