SA VS WI : वेस्टइंडीज T-20 World Cup 2024 मधून बाहेर, दक्षिण आफ्रिकेचा विजय
SA VS WI : T-20 World Cup 2024, वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. वेस्टइंडीज ने प्रथम फलंदाजी करताना 135 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिका संघ फलंदाजीला आला. परंतु 2 ओवर नंतर पाऊस झाल्याने दाखवत लुईस नियमानुसार धावसंख्या आणि ओव्हर मध्ये कपात करण्यात आली. SA VS WI दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 123 धावांचे आव्हान 17 ओव्हर मध्ये देण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 5 बॉल बाकी ठेवत पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज मार्क जेन्सन यानी षटकार मारत सामना जिंकून दिला.
SA VS WI वेस्टइंडीज संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावत 135 धावा केल्या होत्या. वेस्टइंडीज चे आक्रमक फलंदाज आहे अपयशी ठरले होते. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वेस्टइंडीज च्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखले वेस्टइंडीज संघाचे आक्रमक फलंदाजी स्वस्तात बाद झाल्याने वेस्टइंडीज संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. ठराविक अंतराने वेस्टइंडीज संघाच्या विकेट पडल्या.
वेस्टइंडीज संघाकडून मायर्स आणि चेस या दोघांनी चांगली फलंदाजी केली त्यामुळे वेस्टइंडीज संघ सन्मान जनक धावसंख्या करू शकला. वेस्टइंडीज चे इतर फलंदाज हे आफ्रिकेच्या दमदार गोलंदाजी पुढे चालू शकले नाही. वेस्टइंडीज संघाचे फलंदाज मायर्स 35, चेस 52, रसेल 15, जोसेफ 11धावा करू शकले. आफ्रिका संघाकडून शमशीने 3 विकेट घेतल्या तर इतर गोलंदाजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
वेस्टइंडीज संघाची फलंदाजी
दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्टइंडीज संघा कडून फलंदाजीसाठी सलामीला मायर्स आणि होप ही जोडी मैदानात आली. ही आक्रमक जोडी संघाला चांगली सुरुवात करून दिली ही अपेक्षा होती. परंतु पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळण्याच्या तयारीत असतानाच वेस्टइंडीज संघाची पहिली विकेट पडली. (SA VS WI) पहिल्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर होप हा बाद झाला संघाचे धावफलक 2 धावा असताना वेस्ट इंडिज संघाची पहिली विकेट पडली. होप याला जेन्सन यानी स्टब च्या हाती झेल देत बाद केले. त्याने 1 चेडूमध्ये शून्य धाव केली होती. होप आणि मायर्स या दोघांमध्ये 3 चेंडू मध्ये 2 धावांची भागीदारी झाली होती.
आता वेस्टइंडीज संघाची स्थिती 2 धावा 1 गडी बाद अशी झाली होती. होप बाद झाल्यानंतर पुरण हा फलंदाजीसाठी आला परंतु तो देखील अपयशी ठरला. जोरदार टोला लागवण्याचा प्रयत्नात निकोलस पुरण बाद झाला. दुसऱ्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर वेस्ट इंडिज संघाची दुसरी विकेट पडली. निकोलस पुरण याला मार्करम याने मार्को जेन्सन च्या हाती झेल देत बाद केले. पुरण यानी 3 चेंडू मध्ये एक धाव केली होती. पुरण आणि मायर्स या दोघांमध्ये 4 चेंडू मध्ये 3 धावांची भागीदारी झाली होती. आता वेस्टइंडीज संघाची स्थिती नाजूक झाली होती. वेस्टइंडीज संघाचे धावफलक 5 धावा 2 गडी बाद असे झाले होते. पुरण बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी चेस हा आला.
चेस आणि मायर्स या जोडीने संयमाने खेळी करत धावफलक पुढे नेले. या जोडीने दमदार खेळी करत संघाला 50 धावांचा पल्ला गाठून दिला. बाराव्या ओवरच्या शेवटच्या चेंडूवर मायर्स बाद झाला संघाचे धावफलक 86 असताना वेस्ट इंडिज संघाची तिसरी विकेट पडली. मायर्स हा स्टब च्या हाती झेल देत बाद झाला. मायर्स ने 34 चेंडू मध्ये 35 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार लगावले होते.(SA VS WI) मायर्स आणि चेस या दोघांमध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी झाली होती. या दोघांनी 65 चेंडू मध्ये 81 धावांची भागीदारी केली होती. आता वेस्टइंडीज संघाची स्थिती 86 धावा 3 गडी बाद अशी झाली होती. वेस्टइंडीज संघाने पावर प्ले मध्ये 47 धावा काढल्या होत्या.
मायर्स बाद झाल्यानंतर फलंदाजी साठी पौवेल हा आला परंतु पॉवेल हा जोरदार टोला लगावण्याच्या प्रयत्नात स्वस्तात बाद झाला. महाराज च्या गोलंदाजीवर जोरदार टोला लगावण्याच्या प्रयत्नात स्टंपिंग करत बाद केले. पॉवेल यानी 2 चेंडू मध्ये 1 धाव केली होती. आता वेस्टइंडीज संघाची स्थिती 89 धावा 4 गडी बाद अशी झाली होती. तेराव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर पॉवेल हा बाद झाला. पॉवेल आणि चेस या दोघांमध्ये 4 चेंडू मध्ये 3 धावांची भागीदारी झाली होती. पॉवेल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी रुदरफोर्ड हा आला. परंतु तो देखील अपयशी ठरला संघाच्या धावफलकात 6 धावांची भर पडली आणि वेस्ट इंडिज संघाची पाचवी विकेट पडली.
(SA VS WI) चौदाव्या ओवरच्या पाचव्या चेंडूवर रुदरफोर्ड हा बाद झाला रुदरफोर्ड याला शमशी यानी बाद केले. रुदरफोर्डने 4 चेंडूमध्ये शून्य धावा केल्या होत्या. आता वेस्टइंडीज संघाची स्थिती 94 धावा 5 गडी बाद अशी झाली होती. रुदरफोर्ड आणि चेस या दोघांमध्ये 7 चेंडू मध्ये 5 धावांची भागीदारी झाली होती. रुदरफोर्ड बाद झाल्यानंतर चेस च्या साथीला रस्सेला फलंदाजीसाठी आला परंतु ही जोडी ही मैदानात जास्त वेळ टिकली नाही. संघाच्या धावफलका मध्ये 3 धावांची भर पडली आणि चेस बाद झाला 16 व्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर चेस बाद झाला. चेस याला शमशी याने रबाडाच्या हाती झेल देत बाद केले. चेस याने 42 चेंडू मध्ये 52 धावा केल्या.
त्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. तो बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी अखिल हुसेन हा आला संघाची स्थिती आता 97 धावा 6 गडी बाद अशी झाली होती. चेस आणि रसेल या दोघांमध्ये 8 चेंडू मध्ये 3 भावांची भागीदारी झाली होती. रसेल आणि अखिल हुसेन या जोडीने जोरदार खेळण्यास सुरुवात केली परंतु धावफलकांमध्ये 20 धावांची भर पडली आणि वेस्ट इंडिज संघाची सातवी विकेट गेली. 117 धावसंख्या असताना वेस्टइंडीज संघाची सातवी विकेट पडली. अठराव्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर रसेल हा बाद झाला. रसेल याला मार्कक्रम याने धावबाद केले रसेलने 9 चेंडू मध्ये 15 धावा करत 2 षटकार लगावले होते.
रसेल बाद झाल्यानंतर फलंदाजी साठी अल्जारी जोसेफ हा आला. वेस्टइंडीज संघाची आठवी विकेट 118 धावांवर पडली अठराव्या ओवरच्या पाचव्या चेंडूवर अखेर हुसेन हा बाद झाला. अकेले हुसेन याला रबाडा च्या गोलंदाजीवर रबाडाणे झेल घेत बाद केले. अकेले हुसेन याने 11 चेंडू मध्ये 6 धावा केल्या होत्या त्यामध्ये 1 चौकार लगावला होता केल हुसेन बाद झाल्यानंतर जोसेफच्या साथीला मोटी हा शेवटचा फलंदाज मैदानात आला या जोडीने चांगली खेळी करत नाबाद राहिले या दोघांनी 13 चेंडू मध्ये 17 धावांची भागीदारी केली.
त्यामध्ये मोटी याने 7 चेंडूमध्ये 4 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार लगावला. तर जोसेफ यानी 7 चेंडू मध्ये 11 धावा केल्या त्यामध्ये 1 षटकार लगावला आणि हे दोघेही नाबाद राहिले. वेस्टइंडीज संघाने 20 ओवर मध्ये 8 गडी गमावत 135 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाकडून गोलंदाजी मध्ये जेन्सन, मार्कक्रम, महाराज, रबाडा 1 विकेट तर शमशियाने 3 विकेट घेतल्या.
साऊथ आफ्रिका संघाची फलंदाजी (SA VS WI)
136 धावांचे आव्हान घेऊन दक्षिण आफ्रिका संघाची सलामीची जोडी मैदानात उतरली होती सलामीला फलंदाजीसाठी क्विंटन टी कॉक आणि हॅन्ड्रिक ही जोडी मैदानात आली पहिल्या ओवरमध्ये 12 धावा करत या जोडीने आक्रमक सुरुवात केली. परंतु दुसऱ्या ओव्हर च्या पहिल्या चेंडूवर हॅन्ड्रिक बाद झाला हेंड्रिकेने शून्य धावा केल्या होत्या. रसेलच्या गोलंदाजीवर पुरण याने झेल घेत त्याला बाद केले दक्षिण आफ्रिका संघाची स्थिती 12 धावा 1 गडी बाद अशी झाली होती. तो बाद झाल्यानंतर क्विंटन डीकॉकच्या साथीला दक्षिण आफ्रिके संघाचा कप्तान मार्कक्रम आला .
त्याच ओव्हर मध्ये क्विंटन डिकॉक देखील बाद झाला दुसऱ्या ओवरच्या शेवटच्या चेंडूवर रसेल याने क्विंटन याला बाद केले. रसेल यानी रुदरफोर्ड च्या हाती झेल देत डी कॉकला बाद केले. 7 चेडूमध्ये 12 धावा केल्या त्यामध्ये 3 चौकार लगावले होते. आता दक्षिण आफ्रिका संघाची स्थिती 15 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. (SA VS WI) क्विंटन डी कॉक बाद झाल्यानंतर मायक्रमच्या साथीला स्टब हा मैदानात आला या जोडीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने 20 चेंडू मध्ये 27 धावांची भागीदारी केली संघाचे धावफलक 42 असताना दक्षिण आफ्रिका संघाची तिसरी विकेट गेली.
हे देखील वाचा : AFG VS BAN : अफगाणिस्तानची सेमी फायनल मध्ये एन्ट्री, अफगाणिस्तानने रचला इतिहास
6 व्या वरच्या दुसऱ्या चेंडूवर मार्कक्रम हा बाद झाला मार्कक्रम याला अल्झारी याने मायरच्या हाती झेल देत बाद केले मार्कक्रम याने 15 चेंडू मध्ये 18 धावा केल्या. त्यामध्ये 2 चौकार लगावले होते आता दक्षिण आफ्रिका संघाची स्थिती 42 धावा 3 गडी बाद अशी झाली होती. (SA VS WI) मारक्रम बाद झाल्या नंतर फलंदाजीसाठी स्टबच्या साथीला हेंड्रीक क्लासेन हा आला या जोडीने संघाला सावरत धावफलक पुढे नेले. ही जोडी देखील आक्रमकपणे खेळत होती. आठव्या ओवरच्या 6 व्या चेंडूवर साउथ आफ्रिका संघाची चौथी विकेट पडली संघाचे धावफलक 77 असताना हेंड्रीक क्लासेन हा बाद झाला हेंड्रीक क्लासेन याला जोसेफने पुरण च्या हाती झेल देत बाद केले.
हेंड्रीक क्लासेन यानी 10 चेंडूंमध्ये 22 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. हेंड्रीक क्लासेन आणि स्टब या दोघांमध्ये 16 चेंडू मध्ये 35 धावांची भागीदारी झाली होती. हेंड्रीक क्लासेन बाद झाल्यानंतर ही जोडी ही जास्त वेळ मैदानात टिकली नाही. संघाचे धावफलक 93 असताना दक्षिण आफ्रिकेची पाचवी विकेट पडली. बाराव्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर डेव्हिड मिलर हा बाद झाला डेविड मिलर याला चेस यानी बोल्ड आऊट केले होते. डेव्हिड मिलर ने 14 चेंडू मध्ये 4 धावा केल्या. स्टब आणि मिलर या दोघांमध्ये 22 चेंडू मध्ये 16 धावांची भागीदारी झाली होती.
डेव्हिड मिलर बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मार्को जेन्सन हा फलंदाजीसाठी आला. संघाचे धावफलक 100 असताना दक्षिण आफ्रिकेची 6 वी विकेट पडली. दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज स्टब बाद झाला. चौदाव्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर तो बाद झाला स्टब याला चेस यानी मायरच्या हाती झेल देत बाद केले. स्टब यानी 27 चेंडू मध्ये 29 धावा करत 4 चौकार लगावले होते. स्टब आणि जेन्सन या दोघांमध्ये 9 चेंडू मध्ये 7 धावांची भागीदारी झाली होती. आता दक्षिण आफ्रिका संघाची स्थिती 6 गडी बाद 100 धावा अशी झाली होती.
हा सामना वेस्टइंडीज संघाच्या ताब्यात गेला होता दक्षिण आफ्रिका संघाची नाजूक स्थिती झाली होती. या सामन्यात परत येणे दक्षिण आफ्रिका संघासाठी कठीण होते. आता फलंदाजीला जेन्सन आणि महाराज ही जोडी होती. या दोघांनी संयमाने खेळी करत 10 धावांची भागीदारी केली आणि संघाचे धावफलक 110 असताना दक्षिण आफ्रिकेची सातवी विकेट पडली. (SA VS WI) महाराज हा 16 व्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला.
महाराज याला चेस याने जोसेफच्या हाती झेल देत बाद केले. महाराज यानी 6 चेंडू मध्ये 2 धावा केल्या होत्या. आता दक्षिण आफ्रिका संघाची स्थिती 110 दावा 7 गाडी बाद अशी झाली होती. अजून दक्षिण आफ्रिका संघाला जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता होती सामना हा रोमांचक स्थितीत आला होता.
महाराज बाद झाल्यानंतर जेन्सन च्या साथीला रबाडा हा फलंदाजीसाठी आला. या जोडीने आक्रमकपणे खेळी केले. आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता होती या जोडीने 5 चेंडू मध्येच 14 धावा पूर्ण केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला यामध्ये जेन्सन याने महत्त्वाची फलंदाजी केली. जेन्सन याने 14 चेंडूमध्ये 21 धावा केल्या त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावला जेन्सन हा 21 धावांवर नाबाद राहिला.
तर दुसऱ्या बाजूने रबडा यानी चांगली साथ दिली. 3 चेंडू मध्ये 5 धावा केल्या. त्यामध्ये 1 चौकार लगावला आणि संघाला विजय मिळवून दिला. वेस्टइंडीज संघाचा पराभव झाला सुपर 8 सामन्यांमध्ये वेस्टइंडीज संघाचा हा तिसरा पराभव आहे. वेस्टइंडीज संघ हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप सामन्यांमधून बाहेर झाला आहे.
हे देखील वाचा : USA VS ENG : इंग्लंडची सेमी फायनल मध्ये एन्ट्री, यु एस ए वर 10 विकेट्स ने विजय
सामन्याचा मानकरी (SA VS WI Highlights)
तबरीज शमशी हा या सामन्याचा मानकरी ठरला शमशि याने वेस्टइंडीज संघाची महत्त्वाचे आक्रमक फलंदाज हे स्वस्तात बादकेले. वेस्टइंडीज संघाचे आक्रमक फलंदाज हे स्वस्तात बाद झाल्याने वेस्टइंडीज संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.(SA VS WI) शमशियाने वेस्टइंडीज संघाचा सलामीचा फलंदाज मायर्स, चेस, रुदरफोर्ड या आक्रमक फलंदाजांना बाद केले.