Tata Altroz Racer Launch : टाटा ची ही नवीन कार लॉन्च, कोणत्या कार ची लावणार वाट
Tata Altroz Racer Launch : टाटा ची Altroz ही कार देशातील सर्वात वेगवान हॅशबॅक कार बनलेली आहे. या कार ने कमी वेळेत एक लाख पूर्ण करत रेकॉर्ड बनविले आहे.
Tata Altroz Racer Launch : Tata कंपनीच्या सर्व कार देशभरात प्रसिद्ध आहेत. Tata कंपनीच्या कार या सुरक्षित, लुक आणि मजबुती मध्ये उत्कृष्ट असतात. Tata कार कंपनी ही देशातील एक नंबर कार कंपनी आहे. प्रत्येक महिन्याला लाखाने मॉडेल हे Tata कार कंपनीचे विकले जातात. प्रत्येक सेगमेंट मधील कारमध्ये Tata कंपनी ही टॉप लाच आहे, (Tata Altroz Racer Launch) सुरक्षिततेच्या बाबतीत Tata ही एकमेव कंपनी आहे की तिला 5 स्टार रेटिंग आहे. Tata ने आपली Altroz कार काही वर्षांपूर्वी लॉन्च केली होती या कार ला देखील देशभरातून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.Tata कंपनीने या कार मध्ये नवीन बदल करत पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपली Altroz लॉन्च केली आहे.
या कार मध्ये कंपनीने आता नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. Tata कंपनीने Altroz या कार मध्ये Altroz Racer हे नवीन मॉडेल मार्केट मध्ये उतरवले आहे. या कार ने सर्वात कमी वेळे मध्ये एक लॅप पूर्ण करून नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. (Tata Altroz Racer Launch) हे रेकॉर्ड यापूर्वी i 20 या कार च्या नावावर होते. कमी वेळेमध्ये एक लॅप पूर्ण करत Tata च्या Altroz या कार ने i20 कारला मागे टाकून देशातील नंबर एक Racer कार बनलेली आहे. या कारचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् या पुस्तकामध्ये नोंद झाली आहे. भारत देशाचा फॉर्मुला वन Racer नारायण कार्तिकेयन यानी या कारची ड्राईव्ह घेतली होती. 5 जून रोजी या कार ची टेस्टिंग घेण्यात आली होती.
Tata Altroz Racer या कारला आहे 5 स्टार रेटिंग
Tata कंपनीने Altroz ही कार मार्केटमध्ये 7 जून रोजी लॉन्च केलेली आहे. ही एक स्पोर्ट एडिशन मधील Racer कार आहे. ही देशातील एकमेव स्पोर्ट कार आहे. (Tata Altroz Racer Launch) तिला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेली आहे. या कार व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या स्पोर्टी कार ला 5 स्टार क्रॅश रेटिंग मिळालेली नाही. तसेच या हॅचबॅक कार ला कंपनीने 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे. देशातील ही एकमेव स्पोर्टी हॅचबॅक कार आहे. जि ला 360 डिग्री कॅमेरा देण्यात आलेला आहे. तसेच या कारमध्ये वायरलेस चार्जिंग देखील दिलेले आहे.
Tata Altroz Racer Price कारची किंमत
Tata कंपनीच्या कार या डिझाईन मध्ये आणि मजबुतीमध्ये उत्कृष्ट असतातच त्याचबरोबर या कारच्या किमती देखील या कमी असतात. (Tata Altroz Racer Launch) बाकी कार कंपनीच्या तुलनेमध्ये फीचर्स आणि मजबुती असून सुद्धा या कारची किंमत ही सामान्यच असते. कंपनीने या कारची किंमत 9.49 लाख रुपये ठेवली आहे. ही किंमत एक्स शोरूम असेल या किमतीमध्ये आरटीओ चार्जेस, टॅक्स वगैरे एक्स्ट्रा असणार आहे. या कार च्या अचूक किमती बद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या जवळील डीलर ला भेट द्यावी.
Tata Altroz Racer Car Features कार मधील फीचर्स
Altroz या कार मध्ये कंपनीने डॅशबोर्डवर 10.25 इंच चा टच स्क्रीन डिस्प्ले दिलेला आहे. या डिस्प्ले ची साईज मोठी असून हा ऑपरेट करण्यासाठी सोयीस्कर आहे. (Tata Altroz Racer Launch) त्याचबरोबर मोठ्या आकाराचा असल्याने त्यावरील सर्व कंट्रोल हे सहजपणे दिसतात.तसेच कार मध्ये वायरलेस अँड्रॉइड आणि एप्पल कार प्ले सारख्या सुविधा देण्यात आलेल्या आहे. ड्रायव्हरच्या समोर 7 इंच चा मोठा डिजिटल क्लस्टर डिस्प्ले देण्यात आलेला आहे. ड्रायव्हरचे सीट हे हाईट् ऍडजेस्टेबल आहे. ड्रायव्हर आपल्या उंचीनुसार या सीट चे हाईट कमी जास्त करू शकतो. त्याचबरोबर कारमधील पुढील दोन्ही सीट हे व्हेंटिलेटेड प्रकाराचे आहे.
यामुळे या सीटच्या आतून थंड हवा येते आणि जास्त प्रवास केल्यानंतरही प्रवाशांना उष्णता जाणवत नाही. या कारचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या कार मध्ये वाईस कमांड सनरूफ देण्यात आलेले आहेत. समरूफ ओपन किंवा क्लोज करण्यासाठी फक्त वाईस कमांड दिली तरी ते ऑपरेट होते. (Tata Altroz Racer Launch) हे अत्याधुनिक फीचर्स या कार मध्ये कंपनीने दिले आहे. तसेच कार मध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल दिलेले आहे हे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल गाडीच्या आतील टेंपरेचर सेन्स करून त्यानुसार गाडीमध्ये वातावरण हे संतुलित ठेवते.
Tata Altroz Racer Safety सेफ्टी
या कार मध्ये कंपनीने 6 एअरब्याग दिले आहे. सेफ्टी च्या बाबतीत Tata कंपनीची कार या 5 स्टार रेटिंग असतात. देशातील ही एकमेव कंपनी आहे ज्या कंपनीला 5 स्टार क्रॅश रेटिंग मिळालेली आहे. (Tata Altroz Racer Launch) त्याचबरोबर 360 डिग्री कॅमेरा, क्रूज कंट्रोल, पार्किंग सेन्सर, टायर प्रेशर, मॉनिटरी चाइल्ड, अँकर सीट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, असिस्ट कंट्रोल आणि सर्व सीटासाठी सीट बेल्ट अशा अनेक सेफ्टी सुविधा या कारमध्ये कंपनीमध्ये दिलेल्या आहेत.
Tata Altroz Racer Color कलर
Tata कंपनीची Altroz ही कार 3 कलर मध्ये उपलब्ध आहे. या कार चा कलर हा आकर्षित करणारा असून तो स्पोर्टी लुक मध्ये आहे. या कारचा बाहेरून कलर हा ड्युअल टोन मध्ये देण्यात आलेला असून तो स्पोर्टी लुक ला दर्शवतो. ही कार 3 कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.
- Pure grey black roof
- Orange black
- Avenue white black roof
अशा या 3 कलर ऑप्शन मध्ये ही कार उपलब्ध आहेत. या कलर मध्ये गाडीची पूर्ण बॉडी ही एका कलर मध्ये असते आणि गाडीचे बोनेट आणि रूफ हे दुसऱ्या कलर मध्ये असते. (Tata Altroz Racer Launch) या प्रकारचे कलर कॉम्बिनेशन या कार मध्ये दिलेले आहे. या 3 कलर पर्यायांपैकी ऑरेंज ब्लॅक या कलरची सर्वात जास्त मागणी आहे.
Tata Altroz Racer Engine कारचे इंजिन
Tata Altroz ही एक Racer कार असल्याने यामध्ये टर्बो इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे. या कारमध्ये 1.2 लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन दिलेले आहेत. या इंजिनची क्षमता 1199 CC आहे. तसेच हे इंजिन 118.35bhp@5500rpm आणि 170nm@1750-4000rpm एवढे टोर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 3 सिलेंडरचे असून यामध्ये 4 वाल चा वापर करण्यात आलेला आहे. तसेच या इंजिन मध्ये इंधन सप्लाय हा डायरेक्ट इंजेक्शन पद्धतीचा दिलेला आहे. हे इंजिन टर्बो चार्जर आहे तसेच यामध्ये आपल्याला ट्रान्समिशन साठी मॅन्युअल गिअर बॉक्स दिलेला आहे. (Tata Altroz Racer Launch) या इंजिन मध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स दिलेले आहे. तसेच या इंजिनची ताकद ही कार च्या पुढील चाकांना देण्यात आलेली आहे.
Tata Altroz Racer Fuel Type इंधन प्रकार
Altroz ही कार फक्त पेट्रोल व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. या कार मध्ये पेट्रोल साठवण्याची टाकीची क्षमता ही 37 लिटरची आहे आणि ही कार BS VI 2.0 या नॉर्म्सवर आधारित आहे. कंपनीने दिलेल्या माहिती नुसार या कार मध्ये डिझेल व्हेरिएंट आणि सीएनजी व्हेरिएंट देखील तयार करणार आहे. सध्या ही कार फक्त पेट्रोल व्हेरिएंट मध्येच उपलब्ध आहे.
Tata Altroz Racer Brake and Suspension ब्रेक आणि सस्पेन्शन
या कार मध्ये पुढील चाकांसाठी इंडिपेंडेंट मॅक फर्जंन विथ कॉइल हे सस्पेन्शन वापरण्यात आलेले आहे. तर मागील चाकांसाठी विथ कॉइल स्प्रिंग आणि शॉक ऑबजरवर या प्रकारचे सस्पेन्शन दिलेले आहे. हे सस्पेन्शन अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचे असून ही कार स्पोर्ट असल्याने या अत्याधुनिक सस्पेन्शन चा वापर करण्यात आलेला आहे. या कारचे टर्निंग रेडियस ही 5 मीटर इतकी आहे. तसेच या कारच्या पुढील चाकांसाठी डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे आणि मागील चाकांसाठी ड्रम ब्रेक दिलेले आहे. कारचे सर्व चाक हे 16 इंच च्या साईज चे आहे. तसेच चार ही चाक हे आलोय व्हील आहे.
Tata Altroz Racer Size कारची साईज
या कारच्या साईज बद्दल बोलायचे झाल्यास या कारची लांबी ही 3990 mm रुंदी 1755mm इतकि आहे. या कार मध्ये बूट स्पेस हा खूप मोठा देण्यात आलेला आहे. (Tata Altroz Racer Launch) कंपनीने या कारमध्ये बूट स्पेस 345 लिटर चा दिलेला आहे. या कारची सीटिंग कॅपॅसिटी ही 5 लोकांची आहे. या कार चा ग्राउंड क्लिअरन्स हा 165mm इतका आहे. तसेच या कार चा व्हील बेस हा 2501mm इतका आहे. तसेच या कार ला एकूण 4 दरवाजे आहेत आणि मागे बूट स्पेस साठी 1 दरवाजा देण्यात आलेला आहे.
Tata Altroz Racer आरामदायक सुविधा
कंपनीने या कार मध्ये पावर स्टेरिंग दिलेले आहे. तसेच हे स्टेरिंग ऍडजेस्टेबल आहे. या कारच्या सर्व काचा या पावर ऑपरेटेड आहे. तसेच कार मध्ये पावरफुल एसी त्याचबरोबर हीटर देखील दिलेले आहे. या कार मधील ड्रायव्हर सीट हाईट ऍडजेस्टेबल आहे आणि पुढील 2 सीट हे व्हेंटिलेटेड दिलेले आहे. (Tata Altroz Racer Launch) या कार च्या मागे रीडिंग लॅम्प दिलेला आहे. तसेच मागील सीटांसाठी ऍडजेस्टेबल हेड रेस्ट दिलेले आहे. या कार मध्ये कफ होल्डर आणि एसी वेन्ट पाठीमागे दिलेले आहे.
तसेच कार मध्ये क्रूज कंट्रोल, अँड्रॉइड एप्पल कार प्ले, वायरलेस चार्जर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अशा अनेक सुविधा दिलेल्या आहेत. या कारमध्ये जेबीएल चे 4 स्पीकर दिलेले आहे. यामध्ये 2 स्पीकर पाठीमागे आणि 2 स्पीकर पुढे देण्यात आलेले आहे. कार मध्ये सीट बेल्ट वार्निंग, अझर वार्निंग, हाय स्पीड अलर्ट, असे खूप सारे फीचर्स दिलेले आहेत.