Semi Final AFG VS SA : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तान वर दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेची दणक्यात फायनल मध्ये एन्ट्री
Semi Final AFG VS SA : दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तान विरुद्ध सेमी फायनल मध्ये विजय मिळविला आहे. T-20 World Cup मध्ये दक्षिण आफ्रिका संघ पहिल्यांदाच फायनल मध्ये पात्र ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचत 7 वेळा अपयशी ठरल्यानंतर 8व्या T- 20 World Cup मध्ये फायनल मध्ये एन्ट्री केली आहे. दक्षिण आफ्रिका संघाने अफगाणिस्तान संघाला फक्त 56 धावांवर रोखले.(Semi Final AFG VS SA) आणि हे आव्हान 1 विकेट गमावत पूर्ण केले. अफगाणिस्तान संघाने दिलेले 57 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने 8.5 ओव्हर मध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केले.
या पराभवानंतर अफगाणिस्तान संघ हा T-20 World cup 2024 च्या स्पर्धेमधून बाहेर झाला आहे. आता दक्षिण आफ्रिका संघाने फायनल मध्ये प्रवेश केला असून भारत आणि इंग्लंड यांच्यातील विजेत्या संघासोबत फायनल सामना खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाची पहिली विकेट हि क्विंटन डी कॉक च्या रूपाने पडली. त्यानंतर हेन्द्रीक्स आणि एडन मार्क्रम या जोडीने दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवून दिला. या दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. अफगाणिस्तान संघाकडून फारुकी याला 1 विकेट मिळाली.
अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय चुकीचा ठरला.(Semi Final AFG VS SA) अफगाणिस्तान संघाची एकापाठोपाठ 1 विकेट पडतच राहिल्या आणि पूर्ण संघ हा 56 धावांवर आटोपला. अफगाणिस्तान संघाकडून अजमतुल्लाह फक्त याने 2 अंकी धावसंख्या गाठली त्यानंतर कोणत्याही खेळाडूला 2 अंकी धावसंख्या गाठता आली नाही. त्यातील 3 जणांना आपले खातेही उघडता आले नाही.
अफगाणिस्तान संघाकडून एकही फलंदाजानी चांगली खेळी केली नाही. आणि आपल्या विकेट गमावत राहिल्याने पूर्ण संघ हा 56 धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिका संघाकडून शमशी आणि जानसेन या दोघांना 3-3 विकेट मिळाल्या. रबाडा आणि नॉरखीया या दोघांना 2-2 विकेट मिळाल्या.
अफगाणिस्तानचा संघ (Semi Final AFG VS SA)
इब्राहिम झादरण, गुरबाज, अजमतुल्लाह उमरजाई, गुलबदीन नायक, मोहम्मद नबी, करीम जनत, राशिद खान, नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन अलहक, फजल फारुकी.
दक्षिण आफ्रिकेचा संघ (AFG VS SA Highlights )
हॅन्ड्रीक्स, क्लासेन, डेव्हिड मिलर, क्विंटन डी कॉक, एडन मारक्रम, ट्रीस्टन स्टब, कगिसो रबाडा, नॉरखीया, शमशी, मार्को जेन्सन, केशव महाराज,
अफगाणिस्तान संघाची फलंदाजी (Semi Final AFG VS SA)
T- 20 World Cup 2024 मधील दक्षिण आफ्रिके विरुद्ध अफगाणिस्तान सेमी फायनल हा सामना त्रीनीदाद येथील ब्रायन लारा स्टेडियम वर खेळविण्यात आला होता. अपघाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सलामीला फलंदाजीसाठी गुरबाज आणि इब्राहिम ही जोडी मैदानात आली.
या जोडीने आतापर्यंत भरपूर सामन्यांमध्ये अफगाणिस्तान संघाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. या सामन्यात देखील ही जोडी संघासाठी चांगली सुरुवात करून देइल ही अपेक्षा होती. परंतु पहिल्या ओवरच्या 6 व्या चेंडूवर गुरबाज बाद झाला. अफगाणिस्तान संघाची पहिली विकेट 4 धावांवर पडली. गुरबाज याला जेन्सन याने हॅन्ड्रीक च्या हाती झेल देत बाद केले. गुरबाज याने 3 चेंडू मध्ये 0 केली होती.(Semi Final AFG VS SA) गुरबाज आणि इब्राहिम या जोडीमध्ये 6 चेंडू मध्ये 4 धावांची भागीदारी झाली होती. गुरबाज बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गुलबदीन हा फलंदाजीसाठी आला परंतु ही जोडी ही फार काळ टिकली नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या धारदार गोलंदाजी पुढे अफगाणिस्तान संघाचे आक्रमक फलंदाज निष्क्रिय ठरत होते. संघाचे धावफलक 16 धावा असताना अफगाणिस्तान संघाची दुसरी विकेट पडली तिसऱ्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर गुलबदीन हा बाद झाला. गुलबदीन याला जेन्सन याने बोल्ड आउट केले गुलबदीन याने 8 चेंडूमध्ये 9 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 2 चौकार लगावले होते. आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 16 धावा 2 गडी बाद अशी झाली होती. गुलबदीन बाद झाल्यानंतर इब्राहिम च्या साथीला फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर अजमतुल्लाह हा फलंदाजीसाठी मैदानात आला.
परंतु संघाच्या धावफलकामध्ये अवघ्या 4 धावांची भर पडल्यानंतर इब्राहिम हा बाद झाला. संघाचे धावफलक 20 असताना अफगाणिस्तान संघाची तिसरी विकेट पडली. चौथ्या ओवरच्या पहिल्याच चेंडूवर इब्राहिम हा बाद झाला इब्राहिम याला रबाडा याने बोल्ड केले. इब्राहिम यानी 5 चेंडू मध्ये 2 धावा केल्या होत्या. इब्राहिम आणि अजमतुल्लाह या दोघांमध्ये 4 चेंडू मध्ये 4 धावांची भागीदारी झाली होती. (Semi Final AFG VS SA) आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 20 धावा 3 गडी बाद अशी झाली होती. इब्राहिम बाद झाल्यानंतर अजमतुल्लाह च्या साथीला मोहम्मद नबी हा फलंदाजीसाठी मैदानात आला. परंतु मोहम्मद नबी देखील अपयशी ठरला.
त्याला आपले खातेही खोलता आले नाही. चौथ्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. संघाचे धावफलक 20 असताना अफगाणिस्तान संघाची चौथी विकेट पडली. मोहम्मद नबी याला रबाडा याने बोल्ड केले नबी याने 3 चेंडू मध्ये आपले खातेही खोलले नव्हते. आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 20 धावा 4 गाडी बाद अशी झाली होती. अजमतुल्लाह आणि मोहम्मद नबी या दोघांमध्ये 3 चेंडू मध्ये शून्य धावांची भागीदारी झाली होती. आता अजमतुल्लाह च्या साथीला खरोटे हा फलंदाजीसाठी मैदानात आला. अफगाणिस्तान संघ या नाजूक स्थितीतून सावरेल असे वाटत होते. परंतु ही जोडी ही संघाला सावरू शकली नाही.
अवघ्या धावफलकामध्ये 3 धावांची भर पडल्यानंतर संघाची 5 वी विकेट पडली. संघाचे धावफलक 23 असताना अफगाणिस्तान संघाची 5 वी विकेट पडली 5 व्या ओवरच्या 6 व्या चेंडूवर खरोटे हा बाद झाला. खरोटे याला जंक्शन यानी डीकॉकच्या हाती झेल देत बाद केले.खरोटे यानी 7 चेंडू मध्ये 2 धावा केल्या होत्या. खरोटे आणि अजमतुल्लाह या दोघांमध्ये 8 चेंडूमध्ये 3 धावांची भागीदारी झाली होती. आता फलंदाजीसाठी 7व्या क्रमांकावर करीम जनत हा फलंदाजीसाठी आला या दोघांनी सावकाशपणे खेळण्यास सुरुवात केली.
संघाचे धावफलक 28 असताना अफगाणिस्तान संघाचे 6 वी विकेट पडली 7व्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर अजमतुल्लाह हा बाद झाला. अजमतुल्लाह याला नॉरखिया याने स्टबच्या हाती झेल देत बाद केले. अजमतुल्लाह याने 12 चेंडू मध्ये 10 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकार लगावले होते.(Semi Final AFG VS SA) अजमतुल्लाह आणि करीम जनत या दोघांमध्ये 9 चेंडू मध्ये 5 धावांची भागीदारी झाली होती. आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 28 धावा 6 गडी बाद अशी नाजूक स्थिती झाली होती. अजमतुल्लाह बाद झाल्यानंतर अफगाणिस्तान संघाचा कर्णधार राशीद खान हा फलंदाजीसाठी आला करीम जनत आणि रशीद खान या जोडीने संघाला थोडेफार सावरले.
या जोडीने संयमाने खेळी करत संघाला 50 धावांचा पल्ला गाठून दिला. संघाचे धावफलक 50 असताना अफगाणिस्तान संघाची 7 वी विकेट पडली .10 व्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर करीम जनत हा बाद झाला. करीम याला शमशि याने पायचीच बाद केले. होते करीम याने 13 चेंडूंमध्ये 8 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार लगावला होता. करीम जनत बाद झाल्यानंतर राशिद खानच्या साथीला नूर अहमद हा फलंदाजीसाठी आला आता अफगाणिस्तान संघाची स्थिती ही नाजूक झाली होती. या स्थितीतून सावरणे संघाला आता कठीण होते. एकाच ओव्हर मध्ये अफगाणिस्तान संघाची पुढील विकेट पडली 10 व्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर नूर अहमद देखील बाद झाला.
नूर अहमद याला शमशी याने पायचीत बाद केले. त्याला 2 चेंडूमध्ये खातेही न खोलता बाद केली. आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 50 धावा 8 गडी बाद अशी नाजूक झाली. पुढच्या ओव्हर मध्ये रशीद खान देखील बाद झाला. अफगाणिस्तान संघाचा कर्णधार राशीद खान याच्याकडून अपेक्षा होती. (Semi Final AFG VS SA) परंतु दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी पुढे अफगाणिस्तान संघाचा कोणताही फलंदाज टिकू शकत नव्हता. राशिद खान यानी 8 चेंडू मध्ये 8 धावा केल्या त्यामध्ये 2 चौकाला लगावले. रशीद खान याला नॉरखीया यानी बोल्ड आउट केले.
आता अफगाणिस्तान संघाची स्थिती 50 धावा 9 गडी बाद अशी झाली. आता फलंदाजीसाठी मैदानात नवीन अल हक आणि फारुखी ही जोडी मैदानात होती. या दोघांनी संघाला 56 धावांपर्यंत पोहोचविले 12 वे ओवरच्या 5 व्या चेंडू वर नवीन बाद झाला. नवीन याला पायचीत बाद केले नवीन यानी 8 चेंडू मध्ये 2 धावा केल्या होत्या. आणि फारुखियाने 2 चेंडू मध्ये 2 धावा केल्या होत्या. या दोघांमध्ये 9 चेंडूमध्ये 6 धावांची भागीदारी झाली होती. अफगाणिस्तान संघ पूर्ण 56 धावांवर आटोपला. अफगाणिस्तान संघाने 11.5 ओव्हर मध्ये सर्व गडी बाद 56 धावा केल्या. अफगाणिस्तान संघाने पावर प्ले मध्ये 28 धावा काढल्या होत्या.
दक्षिण आफ्रिका संघाकडून जेन्सन आणि शमशी यांना 3-3 विकेट मिळाल्या तर रबाडा आणि नॉरखीया या दोघांना 2- 2 विकेट मिळाल्या. दक्षिण आफ्रिकेच्या धारदार गोलंदाजी पुढे अफगाणिस्तान संघाने गुडघे टेकविले. आणि अवघ्या 56 धावांवर पूर्ण संघ बाद झाला. (Semi Final AFG VS SA) आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये अफगाणिस्तान संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती. परंतु सेमी फायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघापुढे अफगाणिस्तान संघ चांगली खेळी करू शकला नाही. दक्षिण आफ्रिका संघाला अवघे 57 धावांचे आव्हान देण्यात आले होते.
हे देखील वाचा : SA VS WI : वेस्टइंडीज T-20 World Cup 2024 मधून बाहेर, दक्षिण आफ्रिकेचा विजय
दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी
अफगाणिस्तान संघाने दिलेले 57 धावांचे आव्हान हे दक्षिण आफ्रिका संघासाठी किरकोळ असे होते. परंतु अफगाणिस्तान संघाची गोलंदाजी देखील ही अतिशय उत्कृष्ट असल्याने दक्षिण आफ्रिका संघाला हे आव्हान अवघड गेले असते. दक्षिण आफ्रिका संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी क्विंटन डी कॉक आणि हेंड्रिक ही जोडी मैदानात आली. या सामन्यात देखील क्विंटन हा अपयशी ठरला. क्विंटन डी कॉक यानी 1 चौकार मारला आणि तो बाद झाला. संघाचे धावफलक 5 धावा असताना दक्षिण आफ्रिका संघाची पहिली विकेट पडली दुसऱ्या ओवरच्या 5 व्या चेंडूवर क्विंटन डीकॉक हा बाद झाला.
क्विंटन डी कॉक याला फारुकी याने बोल्ड आउट केले. क्विंटन डिकॉकी यानी 8 चेंडू मध्ये 5 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार लगावला होता क्विंटन डी कॉक आणि हेंड्रिक या दोघांमध्ये 11 चेंडू मध्ये 5 धावांची भागीदारी झाली होती. आता दक्षिण आफ्रिकेचे धावफलक 5 धावा 1 गडी बाद असे झाले होते. हॅन्ड्रीच्या साथीला मारक्रम हा दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फलंदाजीसाठी मैदानात आला. या जोडीने कुठलीही घाई न करता संयमाने खेळी केली आणि अफगाणिस्तान संघाला कुठलाही चान्स न देता या जोडीने अखेरपर्यंत फलंदाजी केली.
आणि संघाला विजय मिळवून दिला. 8.5 ओव्हर मध्ये दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळविला.हॅन्ड्रिक आणि मारकरम नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला.(Semi Final AFG VS SA) हेंड्रिक याने नाबाद 25 चेंडूमध्ये 29 धावा केल्या. त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. तर दुसऱ्या बाजूने दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार मारक्रम याने नाबाद 21 चेंडू मध्ये 23 धावा केल्या. त्यामध्ये 4 चौकार लगावले होते. या दोघांमध्ये 43 चेंडू मध्ये 55 धावांची भागीदारी झाली होती. दक्षिण आफ्रिका संघाने 8.5 ओव्हर मध्ये 1 गडी गमावत 60 धावा केल्या.अफगाणिस्तान संघाकडून फारुकी याला 1 विकेट मिळाली.
हे देखील वाचा : AFG VS BAN : अफगाणिस्तानची सेमी फायनल मध्ये एन्ट्री, अफगाणिस्तानने रचला इतिहास
सामन्याचा मानकरी
(Semi Final AFG VS SA) दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सन हा सामन्याचा मानकरी ठरला. मार्को जेन्सन यानी 3 ओव्हर मध्ये 16 धावा देत अफगाणिस्तान संघाचे 3 महत्त्वाचे फलंदाज बाद केले होते.