MG Comet EV : फक्त 11000 रुपयांमध्ये  घरी घेऊन जा हि कार ! देशातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक  कार

MG Comet EV : फक्त 11000 रुपयांमध्ये  घरी घेऊन जा हि कार ! देशातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक  कार

MG Comet EV
MG Comet EV

MG Comet EV : सध्या महागाई वाढल्यामुळे सर्व सामान्य जनतेला चार चाकी गाडी घेणे अवघड झाले आहे. चार चाकी गाड्यांच्या वाढलेल्या किंमती त्याचबरोबर डिझेल पेट्रोलचे भाव हे देखील खूप वाढले आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या महागाईपासून वाचण्यासाठी खूप सारे लोकांनी CNG गाड्या घेतल्या होत्या.परंतु आता CNG  देखील जास्त महाग झाला आहे. त्याचबरोबर CNG गाड्यांना लागणारा गॅस हा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतो आणि तो गॅस भरण्यासाठी देखील खूप वेळ लागतो.CNG गॅस स्टेशन ठरावीक ठिकाणी उपलब्ध आहे. CNG  गॅस ची वाढलेली किंमत आणि अनियमित उपलब्धता यामुळे लोक CNG गाडीला देखील कंटाळले आहे.

MG Comet EV सध्याच्या काळात पेट्रोल डिझेल आणि CNG या सर्वांवर एकच सर्वोत्तम पर्याय म्हणजे इलेक्ट्रिकल गाड्या होय.इलेक्ट्रिसिटी ही मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.त्याचप्रमाणे चार्जिंग करण्यासाठी कुठेही दूर जावे लागत नाही किंवा लाईन लावावी लागत नाही.आपण गाडी घरी देखील चार्ज करून शकतो आणि इलेक्ट्रिसिटी चे दर हे देखील कमी असल्याने इलेक्ट्रिकल गाड्या सध्याच्या काळात खूप परवडत आहे. श्रीमंत असो किंवा गरीब सर्व जनतेला इलेक्ट्रिकल गाड्या हाच एक बेस्ट पर्याय उपलब्ध राहिला आहे

 इलेक्ट्रिकल गाड्यांमध्ये आता खूप साऱ्या कंपन्या उतरल्या आहे.MG Comet EV सुरुवातीच्या काळात ठराविकच कंपन्या इलेक्ट्रिकल गाड्या बनवत होत्या जसे की टाटा कंपनी.परंतु आता जवळपास सगळ्याच कंपन्या इलेक्ट्रिकल मार्केटमध्ये उतरल्या आहे आणि त्या कंपन्या नवनवीन फीचर्स असलेल्या गाड्या मार्केटमध्ये आणत आहे. त्यामुळे आता कंपनीमध्ये देखील स्पर्धा चालू आहे. इलेक्ट्रिकल गाड्यांमध्ये जास्त करून लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जातो.दिवसेंदिवस या बॅटरीचे मागणी वाढत आहे

सध्या भारत 60 ते 70 टक्के लिथियम आयन बॅटरी चायना मधून इम्पोर्ट करत आहे.भारतामध्ये बॅटरी बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल हा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.भारत सरकारने देखील आता बॅटरी निर्मिती प्रकल्प यांच्यावर जोर देत बॅटरी उत्पन्न क्षमता वाढवण्यास प्रयत्न करत आहे.

MG Comet EV
MG Comet EV Customized

MG Comet EV नवीन कार बद्दल : 

टाटा कंपनीने आपल्या भरपूर चार चाकी इलेक्ट्रिकल मॉडेल्स मार्केटमध्ये उतरवत आहे.आणि त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.त्याचबरोबर आता टाटा कंपनीला टक्कर देण्यासाठी भरपूर कंपन्या इलेक्ट्रिकल गाड्या बनवून मार्केटमध्ये उतरवीत आहे. त्यापैकी एक कंपनी म्हणजे MG . MG ने आपल्या इलेक्ट्रिकल वेहिकल मध्ये भरपूर मॉडेल बनविले आहे.परंतु ते सर्व जास्त किमतीत असल्याने सर्वसामान्य जनतेला त्या गाड्या परवडेबल नाही.

म्हणून MG कंपनीने आपले इलेक्ट्रिकल वेहिकल मधील सर्वात कमी किमतीचे मॉडेल म्हणजेच MG Comet EV हे नवीन मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. MG  कंपनीने टाटा कंपनीच्या टाटा पंच या मॉडेल ला कॉम्पिटिशन म्हणून आपले हे MG Comet EV नवीन मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. आपण MG  कंपनीच्या गाड्यांच्या लक्झरीयस आणि फीचर्स बद्दल जाणूनच आहोत.

MG  कंपनी ही आपल्या कारच्या लुक फीचर्स आणि डिझाईन यामुळे ओळखली जाते.मागील काही काळात चार चाकी गाड्यांमध्ये भरपूर कंपन्या उतरल्या त्यातीलच ही एक कंपनी म्हणजे MG आहे.MG कंपनीने मार्केटमध्ये येताच खूप सारी लोकप्रियता मिळवली आहे.या कंपनीचे देशभरात लाखो ग्राहक आहेत.खूप कमी वेळेत या कंपनीने आपले नाव प्रसिद्ध केले आहे.

MG Comet EV
MG Comet EV Limited Edition

MG Comet EV व्हेरिएंट आणि त्यांची किंमत :

MG Comet EV : MG  कंपनीच्या सर्व व्हेरिएंट मार्केटमध्ये उपलब्ध असून त्यांची किंमत मध्ये थोडा फार फरक आहे.MG  कंपनीचे बेसिक मॉडेल ची किंमत 7.90 लाख आहे तर टॉप मॉडेल ची किंमत 9.98 लाख रुपये आहे.

Sr.NoModel NamePrice
1MG Comet EV Pace7.98 Lakh
2MG Comet EV Play9.28 Lakh
3MG Comet EV Plush9.98 Lakh
MG Comet EV

MG Comet EV साईज (Size) : 

MG Comet EV गाडीचा आकार छोटा असल्याने या गाडीला कमी जागा लागते. शहरी भागामध्ये जागेचा प्रॉब्लेम असल्याने तिथे गाडी पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध नसते. शहरी भागात वर्षां खेरीज वाहनांची रहदारी वाढत चाललेली आहे.त्यामुळे मोठ्या वाहनांना रस्त्यांवर जास्त जागा लागते.मार्ग न मिळाल्याने जास्त वेळ ट्राफिक मध्येच जातो.या गाडीची लांबी 2974 mm आहे आणि रुंदी 1505 mm इतकी आहे.

MG Comet EV या गाडीची उंची 1640 mm आहे.व्हील बेस MG Comet EV या गाडीमध्ये लांब दिलेला व्हील बेस जास्त असल्याने ही गाडी स्पीडमध्ये देखील स्थिर धावते. आपल्याला या गाडीमध्ये व्हील बेस 2010 mm मिळतो. ग्राउंड क्लिअरन्स 165 mm आहे.लांबी आणि रुंदी छोटी असल्या कारणाने ही गाडी सहजपणे अरुंद रस्त्यामध्ये देखील चालू शकते.किंवा ट्राफिक मध्ये अडकल्यास कमी जागेतून देखील ही गाडी सहज निघते. लांबी कमी असल्याने या गाडीला वळण्यासाठी देखील कमी झाला लागते.

Sr.NoSpecificationSize 
1लांबी2974mm 
2रुंदी 1505mm 
3उंची1640mm 
4विल बेस2010mm 
5ग्राउंड क्लिअरन्स165mm 
6बूट स्पेस350 litre 
7चाकांची साईज पुढील145/70 R12
8चाकांची साईज मागील145/70 R12 
MG Comet EV Size

MG Comet EV गाडीमध्ये वापरलेली बॅटरी ! : 

MG Comet EVगाडीमध्ये 17.3 Kwh लिथियम आयन बॅटरी वापरलेली आहे.या गाडीची मोटर हि 6.8 बीएचपी पावर निर्माण करू शकते आणि टॉर्क बनवण्याची क्षमता या गाडीमध्ये 140 nm इतकी आहे. 

गाडीची रेंज किती आहे ? किती किलोमीटर चालू शकते ? : 

अगदी कमी किंमत असून देखील MG Comet EV गाडीची रेंज जास्त आहे. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 7 तासांचा कालावधी लागतो. गाडीसोबत आपल्याला फास्ट चार्जर हे देखील मिळते. 3.3 kw चा चार्जर गाडीसोबत मिळतो.एकदा बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर 230 ते 250 किलोमीटर पर्यंत चालू शकते. या गाडीमध्ये ड्राईव्ह चे तीन मोड दिलेले आहे. आपण आपल्या गरजेनुसार मोड सेट करून शकतो. 

इंजिन असलेल्या गाड्यांमध्ये जसे चार-पाच गिअर असतात तसे MG Comet EV या गाडीमध्ये तीन मोड दिलेले आहेत.सुरुवातीच्या मोड मध्ये बॅटरी जास्त वेळ टिकते.आणि या मोड मध्ये स्पीड थोडा कमी असतो. दुसऱ्या मोड मध्ये गाडीचा स्पीड हा थोडा वाढतो आणि गाडीचा परफॉर्मन्स देखील चांगला होतो.परंतु गाडीची रेंज कमी होते.तिसऱ्या मोडमध्ये गाडीचा पिक – अप जास्त भेटतो आणि गाडीची गती देखील जास्त भेटते.परंतु रेंज थोडी कमी होते. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही गाडी 250 किलोमीटर चालू शकते मध्यमवर्गीय कुटुंबाला ही गाडी परवडणारी आहे. 

हे देखील वाचा : TATA PUNCH EV 3.3 : इलेक्ट्रिक कार मध्ये सर्वात जास्त affordable कार

MG Comet EV गाडी चे फायदे : 

शहरी भागापेक्षा गावाकडे इलेक्ट्रिसिटी बिल यांचे दर कमी असल्याने गावाकडे ही गाडी चांगलीच परवडणारी आहे. 1000  किलोमीटर साठी बॅटरी चार्जिंगचा खर्च हा फक्त 550 रुपये पर्यंत येऊ शकतो. जर आपली गाडी एक महिन्यात 1000 किलोमीटर चालत असेल तर महिन्याला फक्त 550 रुपये खर्च येऊ शकतो.आणि 550 रुपयात आपण एक महिनाभर गाडी चालू शकतो.

 त्यामुळे MG Comet EV गाडी खूप परवडणारी आहे. तसेच बाकी इंधन वर चालणाऱ्या गाड्या या 15 ते 25 लिटर/किलोमीटर एवढेच मायलेज देतात. सध्या पेट्रोल 100 ते 110 रुपये प्रति लिटर या दरामध्ये मिळत आहे. समजा आपण जर गाडीचे मायलेज 20 किलोमीटर प्रति लिटर एवढे घेतले. तर 100 किलोमीटर साठी 5 लिटर इंधन लागेल. प्रति लिटर शंभर रुपये जरी पकडले तरी पाच लिटर चे पाचशे रुपये होतात.म्हणजे आपल्याला शंभर किलोमीटर अंतर गाडी चालविण्यासाठी पाचशे रुपये इतका खर्च येईल. आणि तेच इलेक्ट्रिकल गाडी ला शंभर किलोमीटर अंतर चालण्यासाठी फक्त पन्नास रुपये ची वीज लागेल.म्हणून इलेक्ट्रिक गाडी खूप परवडणारी आहे

.त्याचबरोबर इंधन ची गाडी मध्ये इंजिन वापरल्यामुळे गाडीचे व्हायब्रेशन जास्त होते त्याचबरोबर गाडी चालवत असताना तिचा आवाज देखील आत मध्ये येत असतो. परंतु तेच MG Comet EV गाडीमध्ये होत नाही. इलेक्ट्रिकल गाडीमध्ये गाडीचा स्पीड कितीही असला तरी आत मध्ये आवाज येत नाही.आणि त्याचबरोबर कुठलेही व्हायब्रेशन होत नाही. व्हायब्रेशन कमी असल्याने आणि गाडीमध्ये स्पेअर पार्ट कमी असल्यामुळे गाडीचा मेंटेनन्स हा देखील कमी येतो आणि जरी थोडा फार मेंटनेन्स निघाला तरी तो पूर्ण करण्यासाठी कमी खर्च लागतो. या गाडीमध्ये फक्त बॅटरी आणि मोटर हेच मुख्य पार्ट आहे. इंजिन नसल्यामुळे या गाडीमध्ये इंजिन ला ऑइल टाकावे लागत नाही.

MG Comet EV गाडीची सीट कॅपॅसिटी : 

MG Comet EV गाडीमध्ये चार सीट आरामात बसू शकतात. पुढे दोन ऍडजेस्टेबल सीट दिलेले आहे आणि मागे अटॅच दोन सीट आहे. मागील सीटवर तीन व्यक्ती देखील बसू शकतात.म्हणजे 4 ते 5 पर्यंत सीट या गाडीमध्ये आरामात बसू शकतात. गाडीमध्ये बूट स्पेस हा 350 लिटर आहे. बूट स्पेस देखील या गाडीमध्ये आपल्याला चांगला मिळतो.त्यामुळे थोडेसे सामान देखील आपण या गाडीमध्ये आरामात नेऊ शकतो.

हे देखील वाचा : Lightening : Mobile मुळे खरच वीज पडते का ?

MG Comet EV गाडीचे इंटेरियर (Interior) आणि फीचर्स :

MG Comet EV गाडी दिसायला जरी लहान असली तरी या गाडीमध्ये खूप सारे फीचर्स दिलेले आहे.जे फीचर्स आपल्याला साधारणता पंधरा-वीस लाख रुपये किमतीच्या गाडीमध्ये बघायला मिळतात ते फीचर्स या छोट्याशा गाडीमध्ये दिलेली आहे.

  • 10.25 इंच स्क्रीन टच इन्फोटेनमेंट डिसप्ले .
  • दोन फ्रंट एअर बॅग 
  • डिजिटल की, चावी
  • ब्लूटूथ कार प्ले आणि अँड्रॉइड सिस्टीम
  • सर्व बाजूने सेंसर
  • रियर पार्किंग कॅमेरा 
  • टायर प्रेशर मेजरमेंट डिस्प्ले
  • डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
  • 3 पॉईंट सीट बेल्ट
  • स्मार्ट इग्निशन सिस्टीम 

हे देखील वाचा : Force Gurkha 2024 : 7 सीटर ऑफ रोडिंग कार लॉन्च,आता Mahindra Thar ला विसरून जाल

Spread the love