Mazi Ladki Bahin Yojana 2024 : या तारखेला जमा होणार पहिला हप्ता, माझी लाडकी बहीण योजना

Mazi Ladki Bahin Yojana 2024 : या तारखेला जमा होणार पहिला हप्ता, माझी लाडकी बहीण योजना

Mazi Ladki Bahin Yojana 2024 : माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने आता खूप सारे बदल करत नागरिकांना सोप्या पद्धतीने आता या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी सुरुवातीला सरकारने खूप साऱ्या अटी व कागदपत्रे ठेवले होते.

Mazi Ladki Bahin Yojana 2024
Mazi Ladki Bahin Yojana 2024

Mazi Ladki Bahin Yojana 2024 परंतु आता कागदपत्रे आणि अटी यावरचे नियम शीथिल केले आहे. आणि आता या योजनेचा अर्ज करणे सोपे झाले आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने GR नुसार सुरुवातीला या योजनेचा अर्ज करण्याचा कालावधी 1 जुलै ते 15 जुलै दिले होती. परंतु या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे कठीण असल्याने शासकीय कार्यालयासमोर खूप मोठी गर्दी लागली होती. त्यामुळे सरकारने आता अर्ज करण्याची तारीख वाढवून दिली आहे.

आता अर्ज करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी दिला आहे. नवीन बदलानुसार राज्य सरकारने आता 1 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ बहुतांशी महिलांना घेता यावा यासाठी राज्य सरकारने खूप सारे नियम व अटी कमी केले आहे. 

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता केव्हा जमा होणार? 

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या साठी अर्ज करण्याची सुरुवात ही 1 जुलैपासून 31 ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात आली आहे. (Mazi Ladki Bahin Yojana 2024) ही योजना जुलै महिन्यापासूनच लागू होत आहे. 1 जुलैपासून ही योजना पात्र महिलांसाठी सुरू होणार आहे. ज्या महिलांनी अर्ज हा उशिरा केला असेल तर त्या महिलांचे 2 हप्ते हे एकत्र म्हणजेच तीन हजार रुपये एकाच वेळेस खात्यात जमा होणार आहे.

ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केला असेल त्या महिलांचे हप्ते हे ऑगस्टमध्ये जमा होणार आहे. परंतु ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये कर्ज केले असतील त्या महिलांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते हे सप्टेंबर मध्ये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेचा अर्ज भरणे 1 जुलैपासून सुरू झाले असल्याने या योजनेचा लाभ हा 1 जुलैपासून होणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे. 

माझी लाडकी बहीण अर्ज चुकला तर 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी खूप सारी गर्दी झालेली आहे. या अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची पूर्तता करणे हे कठीण असल्याने अर्ज भरण्यामध्ये चूक होऊ शकते किंवा कागदपत्रांची योग्य प्रकारे पूर्तता होऊ शकत नाही. त्यामुळे चुकीचा अर्ज हा भरला जाऊ शकतो. (Mazi Ladki Bahin Yojana 2024) सर्वप्रथम हे अर्ज भरल्यानंतर या अर्जांची पडताळणी होईल आणि त्यानंतर पात्र असणारे अर्ज हे ग्राह्य धरले जातील. आणि अपात्र झालेले अर्ज परत चुका दुरुस्त करून भरावयास लागणार आहे. यासाठी राज्य सरकारने अर्ज भरल्यानंतर सुरुवातीला अर्ज  पडताळणी ठेवलेली आहे. या पडताळणीमध्ये जे अर्ज चुकीचे असतील त्या अर्जदारांची यादीही जाहीर होणार आहे.

ही यादी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत येथील फलकावर लावण्यात येणार आहे. या यादीमध्ये अर्ज चुकलेल्या लाभार्थ्यांची नावे असणार आहे. या यादीमध्ये अर्ज चुकल्याचे कारण देखील त्यामध्ये नमूद केलेले असेल. या यादीमध्ये अर्जदार आपले नाव बघून आणि अर्ज चुकल्याचे कारण बघून पुन्हा अर्ज हा भरू शकतो. अर्जामध्ये झालेली चूक दुरुस्त करून हा अर्ज नवीन भरला जाईल. अर्ज भरल्यानंतर परत एकदा पडताळणी ही होणार आहे. या पडताळणीमध्ये चुकीचा अर्ज आणि कागदपत्रांची अपूर्णता यांची छाननी होणार आहे.

चुकीचे अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाही. लाभार्थ्यांचे अर्ज चुकले असतील त्या अर्जदारांची पुन्हा एकदा यादी बनवण्यात येईल आणि ती परत अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत येथील फलकावर लावण्यात येईल. त्यामध्ये असलेली चूक दुरुस्त करत अर्जदारांना परत एकदा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा कालावधी हा 1 जुलै ते 31 ऑगस्ट ठेवण्यात आलेला आहे.

नवीन नियमानुसार आवश्यक असणारे कागदपत्रे 

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला 1 जुलैपासून सुरुवात करण्यात आली होती. या योजनेचा कालावधी हा 1 जुलै ते 15 जुलै ठेवण्यात आलेला होता.(Mazi Ladki Bahin Yojana 2024) परंतु या अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे हे जमा करण्यासाठी शासकीय कार्यालयासमोर खूप मोठी गर्दी झालेली होती. या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने सरकारवर टीका करत या योजनेत दुरुस्ती करण्यास सांगितले.

त्यामुळे राज्य सरकारने या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रांमध्ये काही नियम शिथिल केले. त्यामुळे अर्जदारांना आता अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. नवीन नियमानुसार आता माझी लाडकी बहीण योजनेसाठी फक्त 4 आवश्यक कागदपत्रांची गरज आहे. या 4 कागदपत्रांमध्ये देखील आपल्याला पर्याय उपलब्ध करून दिलेले आहे.  

  1. आधार कार्ड 
  2. डोमासाईल सर्टिफिकेट/ शाळा सोडल्याचा दाखला/ जन्माचा दाखला/ मतदान कार्ड/ पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड. 
  3. उत्पन्नाचा दाखला/ पिवळे/ केशरी रेशन कार्ड,
  4. हमीपत्र

वर दिलेली कागदपत्रांची यादीतील कागदपत्रे हे अर्जदारा कडे असणे आवश्यक आहे. पूर्वीचे कागदपत्रे त्यामध्ये खूप सारे कागदपत्रे हे अनिवार्य होते. (Mazi Ladki Bahin Yojana 2024) परंतु ते कागदपत्रे पुरविणे काही लाभार्थ्यांना शक्य नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने आवश्यक कागदपत्रावरील अटी या कमी केल्या आणि आता ठराविक कागदपत्रांची आवश्यकता आहे.

आधार कार्ड 

ज्यामध्ये आधार कार्ड हे पहिले कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आधार कार्ड हे बहुतेक लोकांकडे उपलब्ध असते. ते उपलब्ध नसेल तरी आधार कार्ड हे त्वरित देखील काढून मिळते. 

डोमासाईल सर्टिफिकेट (Mazi Ladki Bahin Yojana 2024)

त्यानंतर दुसऱ्या कागदपत्रांमध्ये 5 पर्याय दिलेले आहे. त्यामधील कोणतेही 1 कागदपत्र असणे आवश्यक आहे. डोमासाईल सर्टिफिकेट, शाळा सोडण्याचा दाखला, जन्माचा दाखला, रेशन कार्ड या चार कागदपत्रांमधून 1 कागदपत्र असले तरी लाभार्थी हा अर्ज करू शकतो. (Mazi Ladki Bahin Yojana 2024) जर या चारही कागदपत्र मधून एकही उपलब्ध नसेल तर त्याला पर्याय रेशन कार्ड आहे वरील दिलेले चारही कागदपत्रे जर लाभार्थ्याकडे नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे जुने रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये पंधरा वर्षांपूर्वीचे जुने रेशन कार्ड आवश्यक आहे ते जर नसेल तर वर दिलेले चार कागदपत्रांमधून 1 कागदपत्र असणे आवश्यक आहे.

उत्पन्नाचा दाखला

 तिसरे कागदपत्र हे उत्पन्नाचा दाखला आहे. लाभार्थी महिलेकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला हा घरातील प्रमुख सदस्याचा असणे आवश्यक आहे. आणि उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे. (Mazi Ladki Bahin Yojana 2024) उत्पन्नाचा दाखला हा घरातील मुख्य सदस्याचा असणे आवश्यक आहे.. जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्यालाही राज्य सरकारने पर्याय म्हणून काही कागदपत्रे दिले आहे. (Mazi Ladki Bahin Yojana 2024) जर महिलेकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले तरी अर्जदार हा अर्ज करता करू शकतो. उत्पन्नाचा दाखला, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड या तीनही कागदपत्रांमधून 1 कागदपत्र असणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा : IND VS ZIM 3rd T20 Highlights : भारताने झिम्बाब्वेला 23 धावांनी चारली धूळ, 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने घेतली आघाडी

हमीपत्र

चौथे आवश्यक कागदपत्र ते म्हणजे हमीपत्र आहे. वरील कागदपत्र हे सहजपणे उपलब्ध होऊ शकते. राज्य सरकारने नियम व अटी कमी करत आवश्यक कागदपत्रांमध्ये खूप सारे सवलती दिल्या आहे. त्यामुळे लाभार्थी व्यक्तीला आता कागदपत्रांसाठी जास्त धावपळ करावी लागणार नाही.

हे देखील वाचा : Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : महिलांना मिळणार 1500/- रुपये प्रति महिना, जाणून घ्या अर्ज कसा भरायचा

या योजनेत अजून 1 महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे जर समजा लाभार्थी महिला पर राज्यात जन्मलेली असेल परंतु तिचा विवाह महाराष्ट्रातील पुरुषासोबत झालेला असेल तर या बाबतीत त्या महिलेचा जन्माचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही. (Mazi Ladki Bahin Yojana 2024) त्यासाठी पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरले जाईल. कुटुंबातील 1 महिला अविवाहित असेल तर ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते. 

या योजनेसाठी कोण पात्र असणार 

  • विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिला 
  • ज्या लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल 
  • 21 ते 65 या वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येइल  
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे 

या योजनेसाठी कोणापात्र असेल

  • ज्या एकत्र कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल 
  • जर कुटुंबातील कोणीही सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल 
  • कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकरीवर असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर ते कुटुंब ही या योजनेसाठी अपात्र असेल (Mazi Ladki Bahin Yojana 2024)
  • ज्या कुटुंबामध्ये जर चार चाकी वाहन (ट्रॅक्टर व्यतिरिक्त) असेल तर ते कुटुंब देखील अपात्र असेल

या योजनेचा अर्ज कसा भरायचा

माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाईन आणि ऑफलाईन या 2 पद्धती निवडलेल्या आहे. ऑनलाईन अर्ज हा पोर्टल किंवा मोबाईल किंवा सेतू सुविधा केंद्र येथे ऑनलाइन भरता येऊ शकतो. अजून दुसरा पर्याय हा ऑफलाइन पद्धतीने आहे. (Mazi Ladki Bahin Yojana 2024) लाभार्थी महिला माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज घेऊन तो पूर्णपणे आवश्यक कागदपत्रे जोडून आणि त्यातील माहिती पूर्ण भरून तो अर्ज अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत मध्ये जमा करू शकतात.

हे देखील वाचा : Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update : माझी लाडकी बहीण योजने मध्ये झाले मोठे बदल, जाणून घ्या

आता या योजनेचा अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने मुदत वाढवलेली असल्याने बहुतांश महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्र देखील आता सरकारने सोपे केले आहे. या योजनेचा पहिला हप्ता ऑगस्टमध्ये येणार आहे. ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल त्या महिलांचा जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या बँक अकाउंट मध्ये डायरेक्ट जमा होतील.

Spread the love