Tata Nexon EV Range : फक्त एकदा चार्ज केल्यानंतर हि कार चालते एवढे किलोमीटर, किंमत ऐकून व्हाल थक्क
Tata Nexon EV Range : देश भरात वाढत्या इलेक्ट्रिकल कारच्या क्रेझ मध्ये Tata Nexon EV या इलेक्ट्रिकल कार ने सध्या देशभरात धुमाकूळ घातलेला आहे. TATA Nexon EV ही कार लॉन्च झाल्यापासून पूर्ण देशातील इलेक्ट्रिकल कारचे मार्केट आपल्या ताब्यात घेतले आहे. TATA Nexon EV लॉन्च झाल्यापासून या कारची प्रचंड अशी विक्री झाली आहे.
Tata Nexon EV Range तसेच या कार ने इतिहास रचला आहे. या कारचे देशभरात सर्वात जास्त मॉडेल विक्री झाले आहे. TATA Nexon EV ही एक SUV कार असून या कारचा लुक आणि फीचर्स हे जबरदस्त आहेत. तसेच टाटाच्या कारला देशभरात मागणी ही जास्तच असते TATA कंपनीच्या कार या मजबुती आणि फीचर्स या गोष्टींसाठी ओळखल्या जातात.
बाकी कंपनींच्या तुलनेमध्ये TATA कंपनीने Nexon EV हि कार अगदी कमी दरात आणि योग्य अशी रेंजमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता देखील ही कार सहजपणे खरेदी करून शकते. TATA कंपनीच्या Nexon EV या कारला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये MG Hector ची एसयूव्ही कार आणि TATA ची स्वतःचीच दुसरी इलेक्ट्रिकल कार TATA Punch EV ही आहे. (Tata Nexon EV Range) एमजी हेक्टर कंपनीची कार जरी मार्केटमध्ये उपलब्ध असली तरी त्या कारची किंमत TATA Nexon EV च्या तुलनेत जास्त आहे. फीचर्स आणि मजबुती या गोष्टी TATA Nexon EV मध्ये अधिक असल्याने लोकांची पसंती टाटा Nexon EV या कारला अगोदर आहे.
TATA Nexon EV Range या कारची रेंज
सुरुवातीला TATA Nexon EV ची रेंज कंपनीने कमी दिलेली होती परंतु TATA कंपनीने आपल्या कार मध्ये बदल करत आता या कारची रेंज वाढवून दिलेली आहे. सुरुवातीला कमी रेंज असल्याने ग्राहकांना वारंवार कार चार्जिंग करायला लागत होती. (Tata Nexon EV Range) आता TATA कंपनीने रेंज वाढवली आहे त्याचबरोबर चार्जिंग करण्यासाठी लागणारा वेळ देखील कमी केलेला आहे. चार्जिंग करण्यासाठी फास्ट चार्जर उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांची आता चिंताच मिटली आहे. TATA Nexon EV ही कार 2 बॅटरी बॅकपॅक मध्ये उपलब्ध आहे.
यामध्ये 30 Kwh आणि 40.5 Kwh असे 2 बॅटरी बॅक पॅक देण्यात आलेले आहेत. 30 Kwh बॅटरी असलेले व्हेरियंट ची रेंज 325 Km पर्यंत आहे आणि 40.5 Kwh बॅटरी असलेले व्हेरियंट ची 465 Km पर्यंत रेंज आहे. (Tata Nexon EV Range) प्रत्येक कार ची रेंज ही त्यामध्ये असलेल्या बॅटरी पॅक वर अवलंबून आहे. TATA Nexon EV ही कार मुख्यता या 2 बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या व्हेरियंट मध्ये या 2 पर्यायांपैकी जी बॅटरी असेल तेवढी रेंज ती कार देते. आता ही रेंज TATA कंपनीने दिलेली आहे.
परंतु सत्य परिस्थितीमध्ये कार रेंज थोडी कमी देते कार ची रेंज ही कार कोणत्या रोडवर चालत आहे आणि कार मधील एसी यावर अवलंबून आहे. तसेच या कारमध्ये गिअर नसून तीन वेगळे मोड देण्यात आलेले आहे ज्यामध्ये स्पोर्ट, इकॉनॉमी आणि सिटी हे तीन मोड दिलेले आहेत. स्पोर्ट मोडमध्ये कार जास्त स्पीड ने धावू शकते हा मोड सरळ आणि सपाट रोडवर वापरण्यात येतो. इकॉनोमी मोड हा सर्वात जास्त रेंज देणार आहे.
या मोडमध्ये कारचा स्पीड हा ठीक असतो आणि या मोड मध्ये कार गरजे एवढा पावर जनरेट करते. तिसरा मोड हा सिटी मोड आहे. हा मोड मुख्यता सिटीमध्ये वापरण्यात येतो शहरांमध्ये जास्त रहदारी आणि गतिरोधक असतात अशा ठिकाणी सिटी मोडचा वापर होतो. (Tata Nexon EV Range) या तिन्ही मोडवर कारची रेंज अवलंबून आहे तसेच यामध्ये जर एसी वापरला तर कारची रेंज अजून थोडी कमी होते.
TATA Nexon EV Battery या कारची बॅटरी
TATA Nexon EV या कार मध्ये 2 प्रकारची बॅटरी वापरण्यात आलेली आहे. वापरण्यात आलेल्या 2्ही बॅटरी या लिथियम आयन च्या आहेत. लिथियम आयन बॅटरी मुळे कारला जास्त रेंज मिळते. त्याचबरोबर या बॅटरीला जागा देखील कमी लागते. यामध्ये 30Kwh आणि 40.5kwh या 2 लिथियम आयन बॅटरी चा वापर करण्यात आलेला आहे.
TATA Nexon EV ही कार लॉन्ग रेंज (465Km)आणि मिडीयम रेंज (325Km) या 2 पर्यायांमध्ये उपलब्ध असल्याने या 2 व्हेरियंटमध्ये 2 वेगळ्या बॅटरी वापरण्यात आलेल्या आहेत लॉंग रेंज साठी 40.5Kwh या बॅटरीचा वापर करण्यात आलेला आहे तर मिडीयम रेंज साठी 30Kwh या बॅटरी चा वापर करण्यात आलेला.(Tata Nexon EV Range)
Charging Time चार्जिंग साठी लागणारा वेळ
जसे की TATA Nexon EV कार 2 बॅटरी पर्याय मध्ये उपलब्ध आहे. 30 Kwh आणि 40.5 Kwh या 2 बॅटरी पर्यायांमुळे बॅटरी चार्जिंग करण्यासाठी लागणारा वेळ हा देखील वेगळा आहे. यामध्ये 30 Kwh या बॅटरीच्या व्हेरियंटला 10- 100% चार्जिंग करण्यासाठी 7.2 Kw AC चार्जर ला 4:30 मिनिट लागतात. 40.5 Kwh बॅटरी असलेल्या व्हेरियंटला 10- 100% चार्जिंग होण्यासाठी 6 तास लागतात.
फास्ट चार्जर ने दोन्ही व्हेरियंटला चार्जिंग होण्यासाठी फक्त 56 मिनिट लागतात. या कार मध्ये आता फास्ट चार्जरची सोय दिल्याने कमी वेळामध्ये देखील गाडी पूर्ण चार्ज होते. (Tata Nexon EV Range) तसेच आपण या कार ने वाहन टू लोड, वाहन टू वाहन देखील चार्ज करू शकतो. जसे की 2 TATA Nexon EV कार असतील तर आपण एका कार ने दुसऱ्या कारला देखील चार्ज करून शकतो.
TATA Nexon EV Battery Warranty बॅटरीची वॉरंटी
TATA Nexon EV या कार मध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. आपल्याला यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की या बॅटरीची वारंटी ही 8 वर्ष किंवा 160000 किलोमीटर यापैकी जे अगोदर पूर्ण होईल. या कालावधीमध्ये जर आपल्याला बॅटरी बदलण्याची गरज पडली तर या वॉरंटी कालावधीमध्ये आपण बॅटरी बदलून घेऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत.
बॅटरीचे आयुष्य वाढविण्यासाठी आपल्याला बॅटरीची देखभाल करणे आवश्यक आहे. जसे की कार ही थंड ठिकाणी आणि कोरड्या ठिकाणी उभी करणे. बॅटरीचा पाण्यासोबत संपर्क टाळावा. (Tata Nexon EV Range) बॅटरी पूर्ण डिस्चार्ज होईपर्यंत वापर टाळणे ज्यावेळेस जास्त काळासाठी कारचा वापर होणार नसल्यास बॅटरी बंद करून ठेवणे.
TATA Nexon EV Battery Replacement बॅटरी किंमत
या कारमध्ये वापरण्यात आलेल्या लिथियम आयन बॅटरी ची आपल्याला 8 वर्ष किंवा 160000 Km ची वारंटीमिळते. यापैकी जे अगोदर पूर्ण होईल ती वारंटी ग्राह्य धरली जाते. वारंटी मध्ये जर कार ची बॅटरी खराब झाली तर कंपनीकडून आपल्याला नवीन बॅटरी मिळते. परंतु जर वारंटी संपली असेल तर आपल्याला नवीन बॅटरी घ्यावी लागते. या बॅटरीची किंमत ही राज्यानुसार आणि सिटी नुसार वेगळी असू शकते या बॅटरीची किंमत 5 ते 5.5 लाख पर्यंत आहे.
या किंमत मध्ये बॅटरीची किंमत आणि ती बसवण्यासाठी लागणारा लेबर चार्ज हे मिळून आहेत. नवीन बॅटरी बसविण्यासाठी लागणारा खर्च हा मुख्यता शहर आणि लेबर चार्जेस यानुसार असतो. तसेच प्रत्येक सर्विस सेंटर नुसार त्या बॅटरीची किंमत वेगळी असू शकते. तुम्हाला बॅटरीची अचूक किंमत माहित करण्यासाठी आपल्या जवळील सर्विस सेंटरला भेट देणे योग्य ठरेल.
TATA Nexon EV Price या कारची किंमत
या कारमध्ये एकूण 10 व्हेरियंट आहे. प्रत्येक मॉडेलची किंमत ही त्यामध्ये वापरण्यात आलेल्या बॅटरी आणि त्या कारच्या रेंज वर अवलंबून आहेत. खाली दिलेल्या कारच्या किंमत या एक्स शोरूम आहे. (Tata Nexon EV Range) त्यांची ऑन रोड किंमत यापेक्षा अधिक असेल. या इलेक्ट्रिकल कार मध्ये क्रिएटिव्ह, फियरलेस आणि इम्पॉर्ड असे तीन मुख्य ट्रीम आहे. त्यांची किंमत बेसिक मॉडेल पासून तर टॉपच्या मॉडेल पर्यंत वेगळी आहे. या प्रकारामध्ये बेसिक मॉडेल हे 14.49 लाख रुपये पासून तर टॉपचे मॉडेल हे 19.99 लाख रुपये पर्यंत आहेत.
क्रमांक | मॉडेल चे नाव | बॅटरी क्षमता (Kwh) | रेंज (किलोमीटर) | किंमत रु. |
1 | Nexon EV Creative Plus | 30 Kwh | 325 Km | 14.49 लाख |
2 | Nexon EV Fearless | 30 Kwh | 325 Km | 15.99 लाख |
3 | Nexon EV Fearless Plus | 30 Kwh | 325 Km | 16.49 लाख |
4 | Nexon EV Fearless LR | 40.5 Kwh | 465 Km | 16.99 लाख |
5 | Nexon EV Fearless Plus S | 30 Kwh | 325 Km | 16.99 लाख |
6 | Nexon EV Empowered | 30 Kwh | 325 Km | 17.49 लाख |
7 | Nexon EV Fearless Plus LR | 40.5 Kwh | 465 Km | 17.49 लाख |
8 | Nexon EV Fearless Plus S LR | 40.5 Kwh | 465 Km | 17.99 लाख |
9 | Nexon EV Empowered Plus LR | 40.5 Kwh | 465 Km | 19.29 लाख |
10 | Nexon EV Empowered Plus LR Dark | 40.5 Kwh | 465 Km | 19.99 लाख |
TATA Nexon EV Engine या कार चे इंजिन
TATA Nexon EV ही कार इलेक्ट्रिकल आहे. यामध्ये इंजिन नसून पावर जनरेट करण्यासाठी बॅटरी आणि इलेक्ट्रिकल मोटरचा वापर करण्यात आलेला आहे. या कारमधील लॉंग रेंजचे मॉडेल हे जास्तीत जास्त 142.68 bhp एवढी पावर जनरेट करू शकते आणि जास्तीत जास्त टॉर्क 215nm एवढा जनरेट करू शकते. मिडीयम रेंजमध्ये असलेली कार ही 129 bhp एवढा जास्त पावर जनरेट करू शकते आणि 215 nm एवढा टॉर्क जनरेट करू शकते.
TATA Nexon EV Features या कारमधील फीचर्स
या कारमध्ये कंपनीने अगदी भरभरून असे फीचर्स दिलेले आहे. अगदी कमी किंमत असलेल्या या कार मध्ये TATA कंपनीने खूप सारे लक्झरी कारचे फीचर्स दिलेले आहे. कारच्या आतमध्ये समोरील डॅशबोर्डवर 10.25 इंच एवढा मोठा डिजिटल डिस्प्ले दिलेला आहेत. (Tata Nexon EV Range) मोठा डिस्प्ले असल्यामुळे चालकाला डिस्प्ले मधील सर्व रीडिंग या अगदी सहजपणे दिसतात. तसेच डॅशबोर्डच्या सेंटरला 12.3 इंच चा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले देण्यात आलेला आहे.
या कारमध्ये वायरलेस फोन चार्जिंग, वायरलेस एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड प्ले देण्यात आलेले आहेत. या कारचे समोरील सिट हे व्हेंटिलेटेड देण्यात आलेले आहे. तसेच ऑटोमॅटिक AC दिलेला आहे. या कार मध्ये जेबीएल (JBL) ची साऊंड सिस्टिम दिलेली असून त्यासोबत 9 स्पीकर देण्यात आले आहेत. क्रूज कंट्रोल, सनरूफ, 6 एअर बॅग, 360 डिग्री कॅमेरा, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर असे खूप सारे फीचर्स या कारमध्ये उपलब्ध आहेत.
हे वाचा : Mahindra Thar Price : हि आहे देशातील सर्वात जास्त लोकप्रिय SUV, जाणून घ्या कींमत
Safety या कार मधील सेफ्टी
या कारमध्ये TATA कंपनीने खूप सारे सेफ्टी साठी फीचर्स दिलेले आहेत. TATA कंपनी ही जगभरात आपल्या मजबुतीसाठी ओळखले जाते. (Tata Nexon EV Range) कंपनीने कारच्या आत मध्ये बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही कसर सोडलेली नाही. TATA कंपनीच्या कारला ग्लोबल N-CAP क्रॅश टेस्टिंग मध्ये 5 स्टार मिळालेले आहेत. देशात TATA कंपनी व्यतिरिक्त कोणत्याही कार कंपनीला 5 स्टार रेटिंग नाही.
या कारमध्ये 6 एअर बॅग दिले आहेत. ज्या ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काम करतात. तसेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक असे अनेक फीचर्स दिलेले आहेत. सीट बेल्ट वार्निंग, डोअर अजर वार्निंग, इंजिन इमोबलाईजर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, पाठीमागचा कॅमेरा, स्पीड अलर्ट, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, हाय डिसेंट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, हाय असिस्ट असे विविध फीचर्स या कारमध्ये आपल्याला मिळतात.
हे देखील वाचा : TATA HARRIER PRICE 2024 : हि आहे TATA ची सर्वात दमदार कार, जाणून घ्या कींमत