Site icon Get In Marathi

Ola Roadster Bike : अखेर OLA ची Bike लॉंच, अगदी कमी कींमत मध्ये 579 km ची रेंज देणार

Ola Roadster Bike : अखेर OLA ची Bike लॉंच, अगदी कमी कींमत मध्ये 579 km ची रेंज देणार

Ola Roadster Bike : इलेक्ट्रिक  Bike ग्राहकांना कित्येक दिवसांपासून OLA च्या इलेक्ट्रिक Bike ची प्रतीक्षा लागून होती. ही Bike नेमकी कशी असेल, तिची किंमत किती, लुक कसा असेल? याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर OLA या इलेक्ट्रिकल कंपनीने आपली Roadster Bike बाजारात लॉन्च केली आहे. 15 ऑगस्ट ला कंपनी ने ही Bike बाजारात उतरविली आहे. Ola ची Roadster ही 3 वेगवेगळ्या व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे.

Ola Roadster Bike

Ola Roadster Bike : Ola ही Bike Roadster सिरीज मध्ये Roadster X,Roadster आणि Roadster Pro असे 3 वेगवेगळ्या व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर OLA ची ही इलेक्ट्रिकल Bike ग्राहकांच्या खिशाला देखील परवडणारी आहे. या 3 व्हेरिएंट पैकी Ola  Roadster X हि Bike स्पोर्ट लुक मध्ये उपलब्ध आहे. त्यासोबतच ही Bike 3 वेगवेगळ्या बॅटरी पॅक साइज मध्ये उपलब्ध आहे.

Ola Bike चे मुख्य 3 प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

  1. Roadster X
  2. Roadster 
  3. Roadster Pro

चला तर सर्वप्रथम OLA च्या Ola  Roadster X या Bike बद्दल जाणून घेऊ. 

Ola Roadster X 

Ola Roadster Bike

Roadster X हे व्हेरिएंट बेसिक व्हेरिएंट आहे. ज्यामध्ये 3 बॅटरी पॅक पर्याय उपलब्ध आहेत आणि Ola  Roadster X ची किंमत 75000/- रुपये पासून सुरू होते. या Bike मध्ये टेलिस्कोपिक फोर्क, समोर डिस्क ब्रेक, आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक, Ola म्याप, एलसीडी डेस्क, क्रुज कंट्रोल आणि इतर काही फीचर्स उपलब्ध आहेत. कंपनीने दावा केला आहे की Roadster ही Bike 2.8 सेकंदात 0 ते 60 किमी प्रति तासाने धावू शकते.

तसेच ही Bike पूर्ण चार्ज केल्यानंतर 200 किलोमीटर पर्यंतचा टप्पा गाठू शकेल. या बाईकचा टॉप स्पीड हा 124kmph आहे. या Bike मध्ये 3 बॅटरी पॅक उपलब्ध आहे. यामध्ये 2.5 kwh या बॅटरी ऑप्शन च्या Bike ची किंमत ही 74999/- रुपये इतकी आहे. यातील दुसरे बॅटरी ऑप्शन हे 3.5kwh आहे आणि या बाईकची किंमत 84999/- रुपये आहे. यातील तिसरे ऑप्शन हे 4.5kwh या बॅटरी ऑप्शन मध्ये असून या Bike ची किंमत 99000/- रुपये इतकी आहे.

Ola Roadster 

Ola  Roadster या Bike मधील पुढचे व्हेरियंट हे मीड स्पेक Roadster आहे. या बाईक चे नाव Ola  Roadster आहे. या Bike मध्ये देखील 3 बॅटरी पर्याय उपलब्ध आहे. (Ola Roadster Bike) या 3 बॅटरी पर्यायानुसार या बाईक ची किंमत वेगळी आहे. यामधील बेसिक व्हेरियंट ची किंमत 104999/- रुपये इतकी आहे. या Bike मधील टॉप व्हेरियंट चा टॉप स्पीड हा 126 kmph इतका आहे. आणि या Bike ची क्षमता ही एका चार्ज मध्ये 248 किलोमीटर एवढी आहे.

या Bike मध्ये टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आहे. या बाईक च्या पुढील चाकाला ABS सह डिस्क ब्रेक देण्यात आलेला आहे. तसेच टच स्क्रीन, पीएफ कंट्रोल, पार्टी मोड, AI असिस्ट, रोड ट्रिप प्लॅनर आणि अजून काही फीचर्स दिलेले आहे. या Bike मध्ये 3.5 kwh या व्हेरियंट ची किंमत 104999/- रुपये इतकी आहे. 4.5 kwh व्हेरियंट ची किंमत 109999/- रुपये आहे. आणि 6 kwh या व्हेरियंट ची किंमत 139999/- रुपये इतकी आहे.

Ola Roadster Pro 

Ola Roadster Pro हे टॉप व्हेरियंट आहे आणि हे दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या Bike ची किंमत 199999/- पासून सुरुवात होते. (Ola Roadster Bike) Roadster Pro 1.2 सेकंदात 0 ते 60 kmph इतका वेग पकडू शकते. तसेच या गाडीचा टॉप स्पीड हा 194 kmph आहे. या Bike मध्ये Usd फोर्क्स, डबल डिस्क ब्रेक, स्प्लिट सीट, ट्रॅक्शन कंट्रोल, इंटिग्रेटेड राईड मोड्स आणि अजून काही फीचर्स मिळतात. हि Bike दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहे.

ज्यामध्ये 8 kwh बॅटरी पर्याय मध्ये उपलब्ध असलेल्या या Bike ची किंमत 199999/- रुपये इतकी आहे आणि सिंगल चार्ज मध्ये ही Bike 250 kilometer पर्यंत चालू शकते. तसेच या Bike मधील टॉपचे व्हेरिएंट असलेले मॉडेलमध्ये 16 kwh बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. आणि या गाडीची किंमत ही 249999/- रुपये इतकी आहे. तसेच ही Bike एका सिंगल चार्ज मध्ये तब्बल 579 kilometer अंतर चालू शकते.

हे देखील वाचा : Sandal Farming : अहमदनगर च्या शेतकऱ्याने तब्बल 27 एकरात केली चंदन शेती

Spread the love
Exit mobile version