MG Comet EV Mileage : हि कार एक चार्ज मध्ये देते एवढे मायलेज, वारंवार चार्ज करण्याची गरज नाही
MG Comet EV Mileage : जगभरात इलेक्ट्रिकल कारची मागणी वाढत चालली आहे. पारंपारिक पद्धतीने वापरत आलेल्या कार मध्ये पेट्रोल आणि डिझेल इंधनाचा वापर केला जातो. पेट्रोल इंधनाच्या वाहनांमुळे प्रदूषण देखील वाढत आहे त्याचबरोबर या इंधनाचे दर देखील खूप वाढलेले आहे. (MG Comet EV Mileage) दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत चाललेले आहे सरकार देखील आता इलेक्ट्रिकल वाहनांची विक्री वाढण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना पाठींबा देत आहे. भारत सरकारने इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर वाढण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहनांवर सबसिडी देखील देण्यास सुरुवात केलेली आहे.
MG Comet EV या कार बद्दल
इलेक्ट्रिकल वाहनांमुळे प्रदूषण देखील कमी होते. बाहेरील देशांमध्ये भारताच्या तुलनेत इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर जास्त आहे. त्याचबरोबर सीएनजी वाहनांचा वापर देखील जास्त होत आहे. बाहेरील देशांनी पेट्रोल आणि डिझेल वाहनांचा वापर खूपच कमी केलेला आहे त्या देशांकडून शिकवण घेत भारताने आता आपल्या देशात देखील पेट्रोल डिझेल वाहनांचा वापर कमी होण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहनांवर भर देण्यास सुरुवात केलेली आहे. (MG Comet EV Mileage) इलेक्ट्रिकल वाहनाजला लागणारी बॅटरी आणि बॅटरी बनवण्यासाठी आवश्यक असणारा कच्चामाल देखील भारतामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
त्यामुळे भारत सरकार आता आपल्या देशामध्येच बॅटरी निर्मिती करून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रिकल वाहनांमुळे वायु प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हे दोन्हीही खूप कमी होते आणि इलेक्ट्रिकल वाहनांचा मेंटेनन्स हा देखील खूप कमी असतो. सध्या पेट्रोल डिझेलचे दर देखील खूप जास्त वाढलेले आहेत. या वाढलेल्या दरामध्ये चार चाकी वाहन चालवणे आता मुश्किल झाले आहे. इलेक्ट्रिकल वाहनांमध्ये इंजिन वापरलेले नसते, पावर निर्मितीसाठी इलेक्ट्रिकल वाहनांमध्ये बॅटरी आणि मोटरचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या वाहनाचा मेंटेनन्स खूप कमी असतो.सध्या देशभरात खूप साऱ्या कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल वाहने बनविण्याची स्पर्धा चालू आहे.
प्रत्येक कंपनी थोड्या कालावधीनंतर आपली नवीन इलेक्ट्रिकल कार बाजारात उतरवित आहे. सध्या देशात टाटा, महिंद्रा, एमजी हेक्टर, या खूप साऱ्या कंपनी आपल्या इलेक्ट्रिकल कार बाजारामध्ये आणत आहे. कमी किंमत मध्ये जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या कार या कंपन्या बनवित एकमेकांना टक्कर देत आहेत. (MG Comet EV Mileage) सध्या भारत देशामध्ये टाटा नेक्सोन EV, टाटा पंच EV आणि एमजी हेक्टर EV या इलेक्ट्रिकल कारचा दबदबा आहे. टाटा कंपनीच्या कार ह्या आपल्या मजबुतीमुळे जगभरात प्रसिद्ध आहे आणि टाटा कंपनीचे कार मायलेज देखील चांगले देतात.
देशातील एकूण इलेक्ट्रिकल कार कंपन्यांच्या विक्रीमध्ये 70 % वाटा हा टाटा कंपनीचा आहे. आता टाटा कंपनीला टक्कर देण्यासाठी एमजी हेक्टर देखील आपल्या इलेक्ट्रिकल कार मार्केटमध्ये उतरवित आहेत. एमजी हेक्टर मागील काही वर्षांपासून इलेक्ट्रिकल कार बनवत आहेत. परंतु आता टाटा कंपनीच्या टाटा पंच EV या कारला तोड देण्यासाठी एमजी हेक्टरने आपली नवीन कार मार्केटमध्ये उतरवित लोकांचे लक्ष आकर्षित केले आहे. हि कार योग्य किमतीमध्ये उपलब्ध असून या कारचे मायलेज देखील हे खूप जास्त आहे. त्यामुळे एका सर्वसामान्य जनतेला परवडणारी आहे.
सध्याच्या वाढत्या इंधन दरवाढीमुळे नागरिक देखील आता इलेक्ट्रिकल वाहनांकडे वळत आहेत. इलेक्ट्रिकल वाहन खरेदी करताना कारचे मायलेज आणि कारची बॅटरी या गोष्टींकडेच लक्ष द्यावे लागते. कारण की कारचे मायलेज हे कारच्या बॅटरीवर अवलंबून असते. जेवढी कारची बॅटरी ची कॅपॅसिटी जास्त असते तेवढे त्या कारची मायलेज देण्याची क्षमता ही जास्त असते. (MG Comet EV Mileage) कारची बॅटरी ची कॅपॅसिटी जर जास्त असेल तर कार मायलेज जास्त देते. त्याचबरोबर कारला वारंवार चार्जिंग करण्याची गरज पडत नाही. एकदा चार्ज केल्यानंतर कार हे खूप सारे अंतर चालू शकते. आता MG Hector कंपनीने आपल्या नवीन कार मध्ये खूप सार्या सुधारणा करत ही कार मार्केटमध्ये उतरविली आहे.
या कारचे नाव MG Comet EV हे असून हि कार मागील काही वर्षांपासून मार्केटमध्ये आलेली आहे. परंतु कंपनीने आता या कारमध्ये खूप मोठे बदल करत टाटा कार च्या टाटा पंच EV या कारला तोड देण्यासाठी आपली एमजी कॉमेट ईव्ही कार मार्केटमध्ये आणली आहे. एमजी हेक्टर ही कार कंपनी आपले कारचे उत्तम अशी डिझाईन आणि खूप सारे नवीन पिक्चर्स देत असते. एमजी कॉमेट ईव्ही मध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून हि कार डिझाईन केलेली आहे. त्याचबरोबर खूप सारे फीचर्स हे या कारमध्ये देण्यात आलेले आहे.
इलेक्ट्रिकल कारच्या किमती या जास्त असतात आणि त्या कारमध्ये जर आपण टॉप मॉडेल घेतले तर त्याची किंमत हि अधिक असते. परंतु एमजी कंपनीने या गोष्टींवर मात करत अगदी कमी किंमत मध्ये टॉप मॉडेल चे फीचर्स कमी किंमत च्या मॉडेलमध्ये दिलेले आहे. (MG Comet EV Mileage) त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला अगदी कमी किंमत मध्ये ही कार उपलब्ध आहे.
त्याचबरोबर या कारमध्ये असलेले नवीन फीचर्स हे देखील कमी किंमत मध्ये सर्वसामान्य जनतेला मिळतात. इलेक्ट्रिकल कार खरेदी करताना सर्वप्रथम कारची बॅटरी कॅपॅसिटी आणि कारचे मायलेज या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. तर चला आज आपण जाणून घेऊयात एमजी कॉमेट टीव्ही या कारचे मायलेज बद्दल आणि या कारमध्ये उपलब्ध असलेले फीचर्स. (MG Comet EV Mileage) प्रत्येक इलेक्ट्रिकल कारचे मायलेज हे त्या कारच्या बॅटरीच्या कॅपॅसिटी वर डिपेंड असते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया एमजी कॉमेट ईव्ही मधील बॅटरी बद्दल.
एमजी कॉमेट ईव्ही बॅटरी
एमजी कॉमेट ईव्ही या कारमध्ये लिथियम आयन बॅटरी चा वापर करण्यात आलेला आहे. लिथियम आयन बॅटरी ही कमी जागेमध्ये जास्त विद्युत साठा करू शकते. या बॅटरीला जागा कमी लागते त्याचबरोबर या बॅटरीचे वजन हे देखील कमी असते. त्यामुळे छोट्याशा कार मध्ये देखील ही बॅटरी सहजपणे बसू शकते आणि कमी जागेमध्ये जास्त विद्युत साठा साठवू शकते. या बॅटरीची कॅपॅसिटी ही 17.3 Kwh इतकी आहे.
या बॅटरीला 0 ते 100% चार्जिंग होण्यासाठी 7.5 Kw च्या फास्ट चार्जरने 3.5 तास लागतात. 3.5 तासांमध्ये ही बॅटरी 0 ते 100% पूर्ण चार्जिंग होते. आणि बॅटरी चार्जिंग करण्यासाठी जर 3.5 Kw चे चार्जर वापरले. तर 0 ते 100% चार्जिंग होण्यासाठी 7 ते 8 घंटे लागतात. सुरुवातीला या कार मध्ये फक्त साधारण चार्जर देण्यात आले होते. त्यामुळे चार्जिंग करण्यासाठी खूप सारा टाईम लागत होता. परंतु आता या कार मध्ये फास्ट चार्जर सुविधा दिल्याने अगदी कमी वेळे मध्ये देखील तुम्ही हि कार 100% चार्जिंग करू शकतात.
एमजी कॉमेट ईव्ही मायलेज (MG Comet EV Mileage)
एमजी कॉमेट ईव्ही मायलेज कारचे मायलेज ड्राइव मोडवर अवलंबून असते. कॉमेट ईव्ही मध्ये तीन मोड देण्यात आलेले आहेत. पहिला आहे नॉर्मल मोड ज्यामध्ये कारचा स्पीड हा साधारण असतो आणि टोर्क देखील कमी असतो. दुसरा मोड हा इकॉनोमी मोड, या मोडमध्ये कारचा स्पीड थोडा वाढविण्यात येतो आणि मायलेज थोडे कमी होते. आणि तिसरा मोड आहे जो की सगळ्यात पावरफुल मोड आहे स्पोर्ट मोड. या मोड मध्ये मध्ये कारचे मायलेज कमी असते. परंतु कार हि जास्त पावर जनरेट करून वेगाने धावू शकते. ज्यावेळेस कार हि ओबडधोबड रस्त्यावरून आणि उंच टेकड्यांवरून प्रवास करत असेल त्यावेळेस या मोड चा उपयोग होतो.
यामोड मध्ये कार जास्त पावर तयार करून वेगाने धावू शकते. कारचे मायलेज हे देखील त्या मोड वर डिपेंड असते. त्याचबरोबर मायलेज मध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या कार मध्ये असलेले एसी. (MG Comet EV Mileage)जर आपण गाडी चालवताना एसी चा वापर केला तर कारच्या मायलेज मध्ये 10 ते 15% ने कपात होते. आता कंपनीने मायलेज हे 230 किलोमीटर दिलेले आहे. परंतु या कारचे मायलेज हे थोडे कमी आहे.
जर ही कार आपण इकॉनोमी मोड मध्ये चालवली आणि एसी पण चालू असला तर हि कार आपल्याला 180 ते 190 किलोमीटरची रेंज देते. आणि जर नॉर्मल मोड मध्ये चालविली तर एसी चालू असताना ही कार नॉर्मल मोडमध्ये 190 ते 205 किलोमीटर पर्यंत रेंज देते. आणि स्पोर्ट मोडमध्ये चालविली तर ही कार आपल्याला एसी चालू असताना 170 ते 180 किलोमीटर पर्यंत रेंज देते.
ट्रान्समिशन सिस्टीम
या कार मध्ये इंजिन नसल्याकारणाने हि कार पूर्ण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीमवर कार्य करते. या ट्रान्समिशन मध्ये आपल्याला गिअर न देता यामध्ये तीन वेगळे मोड देण्यात आलेले आहेत. हे मोड बदलविण्यासाठी आपल्याला एक बटन देण्यात आलेले आहे. ते बटन दाबून आपण आपल्या गरजेनुसार कारचा मोड चेंज करू शकतो. यामध्ये तीन मोड देण्यात आलेले आहे. पहिला नॉर्मल मोड दुसरा इकॉनोमी मोड तिसरा स्पोर्ट मोड. चालक हा आपल्या गरजेनुसार या मोड मध्ये कार चालवू शकतो.
इंजिन
ही कार इलेक्ट्रिकल कार असल्याने या कारमध्ये कुठलेही प्रकारचे इंजिन देण्यात आलेले नाही. त्या बदल्यात या कार मध्ये आपल्याला पावर निर्मितीसाठी बॅटरी आणि त्यासोबत मोटर दिलेली असते. बॅटरीच्या विद्युत शक्तीचा वापर करून मोटर ही पावर तयार होते.(MG Comet EV Mileage) या कारमध्ये आपल्याला पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर बघायला मिळते. ही मोटर 41.42 Kw पर्यंत पावर तयार करू शकते. जास्तीत जास्त पावर आपल्याला 41.42 BHP इतका मिळतो आणि जास्तीत जास्त टॉर्क हा 110 Nm भेटतो.
हे पण वाचा : Revolt RV400 Price : Revolt ने लॉन्च केली नवीन Revolt BRZ Electric Bike,रेंज 150km
चाकांना गती
बॅटरी आणि मोटर हे पावर तयार करतात आणि त्या पावर चा उपयोग करून कारचे चाक फिरतात. या कारमध्ये आपल्याला पुढील चाकांमध्ये ताकद देण्यात आलेली आहे. मोटर द्वारे तयार झालेली पावर ही पुढील टायरला मिळते आणि पुढील टायर हे फिरतात.
ब्रेक, सस्पेन्शन, स्टेरिंग
या कारमध्ये कंपनीने आपल्याला पुढील आणि मागील चारही चाकांना डीस ब्रेक दिलेली आहे. कारच्या मागे बाजूने मल्टी लिंक कॉइल सस्पेन्स देण्यात आलेले आहे. तर पुढील बाजूला मॅप फेरसन स्ट्रेट हे सस्पेन्स दिले आहे. या कारची ब्रेकिंग कॅपॅसिटी ही देखील चांगली आहे. 100 kmph ते 0 kmph ब्रेक लागण्यासाठी ही कार 55.71 मीटर मध्ये ब्रेक लावू शकते. या कारमध्ये पिकअप देखील चांगला आहे. 20 ते 80 किलोमीटर एवढा स्पीड मिळविण्यासाठी 10.14 सेकंद मध्ये मिळू शकते.
हे पण वाचा : Maruti Suzuki Alto 800 फक्त 60000/- रुपयांमध्ये ही कार घरी घेऊन जा
ॲडव्हान्स फीचर्स
एमजी हेक्टर ही कंपनी आपल्या खूप सार्या अत्याधुनिक फीचर्स साठी ओळखली जाते. अगदी कमी किंमत मध्ये या कंपनीने आपल्याला लक्झेरियस कारचे फीचर्स देत असते. (MG Comet EV Mileage) या कारमध्ये आपल्याला लाईव्ह लोकेशन, रिमोट इमोबीलायझर, इंजिन स्टार्ट अलार्म, डिजिटल चावी, ओवर स्पीड अलार्म, स्मार्ट वॉच ॲप, रिमोट डोअर लॉक, इन बेल्ट ॲप, हिंग्लिश वोईस कमांड.
एमजी कॉमेट ईव्ही या कारचे मायलेज किती आहे?
एमजी कॉमेट ईव्ही या कारचे मायलेज 230 किलोमीटर आहे.
एमजी कॉमेट ईव्ही या कारची सीटिंग कॅपॅसिटी किती आहे?
एमजी कॉमेट ईव्ही या कारची सिटी कॅपॅसिटी 4 व्यक्तीची आहे.
MG Comet EV या कारच्या बॅटरीची कॅपॅसिटी किती आहे?
एमजी कॉमेट ईव्ही या कारच्या बॅटरीची कॅपॅसिटी 17.3 Kwh आहे.
एमजी कॉमेट ईव्ही या कार सोबत फास्ट चार्जर भेटते का?
हो, एमजी कॉमेट ईव्ही या कार सोबत फास्ट चार्जर भेटते.
एमजी कॉमेट ईव्ही या कार सोबत किती kwh चे चार्जर मिळते?
एमजी कॉमेट ईव्ही या कार सोबत 7.5 kwh चे चार्जर मिळते.
MG Comet EV या कारला 0 ते 100 % चार्जिंग होण्यासाठी किती वेळ लागतो?
एमजी कॉमेट ईव्ही या कारला 0 ते 100 % चार्जिंग होण्यासाठी 3.5 तास वेळ लागतो.
एमजी कॉमेट ईव्ही या कार मधील इन्फोटेकमेंट सिस्टीम ची साईज किती आहे?
एमजी कॉमेट ईव्ही या कार मधील इन्फोटेकमेंट सिस्टीम ची साईज 10.25 इंच आहे.
एमजी कॉमेट ईव्ही या कार मध्ये किती स्पीकर आहे?
एमजी कॉमेट ईव्ही या कार मध्ये 2 स्पीकर आहे.
MG Comet EV या कारमध्ये सनरूफ आहे का?
एमजी कॉमेट ईव्ही या कारमध्ये सनरूफ नाहीये.
एमजी कॉमेट ईव्ही या कारची किंमत किती आहे?
या कारची एक्स शोरूम किंमत 7 लाख ते 10 लाख पर्यंत आहे.