SA VS ENG Highlights : दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड वर 7 धावांनी विजय, ब्रूक ची अर्धशतकी खेळी व्यर्थ
SA VS ENG Highlights : सुपर 8 सामन्यमध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे 2 संघ भिडले होते. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडला विजयासाठी 164 धावांचे आव्हान दिले होते.T-20 World Cup 2024 मधील सुपर 8 मधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळविला आहे.
SA VS ENG Highlights इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 164 धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंड संघाने या धावांचा पाठलाग करताना चांगली टक्कर दिली. हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला होता. शेवटच्याओवर मध्ये इंग्लंडला जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता होती. इंग्लंड संघाकडून हॅरी ब्रुक यानी अर्धशतकी खेळी केली होती. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना ब्रूक हा बाद झाला त्याचा झेल दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन मार्कक्रम याने घेतला.
तो बाद झाला आणि सामना हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने फिरला शेवटच्या 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती. परंतु सॅम करण याने एकच धाव घेतली. आणि शेवटच्या चेंडूवर जोफ्रा आर्चर याच्याकडून एकही धाव निघाली नाही. इंग्लंड संघाला 20 ओवर मध्ये 6 गडी गमावत 156 धावा करता आल्या. आणि इंग्लंड संघाचा 7 धावांनी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेचा हा सलग 6 वा विजय आहे.(SA VS ENG Highlights) आणि सुपर 8 मधील हा दुसरा विजय आहे.164 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या टीमला दक्षिण आफ्रिकेने ठराविक अंतराने झटके दिले. फिलिप साल्ट यानी 11 धावा जॉनी बेअरस्टो 16 आणि मोहीन आली याने 9 धावा केल्या.
इंग्लंडचे पहिल्या फळीतील फलंदाज हे लवकर बाद झाल्याने इंग्लंडची स्थिती 4 गडी बाद 64 धावा अशी झाली होती. मात्र त्यानंतर लिविंग स्टोन आणि ब्रूक या दोघांनी चांगली भागीदारी केली. इंग्लंडच्या हातातून गेलेला सामना या जोडीने परत इंग्लंडच्या बाजूने वळविला होता. या जोडीने 5व्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली होती. विजय जवळ आला असताना ही जोडी फुटली. लिविंग स्टोन यानी 17 बॉल मध्ये 33 धावा केल्या. लिविंग स्टोन यानी बार्टम्यान च्या एका ओव्हर मध्ये 21 धावा कुटल्या आणि सामना हा इंग्लंडच्या बाजूने फिरविला.
मात्र निर्णायक स्थितीत सामना आला असताना लिविंग स्टोन हा बाद झाला त्याने 17 चेंडूमध्ये 33 धावा केल्या होत्या. आता फलंदाजीसाठी ब्रूक हा मैदानात होता. (SA VS ENG Highlights) शेवटच्या ओव्हर मध्ये इंग्लंडला 14 धावांची गरज होती हॅरी ब्रुक याने विसाव्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारला मात्र दक्षिण आफ्रिकेचा कप्तान मार्कक्रम यानी अप्रतिम झेल घेतला आणि ब्रूक याला बाद केले. या झेलमुळे इंग्लंड संघ पुन्हा अडचणीत आला हॅरी ब्रुक याने 37 चेंडू मध्ये 53 धावा केल्या होत्या.
त्यानंतर सॅम करण आणि जोफ्रा आर्चर ही जोडी मैदानात होती. मात्र या दोघांनाही धावांचा पाठलाग करण्यात यश आले नाही. स्याम करण याने नाबाद 10 धावा केल्या आणि जोफ्रा आर्चर याने 1 धाव केली. गोलंदाजी मध्ये दक्षिण आफ्रिके कडून रबाडा आणि केशव महाराज या दोघांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या बार्टमॅन आणि नोरखिया या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी (SA VS ENG Highlights)
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता दक्षिण आफ्रिका संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी हेंड्रिक आणि डी कॉक ही जोडी मैदानात आली. या जोडीने दक्षिण आफ्रिका संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी आक्रमकपणे फलंदाजी करत पावर प्ले मध्ये 63 धावा ठोकल्या. या जोडीने दक्षिण आफ्रिका संघाला दमदार सुरुवात करून दिली या दोघांनी 59 चेंडू मध्ये 86 धावांची भागीदारी केली.
संघाचे धावफलक 86 असताना 10 व्या ओवरच्या 6 व्या चेंडूवर हॅन्ड्रिक बाद झाला. हॅन्ड्रिक याने 25 चेंडू मध्ये 19 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार लगावला होता. हेड्रिंक बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज क्लासेन हा आला परंतु ही जोडी जास्त वेळ मैदानात टिकली नाही. (SA VS ENG Highlights) डीकॉक हा बाद झाला संघाचे धावफलक 92 धावा असताना दक्षिण आफ्रिका संघाची दुसरी विकेट पडली 12 व्या ओवरच्या 6 व्या चेंडूवर डीकॉक हा बाद झाला.
क्विंटन डीकॉक आक्रमक पारी खेळून बाद झाला. त्याने फक्त 38 चेंडू मध्ये 65 धावा ठोकल्या. त्यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकार लगावले होते. क्विंटन डीकॉक बटलर च्या हाती झेल देत बाद झाला. आता दक्षिण आफ्रिका संघाची स्थिती 92 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. क्विंटन डीकॉक बाद झाल्यानंतर क्लासेन च्या साथीला डेव्हिड मिलर हा आला परंतु संघ सावरण्याच्या अगोदरच क्लासेन हा देखील बाद झाला. संघाचे धावफलक 103 असताना दक्षिण आफ्रिका संघाची तिसरी विकेट पडली.
14 व्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर क्लासेन बाद झाला. त्याला जोस बट्लर यानी धावबाद केले. क्लासेन बाद झाल्यानंतर मिलरच्या साथीला दक्षिण आफ्रिका संघाचा कप्तान मारक्रम आला परंतु तो स्वस्तात बाद झाला संघाचे धावफलक 113 असताना 15 व्या वरच्या चौथ्या चेंडूवर दक्षिण आफ्रिका संघाचा कप्तान मारक्रम हा बाद झाला. त्याला रशीद यानी बोल्ड आउट केले. (SA VS ENG Highlights) मारक्रम आणि मिलर या दोघांमध्ये 6 चेंडूमध्ये 10 धावांची भागीदारी झाली होती. आता दक्षिण आफ्रिका संघाची स्थिती 113 धावा आणि 4 गडी बाद अशी झाली होती.
आता डेव्हिड मिलर च्या साथीला आलेला स्टब या जोडीने संयमाने खेळत धावसंख्या पुढे नेली. डेव्हिड मिलर हा आक्रमकपणे खेळत होता तर स्टब हा शांतपणे खेळत होता. या जोडीने 27 चेंडू मध्ये 42 धावा काढल्या. आणि संघाचे धावफलक 155 असताना दक्षिण आफ्रिका संघाची 5 वी विकेट पडली. शेवटच्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड मिलर हा बाद झाला. त्याला जोफ्रा आर्चर याने ब्रूक च्या हाती झेल देत बाद केले डेविड मिलर यानी 28 चेंडू मध्ये 43 धावा केल्या त्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकार लावले होते. आता स्टब च्या साथीला मार्को जेन्सन हा आला परंतु तो दुसऱ्या चेंडूवर लगेच बाद झाला मार्को जेन्सन याला जोफ्रा आर्चर यानी स्याम करण च्या हाती झेल देत बाद केले. मार्को जॉन्सन याला खातेही खोलता आले नाही.
155 धावांवर साउथ आफ्रिका संघाची 6 वी विकेट पडली. आता 4 चेंडू शिल्लक राहिले होते. स्टब च्या साथीला फलंदाजीसाठी केशव महाराज हा आला हे दोघे नाबाद राहिले. केशव महाराज यानी 2 चेंडू मध्ये 5 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार लगावला. आणि स्टब याने 11 चेंडूंमध्ये 12 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार लगावला. दक्षिण आफ्रिका संघाकडून क्विंटन डिकॉक याने अर्धशतकी पारी खेळली आणि त्याला डेव्हिड मिलर याने देखील चांगली साथ दिली होती. इंग्लंड संघाकडून गोलंदाजी मध्ये जोफ्रा याने 3 विकेट घेतल्या आणि मोइन अली यानी 1 विकेट, आदिल रशीद याला 1 विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिका संघाने 20 ओवर मध्ये 8.15 रनरेट ने 163 धावा केल्या.
इंग्लंड संघाची फलंदाजी (SA VS ENG Highlights)
दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंड संघाला विजयासाठी 164 धावांचे आव्हान दिले. इंग्लंड संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी फिलीप सॉल्ट आणि इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर ही जोडी मैदानात आली. हि जोडी फार काही धावा करू शकली नाही. दुसऱ्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर फिलिप साल्ट बाद झाला. संघाचे धावफलक 15 असताना इंग्लंड संघाची पहिली विकेट पडली. (SA VS ENG Highlights) फिलिप्स सॉल्ट याला रबाडा याने हॅन्ड्रीक च्या हाती झेल देत बाद केले. फिलिप साल्ट याने 8 चेंडू मध्ये 11 धावा केल्या. त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावला. आता फलंदाजीसाठी इंग्लंड संघाचा आक्रमक फलंदाज जॉनी हा आला या जोडीने जबाबदारीने खेळत संघाचे धावफलक पुढे नेले.
इंग्लंड संघाने पावर प्ले मध्ये 41 धावा काढल्या साऊथ आफ्रिका संघाच्या गोलंदाजी पुढे इंग्लंड संघाचे फलंदाज हे अडखळत खेळत होते. संघाचे धावफलक 43 असताना इंग्लंड संघाची दुसरी विकेट पडली. 7 व्या वरच्या 5 व्या चेंडूवर जॉनी हा बाद झाला. जॉनी याला केशव महाराज यानी नॉर्कीयाच्या हाती झेल देत बाद केले. जॉनी याने 20 चेंडूमध्ये 16 धावा केल्या. (SA VS ENG Highlights) त्यामध्ये 1 चौकार लगावला होता. जॉनी आणि बटलर या जोडीमध्ये 31 चेंडू मध्ये 28 धावांची भागीदारी झाली होती. जॉनी बाद झाल्यानंतर बटलरच्या साथीला मोइन अली हा फलंदाजीसाठी आला.
साऊथ आफ्रिका संघाच्या भेदक गोलंदाजी पुढे इंग्लंड संघाचे फलंदाज मोठे टोले लगावण्यात अपयशी ठरत होते. संघाचे धावफलक 54 असताना इंग्लंड संघाचा कप्तान बाद झाला. नवव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर जॉस बटलर हा बाद झाला. त्याला केशव महाराज यानी क्लासेन याच्या हाती झेल देत बात केले. जॉस बटलर यानी 20 चेंडू मध्ये 17 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार लगावला होता. आत्ता इंग्लंड संघाची स्थिती 54 धावा 3 गडी बाद अशी झाली होती. मोईन अली आणि जॉस बटलर या दोघांमध्ये 11 चेंडू मध्ये 11 धावांची भागीदारी झाली होती. जॉस बटलर बाद झाल्यानंतर मोईन अलीच्या साथीला हॅरी ब्रुक हा फलंदाजीसाठी आला.
परंतु ही जोडी ही जास्त वेळ मैदानात टिकली नाही. संघाचे धावफलक 61 असताना मोईन अली देखील बाद झाला. 61 धावसंख्येवर इंग्लंड संघाची चौथी विकेट पडली 11व्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर बार्टमॅन यानी केशव महाराज च्या हाती झेल देत मोइन अली ला बाद केले. (SA VS ENG Highlights) मोइन अली यानी 10 चेंडूमध्ये 9 धावा केल्या होत्या. मोईन अली आणि हरी ब्रूक या दोघांमध्ये 10 चेंडूमध्ये 7 धावांची भागीदारी झाली होती. आता इंग्लंड संघाची स्थिती 61 धावा 4 गाडी बाद अशी झाली होती. मोईन अलि बाद झाल्यानंतर हॅरी ब्रुक च्या साथीला फलंदाजीसाठी इंग्लंड संघाचा आक्रमक फलंदाज लिविनस्टोन हा आला. इंग्लंड संघ हा अडचणीत सापडला होता.
10 ओव्हर मध्ये 61 धावा आणि 4 गडी बाद अशी नाजूक स्थिती झाली होती. परंतु फलंदाजीसाठी आलेल्या लिविंगस्टोन आणि ब्रूक या जोडीने संघाला सावरले एकवेळेस हातातून गेलेला सामना इंग्लंडच्या फलंदाजांनी पुन्हा इंग्लंडकडे वळविला. या जोडीने आक्रमकपणे खेळत इंग्लंड संघाला विजयाच्या वाटेवर परत आणले होते. या जोडीने आफ्रिका संघाचा गोलंदाजांना चांगलेच धुतले विजय जवळ आला असतानाच लिविंगस्टोन हा बाद झाला. (SA VS ENG Highlights) संघाचे धावफलक 149 असताना लिविंगस्टोन हा बाद झाला 139 धाव संख्येवर इंग्लंड संघाची 5 वी विकेट पडली. 18 व्या ओव्हरचा दुसऱ्या चेंडूवर रबाडा यानी लिविंगस्टोनचा स्टब च्या हाती झेल देत बात केले. लिविंगस्टोन यानी 17 चेंडू मध्ये 33 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार लगावले होते.
लिविंगस्टोन जरी बाद झाला होता तरी इंग्लंड संघाचा आक्रमक फलंदाज हॅरी ब्रूक हा मैदानात होता. हॅरी ब्रुक च्या साथीला फलंदाजीसाठी स्याम करण हा आला. या जोडीने संयमाने खेळत संघाचे धावफलक पुढे नेले. अखेरीस शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता होती. स्ट्राईक वर हॅरी ब्रुक होता आणि शेवटचे ओवर नोर्खीया यानी घेतली होती. पहिल्या चेंडूवर हॅरी ब्रुक याने जोरदार टोला लगावला परंतु चेंडू सीमा रेखे पलीकडे गेला नाही.चेंडू उंच गेला आणि हॅरी ब्रुकचा झेल दक्षिण आफ्रिकेचा कप्तान मारकरम यानी घेतला. इंग्लंड संघाची सहावी विकेट पडली. 150 धावसंख्येवर इंग्लंड संघाची सहावी विकेट पडली.
हॅरी ब्रुक याने 37 चेंडू मध्ये 53 धावांची खेळी केली होती. त्यामध्ये 7 चौकार लगावले होते. आता स्याम करण च्या साथीला फलंदाजीसाठी जोफ्रा आर्चर आला. आता 5 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता होती. आणि शेवटच्या 2 चेंडूवर 8 धावांची गरज होती सॅम करण याने एक धाव काढली. (SA VS ENG Highlights) आणि शेवटच्या चेंडूवर 7 धावांची गरज होती.परंतु शेवटच्या चेंडू मध्ये एकही धाव निघाली नाही. आणि इंग्लंड संघ हा सामना 7 धावांनी पराभूत झाला. इंग्लंड संघाने 20 ओवर मध्ये 6 गडी गमावून 156 धावा केल्या. 7 धावांनी इंग्लंड हा सामना पराभूत झाला. आफ्रिका संघाकडून गोलंदाजी मध्ये रबाडा आणि महाराज यांना 2-2 विकेट मिळाल्या. नोर्खीया आणि बारटम्यान यांना 1-1 विकेट मिळाली.
सामन्याचा मानकरी
दक्षिण आफ्रिका संघाचा सलामीचा फलंदाज क्विंटन डीकॉक या सामन्याचा मानकरी ठरला. त्याने उत्कृष्ट अशी खेळ केली होती.त्याने 38 चेंडू मध्ये 65 धावा केल्या. (SA VS ENG Highlights) त्यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकार लगावले होते.