Manikpunj Dam : माणिकपुंज धरण भरले, या गावांना होणार फायदा

Manikpunj Dam : माणिकपुंज धरण भरले, या गावांना होणार फायदा

Manikpunj Dam नांदगाव : तालुका हा आवर्षण क्षेत्रात येत असून हा तालुका कमी पर्जन्यमान क्षेत्रात येतो. या तालुक्यामध्ये मागील वर्षी गंभीर दुष्काळ पडला होता. त्यामुळे तेथील जमिनीचे पाणी पातळी ही देखील खोलीवर गेली आहे. मागील वर्षी या तालुक्यात अगदी कमी प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे या तालुक्यातील माणिकपुंज धरण हे भरले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील या पाण्याचा वापर करता आला नाही आणि या धरणाचे पाणी पाट आणि पाट चाऱ्याना पुढे पाठवता आले नाही.

Manikpunj Dam
Manikpunj Dam

Manikpunj Dam नांदगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू होते. परंतु मागील आठ – दहा दिवसात तालुक्यामध्ये पावसाचे पुनरागमन झाल्याने या क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. त्यामुळे विहिरींना देखील पाणी आले आहे. जून – जुलै महिन्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झाला नव्हता. या दोन महिन्यांमध्ये पाऊस हा फक्त पिका पुरता येत असल्याने, विहिरींना या पावसाचे पाणी आले नव्हते. परंतु मागील काही दिवसांमध्ये चांगला पाऊस झाल्याने विहिरींना देखील पाणी उतरले आहे. त्याचबरोबर मागील आठवड्यात माणिकपुंज धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने हे धरण 100% भरले आहे.

माणिकपुंज धरण ओव्हर फ्लो होत असून हे पाणी पुढे नदीने वाहून जात आहे. माणिकपुंज धरण 100% भरल्याने त्या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या धरणाचा फायदा अनेक छोट्या गावांना होत असतो. माणिकपुंज धरण हे 100% भरले आहे परंतु बाकी ग्रामीण भागातील पाझर तलाव हे अजूनही कोरडेच आहे.

जळगाव खुर्द, चांदोरे. रनखेडा, पिंपरखेड, परधाडी, न्यायडोंगरी, पिंपरी हवेली, हिंगणे देहरे, येथील पाझर तलावांना या धरणाचे ओव्हर फ्लो पाणी सोडले तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल आणि पिकांनाही या पाण्याचा फायदा होईल. यासाठी शेतकऱ्यांनी माणिकपुंज धरणाचे पाणी सोडण्यासाठी आग्रह धरला आहे. याबाबत नांदगाव तहसीलदार सुनील सैंदाणे यांना आपण संबंधित विभागास पाणी सोडण्यास आदेश करावे असे आशयाचे निवेदन काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आले आहे. 

हे निवेदन देत असताना तालुका अध्यक्ष हरेश्वर सुर्वे, उदय पवार, दर्शन अनिल कुमार आहेर, उदय पवार, ओंकार पाटील, भिकन भास्कर पवार, कुणाल दिलीपराव आहेर, चेतन सरोदे, गोरख सरोदे, नवनाथ अवचित बोरसे, सरपंच प्रवीण घोटेकर, कमलेश पेहरे, अण्णा कवडे, शालिक पवार, काशिनाथ चव्हाण, भाऊसाहेब देशमुख, सुरेश बुचकुले, अनिल सुर्वे यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. Manikpunj Dam या धरणाचे पाणी पाट चारीने सोडल्यास वरील सर्व गावाना या पाण्याचा शेतीसाठी व पाणी पिण्यासाठी उपयोग होईल, तसेच कांदा लागवडीसाठी देखील या पाण्याचा वापर होऊ शकतो.

हे देखील वाचा : Onion Plantation : पावसाचे पुनरागमन झाल्याने, नाशिक जिल्ह्यात पोळ कांदा लागवड सुरु

Spread the love