Mini Cooper : मार्केटमध्ये हि कार घालणार धुमाकूळ, फक्त 7 सेकंदात घेते एवढा स्पीड

Mini Cooper : मार्केटमध्ये हि कार घालणार धुमाकूळ, फक्त 7 सेकंदात घेते एवढा स्पीड

Mini Cooper : Mini Cooper या विदेशी कंपनीने पुन्हा एकदा मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आपली नवीन ह्याशबॅक कार उतरवली आहे. ही विदेशी कंपनी सध्या बाजारात आपले 2 नवीन वाहने लॉन्च करणार आहे. यामध्ये Mini Cooper आणि कंट्री मॅन या 2 कारचे लॉन्चिंग केले आहे. त्याचबरोबर या कारचे प्री बुकिंग देखील सुरू झाले आहे. ही कंपनी एक लक्झरी कार बनविण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे, कंपनीने आपल्या या दोन्ही वाहनांना 24 जुलैला मार्केटमध्ये उतरविले आहे.

Mini Cooper
Mini Cooper

Mini Cooper मार्केटमध्ये येताच या कारला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या नवीन डिझाईन केलेल्या Mini Cooper कारच्या खरेदीसाठी लोक उत्सुक आहे आणि या पाचव्या जनरेशनच्या Mini Cooper ला 3 डोर देण्यात आलेले आहेत. तसेच कार मध्ये पावरफुल ब्रेकिंग सिस्टीम चा वापर करण्यात आला असल्याने कारचा स्पीड देखील कंट्रोल करणे अगदी सोपे आहे.

कारची (Booking) बुकिंग कशी होणार 

Mini Cooper या कारला बुक करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. या कंपनीची अधिकृत वेबसाईट ही Shop Mini .In अशी आहे. या कारला बुक करण्यासाठी तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन महत्त्वाची माहिती त्यामध्ये भरून तुम्ही कार बुक करू शकता किंवा या कंपनीच्या अधिकृत डीलर ला भेट देऊन कार संदर्भात माहिती घेऊन तुम्ही कार ऑफ लाईन पद्धतीने देखील बुक करू शकता. 

या लक्झरीयस कार मध्ये कंपनीने खूप सारे ऍडव्हान्स सुविधा दिलेल्या आहेत आणि हि कार आकाराने छोटी असून या कारची किंमत ही जास्त असते. ही कार कंपनी जगभरात आपल्या लक्झरीयस कार साठी प्रसिद्ध आहेत, चला तर जाणून घेऊया या नवीन लॉन्च झालेल्या कार बद्दल 

Mini Cooper Price कारची किंमत किती असणार आहे? 

Mini Cooper ही कार पेट्रोल व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे या कारमध्ये दुसरे कुठल्याही प्रकारचे इंधनचे दुसरे व्हेरिएंट उपलब्ध नाही. या कारची एक्स शोरूम किंमत 44.90 /- लाख रुपये आहे. ही किंमत एक्स शोरूम असून ऑन रोड किंमत या कारची ही जास्त असणार आहे. 

Mini Cooper Mileage मायलेज 

ही एक पेट्रोल कार आहे आणि ही लक्झरीयस असून या कारमध्ये पावरफुल इंजिन वापरण्यात आलेले आहे. त्यामुळे बाकी कार पेक्षा या कारचे मायलेज हे थोडे कमी असणार आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या कारचे मायलेज हे 14 kmpl इतके असू शकते.

Mini Cooper Speed स्पीड 

कार मध्ये टर्बो पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. पेट्रोल इंजिन मुळे कारचा स्पीड हा वाढतो यामुळे कार अगदी कमी वेळेमध्ये जास्त स्पीड घेऊ शकते. Mini Cooper या कार मध्ये 2 लिटर चे टर्बो इंजिन वापरण्यात आलेले आहेत. हि कार वजनाने देखील कमी आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार फक्त 7.7 सेकंद मध्ये 0-100 Kmph एवढा स्पीड घेऊ शकते. या कारमध्ये अगदी कमी वेळेत जास्त स्पीड घेण्याची कॅपॅसिटी आहे.

Mini Cooper Powerful शक्तिशाली 

Mini Cooper ही एक पावरफुल कार पासून या कारमध्ये टर्बो इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे हि कार कमी वेळेत जास्त स्पीड घेऊ शकते. या कारमध्ये 2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन वापरण्यात आलेले आहे. या इंजिनची क्षमता 1998CC आहे. तसेच हे इंजिन 201 bhp पावर जनरेट करू शकते आणि टॉर्क 300 nm इतका जनरेट करू शकते. या इंजिनमध्ये एकूण 4 सिलेंडर देण्यात आलेले आहे आणि प्रत्येक सिलेंडरला 4 वाल देण्यात आलेले आहे. या इंजन मध्ये ट्रान्समिशन हे ऑटोमॅटिक असून त्याच्यामध्ये 7 स्पीड DCT गिअर बॉक्स वापरण्यात आलेला आहे. तसेच या इंजिनची ताकद ही कारच्या पुढील चाकांना देण्यात आलेली आहे. ही कार BS VI 2.0 या नॉर्म्सवर आधारित आहे.

Mini Cooper सस्पेन्शन आणि ब्रेक 

या वेगवान कार साठी कारच्या चाकांना पावरफुल ब्रेक देण्यात आलेले आहे या कारच्या पुढील आणि मागील चारही चाकांना डिस्क ब्रेक वापरण्यात आलेले आहे. तसेच कारच्या पुढील चाकांसाठी मॅक फर्जंन कॉइल स्प्रिंग आणि मागील चाकांसाठी टॉर्शन बार विथ स्प्रिंग हे अत्याधुनिक सस्पेन्शन वापरण्यात आलेले आहे. कारचे स्टेरिंग हे पावरफुल आहे, हे स्टेरिंग मागेपुढे आणि वर खाली ऍडजेस्ट करता येऊ शकते. स्टेरिंग व्हील हे गोलाकार आकाराचे असून त्यावर लेदरचे कव्हर आहे आणि हे स्टेरिंग 2 फोर्क चे देण्यात आले आहे. तसेच कारच्या स्टेरिंग वर अनेक कंट्रोल बटन दिलेले आहे. 

Mini Cooper कारची साईज 

या कारच्या नावामध्येच मिनी असे आहे त्याप्रमाणे कार हि देखील आकाराने छोटी आहे. ही कार टाटाच्या Tiago कार पेक्षा आकाराने छोटी आहे. या कारची लांबी ही 3876 mm रुंदी 1744mm  उंची 1432 mm आणि कार मध्ये मागील बाजूस सामान ठेवण्यासाठी बुट स्पेस हा 210 Litre चा आहे. या कारची सीटिंग कॅपॅसिटी 5 व्यक्तींची आहे. या कार चा व्हील बेस हा 2495 mm इतका आहे. तसेच कार मध्ये 3 दरवाजांचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये डाव्या बाजूने 1 दरवाजा उजव्या बाजूने 1 दरवाजा आणि बूट स्पेस साठी मागे 1 दरवाजा देण्यात आलेला आहे. 

Mini Cooper Features आरामदायक सुविधा 

ही एक लक्झरीयसयस कार असून या कार मध्ये खुप सार्‍या लक्झरी सुविधा देण्यात आलेल्या आहे. या कार मध्ये पावर स्टेरिंग दिलेले असून कारचे पुढील आणि मागील सर्व काचा या पावर ऑपरेटेड आहे. तसेच कारमध्ये पावरफुल AC आणि Heater देण्यात आले आहे. तसेच कार ला ऍडजस्टेबल स्टेरिंग दिलेले आहे आणि ड्रायव्हर सीट हे देखील ऍडजेस्टेबल आहे. कार चालक हा त्याच्या गरजेनुसार सीट ऍडजेस्ट करू शकतो. या कारचे सीट हे इलेक्ट्रिकल ऍडजेस्टेबल आहे फक्त एक बटन दाबून कार चे पुढील सीट हे ऍडजेस्ट करता येऊ शकते. इलेक्ट्रिकल ऍडजेस्टेबल सुविधा ही फक्त कारच्या पुढील सीटाना देण्यात आलेली आहे.

तसेच कार मध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एअर क्वालिटी कंट्रोल अशा सुविधा उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मुळे कार मधील वातावरण हे सेट करण्यात आलेल्या टेंपरेचर एवढेच मेंटेन राहते. तसेच कार मध्ये ॲक्सेसरी पावर आउटलेट दिलेले आहे. त्यामुळे कार साठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी या ॲक्सेसरीमध्ये उपलब्ध असतात.

तसेच अजून सुविधा बद्दल बोलायचे झाल्यास ट्रंक लाईट, वेनिटी मिरर, रियर रीडिंग लॅम्प, रियर सीट अड्जस्टेबल हेड रेस्ट, हाईट अड्जस्टेबल फ्रंट सीट, कप होल्डर फ्रंट, कप फोल्डर रियर, क्रूज कंट्रोल, पार्किंग सेन्सर, रियल टाईम वेहिकल ट्रेकिंग, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन, ग्लोबॉक्स, वोईस कमांड, यूएसबी चार्जर, अजर वार्निंग, आयडियल स्टार्ट स्टॉप सिस्टीम, ऑटोमॅटिक हेड लॅम्प, फॉलो मी होम हेड लॅम्प, कारच्या आतील डिझाईन बद्दल बोलायचे झाल्यास कार मध्ये ड्युअल टोन कलर ऑप्शन उपलब्ध आहे. तसेच कारच्या डॅशबोर्ड वरती ट्याकोमीटर देण्यात आलेले आहे आणि डिजिटल क्लस्टर दिलेले आहे. तसेच कारच्या आत मध्ये बहुतेक ठिकाणी लेदर चा वापर करण्यात आलेला आहे. 

Mini Cooper Look एक्सटेरियर 

कार चा समोरून लुक हा खूपच आकर्षक असा देण्यात आलेला आहे. या कार ला समोरून 2 गोलाकार आकाराचे हेडलॅम्प देण्यात आलेले आहे. तसेच या हेडलॅम्प च्या आत मध्ये सरळ पट्टीमध्ये एलईडी डीआरएल देण्यात आलेले आहे तसेच या हेडलॅम्प च्या खाली फॉग लाईट दिलेले आहे. कारचे हेडलॅम्प हे ऍडजेस्टेबल आहेत. तसेच पावर ऍडजेस्टेबल मिरर देखील दिलेले आहेत.

मिरर फोल्ड देखील होतात कारच्या काचेवर वापरण्यात आलेले वायपर रेन सेंसिंग आहे तसेच या काच साठी डी फॉर पद्धतीचा देखील वापर करण्यात आलेला आहे. कारचे सर्व चाके हे अलॉय व्हील चे आहे तसेच कारच्या बाहेरून टर्न इंडिकेटर दिलेले आहे. हे टर्न इंडिकेटर आरशाला जोडून दिलेले आहे. कारचे हेड लॅम्प हे ऑटोमॅटिक असून सर्व लॅम्प हे एलईडी देण्यात आलेले आहे. 

हे देखील वाचा : TATA Nexon CNG : आली आहे देशातील no 1 CNG कार, जाणून घ्या कींमत

Mini Cooper Safety सेफ्टी 

सेफ्टी च्या बाबतीत या कार ला ग्लोबल N – CAP तर्फे 5 स्टार रेटिंग देण्यात आलेली आहे. या कार मध्ये ABS ब्रेकिंग सिस्टिमचा वापर केलेला आहे. Mini Cooper कार मध्ये सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉकिंग, अँटी अलार्म, डे नाईट रियर व्ह्यू मिरर, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन, सीट बेल्ट वार्निंग, डोअर अजर वार्निंग, ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग, इंजिन इमोबाईलजर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, रियर कॅमेरा अशा अनेक सुविधा कार मध्ये उपलब्ध आहेत.

ABS ब्रेकिंग सिस्टीम अगदी महत्त्वाची असून यामुळे कार अगदी कमी अंतरामध्ये कंट्रोल करता येते. ब्रेकिंग सिस्टीम या पद्धतीचा वापर कार मध्ये गरजेचा असतो. यामुळे कारचे चाक हे हळूवार फिरतात त्यामुळे कार स्लिप होत नाही आणि कार पलटी होण्याची भीती देखील राहत नाही.

Mini Cooper एंटरटेनमेंट सुविधा 

एंटरटेनमेंट साठी कार मध्ये भरपूर सुविधा देण्यात आल्या आहे. आपल्याला या कारमध्ये वायरलेस चार्जर, ब्लूटूथ कनेक्शन, स्क्रीन टच डिस्प्ले, रेडिओ, स्पीकर, एप्पल कार प्ले, अँड्रॉइड प्ले, यूएसबी पोर्ट अशा भरपूर सुविधा कार मध्ये देण्यात आलेले आहे. या कारमध्ये 10 इंच चा इन्फोटेनमेंट स्क्रीन डिस्प्ले देण्यात आलेला आहे.

हे देखील वाचा : Mahindra Bolero Power Plus : आली आहे महिंद्राची नवीन 9 सीटर बोलेरो, देशातील No 1 कार


Spread the love