Site icon Get In Marathi

Nafed Kanda Market : नाफेडचा कांदा आणि भाव पडण्याच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका

Nafed Kanda Market : नाफेडचा कांदा आणि भाव पडण्याच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका

Nafed Kanda Market : राज्यामध्ये सध्या नाफेड चा कांदा आल्या असल्याची अफवा पसरत आहे, परंतु सध्या तरी नाशिक किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीमध्ये नाफेडचा कांदा बाजारात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाव कोसळण्याची भीती न बाळगता एकदम कांदा विक्रीला आणू नये. 

Nafed Kanda Market

नाफेड चा कांदा नाशिकच्या स्थानिक बाजार समितीमध्ये आला असून, त्यामुळे कांदा बाजार भाव पडले असल्याची अफवा सगळीकडे पसरत आहे. परंतु शेतकऱ्यांनी अश्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अशा आपण विश्वास ठेवून त्यांनी साठवलेला कांदा एकदम बाजारात आणू नये असे आवाहन कांदा उत्पादक संघटनांनी केले आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून काही माध्यमातून समाजामध्ये नाफेड चा कांदा बाजारात आला असल्याची अफवा सर्वत्र पसरली आहे, त्यामुळे भाव पडण्याच्या भीतीने कांदा उत्पादक शेतकरी घाबरलेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी लासलगाव, निफाड बाजारात नाफेडचा मोठा स्टॉक आले असल्याची अफवा पसरविण्यात आल्या होत्या. (Nafed Kanda Market) या पार्श्वभूमीवर नाफेडचे संचालक केदा आहेर यांनी सांगितले की नाफेडने असा कोणताही कांदा बाजारात आणि नाशिकच्या बाजारात आणलेला नाही. तरी शेतकऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. तसेच नाफेडचा बफर स्टॉक मधील कांदा स्थानिक बाजारात विक्री केला जात नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. 

गणेशोत्सवापर्यंत भाव टिकतील कारण 

नाफेडच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा नुसार नाफेडला उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिळनाडू, जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदिगड, आसाम आणि पूर्वेकडील राज्य यासारख्या ठिकाणी या कांद्याचे विक्री होणार आहे तसेच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, अमरावती याठिकाणी आडते किंवा ब्रोकर यांच्याकडून बफर स्टॉक मधील कांद्याच्या व्यवहारासाठी निविदा मागविल्या आहेत.

या निविदांमधील अटी शर्तींना नाफेडकडून नेमलेल्या आडतदारांनी बफर स्टॉक चा कांदा नाफेडणे निर्देशित केलेल्या देशातील विविध बाजारात वेगवेगळ्या उच्च किमतीला विकायचा आहे. कांदा व्यापाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तसेच ग्राहक संरक्षन विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार सध्या उत्तरेकडील राज्य आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये कांद्याचे भाव 50 रुपये किलो पेक्षा जास्त गेल्याने नाफेड चा कांदा या भागात विक्री होण्याची शक्यता आहे. तसेच या निविदा 9 सप्टेंबर पर्यंत उघडणार असून त्यानंतर पुढील बऱ्याच दिवसानंतर कांदा बाजारात येऊन शकतो. 

नाफेड कडून मिळालेल्या माहितीनुसार नाफेड कडचा बफर स्टॉकच्या 63% म्हणजे सुमारे दीड लाख मेट्रिक टन कांदा बाजारात येणार असून तोही देशातील विविध भागात दररोज 30 ते 40 ट्रक या प्रमाणात टप्प्याटप्प्याने पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण गणेशोत्सवात कांदा बाजार भाव टिकून राहणार आहे किंवा किलोमागे दोन-चार रुपये भाव देखील जास्त मिळू शकेल असा अंदाज जाणकार कांदा व्यापारी यांनी केला आहे. (Nafed Kanda Market) तसेच दुसरीकडे टेंडर प्रक्रिया 9 सप्टेंबरला सुरू होणार असल्याने त्यानंतरच वर्क ऑर्डर निघेल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा बाजार भाव पडण्याची चिंता करण्याची गरज नाही. 

भाव का पडले? 

3 सप्टेंबर रोजी लासलगाव तसेच पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे सरासरी दर प्रती क्विंटल 4000 पर्यंत पोहोचले. मात्र दुपारनंतर हेच दर पुन्हा 3500 ते 3800 रुपयांपर्यंत घसरल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी बाजार समितीत पोळ्याची सुट्टी असल्याने मंगळवारी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे बाजार भाव दोन ते तीन रुपयांनी घसरले होते. (Nafed Kanda Market) तसेच मागच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सरासरी 60 ते 70 हजार क्विंटल कांदा आवक दररोज होती. परंतु सुट्टीनंतर मंगळवारी नाशिकच्या बाजार समितीमध्ये 91 हजार क्विंटल कांदा आवक झाल्याने त्याचा परिणाम बाजार भाव घसरण्यात झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

एकाच वेळी कांदा मालाची विक्री नको

3 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात मार्केटला कांद्याला चांगले दर मिळाले. नंतर दुपारच्या लिलावासाठी काही मार्केटमध्ये कांद्याची आवक ही दुप्पट तिप्पट अशी झाली. आणि कांद्याच्या दरात घसरत झाली कांदा दर टिकतील आणि अजून वाढतील फक्त शेतकऱ्यांनी एका दिवशी कांद्याची जास्त आवक वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. (Nafed Kanda Market) कांदा उत्पादकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये केंद्र सरकारचा बफर स्टॉक म्हणजेच नाफेड आणि एनसीसीएफ चा कांदा काही दिवसांमध्ये बाजारात येतील परंतु कांदा उत्पादकांनी टप्प्याटप्प्याने विक्री सुरू ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. (Nafed Kanda Market)

हे देखील वाचा : Farm Pond Scheme : कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेत तळे योजना

Spread the love
Exit mobile version