Maruti Suzuki EECO : या कार ने मार्केट मध्ये घातलाय धुमाकूळ, जाणून घ्या कींमत

Maruti Suzuki EECO : या कार ने मार्केट मध्ये घातलाय धुमाकूळ, जाणून घ्या कींमत

Maruti Suzuki EECO : या कार ने मार्केट मध्ये घातलाय धुमाकूळ, जाणून घ्या कींमत : मारुती सुझुकी कंपनी खूप सार्‍या कमी किमतीत चांगल्या फीचर्स कार साठी प्रसिद्ध आहेत. या कंपनीच्या कार या कमी किमतीत उपलब्ध असतात आणि सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या असतात या कंपनीच्या खूप सार्‍या कार बाजारात आहेत.

Maruti Suzuki EECO
Maruti Suzuki EECO

परंतु सर्व कार मध्ये Maruti Suzuki EECO एका कार ने इतिहास रचला आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या इको या कार ने मार्केटमध्ये तब्बल 14 वर्षांपासून पकड बनवून ठेवलेली आहे 2010 साली मार्केटमध्ये लॉन्च केलेली इको व्हॅन ही आजपर्यंत लोकांच्या पसंतीस अव्वल ठरलेली आहे. खूप सार्‍या कंपन्या थोड्या कालावधीनंतर नवीन नवीन कार मार्केटमध्ये उतरावेत असतात परंतु प्रत्येक कारला मार्केटमध्ये यश मिळत नाही. खूप सारे कार या मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

लोकांची पसंती देखील बदलत असल्याने जनता नवीन नवीन कार घेण्यासाठी उत्सुक असतात. परंतु मारुती कंपनीच्या एकूण या कार ने 14 वर्षांपासून मार्केटमध्ये आपला कब्जा करून ठेवलेला आहे. आज देखील मारुतीच्या इको या कारची प्रचंड अशी मागणी आहे. अनेक कंपनीने इको Maruti Suzuki EECO कारचे मार्केट खाण्याचा प्रयत्न केला. त्या कंपनीने अनेक कार लॉन्च केल्या परंतु तरीही त्या इको यांच्या मार्केटमध्ये आपली पकड बनवू शकले नाही. मारुती कंपनीने या  इको कार मध्ये थोड्या अंतराने नवीन बदल करत आणि आकर्षक अशी किंमत ठेवत या कारला मार्केटमध्ये बनवून ठेवलेले आहे. तसेच ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन मॉडेल मध्ये उपलब्ध असल्याने ग्राहकांना पर्याय उपलब्ध आहे.

मारुती कंपनीने आतापर्यंत 12 लाख युनिट विकलेले आहे. इको कार 5 सीटर 7 सीटर मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये कार्गो, ॲम्बुलन्स आणि टुरिस्ट अशा विविध मॉडेलचा समावेश आहे. जेव्हा ही कार 2010 साली लॉन्च झाली त्यावेळेस या कारला आपले पहिले 5 युनिट विकण्यासाठी 8 वर्षे लागली होती परंतु नंतर 5 लाख युनिट या कारचे फक्त पुढील 3 वर्षातच विकले गेले होते त्यानंतर या कारचा विक्री होण्याचा रेकॉर्ड झाला. 

मारुती सुझुकी इको या कारची किंमत 

मारुती सुझुकी इको 7 सीटर कार ची एक्स शोरूम किंमत ही 5.61 लाख आहे. त्यामध्ये आरटीओ आणि इन्शुरन्स मिळून जवळपास ही कार आपल्याला ऑनरोड 6 लाखांपर्यंत मिळते. 6 लाखांमध्ये 7 सीटर कार आपल्याला मिळते. अगदी कमी किंमत मध्ये 7 सीटर कार Maruti Suzuki EECO उपलब्ध आहे. तसेच या कारमध्ये खूप सारे फीचर्स देखील आहे. अन्य कंपनीच्या 7 सीटर कार यांची किंमत ही जवळपास 12 लाख पासून सुरुवात होते.

मारुती सुझुकी कंपनी सुरुवातीपासूनच आपल्या कारची किंमत ही योग्य ठेवलेली आहे. प्रत्येक वर्षी कारच्या किमती या वाढत चाललेल्या असून सर्वसामान्य जनतेला, फॅमिली साठी योग्य कार खरेदी करणे आता अवघड झालेले आहे. परंतु मारुतीची ईको हि कार सर्वसामान्य जनतेला परवडणारी आहे. त्याचबरोबर ही कार सीएनजी मध्ये देखील उपलब्ध असल्याने अगदी कमी दरामध्ये या कार ने  प्रवास करता येऊ शकतो. मारुती कंपनी आपल्याला 6 लाखांमध्ये 7 सीटर कार उपलब्ध करून देते.

मारुती सुझुकी इको कारचे मायलेज 

Maruti Suzuki EECO कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरिएंट हे मॅन्युअल आहेत. इको कार मध्ये आपल्याला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीम मिळत नाही. पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंट या दोन्ही मधील मायलेज वेगळे आहेत. पेट्रोल वेरियंटमध्ये आपल्याला 20 kmpl एवढे मायलेज मिळते तर सीएनजी मध्ये 26 kmpl इतके मायलेज देते. कारचे मायलेज हे शहरी भागात आणि हायवेला वेगळे असते. शहरी भागात जास्त रहदारी असल्याकारणाने तिथे आपल्याला कार कमी स्पीड मध्ये चालवायला लागते.

त्यामुळे तेथे आपल्याला कमी मायलेज मिळते तेच जर कार ही चांगल्या रोडने धावत असेल तर तिथे आपण टॉप गेअरवर चालवू शकतो. त्यामुळे कार चे मायलेज आपल्याला जास्त मिळते. इको या कारचे मायलेज आपल्याला सीएनजी मध्ये जास्त मिळते. तसेच सीएनजी गॅसचे भाव देखील कमी आहे. त्यामुळे या दोन व्हेरिएंट पैकी सीएनजी व्हेरिएंट हे फायदेशीर आहे. परंतु सीएनजी गॅस हा सर्वत्र उपलब्ध नसतो ग्रामीण भागात सीएनजी गॅसची टंचाई असते. 

इको कारचे इंजिन आणि ट्रान्समिशन 

Maruti Suzuki EECO कारमध्ये आपल्याला k12n हे इंजिन मिळते. या इंजिनची कॅपॅसिटी 1197cc आहे. हे इंजिन जास्तीत जास्त पावर 79.65 bhp@6000rpm जनरेट करू शकते. आणि जास्तीत जास्त टॉर्क हा 104.4nm@3000rpm जनरेट कर शकते. या इंजिन मध्ये आपल्याला 4 सिलेंडर मिळतात आणि या 4  सिलेंडरला 4 वाल आहेत. यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे ऑटो ट्रान्समिशन मिळत नाही. या कारमध्ये आपल्याला मॅन्युअल ट्रान्समिशन मिळतात यामध्ये आपल्याला 5 स्पीड गिअर बॉक्स मिळतात आणि या कार मध्ये मागील चाकांना ताकद देण्यात आली आहे. 

Maruti Suzuki EECO इंधन प्रकार 

मारुती सुझुकी इको पेट्रोल आणि सीएनजी या दोन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोलमध्ये आपल्याला इंधन टाकीची कॅपॅसिटी ही 32 लिटर मिळते. तर सीएनजी गॅसची स्टोरेज कॅपॅसिटी हि 6 किलो पर्यंत मिळते या कारचा जास्तीत जास्त स्पीड 146 kmph पर्यंत आहे. 

मारुती सुझुकी इको ब्रेक सिस्टीम 

इको या कार मध्ये आपल्याला पुढील चाकांसाठी डिस्क ब्रेक मिळतात तर मागील चाकांसाठी ड्रम ब्रेक देण्यात आलेले आहेत. या कारमध्ये देण्यात आलेले ब्रेक हे पावरफुल असल्याने कमी अंतर मध्ये आपण गाडीचा स्पीड कंट्रोल करू शकतो. 

इको या कारची साईज 

मारुती सुझुकी इको Maruti Suzuki EECO कारची सीटिंग कॅपॅसिटी ही 7 सीट आहे. या कारची लांबी ही 3675mm, रुंदी 1475mm आहे आणि उंची ही 1825mm आहे. या कार मध्ये आपल्याला मागील बाजूस सामान ठेवण्यासाठी 540 लिटर कॅपॅसिटी चा स्पेस मिळतो. या कारमधील पुढील चाकांचा बेस हा 2350mm देण्यात आलेला आहे. या कारमध्ये आपल्याला टोटल 5 दरवाजे मिळतात. या कारचे वजन हे 935 kg इतके आहे. 

इको कार मध्ये असलेले ॲडव्हान्स फीचर्स 

या कार मध्ये आपल्याला सेफ्टी साठी 2 एअरबॅग देण्यात आले आहे. त्याचबरोबर या दोन्ही एअर बॅग एक ड्रायव्हर साईड आणि एक पॅसेंजर साईडला देण्यात आलेल्या आहे. या कार मध्ये चाइल्ड लॉक सेफ्टी देखील देण्यात आलेला आहे. तसेच या कार मध्ये ABS सिस्टिमचा देखील वापर करण्यात आलेला आहे. इको कार मध्ये खूप सारे नवीन फीचर्स ॲड करण्यात आले आहे. या कारमध्ये स्पीड अलर्ट इंजिन इमोबिलायझर, सीट बेल्ट वार्निंग असे अनेक सारे फीचर्स सोबत देण्यात आले आहे.

इको व्हॅन टायर 

मारुती सुझुकी इको व्हॅन या कारचे टायर ची साईज ही 155/65R13 आहे. या कारचे चारही टायर हे ट्यूबलेस आहेत. चारी व्हीलची साईज ही 13 इंच आहे. 

हे देखील वाचा : Mazi Ladki Bahin Yojana 2024 : या तारखेला जमा होणार पहिला हप्ता, माझी लाडकी बहीण योजना

इको व्हॅन इंटेरियर 

Maruti Suzuki EECO व्हॅन या कारचे इंटिरियर देखील खूप आकर्षक आहे. या कारमध्ये खूप सारे बदल केल्याने आतील बाजूने देखील हि कार आकर्षक झालेली आहे. या कारमध्ये आपल्याला ट्याकोमीटर, ग्लोवबॉक्स, डिजिटल ओडोमीटर मिळतात. तसेच आपल्याला या कारमध्ये सेमी डिजिटल क्लस्टर देखील मिळते. मारुती कंपनीने अगदी कमी किंमत मध्ये या कारमध्ये खूप सारे फीचर्स ॲड करून दिलेले आहे. ज्या कारची किंमत 12,13 लाख असते त्या कारच्या सुविधा आपल्याला अगदी 6 लाखाच्या किंमत असलेल्या या कारमध्ये मिळतात. आतील बाजूस इंटेरियर ड्युअल कलर उपलब्ध आहे. या कार मधील सीट देखील उत्कृष्ट क्वालिटीचे आहे. सीटचे कलर हे इंटिरियरच्या कलर सोबत मॅचिंग असल्याने गाडीचा लुक खूप छान दिसतो. 

हे देखील वाचा : IPL Winner Team List : आत्तापर्यंत आयपीएल जिंकलेल्या सर्व संघांची यादी, सर्वात जास्त वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेला संघ

Maruti Suzuki EECO एक्सटेरियर 

नवीन इको कार मध्ये कंपनीने खूप सारे बदल करत या कारचा लुक आता खूप चेंज झालेला आहे. पहिल्या कारच्या तुलनेत आता च्या नवीन इको या कारमध्ये आपल्याला खूप सारे बदल बघायला मिळतात. या कारमध्ये समोरून बाजूने दोन ऍडजेस्टेबल हेड लॅम्प देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर काळा कलर मध्ये ग्रील देखील देण्यात आलेले आहे. हेडलॅम्प हे हॅलोजन मध्ये उपलब्ध आहेत या कारमध्ये आपल्याला मागील बाजूस पार्किंग सेंसर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मागील बाजूने रीडिंग लॅम्प देखील देण्यात आलेला आहे.

इको कार मध्ये आपल्याला टोटल 5 दरवाजे मिळतात. यापैकी पुढील 2 दरवाजे हे बाहेरच्या बाजूला उघडतात. तर मागील 2 दरवाजे हे स्लाईड करून उघडतात. बाकी कंपनीच्या कार मध्ये जागेचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. परंतु Maruti Suzuki EECO कारमध्ये आपल्याला भरपूर सारा स्पेस मिळतो. मागील सीट आणि पुढील सीट या सीटांमध्ये अंतर देखील जास्त आहे. त्यामुळे मागे बसलेल्या प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण होत नाही. त्याचबरोबर कारचे हूड हे देखील उंच असल्याने जास्त उंची असलेल्या प्रवाशाला देखील या कारमध्ये मोकळे बसता येते.

हे देखील वाचा : IND VS ZIM 3rd T20 Highlights : भारताने झिम्बाब्वेला 23 धावांनी चारली धूळ, 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने घेतली आघाडी

मारुती सुझुकी इको कार ही ॲम्बुलन्स फॅमिली साठी तसेच वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. Maruti Suzuki EECOएकच कार खूप सारे उपयोगात येते. शेतकऱ्यांसाठी देखील मारुती सुझुकी इको व्हॅन खूप फायदेशीर ठरते. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत या कारचा उपयोग होत असतो. मारुती सुझुकी इको 5 कलर मध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी सफेद कलर हा सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेला आहे. मार्केटमध्ये सध्या सफेद कलरच्या इको या कारची मागणी सर्वात जास्त आहे.

हे देखील वाचा : Hyundai Creta Price : या कार ने केल आहे मार्केट जाम,जाणून घ्या कींमत

Spread the love