Maruti Suzuki Wagonr आली आहे मारुतीची नवीन कार Wagonr Top Model
Maruti Suzuki Wagonr ही कंपनी कमी किंमत मध्ये चांगले फीचर्स असलेल्या कार मार्केटमध्ये उतरवीत असते खूप वर्षांपासून मारुती कंपनीचे वॅग्नर हे मॉडेल मार्केटमध्ये लोकांच्या पसंतीस आहे. अगदी कमी किंमत मध्ये ही कार सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध आहे कंपनीने आता या मॉडेलमध्ये नवीन बदल करून ही कार मार्केटमध्ये उतरविली आहे.
Maruti Suzuki Wagonr zxi (झेड एक्स आय)
Maruti Suzuki कंपनी चे झेड एक्स आय हे टॉप मॉडेल आहे. आता हे टॉप मॉडेल ब्लॅक कलर मध्ये देखील उपलब्ध आहेत. ब्लॅक कलर मध्ये या गाडीचा लुक एकदमच चांगला दिसतो आतापर्यंत Wagonr कार ही बहुतेक सफेद कलर मध्येच आपण बघितलेली आहे परंतु कंपनीने आता ब्लॅक कलर मध्ये देखील मारुती Wagonr ही कार लॉन्च केली आहे. चला तर आपण बघुयात या कारच्या इंजिन बद्दल, स्पेसिफिकेशन, एक्स्टेरियर, इंटेरियर, मायलेज आणि किंमत याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.
Maruti Suzuki Wagonr price कार ची किंमत
Maruti Suzuki Wagonr या कार ची किंमत ही सर्वसामान्य जनतेला परवडेल अशी आहे या कारमध्ये वेगवेगळे व्हेरियंट आहेत. त्यांची किंमत देखील ही वेगळी आहे Maruti Suzuki Wagonr मध्ये बेस मॉडेल Vxi हे 5.54 लाख मध्ये उपलब्ध आहे. तर टॉप मॉडेल Zxi Plus 6.75 लाख रुपये मध्ये उपलब्ध आहे. ऑन रोड प्राईस झेड एक्स आय मॉडेलची 7.5 लाख ते 8.5 लाख रुपये पर्यंत आहे.हि कार 60000/- रु डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध आहे.
Maruti Suzuki Wagonr Engine इंजिन स्पेसिफिकेशन
या कारमध्ये इंजन हे खूप पावरफुल आहे. इंजिन चांगले मायलेज देते त्याचबरोबर टोर्क देखील चांगला जनरेट करते. या कारमध्ये वापरण्यात आलेले इंजिन हे 1.2 लिटर 4 सिलेंडर K12 N सिरीज चे पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 89 bhp चे पावर जनरेट करू शकते.113 nm चा टॉर्क जनरेट करू शकते.
Maruti Suzuki Wagonr Mileage या कारचे मायलेज
Maruti Suzuki कंपनी चांगल्या मायलेज असणाऱ्या कार साठी ओळखली जाते त्याबरोबर Wagonr कार वजनाने देखील कमी आहे. त्यामुळे ही कार चांगले ऍव्हरेज देते यामध्ये इंजिन वापरण्यात आलेल आहे ते पावरफुल असल्या कारणाने कार चांगले मायलेज देते. Maruti Suzuki Wagonr zxi ही कार 23-24 kmpl पर्यंत एवरेज हायवेला देते आणि सिटी मध्ये 20 ते 21 kmpl पर्यंत एवरेज देते.
Maruti Suzuki Wagonr Zxi transmission ट्रान्समिशन
Maruti Suzuki Wagonr या कारमध्ये वेगवेगळे व्हेरीएंट उपलब्ध असल्याने त्यामध्ये वेगळे ट्रान्समिशन देण्यात आलेली आहे. ते त्या वेरिएंटवर अवलंबून आहे की कोणत्या प्रकारचे ट्रान्समिशन देण्यात आले आहे. आपल्याला या कार मध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअर मिळते आणि या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील उपलब्ध आहे.
Maruti Suzuki Wagonr Exterior बाहेरील बाजूने
नवीन डिझाईन केलेल्या Maruti Suzuki Wagonr चा लूक हा एकदम चांगला करण्यात आला आहे. समोर दोन हॅलोजन मध्ये हेडलाईट आहे त्याचबरोबर त्यांच्या खाली दोन साईड इंडिकेटर देण्यात आलेले आहेत आणि त्याच्याखाली दोन कंपनीने फिट करून दिलेले फॉग लाईट देखील मिळतात. सेंटरला सुझुकीचा लोगो देण्यात आलेला आहे आणि त्याच्या साईडला ब्लॅक कलर मध्ये ग्रील देण्यात आलेला आहे.खाली नंबर प्लेट दिलेली आहे आणि त्याच्याखाली ब्लॅक कलरमध्ये रेडिएटर ग्रील दिलेले आहे. त्यामुळे गाडी चा लूक खूपच भरगच्च वाटतो.
या कारच्या टायरला आलोय विल्स देण्यात आलेले आहेत. जे की फक्त टॉप मॉडेल मध्ये अवेलेबल आहे. व्हीलची साईज ही R14 इंच आहे. कारच्या पुढील चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे आणि मागील चाकांना ड्रम ब्रेक देण्यात आले आहे. साईडला असलेले दोन्ही आरशांना खालून साईड इंडिकेटर देण्यात आलेले आहे. कारच्या मागील बाजूला दोन्ही बाजूंना दोन उभे टेल लाईट देण्यात आले आहे.
मागील काचेला वायपर आणि डी फॉगर देण्यात आलेली आहे. काचेला वरती स्टॉप लाईट देण्यात आला आहे जे हॅलोजन मध्ये आहे. मागील बाजूस देखील सुझुकी कंपनीचा लोगो देण्यात आला आहे. रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील या मॉडेलमध्ये आपल्याला मिळतो. त्याचबरोबर दोन रिव्हर्स पार्किंग सेन्सर देखील मिळते. या कार मध्ये आपल्याला बूट स्पेस देखील चांगला बघायला मिळतो. या कार मध्ये आपल्याला बूट स्पेस हा 341 लिटरचा मिळतो.
हे देखील वाचा : Maruti Suzuki Alto 800 फक्त 60000/- रुपयांमध्ये ही कार घरी घेऊन जा
Maruti Suzuki Wagonr Interior आतल्या बाजूने
या गाडीची हाईट जास्त असल्याने आत मध्ये बसण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. सर्व विंडोंचे काच चे कंट्रोल हे एका ठिकाणी ड्रायव्हर दरवाजाला देण्यात आलेले आहेत. या कारमध्ये आपल्या 7 इंचचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले बघायला मिळतो. हा डिस्प्ले अँड्रॉइड आणि एप्पल कार प्ले या दोन्ही सिस्टीमला सपोर्ट करतो. या कारमध्ये आपल्याला चार स्पीकर मिळतात जे की चारही दरवाजांना माउंट केलेले आहे. या कार मध्ये आपल्याला स्टेरिंग गोलाकार आकारात मिळते. स्टेरिंग ला कॉल रिसिव्ह आणि बंद करण्याचे बटन देखील मिळते.
स्टेरिंग विल हे सिल्वर फिनिशिंग मध्ये येते. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मध्ये स्पीडोमीटर ट्याकोमीटर आणि गरजेचे सर्व इंडिकेटर त्यावर उपलब्ध आहेत. या कारमध्ये एसी देखील हा चांगला पावरफुल आहे. एसीचे आउटलेट व्हेन्ट हे गोलाकार आकारात उपलब्ध आहे. या कारचा डॅशबोर्ड हा ड्युएल टोन मध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये दिलेला एसी हा मॅन्युअल कंट्रोल आहे. डॅशबोर्डला बारा वोल्ट चा चार्जिंग सॉकेट देण्यात आला आहे आणि युएसबी कनेक्ट करण्यासाठी पोर्ट देण्यात आला. गेअर टाकण्यासाठी छोटासा गिअर स्टिक देण्यात आलेला आहे.
त्याच्या शेजारी बॉटल होल्डर आहे आणि त्यामागे हॅन्ड ब्रेक देण्यात आला आहे. या कार मधील सीट ला ऍडजेस्टेबल हेड रेस्ट देण्यात आलेला नाही. ड्रायव्हर शेजारील सीटच्या समोर बुकलेट मॅक्झिन ठेवण्यासाठी छोटा स्पेस देण्यात आलेला आहे. मागील सीटवर बसणाऱ्या पॅसेंजर यांना देखील चांगला स्पेस उपलब्ध आहे.
या कारमध्ये आपल्याला हेड रूम हा जास्त मिळतो त्यामुळे ज्या व्यक्तीचे उंची जास्त असेल त्यांना देखील या कारमध्ये बसण्यास अडचण येणार नाही. मागील सीट आणि पुढील सीट या दोन्हीमध्ये अंतर देखील जास्त आहे. मागील सीट साठी एसी व्हेंट देण्यात आलेला नाही. आणि मागील सीटला देखील ऍडजेस्टेबल हेड रेस्ट देण्यात आलेला नाही.
मागील दोन्ही दरवाजांना स्पीकर देण्यात आलेला आहे. या कारमध्ये दोन एअर बॅग देण्यात आलेल्या आहेत. या कारची ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये या कारला 1 ची रेटिंग आहे. जी की खूप कमी समजली जाते. या कारची बिल्ड क्वालिटी साधारण असल्याकारणाने या कारला सेफ्टी रेटिंगमध्ये कमी गुण मिळतात. जर गाडीचा स्पीड हा ठीक असेल आणि सर्व सुरक्षित गोष्टी वापरून कार चालवली तर सुरक्षा होऊ शकते. ग्रामीण भागात ही कार फायद्याची ठरते. ग्रामीण भागात रोड हे छोटे असल्याकारणाने तेथे वाहनांचा स्पीड हा कमी असतो त्यामुळे तेथे एक्सीडेंट होण्याचे प्रमाण देखील कमी असते. सर्व नियम पाळून जर ही कार वापरली तर अपघात टळू शकतो.
Maruti Suzuki Wagonr ही कार सर्वसामान्य जनतेला परवडणार आहे. खूप सार्या वर्षांपासून ही कार लोकांच्या पसंतीस अव्वल ठरलेली आहे. या कारच्या कमी किंमत मुळे आणि चांगले असे मायलेज त्याचबरोबर या कारमध्ये असणारा जास्त स्पेस यामुळे ही कार लोकांच्या पसंतीस आहे. या कार ला जास्त ग्राउंड क्लिअरन्स असल्याने ही कार जमिनीवर टेकत नाही त्यामुळे कच्च्या रस्त्यांवर देखील कार आरामात चालते.
काही लोकांची उंची जास्त असल्याकारणाने त्यांना बाकी कार मध्ये बसण्यास अडचण येते परंतु Wagonr कार मध्ये हेड रूम देखील जास्त असल्याने कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. या कारमध्ये बूट स्पेस देखील जास्त उपलब्ध आहे त्यामुळे प्रवास करताना जर जास्त सामान असेल तरीदेखील ते मागील बूट स्पेस मध्ये आरामात बसते. या कारमध्ये बूट स्पेस हा आपल्याला 341 लिटर मिळतो. मागील सीट हे देखील बसण्यासाठी कम्फर्टेबल आहे. मागील सीटवर बसल्यावर प्रवाशांचे गुडघे हे पुढील सीटला लागत नाही.
त्यामुळे प्रवासी हे निवांत मागे बसू शकतात. या कारचे मायलेज देखील बाकी कारच्या तुलनेत जास्त आहे त्याचबरोबर ही कार सीएनजी मध्ये देखील उपलब्ध आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे खूप सारे ग्राहक हे सीएनजी कडे वळले आहे. सीएनजी मध्ये पेट्रोलच्या तुलनेत जास्त मायलेज मिळते. या कारमध्ये वापरण्यात आलेले इंजिन हे तीन सिलेंडरचे आहे त्याचबरोबर ते इंजिन पावर देखील उत्तम असे जनरेट करते. त्यामुळे कारला कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही.
हे देखील वाचा : Tata Curvv Launch : कोटीची कार केवळ लाखात,टाटा ची नवीन SUV मार्केटमध्ये येत आहे
FAQ,S
Maruti Suzuki Wagonr या कार मध्ये top मॉडेल कोणते आहे ?
Maruti Suzuki Wagonr या कार मध्ये top मॉडेल ZXI Plus आहे.
Maruti Suzuki Wagonr या कार चे मायलेज किती आहे?
Maruti Suzuki Wagonr या कार चे मायलेज 22-23 आहे.
Maruti Suzuki Wagonr या कार चे बेस मॉडेल कोणते आहे?
Maruti Suzuki Wagonr या कार चे बेस मॉडेल VXI आहे.
Maruti Suzuki Wagonr या कार चे बेस मॉडेल ची कीमंत किती आहे?
Maruti Suzuki Wagonr या कार चे बेस मॉडेल ची कीमंत 5.45 लाख रु आहे.
Maruti Suzuki Wagonr या कार चे top मॉडेल ची कीमंत किती आहे?
Maruti Suzuki Wagonr या कार चे top मॉडेल ची कीमंत 6.75 लाख रु आहे.
Maruti Suzuki Wagonr या कार चे टायर ची साईज किती आहे ?
Maruti Suzuki Wagonr या कार चे टायर ची साईज R16 आहे.
Maruti Suzuki Wagonr या कार मध्ये एअर ब्याग किती आहे ?
Maruti Suzuki Wagonr या कार मध्ये एअर ब्याग 2 आहे.
Maruti Suzuki Wagonr या कार ची ग्लोबल Ncap रेटिंग किती आहे?
Maruti Suzuki Wagonr या कार ची ग्लोबल Ncap 1 आहे.