Site icon Get In Marathi

Maruti Suzuki Grand Vitara : हि आहे सर्वात जास्त मायलेज देणारी हायब्रीड कार, कींमत किती असणार?

Maruti Suzuki Grand Vitara : हि आहे सर्वात जास्त मायलेज देणारी हायब्रीड कार, कींमत किती असणार?

Maruti Suzuki Grand Vitara

Maruti Suzuki Grand Vitara : Maruti च्या नवीन डिझाईन करण्यात आलेल्या Grand Vitara या कार ने मार्केट मध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळविली आहे. या कारला देशभरातून खूप मागणी आहे. Maruti च्या या कारमध्ये हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. Maruti ने तयार केलेल्या हायब्रीड कार मध्ये ही पहिलीच कार असणार आहे. या कारमध्ये कंपनीने मजबूत पावर ट्रेन चा वापर केला आहे. ही कार नेक्सा शोरूम मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या कारला बुकिंग करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येऊ शकते.

Maruti कंपनीने हि कार टोयोटाच्या मदतीने निर्माण केली आहे. टोयोटा या कंपनीने यापूर्वी हायरायडर ही कार हायब्रीड मध्ये लॉन्च केली होती. Maruti  कंपनीने टोयोटा कंपनीची साथ घेत Grand Vitara ही कार डिझाईन केली आहे. Grand Vitara कार 6 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये Sigma , Delta , Zeta,  Alpha, Zeta + आणि Alpha + असे सर्व प्रकार असणार आहे. या 6 मॉडेल पैकी Zeta + आणि Alpha + हे टॉपचे व्हेरिएंट असणार आहे. 

Maruti Suzuki Grand Vitara Price कारची किंमत 

Grand Vitara या कारला देशभरात मागणी आहेच आणि हि कार आकर्षक पद्धतीने डिझाईन करण्यात आलेली आहे. कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार या कारची किंमत ही भारतात 16 /- लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. तसेच या व्हेरियंटमधील टॉप मॉडेल ची किंमत ही 21 /- लाख रुपये पर्यंत असू शकणार आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या नेक्सा शोरूम मध्ये भेट द्यावी. 

Maruti Suzuki Grand Vitara Mileage मायलेज 

Grand Vitara SUV मॉडेल मध्ये असून ही एक कॉम्पॅक्ट कार आहे. तसेच या कार मध्ये इलेक्ट्रिकल आणि इंजिन या दोन पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे ही कार इलेक्ट्रिकल प्लस इंजिन या दोन पर्यायांवर चालणार आहे. (Maruti Suzuki Grand Vitara) यामुळे या कारचे मायलेज जास्त असणार आहे. Maruti कंपनीच्या दिलेल्या माहितीनुसार या कार चे मायलेज हे 27.89 kmpl असणार आहे. ही कार देशातील सर्वात जास्त मायलेज देणारी कार आहे असा Maruti कंपनीचा दावा आहे. 

Maruti Suzuki Grand Vitara Engine कार चे इंजिन 

या कारमध्ये पावरफुल हायब्रीड इंजिन वापरण्यात आलेले आहे. M15D विथ स्ट्रॉंग हायब्रीड हे इंजिन कार मध्ये वापरण्यात आले आहे. या इंजिनची क्षमताही 1490CC इतकी आहे. तसेच हे इंजिन 91.18 bhp@5500rpm एवढी पावर जनरेट करू शकते. आणि टॉर्क हा 122nm@4400 – 4800rpm एवढा तयार करू शकते. इंजिन मध्ये 3 सिलेंडर वापरण्यात आलेले आहे. प्रत्येक सिलेंडरला 4 वाल देण्यात आले आहे. या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पद्धतीचा वापर करण्यात आलेला असून गिअरबॉक्स हा ECVT असणार आहे.

इंजिनची ताकद ही कारच्या पुढील चाकांनी देण्यात आलेली आहे. ही कार पेट्रोल इंधनावर चालते या कारमध्ये दुसरे कुठलेही इंधन पर्याय दिलेले नाही. तसेच या कारमध्ये इंधन टाकीची क्षमता ही 45 Liter ची दिलेली आहे. तसेच या कारमध्ये पेट्रोल व्यतिरिक्त इलेक्ट्रिक पावर हे एक पर्याय इंधन असणार आहे. ही कार BS VI 2.0 या नॉर्म्सवर आधारित आहे. तसेच या कारला स्पीड देखील हा भरपूर दिलेला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या कारचा स्पीड हा 135 kmph इतका असणार आहे. 

Maruti Suzuki Grand Vitara सस्पेन्शन आणि ब्रेक 

या कारमध्ये पुढील चाकांसाठी मॅक फर्जंन सस्पेन्शन चा वापर करण्यात आला आहे तर मागील चाकांसाठी टोरशन बीम या पद्धतीच्या सस्पेन्शन चा वापर करण्यात आलेला आहे. तसेच या कारमधील स्टेरिंग हे इलेक्ट्रिकल दिलेले आहे. हे स्टेरिंग व्हील मागे पुढे आणि खाली वर ऍडजेस्ट करता येऊ शकते. या स्टेरिंग साठी रॅक पिनियन पद्धतीच्या गिअरचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे गाडीच्या चाकाला बसणारे दणके हे चालका च्या हाताला जाणवत नाही. गिअर्स स्टेरिंग मुळे पावर ही फक्त एका बाजूने ट्रान्सफर होते. या कारचा टर्निंग रेडीयस 5.4 Meter आहे.

तसेच कार च्या पुढील चाकांसाठी व्हेंटिलेटेड डिस्क ब्रेक दिलेले आहे. तर मागील चाकांसाठी सॉलिड डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. (Maruti Suzuki Grand Vitara) तसेच या कारच्या ब्रेकिंग ची क्षमता ही देखील उत्तम आहे. ही कार 100 kmph स्पीड वरून 0 kmph स्पीड फक्त 40.58 Meter मध्ये थांबू शकते. तसेच इंजिन देखील पावरफुल असल्याने या कारला 0 ते 100 kmph स्पीड मिळविण्याकरता फक्त 11.40 सेकंद लागतात. या कार चे सर्व व्हील हे अलॉय व्हील देण्यात आलेले आहे. या कारच्या चाकांची साईज ही 17 इंच इतकी आहे. 

Maruti Suzuki Grand Vitara Size कारची साईज 

Grand Vitara ही SUV कार आहे या कारमध्ये हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे या कारची साईज ही थोडी मोठी असणार आहे. या कारची लांबी ही 4345 mm, रुंदी 1795mm, उंची 1645 mm इतकी असणार आहे. तसेच कारच्या पाठीमागे देण्यात आलेला बूट स्पेस याची कॅपॅसिटी 373 Litre इतकी असणार आहे. या कारमध्ये 5 व्यक्ती बसू शकतात ज्यामध्ये 2 व्यक्ती पुढे आणि 3 व्यक्ती मागे असे 5 जण आरामात या कार मध्ये बसू शकतात. या कारचा ग्राउंड क्लिअरन्स  210 mm इतका आहे. तसेच व्हील बेस हा 2600 mm आहे. या गाडीचे वजन हे 1750 kg इतके आहे. 

Maruti Suzuki Grand Vitara Variant व्हेरिएंट 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या कार मध्ये एकूण 6 व्हेरिएंट असणार आहे. हे सर्व व्हेरिएंट मध्ये हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. सर्व व्हेरिएंट हे खाली दिले आहे.

  1. Sigma  
  2. Delta  
  3. Zeta 
  4. Alpha 
  5. Zeta +
  6. Alpha + 

या सर्व 6 प्रकारांमध्ये ही कार उपलब्ध असणार आहे. या कार मध्ये बेस मॉडेल पासून टॉप मॉडेल दिलेले आहे. त्यानुसार या कारची किंमत असणार आहे. टॉपच्या व्हेरियंटमध्ये खूप सारे अत्याधुनिक फीचर्स दिलेले आहेत. 

Maruti Suzuki Grand Vitara Facility सुविधा 

कंपनीने या कार मध्ये पावरफुल स्टेरिंग दिलेले आहे त्याचबरोबर कारच्या पुढील आणि मागील काचा या पावर ऑपरेटेड आहे. तसेच कार मध्ये पावरफुल एसी सोबतच हीटर देखील दिलेले आहे. कार मधील स्टेरिंग हे ऍडजेस्टेबल देण्यात आलेले आहे. तसेच कारचालकाचे सीट देखील ऍडजेस्टेबल आहे. (Maruti Suzuki Grand Vitara) चालक गरजेनुसार सीट सेट करू शकतो. या कार मधील सीट हे व्हेंटिलेटेड देण्यात आलेले आहे.

कार मध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ॲक्सेसरीज पावर आउटलेट, रियर सीट अड्जस्टेबल हेड रेस्ट, रीअर सीट सेंटर आर्म रेस्ट, हाईट ऍडजेस्टेबल फ्रंट सीट बेल्ट, कप होल्डर फ्रंट आणि कप होल्डर रीअर आणि पाठीमागे AC वेन्ट, क्रूज कंट्रोल, पार्किंग सेन्सर, रियल टाइम व्हेईकल ट्रेकिंग, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन, व्हाईस कमांड, प्याडल शिफ्ट, यूएसबी चार्जर, ग्लोबॉक्स, आयडियल स्टार्ट स्टॉप सिस्टीम, ऑटोमॅटिक हेड लॅम्प, फॉलो मी होम हेड लॅम्प अशा अत्याधुनिक फीचर्सचा उपयोग या कार मध्ये करण्यात आलेला आहे.

Maruti Suzuki Grand Vitara look डिझाईन 

कारच्या आत मध्ये आपल्याला डॅशबोर्ड बघायला मिळतो. या डॅशबोर्ड वरती TachoMeter दिलेले आहे. तसेच ग्लोबॉक्स, Digital Odometer दिले आहे. चालकाच्या समोर फुल डिजिटल क्लस्टर दिलेला आहे. या क्लस्टरची साईज ही 7 इंच इतकी आहे. तसेच कार च्या मध्ये बहुतेक ठिकाणी लेदर चा वापर करण्यात आलेला आहे.

कारच्या बाहेरून डिझाईन बद्दल बोलायचं झाल्यास कार चा बाहेरील लुक हा देखील खूप आकर्षक आहे. कारच्या समोर ऍडजेस्टेबल प्रोजेक्टर हेडल्याम्प दिलेले आहे. कारच्या वरती रूफ रेल दिलेले आहे. कारच्या टायरची साईज ही 215/60R17 अशी आहे. कार चे सर्व टायर हे ट्यूबलेस रेडियल आहे. तसेच कार चे पुढील आणि मागील लॅम्प हे एलईडी देण्यात आलेले आहे. 

Maruti Suzuki Grand Vitara Safety सेफ्टी 

या कारमध्ये सेफ्टी साठी अनेक सुविधा देण्यात आलेल्या आहे. Grand Vitara कारमध्ये ABS ब्रेकिंग सिस्टीम चा वापर करण्यात आलेला आहे. (Maruti Suzuki Grand Vitara) तसेच सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड Safety अशा अनेक सुविधा कार मध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये एकूण 6 एअरबॅग दिलेल्या आहेत. ज्या की ड्रायव्हर आणि पॅसेंजर साईडने आहे. तसेच साईडला देखील एअरबॅग देण्यात आल्या आहेत. डे नाईट रियर आरसा देखील गाडीमध्ये बघायला मिळतो. इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन, सीट बेल्ट वार्निंग, डोअर अजर वार्निंग,टायर प्रेशर मॉनिटरिंग, इंजीन इमोबाईलजर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, रियर कॅमेरा, स्पीड अलर्ट, 360 डिग्री कॅमेरा अशा अनेक सुविधा या कार मध्ये उपलब्ध आहे. 

हे देखील वाचा : Mahindra Bolero Power Plus : आली आहे महिंद्राची नवीन 9 सीटर बोलेरो, देशातील No 1 कार

Maruti Suzuki Grand Vitara Entertainment एंटरटेनमेंट 

कार मध्ये आपल्याला रेडिओ, अँड्रॉइड आणि ॲपल कार प्लेट अशा म्युझिक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. तसेच Grand Vitara कार च्या पुढे आणि मागे स्पीकर दिलेले आहेत. या कारमध्ये वायरलेस फोन चार्जिंगची सुविधा आहे. मोबाईल चार्जिंग साठी A आणि C टाईप चे यूएसबी पोर्ट दिलेले आहे. कारमध्ये लाईव्ह लोंकेशन, गूगल अलेक्सा कनेक्टिव्हिटी, स्पीड अलर्ट, रिमोटवर लॉक अनलॉक अशा अत्याधुनिक सुविधांचा वापर कार मध्ये केलेला आहे. कमी किंमत मध्ये लक्झरीयस कार चे फीचर्स या कारमध्ये उपलब्ध असल्याने या कारला मार्केटमध्ये प्रचंड अशी मागणी आहे.

हे देखील वाचा : Mini Cooper : मार्केटमध्ये हि कार घालणार धुमाकूळ, फक्त 7 सेकंदात घेते एवढा स्पीड

Spread the love
Exit mobile version